११ सप्टेंबर १८९३ : भारतीय संस्कृतीचा दिग्विजयी घोष ! 

११ सप्टेंबर १८९३ : भारतीय संस्कृतीचा दिग्विजयी घोष ! 
तो दिवस होता—
११ सप्टेंबर १८९३!
ज्या क्षणी शिकागोच्या सर्वधर्मपरिषदेतून
एक विराट, अमर, आत्मोन्मुख ध्वनी विश्वभर घुमला,
“माझ्या बंधु आणि भगिनींनो!” या साध्या, परंतु दिग्विजयी शब्दांतून हिंदु संस्कृतीचे
अद्वितीय तेज पाश्चात्यांच्या हृदयात उतरले…
तेथे उभा होता—
भगव्‍या वस्त्रांमध्ये एक तेजोमय संन्यासी,
नेत्रांत दिपणारी उर्जा,
कंठात सिंहगर्जना,
आणि हृदयात अखंड भारताचा अमर आत्मा!
ते होते—स्वामी विवेकानंद!
जगाला त्‍यांनी भारताचा परिचय करविला,
की भारत हा केवळ दारिद्र्याचा, गुलामगिरीचा
भूभाग नाही,
तर तो आहे—
मानवतेच्या आणि सभ्‍यतेच्‍या अखंड मंगलमय
प्रवाहाचे पवित्र तीर्थक्षेत्र
स्वामींच्या प्रत्येक वाक्यातून वाहत होती
अध्यात्माची गंगा,
समानतेची सिंधू,
आणि सार्वभौम बंधुत्वाचा अमर झरा!
त्यांच्या कंठातून निघालेला प्रत्येक शब्द
जणू प्रज्वलित ज्वाला,
जगाच्या हृदयातील अंधकाराचा नाश करणारी.
त्यांचा भावार्थ होता —
“ उदार चरितानां तू वसुधैव कुटुंबकम् ”,
संपूर्ण पृथ्‍वी म्‍हणजे एक कुटुंबच,
त्या क्षणी—
भारताची भूमी नव्याने ओळखली गेली.
गुलाम देशातील ही दिव्य ओजस्विता पाहून
पाश्चात्यांनी नम्रतेने माना झुकविल्या.
भारताची संस्कृती ही मागासलेली नाही,
तर मानवतेच्या उन्नतीसाठी
जगाला मार्गदर्शक ठरलेली सर्वश्रेष्ठ परंपरा आहे—
हे शिकागोच्या सभागृहात सिध्‍द झाले .
स्वामी विवेकानंदांचा तो दिव्य घोष
आजही प्रत्येक भारतीयाच्या हृदयात चेतना
निर्माण करतो.
ते म्हणाले होते
“उठा, जागे व्हा आणि ध्येयप्राप्ती होईपर्यंत थांबू नका!”
हाच मंत्र आजही तरूणांना सिंहगर्जनेप्रमाणे आवाहन करतोय्…
आज जेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची
भारतीय संस्‍कृतीच्‍या उत्‍थानाची यात्रा
शताब्दी वर्षात पोहोचली आहे,
तेव्हा प्रकर्षानं वाटतं
स्वामी विवेकानंदांच्या शिकागोतील त्‍या दिग्विजयी
घोषणेला
जणू मूर्त स्वरूप प्राप्त होत आहे.
स्वामी विवेकानंदांनी रोवलेला भारतीय संस्कृतीच्या दिग्विजयाचा ध्वज
लाखों स्‍वयंसेवकांच्‍या परिश्रमातुन, त्‍यागातुन
अधिक तेजाने आणि मांगल्‍याने फडकतो आहे
आणि
दिग्विजयाची यात्रा आणखी शंभर पाऊले
पुढे गेली आहे.. .
आज आपण सारे—
स्वामी विवेकानंदांच्या शिकागो दिग्विजय दिनाच्या
स्मरणात उभे असताना
घोष ऐकतो आहोत—
“भारत पुन्हा विश्वगुरु बनेल!”
“भारतमाता पुन्‍हा जगतगुरू पदी विराजमान
झालेली बघतो आहे” स्वामी विवेकानंदांना
झालेली ही दिव्‍यदृष्‍टी
साकार होत असल्‍याचा विश्‍वास आज वाढतो आहे. . .
स्‍वामी विवेकानंदांच्‍या दिग्विजयी यात्रेचा दीप
भारतभूमी उजळून टाकतो आहे
तो जगालाही प्रकाश दाखविणार आहे. . .
मानवतेचा, कल्‍याणाचा आणि समृध्‍दीचाही. . .
“येणारी पन्नास वर्षे भारतमाता हेच
आमचं दैवत असलं पाहिजे” स्वामी विवेकानंदांचा
हा संदेश प्रत्येक भारतवासीयाच्या मनामनात
भिनला पाहीजे…
” भारतमाता की जय” हा मंत्रच सर्व समस्यांवरचं एकमात्र उत्तर आहे.
© निशिकांत,
अकोला

“नियती: कृष्ण कर्ण संवाद” – जेव्हा नियती, धर्म आणि मानवता यांचा महासंवाद घडला

“नियती: कृष्ण कर्ण संवाद” – जेव्हा नियती, धर्म आणि मानवता यांचा महासंवाद घडला

लेखक: गोपाल संतोष गांधी
9850670057
8668833551

प्रकाशक: इंक व्हिजन प्रेस पब्लिशिंग

काय होते जेव्हा इतिहासातील सर्वात शोकात्म महानायक, नियतीला दिशा देणाऱ्या सारथ्यासमोर उभा ठाकतो?
काय होते जेव्हा एकाच आकाशात दोन सूर्य एकमेकांना भिडतात? आणि काय होते जेव्हा धर्म, वचन, निष्ठा आणि रक्ताचे नाते अशा धर्मसंकटात अडकतात, जिथे प्रत्येक मार्ग विनाशाकडेच जातो?
याच गहन प्रश्नांच्या मुळाशी जाऊन लेखक गोपाल गांधी यांनी “नियती: कृष्ण कर्ण संवाद” ही एक अशी साहित्यिक कृती रचली आहे, जी महाभारताच्या एका अध्यायाचे केवळ पुनर्वाचन नाही, तर त्याच्या आत्म्याचे मनोवैज्ञानिक क्ष-किरण (X-ray) आहे.

ही कादंबरी तुम्हाला कुरुक्षेत्राच्या त्या रणांगणावर नेत नाही जिथे शस्त्रांचा कोलाहल आहे, तर त्या रणांगणावर नेते जे कृष्ण, कर्ण, दुर्योधन आणि कुंती या पात्रांच्या मनात लढले जात होते. जर तुम्ही महाभारताला केवळ घटनांचा संग्रह मानत असाल, तर हे पुस्तक तुमचा दृष्टिकोन बदलून तुम्हाला एका खोल आणि भावनिक अनुभवाने समृद्ध करेल.

कथेचा केंद्रबिंदू: गहन संवाद

पुस्तकाचा गाभा कृष्ण आणि कर्ण यांच्यातील ऐतिहासिक संवादावर केंद्रित आहे. शांतीचे सर्व मार्ग बंद झाल्यावर, अखेरचा प्रयत्न म्हणून श्रीकृष्ण कर्णाला भेटतात. लेखकाने या भेटीला एका सामान्य राजकीय घटनेऐवजी एक गहन, तात्विक आणि भावनिक महासंवादाचे स्वरूप दिले आहे. गंगेच्या तीरावर, रात्रीच्या शांततेत, जिथे केवळ लाटांचे संगीत आणि ताऱ्यांची निःशब्द नजर साक्षी आहे, हा संवाद दोन व्यक्तींमध्ये नाही, तर दोन विचारसरणी, दोन सत्य आणि दोन नियतींमध्ये घडतो.जेव्हा श्रीकृष्ण कर्णासमोर त्याच्या जन्माचे रहस्य उलगडतात, तेव्हा ती केवळ एक माहिती नसते. तो एक असा वज्राघात असतो, जो कर्णाचे संपूर्ण अस्तित्व, त्याची ओळख, त्याच्या निष्ठा आणि त्याच्या आयुष्यभराच्या अपमानांना एका क्षणात हादरवून टाकतो. येथूनच ही कादंबरी वाचकाला आपल्या भावनिक पकडीत घेते आणि अशा प्रवासावर घेऊन जाते, जिथे प्रत्येक पानावर एक नवीन रहस्य आणि एक नवी वेदना उलगडते.

पुस्तकाची बलस्थाने:

1.सखोल मनोवैज्ञानिक चित्रण: या पुस्तकाची सर्वात मोठी शक्ती म्हणजे पात्रांचे अभूतपूर्व मनोवैज्ञानिक चित्रण. लेखकाने कर्ण, कृष्ण आणि दुर्योधन यांसारख्या प्रस्थापित पात्रांच्या मनाचे थर उलगडले आहेत. कर्णाची वेदना केवळ सामाजिक तिरस्कारापुरती मर्यादित नाही. लेखक त्याची निष्ठा, त्याचे वचन, त्याचा धर्म आणि नव्याने कळलेल्या सत्यामधील संघर्ष अत्यंत मार्मिकपणे मांडतात. हे कर्णाचे सर्वात मानवी आणि तरीही सर्वात दृढ चित्रण आहे.

2.काव्यात्मक आणि तत्त्वज्ञानाने ओतप्रोत भाषा: गोपाल गांधी यांची भाषा या कादंबरीचा आत्मा आहे. “पश्चिमेकडील क्षितिज एखाद्या हताश राणीच्या विखुरलेल्या कुंकवाप्रमाणे रक्तवर्णी झाले होते,”

किंवा “हा संवाद केवळ दोन व्यक्तींमधील संभाषण नसून, तो धर्म आणि अधर्म, सत्य आणि असत्य, कर्तव्य आणि मोह यांच्यातील संवाद आहे,” यांसारखी वाक्ये कथेला एक काव्यात्मक उंची देतात. भाषा इतकी जिवंत आणि प्रवाही आहे की वाचक स्वतःला त्या कालखंडात उपस्थित असल्याचा अनुभव करतो. विशिष्टता आणि नाविन्य: महाभारताकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोनया पुस्तकाचे वेगळेपण आणि नाविन्य त्याच्या कथानकाच्या दृष्टिकोनात आहे. हे पुस्तक “काय झाले” यापेक्षा “का झाले” यावर अधिक लक्ष केंद्रित करते.

•कर्णाच्या दृष्टिकोनाला प्राधान्य: हे पुस्तक कर्णाला कथेच्या केंद्रस्थानी ठेवून त्याच्या मनातील महायुद्धाला महत्त्व देते.

•दुर्योधनाचे मानवीकरण: कादंबरी दुर्योधनाला केवळ एक खलनायक म्हणून पाहत नाही, तर कर्णासोबतची त्याची खरी मैत्री आणि त्याचा एकटेपणा यावरही प्रकाश टाकते. हे दाखवते की कसे दोन एकटे जीव एकमेकांच्या जखमांवर मलम बनतात, जरी ते मलम विषाचे असले तरी.

•नैतिकतेची सापेक्षता: हे पुस्तक धर्म आणि अधर्माच्या स्थापित व्याख्यांना आव्हान देते आणि दाखवते की प्रत्येक पात्र आपापल्या वैयक्तिक सत्यासाठी आणि धर्मासाठी लढत होते.आजच्या युगातील प्रासंगिकताहे पुस्तक आजच्या काळात आश्चर्यकारकपणे प्रासंगिक आहे. कर्णाचा स्वतःच्या ओळखीसाठीचा संघर्ष आजच्या प्रत्येक व्यक्तीच्या संघर्षाचे प्रतीक आहे, जो आपल्या मुळांमध्ये आणि आकांक्षांमध्ये अडकला आहे. एखाद्या व्यक्ती किंवा विचारसरणीप्रती असलेली आंधळी निष्ठा आणि वैयक्तिक नैतिकता यांच्यातील संघर्ष आज कॉर्पोरेट जगापासून राजकारणापर्यंत सर्वत्र दिसतो. हे पुस्तक आपल्याला शिकवते की परिस्थिती काहीही असो, आपली ‘निवड’ (Choice) हेच आपले चारित्र्य ठरवते.

हे पुस्तक का वाचावे?

जर तुम्हाला असे पुस्तक वाचायचे असेल जे केवळ तुमचे मनोरंजन करणार नाही, तर तुम्हाला विचार करायला, भावना व्यक्त करायला आणि आत्मपरीक्षण करायला भाग पाडेल, तर “नियती: कृष्ण कर्ण संवाद” तुमच्यासाठीच आहे. हे पुस्तक तुम्ही वाचले पाहिजे कारण:

1.एका नव्या महाभारताचा अनुभव घेण्यासाठी: हे तुम्हाला महाभारताला अशा भावनिक आणि बौद्धिक खोलीतून अनुभवण्याची संधी देईल, जी तुम्ही पूर्वी कधीही अनुभवली नसेल.

2.आत्मचिंतनासाठी: हे पुस्तक तुम्हाला तुमच्या स्वतःच्या आयुष्याबद्दल, तुमच्या निष्ठांबद्दल आणि तुमच्या निर्णयांबद्दल विचार करण्यास प्रवृत्त करेल.
3.कर्णाला खऱ्या अर्थाने समजून घेण्यासाठी: जर तुम्हाला कर्णाच्या चारित्र्याची गुंतागुंत आणि त्याची शोकांतिका खऱ्या अर्थाने समजून घ्यायची असेल, तर हे पुस्तक वाचणे अनिवार्य आहे.
4.उत्कृष्ट आणि प्रभावी साहित्याचा आनंद घेण्यासाठी: जे वाचल्यानंतरही तुमच्या मनात दीर्घकाळ गुंजत राहील.थोडक्यात सांगायचे तर, ही कादंबरी केवळ एक साहित्यिक कलाकृती नाही; हा एक तात्विक प्रवास आहे, एक भावनिक अनुभव आहे आणि महाभारताच्या सर्वात गुंतागुंतीच्या नायकाशी साधलेला संवाद आहे. हे एक असे पुस्तक आहे जे तुम्हाला हादरवून टाकेल आणि कदाचित कायमचे बदलून टाकेल.

भारताचे 17 वे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन असतील.

सी. पी. राधाकृष्णन यांनी इंडी आघाडीच्या उमेदवाराचा पराभव करून उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले.

एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन उपराष्ट्रपती निवडणुकीत विजयी झाले आहेत. त्यांनी इंडी आघाडीचे उमेदवार न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांचा पराभव केला.

नवी दिल्ली :
एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विजयी ठरले आहेत. त्यांनी इंडी आघाडीचे उमेदवार न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांचा पराभव केला. या निवडणुकीत लोकसभा व राज्यसभा मिळून एकूण ७६७ खासदारांनी मतदान केले होते. त्यापैकी १५ मते अवैध ठरवण्यात आली. विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राधाकृष्णन यांचे अभिनंदन केले. त्यांनी म्हटले की, “राधाकृष्णन यांचा अनुभव आणि प्रामाणिकपणा राष्ट्रपती भवनातील कार्य अधिक सक्षम आणि प्रेरणादायी करेल.”

राधाकृष्णन यांचा दीर्घ राजकीय प्रवास भाजपाशी जोडलेला आहे. ते दोन वेळा कोयंबटूरचे खासदार राहिले असून संघटनात्मक कामकाजात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. साधेपणा, स्वच्छ प्रतिमा आणि समाजकार्यातील सक्रियता ही त्यांची खास ओळख आहे. या विजयामुळे दक्षिण भारतात एनडीएला नवी ताकद मिळेल, असे राजकीय जाणकार मानत आहेत.

संघ आणि भाजपातील सक्रिय भूमिका – राधाकृष्णन

राधाकृष्णन हे संघ आणि भारतीय जनता पक्षाशी दीर्घकाळापासून जोडलेले आहेत. १९७४ साली ते जनसंघाच्या राज्य कार्यकारिणी समितीवर सदस्य म्हणून निवडले गेले. 

  • १९९६ मध्ये त्यांची तमिळनाडू भाजपाचे सचिव म्हणून नियुक्ती झाली.

  • त्यानंतर १९९८ आणि १९९९ मध्ये ते कोयंबटूर मतदारसंघातून सलग दोन वेळा लोकसभा सदस्य म्हणून निवडून आले.

  • भाजपातील विविध पदांवरील कार्य – राधाकृष्णन

    • २००४ ते २००७ या काळात ते तमिळनाडू भाजपाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते.

    • नंतर २०२० ते २०२२ या कालावधीत त्यांनी केरळ भाजपाचे राष्ट्रीय प्रभारीपद सांभाळले.

    • २०२४ मध्ये त्यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली.

    • याआधी ते झारखंडचे राज्यपाल म्हणूनही कार्यरत होते.

    • sankalit.

कुठे गेले ते आंदोलनकर्ते, जे घोषणा देत होते की “ चार लाख ट्रॅक्टर घेऊन दिल्लीला घेरू ” ?

कुठे गेले ते आंदोलनकर्ते, जे घोषणा देत होते की “ चार लाख ट्रॅक्टर घेऊन दिल्लीला घेरू ” ?

आज पंजाबमध्ये पुरामुळे हजारो शेतकरी बांधव उद्ध्वस्त झाले आहेत. घरं पाण्यात वाहून गेली, जनावरं दगावली, शेतजमिनी पूर्णपणे नष्ट झाल्या. खरी वेळ आली असताना हेच तथाकथित शेतकरीप्रेमी आंदोलनकर्ते चार ट्रॅक्टर घेऊनसुद्धा मदतीला गेले का? नाही!

कारण अगदी स्पष्ट आहे. दिल्ली घेरण्यासाठी त्यांना फंडिंग होतं. मागे “डीप स्टेट” उभं होतं. पण शेतकऱ्यांच्या खऱ्या अडचणी सोडवायला त्यांना ना पैसा मिळतो, ना राजकीय फायदा होतो. म्हणूनच ते आज बेपत्ता आहेत. हे आंदोलन कधीच शेतकऱ्यांसाठी नव्हतं. तो फक्त एक बहाणा होता. खरी खेळी होती नरेंद्र मोदींना हटवण्याची. भारताची संपत्ती लुटण्यासाठी, भारताला पुन्हा गुलाम बनवण्यासाठी आंतरराष्ट्रीय टोळ्या आसुसलेल्या आहेत. पण त्यांच्या आड उभे आहेत फक्त नरेंद्र मोदी. मोदींना हटवण्याचा कुणाकडे काही प्लॅन असेल तर सांगा. मग ४ लाख काय, ४० लाख ट्रॅक्टरांच्या किंमतीएवढं फंडिंग अमेरिका आणि त्यांचे दलाल करतील. पण त्यांनी हे विसरू नये – मोदींच्या मागे ८० कोटी हिंदू खंबीरपणे उभे आहेत.

अमेरिकन दलालांनो, लक्षात ठेवा –
मोदींचं एक केस वाकडं करण्याची ताकद तुमच्या बापाच्या बापातही नाही. देश संकटात असताना मोदी सरकार मैदानात उतरून मदतकार्य करतं.
पण हे आंदोलनकर्ते मात्र त्या वेळी बिळात लपून बसतात. देशभक्ती म्हणजे दिल्लीत गोंधळ घालणं नाही. खरी देशभक्ती म्हणजे.

– पुरग्रस्तांना मदतीचा हात देणं,

– शेतकऱ्यांच्या आयुष्याची काळजी घेणं,

– आपत्तीच्या वेळी खांद्याला खांदा लावून उभं राहणं.

ज्यांनी स्वतःला शेतकऱ्यांचे तारणहार म्हणून मिरवलं होतं, ते खऱ्या वेळी बेपत्ता झाले आहेत. यावरून एकच गोष्ट स्पष्ट होते – ते कधी शेतकऱ्यांचे नव्हतेच, ते फक्त परदेशी दलालांचे प्यादे होते. 

आता वेळ आली आहे की आपण सर्वांनी डोळसपणे विचार करावा –
खरोखर शेतकऱ्यांचे रक्षण करणारे कोण? आणि देशाला विकायला तयार असलेले दलाल कोण? काँग्रेस नेतृत्वाखालील यूपीए सरकारचे गृह राज्यमंत्री मुल्लापल्ली रामचंद्रन यांनी २०१३ मध्ये लोकसभेत सांगितले होते की, “नैसर्गिक आपत्तीला राष्ट्रीय आपत्ती घोषित करण्याची कोणतीही तरतूद नाही.” पण सुदैवाने आता पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार आहे, ज्यांनी सध्याच्या हिमाचल प्रदेश आणि पंजाबमधील नैसर्गिक आपत्तीला राष्ट्रीय आपत्ती घोषित केले आहे.

जय हिंद !
– जयसिंग मोहन 🚩

पितृपक्ष : तर्पण आणि अर्पणाचा उत्सव.

0

पितृपक्ष हा पूर्वजांच्या स्मरणाबरोबरच व्यक्तिमत्व निर्माण, कुटुंब एकता आणि निसर्गाशी सामंजस्य साधण्याची संधी आहे.

श्राद्ध, तर्पण आणि ‘पाच ग्रास’ ही परंपरा जीवसृष्टीच्या संरक्षणाचा व सदाचाराचा संदेश देणारी आहे. या विधींमधून केवळ पितरांचे स्मरण होत नाही, तर कुटुंबात एकोपा, पिढ्यांतील नात्यांचा सन्मान आणि सर्व जीवांप्रती करुणा जोपासली जाते. निसर्गाशी संतुलन राखण्याचा संदेश देत पितृपक्ष हा समाजात नैतिक मूल्ये दृढ करणारा आणि जीवनाकडे कृतज्ञतेने पाहण्याची प्रेरणा देणारा पर्व मानला जातो. संपूर्ण जगात आपल्या पूर्वजांचे स्मरण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याची परंपरा आहे. मात्र भारतात पूर्वजांच्या स्मरणाची ही पितृपक्षाची परंपरा व्यक्तिमत्व घडविणारी, कुटुंबाच्या महत्त्वाची जाणीव करून देणारी आणि निसर्गाशी समन्वय साधणारी अशी अद्भुत परंपरा मानली जाते. भारतीय आणि पाश्चात्त्य चिंतनात मूलभूत फरक आहे. पाश्चात्त्य चिंतन मुख्यत्वे बाह्य जग म्हणजेच भौतिक सृष्टीपुरते मर्यादित आहे, तर भारतीय चिंतन हे लौकिकापासून अलौकिक सृष्टीपर्यंत व्यापक आणि सर्वसमावेशक आहे.थे विकासाचा आधार फक्त बाह्य साधनांवर नाही, तर अंतःशक्तीच्या संवर्धनावरही मानला गेला आहे. ही वैशिष्ट्य भारतीय सनातन परंपरेतील सर्व सांस्कृतिक, सामाजिक आणि धार्मिक समागमांत प्रतिबिंबित होते आणि पितृपक्ष हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.

पितृपक्ष दरवर्षी आश्विन कृष्ण पक्षाच्या प्रतिपदेतून अमावास्येपर्यंत साजरा केला जातो.
या वर्षी तो ८ ते २१ सप्टेंबर या कालावधीत राहील. या दिवसांची दिनचर्या आत्मिक ऊर्जा जागृत करण्याची आणि आरोग्यशक्ती अर्जित करण्याची प्रक्रिया मानली जाते. तर यातील कर्मकांड हे कुटुंब आणि निसर्गाशी सामंजस्य साधणारे असल्याचे सांगितले जाते.

पितृपक्ष समजून घेण्यासाठी तीन मुख्य आधार सांगितले जातात — व्यक्तीच्या अवचेतन मनाची शक्ती, अंतर्गत ऊर्जा, कुटुंबीयांची शक्ती आणि सामंजस्य.

अंतर्गत ऊर्जा व अवचेतन मनाची शक्ती जागृत करण्यासाठी एकाग्रता आवश्यक आहे. यासाठी ब्रह्ममुहूर्ताला उठणे, सूर्योदयापूर्वी स्नान करणे आणि सूर्योपासना करणे हे महत्त्वाचे मानले जाते. नदी किंवा सरोवरापर्यंत जाताना व परतताना केलेले पूर्वजांचे स्मरण हे चित्त एकाग्र करण्यास मदत करते आणि आत्मशक्ती जागृत करते. त्यातून पराक्रम व पुरुषार्थाला गुणात्मकता प्राप्त होते.स्नान-पूजनानंतर हवन तसेच ‘पाच ग्रास’ काढण्याची परंपरा आहे. हे पाच ग्रास मासा, मुंगी, कावळा, गाय आणि कुत्रा यांच्यासाठी अर्पण केले जातात. म्हणजेच जलचर, थलचर आणि नभचर अशा सर्व प्राण्यांच्या संरक्षणाचा आणि सहअस्तित्वाचा संदेश या परंपरेत अंतर्भूत आहे. पितृपक्ष अथवा पितरांचे महत्त्व याचा उल्लेख सर्व पुराणांत आढळतो.

श्रीमद्भागवत हे विशेषतः पूर्वजांच्या मुक्तीसाठी रचित मानले जाते, तर याचे सविस्तर वर्णन गरुड पुराणात आढळते. पितृपक्षात दिवंगत कुटुंबीयांच्या स्मरणाच्या प्रक्रियेला ‘श्राद्ध’ असे म्हटले जाते. ‘श्रद्धा’ केंद्रस्थानी असलेली चेतना हीच श्राद्धाची खरी आधारभूत शक्ती आहे. यात सर्वप्रथम पूर्वजांच्या प्रतीकस्वरूप ज्वारीच्या पिठाचा एक लहानसा पिंड तयार केला जातो. पिंड स्थापित करून पितृ गायत्री मंत्रासह १०८ वेळा जल अर्पण केले जाते. पूजन-अर्पण झाल्यानंतर हा पिंड पीपळाच्या झाडाखाली ठेवला जातो आणि अर्पित केलेले जल वाहत्या पाण्यात विसर्जित केले जाते. यानंतर किमान एका अभ्यागतास (आमंत्रित पाहुण्यास) भोजन घालण्याची परंपरा आहे. अशी मान्यता आहे की, जरी कुटुंबीय या जगातून निघून गेले असले तरी त्यांची ऊर्जा कुटुंबात विद्यमान राहते.

अनेक उदाहरणे अशी आहेत की, जेव्हा लोक महत्त्वाचे कार्य सुरू करतात तेव्हा ते आपल्या दिवंगत पूर्वजांचे स्मरण करतात आणि त्यातून यश प्राप्त करतात.

पुराणांमध्ये ‘पाच ग्रासां’चे पितृसंबंधी संदर्भ आढळतात, परंतु समाज आणि व्यक्तिमत्व-निर्मितीच्या दृष्टीनेही त्यांना मोठे महत्त्व आहे. या परंपरेच्या माध्यमातून या प्राण्यांशी मानवी नाते आणि संरक्षणाची भावना दृढ करण्यात आलेली आहे.

Sorce

बत्तीस वर्षांपूर्वीच्‍या एैतिहासिक मोर्चाची प्रासंगिकता…

0

         “उठ दोस्ता,उगार मूठ…

            शिक्षणाच्या बाजारातील तूच

            तुझी थांबव लूट…”

      १९९३ चा ७ सप्टेंबर आठवतो का? मुंबई येथे मंत्रालयावर छात्रशक्तीचा विराट मोर्चा… अद्भुत आणि ऐतिहासिक असा हा मोर्चा होता!

      बघता बघता त्या ‘प्रचंड’ मोर्चाला आज बत्तीस वर्ष पूर्ण झालेत. एक लाख तीस हजार विद्यार्थी मुंबईच्या रस्त्यांवरून जोशपूर्ण घोषणा देत पण अत्यंत शिस्तीत मंत्रालयावर धडक मारतात, कुठेही गडबड-गोंधळ न करता जोरदारपणे आपल्या मागण्या मांडतात आणि तितक्याच शिस्तीने आपापल्या गावी परततात ही १९९३ सालात घडलेली घटना आहे.

       “आरं आरं सरकारची झोप उडाली…

       आली आली आली एबीव्हीपी आली…”

     या गगनभेदी गीतांनी सगळा महाराष्ट्र हादरला होता आणि आमचे तारुण्य फुलून गेले होते. देशाच्या नव्हे जगाच्या इतिहासात नोंद झालेला हा मोर्चा होता.  मुं बईतील समुद्र त्यादिवशी अचंबीत झाला होता असे वर्णन केल्या जात होते. जागतिक विक्रम असलेला हा मोर्चा…

     आम्ही सगळे वयाच्या विशी-पंचविशीतच होतो. एकीकडे शिक्षणक्षेत्रात जागोजागी सुरू झालेला व्‍यापार, विना-अनुदानित महाविद्यालयांतून

चालणारी पिळवणूक आणि दुसरीकडे सरकारी शाळा-महाविद्यालयांची दुर्दशा हे अस्वस्थ करणारे चित्र अत्‍यंत चिंताजनक होते. अभाविपने शिक्षणक्षेत्रातील या अनागोंदी कारभारा विरोधात एल्‍गार पूकारला.

     महाराष्ट्रातील अक्षरशः गाव न गाव पिंजून काढले गेले. सगळ्या गावांपर्यंत आणि महाविद्यालयांपर्यंत कार्यकर्ते पोहचले. अनेकजण यासाठी विस्‍तारक निघाले, अनेकजण महिना- महिना प्रवास करीत होते. नियोजनाचे आणि नेतृत्वाचे एक अद्भुत प्रशिक्षणच आमच्‍या पिढीला मिळत होते. शिक्षणक्षेत्रातील प्रश्नांचा व्यवस्थित अभ्यास करणं, तो विद्यार्थ्‍यांसमोर मांडणे, दिवसभर संपर्क मोहीम काढणे आणि रात्री भिंती रंगवणे अशा या संघर्षमय ‘काळाने’ आमच्‍या पिढीला आंदोलनाची आणि नेतृत्‍वाची दिशा दिली.

     एकाही विद्यार्थ्याने विनातिकीट प्रवास करून मोर्चाला यायचे नाही हा परिषदेचा संस्‍कार आणि दंडकच म्‍हणा नं ! ज्यांना प्रवासखर्च शक्य नाही अशांसाठी व्‍यवस्‍था करणे, प्रवासाचे नियोजन करणे, कोठेही अपघात होणार नाही याची पूर्ण दक्षता घेणे, पोलिसांशी संपर्क ठेवत पालकांनाही भरवसा देणे, मुंबईच्या कार्यालयाशी सतत संपर्क ठेवणे… वयाच्या विशीतच हे सारे शहाणपण आम्‍ही आत्मविश्वासाने शिकत होतो.  घरून आणलेले डबे, एकाच्या डब्यात ऐनवेळेस चार-चार जणांची जेवणे, सायकलचा भरपूर वापर, फोन वगैरे सुविधा जवळपास नाहीतच,पैशांची चणचण नव्हे तर खडखडाटच, एव्हढी मेहनत करूनही वेळापत्रकातील एखादी ‘गोष्ट’ चुकली तरी प्रमुखांकडुन रागवले जायचे, आपापला ‘अभ्यास’ सांभाळून, सांभाळुन कसला दुर्लक्ष करून ‘लष्कराच्या भाकरी’ भाजायच्या आहेत अशी वारंवार मिळणारी तंबी, जीवापाड घाम गाळून संध्याकाळी फुलणारं अकोल्‍याच्‍या रतनलाल प्‍लॉट चौकातील परिषदेचं कार्यालय आणि दिवसभर घडलेले किस्से,कहाण्या आणि मोर्चाला मिळणारा वाढता प्रतिसाद या गप्पांमध्ये हरवत जाणारे भान… सारेच अद्भुत…अवर्णनीय…

      ७ सप्टेंबर,१९९३ च्या मुंबईत निघालेल्या या ‘विराट’ मोर्चाने महाराष्ट्रातील विद्यार्थी चळवळीला दिली एक सकारात्मक दिशा… गावोगावच्या विद्यार्थ्यांना दाखवला ‘व्यवस्था परिवर्तनाचा’ एक शिस्तबद्ध मार्ग आणि आम्हा कार्यकर्त्यांना दिला अडचणींचे डोंगर फोडणारा ‘तो’ प्रचंड आत्मविश्वास, शिवाय संघर्षातही ‘विधायक’ दृष्टी ठेवण्याचा एक कायमस्वरूपी संस्कार !!

     सरकारला हादरवणारं प्रचंड तुफान त्‍यादिवशी मुंबईत अवतरलं होतं. आम्‍ही त्‍या तुफानाच्‍या अग्रभागी होतो. एवढं प्रचंड तुफान असलं तरी समाजाचं कणभरही नुकसान झालं नाही. लाखो तरूणांना शिस्‍तीत ठेवणारा तो विलक्षण संस्‍कार देण्‍याचं सामर्थ्‍य फक्‍त अभाविप मध्‍येच होतं.

आजच्‍या परिस्थितीत आंदोलन आणि या मोर्चाची प्रासंगिकता अधिक निर्माण झाली आहे. ‘जोश के साथ होश भी’ ही जाणिव मनात ठासुन निर्माण झाली. मुंबईतील लाखो विद्यार्थ्‍यांची मंत्रालयासमोर झालेली विराट सभा…

    श्रीकांत भारतीय यांचे सुत्रसंचालन, राजकुमारजी भाटीया, चंद्रकांतदादा पाटील, विनोद तावडे आणि कित्‍येकांची भाषणे आजही डोळयांपूढे उभी राहतात. आशिष शेलार, राजेश पांडे, आदी अनेक तत्‍कालीन कार्यकर्ते मोर्चाची संपूर्ण व्‍यवस्‍था बघत होते. प्रमोदजी, गोपीनाथजी आदी अनेक नेते प्रेक्षकांमध्‍ये समोरच्‍या रांगेत बसलेले होते.

     या ऐतिहासिक आंदोलनाच्या यज्ञात आमच्‍या पिढीने आपल्या परिश्रमांच्या आहुती टाकलेल्या आहेत… याचा आनंद आहे, समाधान आहे. या निर्मळ, निर्मोही आनंदाचे आज स्मरण करू या…स्मरण… तेजाचे, उर्जेचे, योग्य मार्गाचे… संस्कारांचे, स्नेहाचे, आपलेपणाचे, संघटनेचे आणि शक्तीच्या उपासनेचे!

              © निशीकांत,

                    अकोला.

     (संदर्भ: ‘अभाविप विराट मोर्चा’ फेसबुक पोस्ट.)

ट्रंप यांची बदललेली भूमिका: भारतावर टॅरिफ लावल्यानंतरही मैत्रीची भाषा, पंतप्रधान मोदींचाही सकारात्मक प्रतिसाद.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी भारतावर ५०% टॅरिफ लावल्यानंतर पंतप्रधान मोदींसोबत मैत्रीची भाषा केली. मोदींनीही सकारात्मक प्रतिसाद देत भारत-अमेरिका रणनीतिक भागीदारीवर भर दिला.

अमेरिकेला आता हे लक्षात आले आहे की भारताशी नातेसंबंध बिघडवून त्याने योग्य केलेले नाही. याची झलक आता दिसू लागली आहे. भारतावर ५० टक्के टॅरिफ लावल्यानंतर स्वतःच्या देशात चौफेर टीकेचे धनी ठरलेल्या राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांचीही भाषा बदलू लागली आहे.

सोमवारी व्हाईट हाऊस मध्ये ट्रंप म्हणाले, “मी नेहमी मोदींचा मित्र राहीन, ते एक महान पंतप्रधान आहेत.” त्यांनी भारत आणि अमेरिका यांच्यातील “विशेष नाते” असल्याचेही नमूद केले. हे वक्तव्य व्यापार, टॅरिफ आणि रशियाकडून तेल खरेदी यासंबंधी सुरू असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर करण्यात आले…

पंतप्रधान मोदी यांचे उत्तर – 
मोदींनी एक्सवर पोस्ट करत ट्रंप यांच्या विधानाचे कौतुक केले. त्यांनी लिहिले, “राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांच्या भावना आणि आपल्या संबंधांबाबत केलेल्या सकारात्मक मूल्यांकनाची मी मनापासून प्रशंसा करतो. भारत आणि अमेरिका हे सकारात्मक व भविष्याभिमुख रणनीतिक भागीदारीचे…”

यापूर्वी भारतावर टॅरिफ लावले होते
रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यात अपयशी ठरलेले ट्रंप यांनी नाराजीपोटी भारतावर ५० टक्के टॅरिफ लावले होते. यासोबतच त्यांनी असा युक्तिवाद केला की, भारताने रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला.

ट्रंप यांना वाटले की भारत दबावाखाली येईल, परंतु पंतप्रधान मोदींनी इतर पर्यायही शोधून काढले. त्यामुळे ट्रंप चौफेर अडचणीत सापडत गेले. अखेरीस आता त्यांच्या भूमिकेत बदल दिसू लागला आहे.

सोर्स

हिंदू सण आणि भारतीय अर्थव्यवस्था.

हिंदू सण आणि भारतीय अर्थव्यवस्था

भारतात वर्षभर विविध सण-उत्सवांची रेलचेल असते. दिवाळी, गणेशोत्सव, होळी, नवरात्र, मकरसंक्रांत, रक्षाबंधन, गुढीपाडवा अशा प्रत्येक सणाला धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहेच; पण त्याचबरोबर हे सण आपल्या अर्थव्यवस्थेवरही प्रचंड परिणाम घडवतात. सण हे केवळ श्रद्धा आणि भक्तीचे प्रतीक नाहीत, तर ते व्यापार, रोजगार, खरेदी-विक्री आणि उत्पादन यांना चालना देणारे महत्त्वाचे आर्थिक घटक आहेत.

सणांचे आर्थिक चक्र – 

भारतीय अर्थव्यवस्थेत सणांमुळे निर्माण होणारी हालचाल लक्षात घेतली तर ते एक संपूर्ण economic cycle आहे. प्रत्येक सणापूर्वी लोक खरेदी करतात, नवीन वस्तू विकत घेतात, सजावट करतात, प्रवास करतात, गिफ्ट्स देतात. यामुळे बाजारपेठेत पैसा फिरतो. ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत या खरेदीमुळे उद्योगधंद्यांना आणि लघु उद्योजकांना नवा उभारी मिळतो.

उदाहरणार्थ, गणेशोत्सवात मूर्तिकार, सजावट करणारे, फुलवाले, मिठाईवाले, वाजंत्री, इलेक्ट्रिशियन, इव्हेंट मॅनेजमेंट अशा शेकडो व्यवसायांना रोजगार मिळतो. दिवाळीच्या काळात सोने-चांदी विक्री, कपडे, फटाके, इलेक्ट्रॉनिक्स, वाहनं, घरांच्या सजावटीसाठी लागणाऱ्या वस्तूंची विक्री प्रचंड वाढते.

रोजगारनिर्मिती आणि लघु व्यवसाय – 

सणांच्या काळात हंगामी रोजगार मोठ्या प्रमाणावर तयार होतो. हातकलेवर आधारित व्यवसाय, मिठाई बनविणारे, गोड पदार्थ विक्रेते, खेळणी बनविणारे, रंगोळी, फटाके, कंदील, सजावट साहित्य यांची मागणी अचानक वाढते. यामुळे बेरोजगारांना तात्पुरता रोजगार मिळतो.
ग्रामीण भागातही पारंपरिक वस्तू, हस्तकला आणि शेती उत्पादनांची विक्री वाढते. उदाहरणार्थ, मकरसंक्रांतीला तीळ-गूळ, पोहे, गुळाचा व्यापार, होळीच्या वेळी रंग, पिचकार्या, तर नवरात्रीला पारंपरिक वेशभूषा आणि दागिने यांची मागणी वाढते.

मोठ्या उद्योगांवरील परिणाम – 

भारतीय अर्थव्यवस्थेतील काही प्रमुख क्षेत्रे सणांमुळे सर्वाधिक प्रभावित होतात:

ऑटोमोबाईल उद्योग: दिवाळी आणि दसऱ्याच्या काळात लोक गाड्या खरेदी करण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे वाहन विक्रीत मोठी वाढ होते.

ज्वेलरी उद्योग: अक्षय तृतीया, धनत्रयोदशी, दिवाळी यावेळी सोन्या-चांदीची विक्री प्रचंड वाढते.

एफएमसीजी क्षेत्र: मिठाई, स्नॅक्स, शीतपेये, गिफ्ट पॅक्स यांची विक्री प्रचंड वाढते.

ट्रॅव्हल आणि टुरिझम: सुट्ट्या मिळाल्यामुळे लोक प्रवासाला प्राधान्य देतात. रेल्वे, विमानसेवा, हॉटेल, टॅक्सी, पर्यटन स्थळे यांचा व्यापार तेजीत येतो.

अर्थव्यवस्थेतील सकारात्मक परिणाम – 

1. मागणी वाढते – लोक जास्त खर्च करतात, त्यामुळे उत्पादन वाढते.

2. पैसा फिरतो – बाजारपेठेत liquidity वाढते.

3. उत्पादन वाढते – मोठे व लहान उद्योग ग्राहकांच्या मागणीनुसार उत्पादन करतात.

4. रोजगार मिळतो – हंगामी कामगारांना रोजगार उपलब्ध होतो.

5. स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन – विशेषतः ग्रामीण व लघु उद्योगांना संधी मिळते.

आधुनिक काळातील बदल  – 

आजच्या काळात ऑनलाइन शॉपिंग, ई-कॉमर्स आणि डिजिटल पेमेंटमुळे सणांच्या खरेदीत मोठा बदल झाला आहे. अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट सारख्या कंपन्यांचे festival sales भारतीय अर्थव्यवस्थेत मोठा वाटा उचलतात. मोबाईल पेमेंट, UPI व्यवहार वाढल्यामुळे पैसे फिरणे अधिक सोपे झाले आहे.

त्याचबरोबर, “इको-फ्रेंडली सण” या संकल्पनेलाही मागणी वाढत आहे. मातीच्या मूर्ती, नैसर्गिक रंग, पुनर्वापर करता येणारे सजावट साहित्य वापरून लोक पर्यावरणपूरक सण साजरे करू लागले आहेत. यामुळे नव्या प्रकारच्या उद्योगांना चालना मिळत आहे.

निष्कर्ष – 

हिंदू सण हे केवळ धार्मिक उत्सव नाहीत तर ते भारतीय अर्थव्यवस्थेचे प्राणवायू आहेत. लहान दुकानदारांपासून ते मोठ्या उद्योगांपर्यंत सर्वांना सणांमुळे नवा उत्साह, नवा व्यवसाय आणि नवीन रोजगार संधी मिळतात. खरेदी-विक्रीचे हे हंगामी चक्र देशाच्या GDP मध्येही महत्त्वाची भर घालते.

तथापि, आपण सण साजरे करताना आर्थिक सुबुद्धी बाळगली, फुजूल खर्च टाळला आणि पर्यावरणपूरक मार्ग स्वीकारले, तर सण हे श्रद्धा आणि आनंदासोबतच शाश्वत अर्थव्यवस्थेला बळकटी देणारे ठरतील.

………

संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता.

रशियाचे जे रणगाडे होते, ते जेव्हा युक्रेनवर हल्ला करण्यासाठी पोहोचले, तेव्हा तुर्कीने युक्रेनला जे बायरकतार ड्रोन दिले होते, त्या ड्रोनने या रणगाड्यांना लक्ष्य केले. त्यामुळे बरेच रणगाडे उद्ध्वस्त झाले. या रशिया-युक्रेन संघर्षात बायरकतार ड्रोनचा खूप फायदा झाला, कारण ड्रोनने हल्ला होऊ शकतो याची रशियाला अपेक्षा नव्हती. त्या ड्रोनने बरेच रणगाडे उडवले. रणगाडे म्हणजे अशी वाहने जी उंचीवर उडणाऱ्या हेलिकॉप्टरवर हल्ला करू शकतात, दूरवर गोळ्यांचा मारा करू शकतात आणि खूप मोठी हानी घडवून आणू शकतात.

हे टी-90 रणगाडे, ज्याला भारतात भीष्म म्हणतात, ते रशियादेखील वापरत आहे. रशियाचा जो टी-90 रणगाडा, ज्याला भारत भीष्म म्हणून वापरतो, प्रोरिव-3 या रणगाड्याचा रशिया-युक्रेन युद्धात उपयोग केला गेला होता. तर मग हे का सांगायचं आहे? कारण हाच टी-90 रणगाडा, जो रशिया-युक्रेन युद्धात वापरला गेला, तो युक्रेनने खूप मोठ्या प्रमाणात नष्ट केला.

टी९० टँक या युद्धात यशस्वी ठरले नाहीत. युद्धात यशस्वी ठरले नाहीत, म्हणून लोकांनी भारताची खिल्ली उडवायला सुरुवात केली. तुम्ही विचाराल की रशिया-युक्रेन युद्धामुळे भारताची खिल्ली कशी उडवली गेली? भारताची खिल्ली अशा प्रकारे उडवली गेली, कारण भारताकडून याच टी९० टँकचा वापर केला जातो. तुर्की हा पाकिस्तानचा समर्थक आहे. जर रशिया-भारत-पाकिस्तान यांच्यात युद्ध झाले, तर भारताला बायरकतार ड्रोन मिळणार नाहीत, ते पाकिस्तानला मिळतील. आणि पाकिस्तानला बायरकतार ड्रोन मिळाल्यावर आमचे टी९० टँक तिथे कमजोर पडतील. भारतात सर्वात जास्त संख्येने टी९० आणि टी७२ टँक आहेत. हे दोन्ही रशियामध्ये तयार झालेले टँक आहेत. त्यांची अशी अवस्था पाहून पाकिस्तानी लोकांनी त्या काळात भारताची खूप मजा घेतली. पण भारत एका चांगल्या गोष्टीसाठी ओळखला जातो आणि ती म्हणजे ‘शिकून सुधारणा करणे’. तुम्ही विचाराल कशाप्रकारे? तुम्हाला १९९९ चे कारगिल युद्ध आठवते का? कारगिल युद्ध झाले, तेव्हा भारतासमोर एक मोठे आव्हान होते. जर आपल्याला शत्रूचे नेमके स्थान कळले असते, तर आपण त्यांना सहज हरवले असते. आम्ही अमेरिकेला विनंती केली होती की, शत्रू कुठे बसला आहे, ते आम्हाला सांगा. पण अमेरिकेने आम्हाला ते स्थान सांगितले नाही. त्याऐवजी अमेरिकेने काय केले? त्याने आम्हाला नकार दिला. ‘मी पाकिस्तानसोबत आहे, मी स्थान सांगू शकत नाही.’ त्यावेळी अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार होते. अटलजींनी सरकारमध्ये ताबडतोब इस्रोला आदेश दिला की, ‘भविष्यात ही आव्हाने मोठी होऊ शकतात, त्यामुळे त्याचा सामना करण्याची तयारी करा.’ तयारी म्हणून भारताने आपली प्रादेशिक दिशा-निर्देशक प्रणाली (रिजनल नेव्हिगेशन सिस्टीम), ज्याला आज तुम्ही ‘नाविक’ (NavIC) या नावाने ओळखता, ती बनवली. आता जर अमेरिकेने आपल्याला स्थान सांगितले नाही, तरी आपण स्वतःची IRNSS प्रणाली तयार केली आहे. आता आपण स्वतः ते स्थान पाहू शकतो. म्हणजेच, ‘गरज ही शोधाची जननी आहे.’

आता एवढी मोठी प्रस्तावना कशासाठी? ही प्रस्तावना यासाठी आहे की, टी-90 रणगाड्यांची जी अवस्था झाली, त्यामुळे आम्हीही चिंतेत पडलो. भारताचे संरक्षण संशोधन वैज्ञानिकही चिंतेत पडले की, ज्याच्या जोरावर आपण युद्ध लढायला जात आहोत, तो तर कमजोर होत आहे. तो कमजोर होत असल्यामुळे आपल्याला याचा सामना करण्यासाठी स्वतःच काहीतरी तयारी करण्याची आवश्यकता असेल. मित्रांनो, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की भारताने टी-90 रणगाड्याची अपडेटेड आवृत्तीही काढली आणि एक नवीन रणगाडाही तयार केला. रशिया-युक्रेन युद्धापासून शिकत भारताने आपल्या शस्त्रास्त्रांमध्ये आमूलाग्र बदल केले. कारण, हे रणगाडे कुठेतरी नुकसान सोसत आहेत. आणि तर कहर म्हणजे भारताने एक इतिहास घडवला आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे आणि गलवान व्हॅली घटनेमुळे अडीच वर्षांपेक्षा कमी वेळात भारताने स्वतःचा एक नवीन रणगाडा बनवला आहे. आता तुम्ही विचाराल की भारताने आपला नवीन रणगाडा बनवून टी-90 पेक्षा जास्त सुविधा विकसित केल्या आहेत का? तर यात अशा सुविधा टाकल्या आहेत की आता ड्रोन. यातून तुम्ही ड्रोन ऑपरेट करू शकता. पहिली गोष्ट ही आहे. दुसरी, ड्रोनची ओळख पटवण्याची सर्व तंत्रज्ञान यात बसवले आहे, की जर ड्रोनचा हल्ला होणार असेल, तर हा स्वतःच ओळख पटवेल. भारताच्या डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ) आणि एलएनटीने मिळून भारताचा स्वतःचा ‘जोरावर’ रणगाडा बनवला आहे. भारताचा स्वतःचा ‘जोरावर’ ज्याला ‘किंग ऑफ माउंटन्स’ असे नाव देण्यात आले आहे.

हे तेच रणगाडे (टँक) आहेत जे आता भारताच्या सेवेत येण्यासाठी तयार आहेत. त्यांचे प्रात्यक्षिक (डेमो) आणि चाचणी (ट्रायल) झाले आहे. याच कारणामुळे ‘इंडिया शोकेस लाईट बॅटल टँक जोरावर’ हे ‘उंच ठिकाणच्या युद्धासाठी’ (High Altitude Warfare) चर्चेत आहे. आता तुम्ही म्हणाल की उंच ठिकाणच्या युद्धाचा काय संबंध आहे? जगातील सर्वात जड रणगाडा भारतात आहे. त्याचे नाव अर्जुन आहे, त्याचे वजन ६८ टन म्हणजे ६८,००० किलो आहे. जेव्हा एवढा जड रणगाडा चालतो, तेव्हा त्याला लॉजिस्टिक्सच्या (सैन्य आणि युद्धोपयोगी सामग्री पुरवठा) अनेक अडचणी येतात. खूप उंचीवरच्या ठिकाणी त्याला चालताना अडचणी येऊ शकतात, कारण त्याचे स्वतःचेच वजन खूप जास्त आहे. अशा परिस्थितीत, भारताने गलवान खोऱ्यातील घटना पाहिल्यानंतर हे लक्षात घेतले की, जर अशा मोक्याच्या (Strategic) ठिकाणी युद्ध झाले, तर आपल्याला अशी वाहने (व्हीकल्स) लागतील, जी कमी वजनाची असतील, वेगाने पुढे जातील आणि आधुनिक दळणवळण प्रणालीने सुसज्ज असतील. ‘जोरावर’ याच परिस्थितीला लक्षात घेऊन तयार करण्यात आलेला भारताचा स्वतःचा रणगाडा आहे आणि तो तयार झाला आहे.

भारताने नुकतेच गुजरातमधील हजीरा येथे शनिवारी ‘जोरावर’ची चाचणी यशस्वीरीत्या पार पाडली आहे. लाईट बॅटल टँक ‘जोरावर’ पूर्णपणे तयार झाला आहे. भारताने ‘आत्मनिर्भर’ पद्धतीने अडीच वर्षांपेक्षा कमी कालावधीत देशातच तयार केलेल्या या रणगाड्याचे प्रात्यक्षिक सादर केले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, अर्जुन रणगाड्याचे वजन ६८ टन आहे, तर ‘जोरावर’चे वजन २५ ते २८ टन दरम्यान आहे. म्हणजेच अर्जुनच्या वजनाच्या निम्म्याहूनही कमी. त्यामुळे जेव्हा तुम्ही त्याला एक-तृतीयांश वजनासह चालताना पाहाल, तेव्हा हे आपोआप समजेल की हा रणगाडा भविष्यात भारताच्या किती गरजा पूर्ण करेल.

हा असा रणगाडा आहे जो वेगाने चढाई करू शकतो, डोंगराळ भागात यशस्वी आहे आणि ड्रोनशी लढण्यासाठी सक्षम आहे. आणि हे काम आम्ही आमच्या स्तरावर केले आहे.

सैन्याला आता ५९ रणगाडे तयार करून दिले जातील. आणखी २९५ रणगाडे तयार करण्याची तयारी आहे. २०२७ पर्यंत सैन्य पूर्णपणे या रणगाड्यांनी सुसज्ज होईल. भारताने आत्मनिर्भर होऊन किती जलद निर्णय घेतला आहे, हे लक्षात घ्या. अडीच वर्षांपेक्षा कमी कालावधीत आम्ही आमचा ‘जोरावर’ रणगाडा तयार केला, ज्यामध्ये १०५ मिमी कॅलिबरची तोफ आहे. या तोफेने तुम्ही रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रे डागू शकता.

पहिले या रणगाड्यात ड्रोन लावण्यात आले आहेत, जे युद्ध व्यवस्थापन प्रणालीसह कार्य करतात. दुसरे यामध्ये मॉड्युलर एक्सप्लोसिव्ह रिअॅक्टिव्ह आर्मर आणि एक सक्रिय संरक्षण प्रणाली आहे, जी त्याला हल्ल्यांपासून सुरक्षित ठेवते. जर यावर हल्ला झाला, तर ही प्रणाली त्याला सुरक्षित ठेवेल. या रणगाड्याचे वजन २५ टन आहे. तो लडाखसारख्या जास्त उंचीच्या ठिकाणी सहजपणे तैनात केला जाऊ शकतो. यात ३० एचपी प्रति टनचे पॉवर-टू-वेट प्रमाण आहे, जे चांगल्या हालचालीसाठी (मोबिलिटी) महत्त्वाचे आहे.

या उत्कृष्ट वजनासह तो सहजपणे फिरू शकतो. ‘जोरावर’ची चीनच्या ZTQ टाइप १५ सारख्या हलक्या रणगाड्यांशी स्पर्धा असेल, कारण चीन जास्त उंचीच्या भागांसाठी अशाच प्रकारचे हलके रणगाडे वापरतो. आम्ही आमच्या पातळीवर असा रणगाडा तयार केला आहे. याचा अर्थ असा की भारताकडे आता जड, मध्यम आणि हलके अशा तिन्ही प्रकारचे रणगाडे असतील. २५ टन वजनासह, हा रणगाडा मूलभूत गरजा पूर्ण करून जास्त उंचीवर वापरला जाऊ शकेल.

भारतात आधीपासूनच अर्जुन टँक, भीष्म टँक (ज्याला T90 भीष्म म्हणतात), T72 अजय टँक आहेत आणि आता आपल्याकडे जोरावर टँक देखील असेल. भविष्यात यामुळे आपण युद्धभूमीवर खूप चांगल्या गोष्टी करू शकू. भारताने हे काम खूप कमी वेळेत पूर्ण केले आहे. म्हणूनच आम्ही याला देशाची एक मोठी उपलब्धी मानत आहोत. पीपल्स लिबरेशन आर्मी, म्हणजेच चीनच्या सैन्याकडे ZTQ105 नावाचा 30 ते 33 टन वजनाचा लाईट टँक आहे, जो त्यांनी सध्या एलएसीवर (LAC) तैनात केला आहे. त्यांच्यासमोर आपण 25 टन वजनाचा हा टँक पाठवत आहोत, असे समजा. याच तुलनेत, आपण आपला टँक अशा भौगोलिक परिस्थितीत तयार केला आहे, जिथे कमी वजनाचे टँक सहजपणे हलवता येतात.

या टँकला जोरावर हे नाव जनरल जोरावर सिंग कलूरिया यांच्या नावावरून देण्यात आले आहे, जे कैलास मानसरोवरच्या डोगरा-तिबेट युद्धाच्या मोहिमेदरम्यान प्रसिद्ध झाले होते. अशाप्रकारे, एका खास व्यक्तीच्या नावाने आपण हे काम केले आहे. हा जोरावर टँक रेकॉर्ड वेळेत तयार करण्यात आला आहे. डीआरडीओ प्रमुखांनी सांगितले की, लाईट टँकला प्रत्यक्षात एक्शन मध्ये पाहणे हा एक महत्त्वाचा दिवस आहे. “आम्ही एक उदाहरण प्रस्थापित केले आहे. अडीच वर्षांपेक्षा कमी कालावधीत आम्ही केवळ 25 टन वजनाचा लाईट टँकच तयार केला नाही, तर त्याचा पहिला प्रोटोटाइप देखील बनवला आणि त्याची चाचणीही केली.” हे देशाच्या आत्मनिर्भर होत असलेल्या प्रगतीची ओळख आहे.

साभार – विष्णुगुप्त पेज .

image google

काश्मीर विलीनीकरणात श्री गोळवलकर गुरूजींचा सिंहाचा वाटा.

काश्मीर विलीनीकरणात श्री गोळवलकर गुरूजींचा सिंहाचा वाटा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशा साठी काय केले? किंवा संघ देशा साठी काय करतो?  संघाचे स्वयंसेवक तिरंगा ध्वजाचा सन्मान करीत नाहीत असे अनेक प्रश्न देशातील संघ विरोधी विचारधारेचे अज्ञानी सेक्युलर पोंगापंडीत किंवा विचारजंत नेहमी करीत असतात.स्वातंत्र दिनाचे औचित्य साधून देशात घर घर तिरंगा यात्रा सुरू आहे.संघाचे स्वयंसेवक तिरंगा ध्वजाला मानत नाही असा खोटा प्रचार करून आता तिरंगा यात्रेला सुद्धा लक्ष केलं जात आहे.प्रसार माध्यमात भाजपा ची मातृसंस्था असलेल्या संघटनेनेचे म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक तिरंगा ध्वजाला मनात नाही असे वक्तव्य करून आपल्या अकलेचे अज्ञान पाजळतात. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बदनामी करतात आणि हा त्यांचा आता नेहमीचा धंदाच झालेला आहे. देशात भाजपा ची तिरंगा यात्रा सुरू आहे आणि तिरंगा यात्रेला अनुसरून सेक्युलर पोंगापंडीत उपरोक्त उल्लेखित प्रश्न उपस्थित करून टिंगलटवाळीवाला प्रचार करीत आहेत.टिंगलटवाळी जरी भाजपची असली तरी मात्र त्यांच लक्ष भाजपची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असतो.वास्तविक पाहता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वंयसेवकांनी चले जाव चळवळीत तिरंगा ध्वजाच्या सन्मान केलेला आहे बिहार मधील ब्रिटिश सचिवालय पासून रामटेक ब्रिटिश कचेरीवर तिरंगा ध्वज फडकविण्यात संघ स्वयंसेवक आघाडीवर होते.श्रीनगर च्या लाल चौकात तिरंगा ध्वजाचा सन्मान करणारे संघाचे स्वयंसेवक मुरली मनोहर जोशी व नरेंद्र मोदी होते. जेथे झेड प्लस सुरक्षा मध्ये सुशील कुमार शिंदे यांना भीती वाटत होती तेथे विना सुरक्षा मुरली मनोहर जोशी व नरेंद्र मोदी तिरंगा ध्वजाचा सन्मान करण्या साठी गेले होते.संघाच्या स्वयंसेकांनी नेहमीच प्रथम राष्ट्रहित जोपासले असून संघाच्या स्वयंसेवकांनी सुद्धा राष्ट्र प्रथम आणि राष्ट्रसेवा हे जीवनमुल्य अंगीकारलेले आहे देशातील कोणत्याही आपदाच्या कठीण काळात संघाचे स्वयंसेवक प्रथम उभे राहतात हा इतिहास आहे.त्यामुळे देशाहिता साठी संघर्ष करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला लक्ष का केले जाते? संघ इतिहासाची उजळणी व्हावी म्हणूनच हा लेख प्रपंच आहे. देश स्वातंत्र झाल्या नंतर फाळणीच्या भयंकर वेदना तथा देशातील 540 संस्थान विलीनीकरण करण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता.सरदार पटेल यांच्या कणखर नेतृत्वाखाली 538 संस्थाने भारतात सामील झाले होते परंतु देशाचे अविभाज्य घटक काश्मीर आणि हैदराबादच्या प्रश्न किचकट बनला होता.सरदार पटेल यांनी योग्य कार्यवाही करून हैदराबादचा प्रश्न मिटवून निजाम स्टेटचे भारतात विलीनीकरण करून घेतले होते.परंतु जम्मू काश्मीरचा प्रश्न प्रलंबित होता. तेव्हा सरदार पटेल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक श्री गोळवलकर गुरुजी यांच्या सोबत संपर्क साधून काश्मीर विलीनीकरण संबंधी राजा हरिसिंह यांच्या सोबत संपर्क करण्याचा प्रस्ताव ठेवला होता.श्री गोळवलकर गुरुजी यांनी काश्मीरचा दौरा केला आणि त्यांच्या पुढाकाराने जम्मू व काश्मीर संस्थान भारतामध्ये सामिल झालेले होते.जम्मू आणि काश्मीरच्या भारतात विलीनीकरण इतिहास मध्ये तथा कश्मीर भारतात सामील करण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची महत्वपूर्ण भूमिका असून श्री गोळवलकर गुरुजी यांचा सिंहाचा वाटा राहीलेला आहे. हिंदुस्तान फाळणीच शल्य घेऊन स्वातंत्र झाला होता व निर्माण झालेल्या पाकिस्तानने काश्मीरची भूमि गिळंकृत करण्याचा मनसुबा करून तेथे कुरापती सुरु केल्या आणि आपल्या पाकिस्तानी फौजा कश्मीर मध्ये घुसविण्याची तयारी सुद्धा केली होती कश्मीरचे महाराजा राजा हरीसिंह यांनी हिंदुस्तान अथवा पाकिस्तान मध्ये सामील न होण्याची तठस्थ भूमिका घेतली होती व यांच संधिचा फायदा घेत पाकिस्तान घुसखोरीच्या तयारीला लागला होता ही बाब भारत सरकारच्या लक्षात सुद्धा येत होती राजा हरीसिंह यांच्या भारतात सामील न होता तठस्थ राहण्याच्या भूमिके मुळे भारत सरकार सुद्धा चिंतित होते त्याच दरम्यान ऑक्टोम्बर 1947 च्या पहिल्या आठवडया मध्ये पाकिस्तानी फौजानी घुसखोरीच्या हालचाली प्रारंभ केल्या.हल्ला होऊ शकतो याची कल्पना सुधा भारत सरकारला आली होती तेव्हा भारत सरकारच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांनी गोळवलकर गुरुजी यांच्या सोबत संपर्क करण्यात आला संभावित धोक्यावर पटेल व श्री गुरुजी यांच्या मध्ये संवाद झाला.श्री गोळवलकर गुरुजी यांनी राजा हरिसिंह यांची भेट घेण्याची योजना झाली.त्यानुसार श्री गोळवलकर गुरूजी दि.17 ऑक्टोम्बर 1947 रोजी सरकारी विमानाने श्रीनगरला पोहचले त्यांच्या सोबत प्रचारक वसंतराव ओक व वकील नरेंद्रसिंह उपस्थित होते.दि.18 ऑक्टोम्बर रोजी कर्णमहाल मध्ये पोहचले तेव्हा स्व:ता राजा हरीसिंह व त्यांच्या पत्नि महाराणी तारा राणी यांनी राजवाडया प्रवेशद्वार उभे राहून श्री गोळवलकर गुरुजी यांचे स्वागत केले त्याच दिवशी राजा हरीसिंह व श्री गुरुजी यांच्या मध्ये संभावित धोके व जम्मू आणि कश्मीर हिंदुस्तान मध्ये विलीनीकरण संबधी प्रदीर्घ चर्चा झाली मी आपल्या सुचनावर अवश्य विचार करेन ,असा शब्द राजा हरीसिंह यांनी श्री गुरुजी यांना दिला व श्री गुरुजी पुढील प्रवासा साठी निघाले दि.23 ऑक्टोम्बर रोजी म्हणजे श्री गुरुजी यांच्या प्रवासा नंतर 5 दिवसांनी पाकिस्तानच्या फौजा जम्मू आणि कश्मीर मध्ये घुसल्या आणि त्यांनी अत्यचाराचा उच्छाद मांडला कश्मीर मधील मौक्याचे ठिकाणवर कब्जा करण्याच्या तयारीला लागले होते रक्तपात सुध्दा घडवून आणला.तेव्हा दि.27 ऑक्टोम्बर 1947 रोजी जम्मू कश्मीरचे प्रधान मेहेरचंद महाजन यांच्या समक्ष महाराज हरीसिंह यांनी विलीनीकरणाच्या पत्रावर स्वाक्षरी करून जम्मू कश्मीर भारत सरकार मध्ये सामील झाल्याचे जाहीर केले शेवटी राजा हरीसिंह व श्री गोळवलकर गुरुजी यांची भेट व झालेल्या चर्चा मधूनच जम्मू आणि कश्मीर भारतात विलीनीकरणाच्या बाजूने निर्णायक ठरली देशाचा मुकुटमणी असलेला कश्मीर भारता मध्ये विलीन होऊन भारताचा अविभाज्य घटक ठरला. काश्मीर चे महाराजा हरीसिंह यांनी जम्मू आणि काश्मीर भारतात अधिकृत विलीनीकरणच्या नंतर भारत सरकार ने हिंदुस्तानी फौजा कश्मीर मध्ये पाठविण्यात सुरुवात केली पण तेथे प्रचंड नैसर्गिक अडथळे निर्माण झाले होते तेव्हा सुद्धा संघाच्या स्वयंसेवनी दुर्गम भागात विमानाच्या धावपट्टया तयार करण्यापासून सैन्याला शस्रसाठा पोहचविण्या साठी हिंदुस्थान फौजाच्या खांद्याला खांद्या लावून काम केले आहे.पाकिस्तानने लादलेल्या युद्धात अनेक स्वयंसेवकाना वीर मरण सुद्धा आलेले आहे अखेर पाकिस्तान पराभूत होऊन हिंदुस्तान दि १ जानेवारी १९४८ रोजी विजयी ठरला त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक श्री गोळवलकर गुरुजी यांचा जम्मु व कश्मीर प्रदेश हिंदुस्तान मध्ये सामील करण्यात सिंहाचा वाटा आहे.तसेच पाकिस्तानने निर्माण केलेल्या युद्धजन्य परीस्थितीत सैन्याच्या खांद्याला खांदा लावुन संघाचे स्वयंसेवक काश्मीर मध्ये झाले उभे झाले होते. हा कपोलकल्पित खोटा इतिहास नसून सत्य घडलेला इतिहास आहे सरकार दरबारी त्याचे पुरावे सुद्धा उपलब्ध आहेत.घर घर तिरंगा यात्रा निमित्ताने संघाने देशासाठी काय केले? असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या साठी काश्मीर विलीनीकरणाचा इतिहास योग्य समज देईल तसेच तरूण मंडळी समोर संघ स्वयंसेवकाचा इतिहास यावा म्हणूनच हा लेख प्रपंच आहे.