? आनंदाची स्थानके ?

लॉकडाऊनच्या निमित्ताने दूरदर्शनने अनेक जुन्या डॉक्युमेंटरीज बाहेर काढल्यायत. तर परवा काश्मीरवर एक डॉक्युमेंटरी चालू होती. काश्मीरच्या निसर्गाचं विलोभनीय दर्शन टीव्हीवर होत होतं. दोन्ही हातांनी आपल्या दुखऱ्या गुडघ्यांना पेनबाम चोळत समोरच्या परब काकी माझ्याशी गप्पा मारत होत्या. टिव्हीवर काश्मीर बघून त्यांना आपल्या उमेदीच्या दिवसांची आठवण झाली. आणि त्या खुर्चीतल्या खुर्चीत पुटपुटल्या,

“डोळे मिटण्याच्या आधी एकदा तरी काश्मीर बघायची खूप इच्छा होती रे. पण संसाराच्या रामरगाड्यात जमलंच नाही.

“ अहो, मग आता जाऊन या ना काकी. आता सोपं झालंय तिथे जाणं”

“ आता शक्य नाही रे बाबा. हे संधिवाताचे गुडघे घेऊन बर्फात कुठे जाणार. पुन्हा यांना मधुमेहाचा तीव्र त्रास. अंहं… आता नाहीच शक्य. त्यावेळी हौस होती. अंगात शक्ती होती. मी माझ्या भिशीतून पैसे पण जमवले होते. पण आज जाऊ ,उद्या जाऊ करता करता कधी जाणं झालंच नाही. आता दोन्ही मुलं मार्गी लागलीयत. सुना आल्यायत. सख्य्ख्या आईवडीलांसारखं आम्हाला जपतात. पण माझे गुडघे आणि यांचा मधुमेह आम्हाला घराबाहेर पडायची परवानगी देत नाही. दात आहेत तर चणे नाहीत आणि चणे आहेत तर दात नाहीत अशी परिस्थिती आहे आमची.”

आपल्यापैकी बऱ्याच जणांची परिस्थिती या परब काका काकींसारखी असते. आयुष्याची आनंदयात्रा घेऊन ही लाईफ़लाईन एक्सप्रेस निघालेली असते. वाटेत कितीतरी आनंदाची स्थानके लागतात. पण आपण सहजपणे त्यांना बायपास करुन निघून जातो. साजरे करण्यासारखे कितीतरी क्षण आपल्या आयुष्यात नियमित येत असतात. पण आपण ते वेग्वेगळ्या सबबींखाली साजरे करायचं नाकारतो. कधी वेळ नाही म्हणून, कधी परिस्थिती नाही म्हणून, तर कधी जबाबदाऱ्या आहेत म्हणून! आणि नंतर चुकचुकतो. आयुष्यात कोणताही क्षण एकदाच येतो. आपण तो ओंजळीत पकडला नाही तर दुसऱ्याच क्षणी भूतकाळाचा भाग बनतो. मानवनिर्मित सगळी चाकं उलटी फिरवता येतात. पण कालचक्र कधीच उलटं फिरवता येत नाही. निसटलेले क्षण, हुकलेली संधी आणि गेलेलं माणूस कधी मागे फिरवून आणता येत नाही. त्या त्यावेळेस त्याचा आदर करता आला पाहीजे.

थोडी मेमरी रिवाईंड करा आणि आठवून बघा, काय काय राहून गेलं आयुष्यात…. आवडत्या मैत्रीणीला गुलाबाचं फूल देईन देईन म्हणता द्यायचं राहून गेलं. तब्बेतीची काळजी घे रे असं फ़ोनवर गलबलून सांगणाऱ्या गावच्या भावाला मिठी मारायचं राहून गेलं. आयुष्यभर हाल अपेष्टा काढलेल्या बाबांना त्यांच्या हयातीत विमानाने फिरवायचं राहून गेलं. आईच्या रित्या मनगटांवर सोन्याच्या बांगड्या चढवायचं राहून गेलं. बहिणीशी गैरसमजुतीतून भांडण झालं होतं, तिला सॉरी म्हणायचं राहून गेलं. बाळ लहान होतं तेव्हा त्याला घोडा घोडा करायचं राहून गेलं. लग्नाचा २५ वा वाढदिवस ऑफीसच्या कामामुळे साजरा करायचा राहून गेलं. गुलाम अलीला लाईव्ह ऐकायचं कायमचं राहून गेलं. कोकणात जन्म घेऊन सुद्धा आंबोलीला सहल काढायचं शेवट्पर्यंत राहून गेलं…. एक ना अनेक…. असे हजारो, लाखो आनंदाचे, क्रुतार्थतेचे क्षण परमेश्वराने उदारहस्ते ओंजळीत टाकले होते. पण ते आपल्या गाफ़ीलपणामुळे तसेच राहून गेले. काही राहून गेले तर काही काळासोबत वाहून गेले. आनंदाची अशी कितीतरी स्थानके वाटेत लागली होती. पण आपली गाडी तिथे थांबू शकली नाही.

इंग्रजीत एक अल्पाक्षरी म्हण आहे, Tomorrow never comes. कोणतीही गोष्ट उद्यावर ढकलू नका. आजचा आनंद आजच उपभोगा. उद्याचा दिवस आपल्या आयुष्यात येईल की नाही ते आपल्याला ठाऊक नाही. आला तर त्याला सामोरे जाण्याच्या स्थितीत आपण असू की नाही ते आपल्याला सांगता येत नाही.

हा प्रवास कधीतरी संपण्याची वेळ येईल. एक दिवस शेवटचे स्थानक नजरेसमोर दिसू लागेल. गाडीचा वेग मंद मंद होत जाईल. आणि कितीही इच्छा असली तरी शेवटच्या स्थानकातून ही गाडी माघारी फ़िरवता येणार नाही.. तेव्हा आनंदाने जगू लागा. आत्ता, या क्षणापासून. तुमची गाडी आत्ता ज्या स्थानकावर थांबली आहे ते आनंदाचे स्थानक आहे.
————————————-
या सकारात्मक उपक्रमावर अनेक छान प्रतिक्रिया येतायत. त्यातल्या काही प्रातिनिधिक देतोय:
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला विभाग अध्यक्षा, सद्भगिनी धनश्री चिंचकर नाईक म्हणतात, “आपले लेख सकारात्मक उर्जा देतात. आताच्या परिस्थितीत खचुन जाणाऱ्या लोकांना त्याची जास्त गरज आहे. मी ते माझ्या सर्व ग्रुप्स मध्ये शेअर करत असते.”
मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथकाचे PI श्री सुनील जाधव म्हणतात, ” सध्याच्या दिवसात या उपक्रमाची सर्वाधिक गरज आम्हाला आहे. खूप टेन्शनमध्ये असलो की मी तुमचे मेसेज काढून वाचतो. छान वाटतं.”
धन्यवाद मित्र हो. आपल्या प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत. ?

-प्रसाद कुलकर्णी
Motivational Speaker
9969077133

कोरोनाचा असाही अनुभव

कोरोनाचा असाही अनुभव.

आधीचं करोना बिरोना काही होणार आहे, आस माहित असत त आम्ही इथे आलोच कशाला आसतो.” असं इंडियन स्टोर मध्ये भेटलेल्या मराठी काकू मला सांगत होत्या. इंडियन स्टोर यासाठी कि मी अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनाच्या ग्रीन्सबोरो या शहरात राहते. तर त्या काकू या सगळ्या परिस्थितीला वैतागलेल्या दिसत होत्या. त्या भेटीत आम्ही एकमेकांचे नंबर शेअर केलेत आणि दोघीही आपापलं समान घेण्यात व्यस्त झालोत.

घरी आल्यानंतर माझ्या डोक्यात विचार यायला लागलेत. त्या काकू इथे कधी आल्या असतील, त्यांचे कुठे फिरायला जायचे ठरले होते का?, किंवा त्या कुठे जाऊन आल्या आसतील का? आसे प्रश्न माझ्या डोक्यात येत होते. त्या दिवशी त्यांच्या सोबत त्यांचा मुलगा असल्याने, त्या त्यांच्या मुलाकडे काही दिवसासाठी आल्या आहे हे कळत होत. त्या दिवशीच्या त्यांच्या वावरण्य वरून त्या इथे पहिल्यांदाच आल्या आहेतं हे जाणवत होतं. त्या काकूंचा वय ६० ते ६५ च्या दरम्यान असाव आस मला वाटते. या वयात एखाद्या नवीन जागी जाऊन जुळवून घ्यायला किती त्रास होत असेल. केवळ जागाच नवीन नाही, तर हे सगळ जगच त्यांच्या साठी निराळं आहे. इथले लोकं त्यांची भाषा हे सगळाच त्यांच्या करता नवीन आहे. त्यात भर म्हणजे करोना मुळे कुठे फिरायला जाणा तर सोडाच, पण घराबाहेर वॉकला जाण सुद्धा बंद झाल आहे. त्यामुळे त्या घरात कंटाळल्या असतील असं मला वाटत होतं. शेवटी नराहावता दुसऱ्या दिवशी मी त्यांना फोन केला आणि त्यांना माझ्या मनात येतील ते प्रश्न विचारलेत, आमचा गप्पांचा कार्यक्रम बराच वेळ चालला.

त्यांच्याशी बोलताना मला कळलेकी त्या त्यांच्या मुलाकडे आल्या आहेत. त्यांचा मुलगा पाच सहा वर्षापूर्वी अमेरिकेत शिक्षणासाठी आला होता. तो आता इथेच नोकरीला लागला. शिक्षण आणि नोकरी यामुळे  त्याला भारतात जाणा जमला नाही. त्यामुळे काका काकूच त्याला भेटायला आलेत.  गेले सहा महिने झालेत ते इथे आहेत. खरतर tourist Visa हा सहा महिन्यान करताच valid आसतो. काका काकूंची परत जाण्याची तयारी झालीच होती पण मधातच करोनाच सुरु झालं. करोनाची सुरवात अमेरिकेत झाली तेव्हा कोणत्याच प्रवासावर बंधनं नव्हती. परंतु प्रवासात इतर लोक आणि काका काकूंचा वय हे लक्षात घेता त्यांच्या मुलानी त्यांना पाठवलं नाही. त्यांच्या मुलाने घेतेलेला निर्णय खरच योग्य आहे आणि कोणीही हाच निर्णय घेतला असता.

त्यावेळी विचार आला कि काकू आधीच इथल्या सगळ्या परिस्थितील कंटाळल्या होत्या. भारतातल्या सारखा इथे चार मंदिर असतील किंवा शेजारी पाजारी आपण जाऊन बोलू आस काही नसतं. काका काकू जेथे राहतात त्या सोसायटीत क्वचितच भारतीय असतील पण आजून त्यांची कोणाशी ओळख झाली नाही. त्यामुळे बोलायला कोणी नसल्याने ते आजुनच कंटाळले आहेत. बाहेर आता थंडी नसली तरी करोना मुळे कुठे जाण देखील बंद झाला आहे. करोनाचा प्रसार पाहता त्यांना आजून इथे चार पाच महिने तरी काढावे लागणार आहेत.  

असे कितीतरी जणं इथे वेग वेगळ्या कारणांनी आले असतील आणि इथे आडकून पडले असतील. कोणी ट्रेनिंगला एक दोन महिन्या साठीच आल असेल, तर कोणी आपल्या मुला मुली कडे काही दिवांसाठी आला असेल. त्यांचे भारतात काही प्लान्स ठरले असतील कोणी आपल्या मुलाबाळांना सोडून आले असतील. त्या सर्व लोकांचे परत जाने निदान चार पाच महिन्या साठी तरी लाबंले आहे. इथे काही कामा निमित्त्य आलेले लोकं आणि त्यांची मायदेशी वाट पहाणर्या लोकांची काय अवस्था झाली असेल हे त्यांच त्यांनाच ठाऊक. सध्या स्थितीत अमेरिकेत करोनाचे रुग्ण इथे खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. हि परिस्थिती आणखीन  किती दिवस राहील काही सांगता येणे कठीण आहे. त्यामुळे शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे आणि हे संकट लवकर संपू दे अशी देवाजवळ प्रार्थना करणे हेच आपल्या हातात आहे. (photo – naukaridotcom & google)

  • धनश्री पंडित नानोटी, अमेरिका.

दिवा एकतेचा आणि राष्ट्र रक्षणाचा. 

दिवा एकतेचा आणि राष्ट्र रक्षणाचा 

भारतावर गेल्या तीन महिन्यापासून कोरोना विषाणूचे संकट प्रकर्षाने जाणवायला लागले आणि तेव्हा पासून दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग देशात वाढताना आपल्याला  दिसतो आहे. जगातील जवळपास १८० देशावर कोरोंनाचे संकट असून प्रत्तेक देश या सकटचा सर्वतोपरी सामना करताना दिसतो आहे.

भारतात सुद्धा केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून या संकटाचा सामना करण्यासाठी व जनतेच्या हितासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.  ईश्वर सुद्धा या संकटाच्या समयी डॉक्टर, नर्सेस, पोलिस, सफाई कर्मचारी, प्रशासनातील सर्व अधिकारी – कर्मचारी अशा विविध दिवस – रात्र झटणार्‍या सज्जनांच्या रूपाने आपल्यासोबत मैदानात आहे. असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. २१ दिवसाचा लॉक डाउन घोषित केल्या पासून असंख्य लोक सैनिक म्हणून आहे तिथेच थांबून व आहे त्या परिस्थितीत लढा देत आहेत.

गेल्या आठवड्यात या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या दृष्टीने तसेच सर्वांचे मनोबल वाढवण्यासाठी आपल्या घरूनच टाळ्या, घंटी, थाळी वाजवण्याचे आवाहन देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी केले. या आवाहनाला जनतेने प्रचंड प्रतिसाद दिला. काही भागात उत्साही नागरिकांनी हा उपक्रम सामूहिक केला. सामूहिक उपक्रम करणे योग्य नव्हते पण त्यात मोदींचा काय दोष. देशातील काही तुरळक भागातून मोदींनी दिलेल्या या उपक्रमाचा चुकीचा अर्थ काढून टीका करण्यात आली परंतु जनतेनी त्याची दखल  घेतल्याचे दिसत नाही..

गेल्या काही दिवसातील देशातील घटना उघडकीस आल्या नंतर, समाज कंटकाकडून देशात कोरोना विषाणू मुद्दाम पसरवण्याचा प्रयत्न तर केला जात नाही ना ? अशी शंका कोरोना विरुद्ध लढणार्‍या तमाम देशवासीयांच्या मनात निर्माण झाली  व यामुळे देशात भीतीचे वातावरण निर्माण झाले . अशा समाजकंटाकामुळे देशातील परिस्थिति हाता बाहेर जाते की काय ? असा मोठा प्रश्न आज देशातील नागरिकांसमोर  निर्माण झाला आहे.  

पुन्हा मोदींनी जनतेला आवाहन केले की ५ मार्च ला रात्री ९ वाजता  घरातील सर्व लाइट बंद करून आपल्या घराच्या अंगणात किंवा ग्यालरीत ९ मिनिटांसाठी पणती किंवा दिवा किंवा मोबाइल टॉर्च लावून आपण  सारे भारतीय एक आहोत आणि कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी, राष्ट्र रक्षणासाठी आपण सज्ज आहोत असा संदेश देण्याचे आवाहन केले.

समजाच्या सर्व स्तरातील गरीब, मध्यमवर्गीय, श्रीमंत, संत महंत, कलाकार, उद्योजक, शेतकरी, शेतमाजुर अशा सर्व भारतीयांनी स्वयंस्पुर्थीने मोठ्या प्रमाणात  राष्ट्रप्रमुखांच्या आवाहनाला प्रतिसाद देत संपूर्ण देश ठरलेल्या वेळी एका तालात आणि एका सूरात मोदींच्या मागे दिवा घेऊन उभा दिसला. आम्ही एक आहोत आणि राष्ट्र रक्षणासाठी सज्ज आहोत जणू असा निर्धार तमाम भारतीयांनी केला.

 

  • नितिन राजवैद्य         

तणावाचे व्यवस्थापन

? अप्रोच महत्वाचा असतो ?
आयुष्य तुमचं आहे आणि ते कसं जगायचं ते तुमच्या हातात आहे. त्याची माती करायची ठरवलीत तरी तुम्हाला विचारणारं कुणी नाही. आणि त्याचं सोनं करायचं ठरवलंत तरी तुमचे तुम्हीच जिम्मेदार. परिस्थिती कशी असावी ते आपल्या हातात नाही. त्या परिस्थितीत आपण कसं वागावं हा आपला चॉइस असतो. आलेल्या आपत्तीचं रूपांतर इष्टापत्तीत करणे हे तुमचं कौशल्य असतं. अशा वेळी महत्वाचा असतो तो तुमचा ऍप्रोच, आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन…!

माझे सिंगापूरस्थित वर्गमित्र सुबोध मेहता यांनी अशी सूचना केली की व्हिडीओ क्लिपच्या माध्यमातून संवाद साधू शकलात तर ते अधिक परिणामकारक होईल. आम्हाला अधिक आवडेल…! म्हणून एक छोटीशी व्हिडीओ क्लिप सोबत जोडलीय. जास्त मोठी नाही, अवघ्या ३५ सेकंदांची आहे. पण अवश्य पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवत राहा.

याआधीचे दोन्ही लेख (आणि एकंदरीत ही संकल्पनाच) लोकांना खूप आवडली हे मला येणाऱ्या प्रतिक्रियांमध्ये दिसतंय. आणि त्याने माझीही उमेद वाढत्येय.

तेव्हा, भेटत राहू… बोलत राहू. तोवर निरोप घेतो. ?

 

[embedyt] https://www.youtube.com/watch?v=uPU_WrdizoQ[/embedyt]

 

-प्रसाद कुलकर्णी
Motivational Speaker
9969077133

अमेरिकेतील भारतीय समाज.

अमेरिकेतील भारतीय समाज.

मूळ भारतीय असणारा आणि सध्या  अमेरिकेत राहणारा भारतीय समाज हा अमेरिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे. अनुक्रमे चीन आणि  हिस्पॅनिक यांच्यानंतरचा हा तिसरा अमेरिकेतर समाज आहे.

2017 च्या अमेरिकी लोकसंख्या च्या 1.0 3% अंदाजे 44 लाख त्याची संख्या आहे. यात 51% हिंदू ,18.6% ख्रिश्चन ,10 टक्के मुसलमान, 5 टक्के शीख ,2 टक्के जैन आणि 10 टक्के ज्यांनी धर्म नोंदवलेला नाही असे अशी एकूण वर्गवारी आहे.

भाषा नुसार विचार केला तर हिंदी, गुजराती, पंजाबी, तेलगू या भाषा जास्त बोलल्या जातात.

अमेरिकेचा लोकसंख्या वाढीचा वेग 13 टक्के आहे तर  अमेरिकेतील भारतीय समाजाचा वाढीचा वेग 130 टक्के आहे.

इतिहास:

तसे तर सन सोळाशे च्या नंतरच ईस्ट इंडिया कंपनीने काही भारतीय अमेरिकन  कॉलनीत आणले. परंतु भारतीयांचा जाणवण्यासारखा येण्याचा प्रवाह अठराव्या शतकात सुरू झाला. इसवी सन 1900 पर्यंत अमेरिकेत 2000 भारतीय शीख राहत होते. ही शीख मंडळी त्या वेळी कॅलिफोर्नियामध्ये राहत होती आणि तेथील मेक्सिकन लोकांशी मिळून राहत होती.  यांनाही वंशभेदाचा त्रास झाला .अनेक कायदे त्यांच्याविरुद्ध तयार करण्यात आले. यांना गोऱ्या महिलेशी लग्न करायची परवानगी नव्हती. जमिनीची मालकी हक्क नव्हता. अशा अडचणी होत्या परंतु ब्राऊन म्हणजे  मेक्सिकन स्त्रीशी लग्न करता येत होते. 1910 मध्ये भिकाजी बलसारा यांना प्रथमच स्वतंत्रपणे औपचारिकरीत्या अमेरिकन नागरिकत्व मिळाले. ते पारशी होते आणि पारशी हिंदू पेक्षा वेगळी व गोरी जमात आहे हा त्या वेळी तर्क होता मुजुमदार यांनाही  कॉकेशियन समजून नागरिकत्व देण्यात आले.

नागरिकत्व साठी लढा मराठी माणसाचा:

1913 ते 23 च्या दरम्यान 100 भारतीयांना अमेरिकन नागरिकत्व देण्यात आले. 1923 मध्ये अमेरिकन सुप्रीम कोर्टाने एका खटल्यांमध्ये असा निर्णय दिला की ,भारतीय हे फ्री , मूक्त गोरे नाहीत  आणि ते कॉकेशियन आहेत हा आधार त्यांना नागरिकत्व द्यायला पुरेसा नाही म्हणून त्यांना नागरिकत्व देता येणार नाही .भारतीय आणि अमेरिका यांच्यात  प्रचंड तफावत आहे आणि ते या समाजात मिसळू शकणार नाही असेही न्यायालयाने म्हटले.या निकालाच्या परिणामी 50 भारतीयांचे नागरिकत्व काढून घेण्यात आले. सखाराम गणेश पंडित हे एक वकील होते आणि एका गोऱ्या स्त्रीशी त्यांनी लग्न केले होते .त्यांनी या निकालाच्या विरुद्ध लढा दिला आणि त्यांना नागरिकत्व पुन्हा बहाल झालं परंतु यानंतर असं नागरिकत्व अन्य कोणालाही बहाल केलं नाही. यामुळे सुमारे 3000 भारतीयांना अमेरिकेतून परत भारताकडे  निघण्याची वेळ आली आणि सर्वांना ते शक्य नव्हतं .यामुळे यशोदास बघाई या भारतीयाने आत्महत्या केली .या घटनेचा परिणाम म्हणून या निर्णयावर प्रश्नचिन्ह लागलं आणि इमिग्रेशन ही वनवे सिस्टीम होऊ शकत नाही ही असेच सर्वांना वाटलं.
1917 च्या इम्मिग्रेशन कायद्यामुळे भारतीयांचं इमिग्रेशन कमी झालं आणि त्यांना मेक्सिकोचे वाटेने अवैधरित्या अमेरिकेत प्रवेश करणे हाच एक पर्याय उरला आणि त्या वेळी राहणारा शीख समाज त्यांना सहज आपल्यामध्ये सामावून घेत होता. अशाप्रकारे 1923 ते 1935 या काळात सुमारे 2000 भारतीय प्रामुख्याने शीख अवैधरित्या अमेरिकेत आले. गदर पार्टीने यांना वसवण्यासाठी पण पुष्कळ मदत केली आणि यातून  गदर पार्टीला पैशाचा स्त्रोत पण मिळाला.

दुसऱ्या महायुद्धानंतर:

द्वितीय महायुद्धानंतर लुईस सेलर नुसार 1946 पासून दरवर्षी 100 भारतीयांना स्थलांतराची, अमेरिकन नागरिकत्व मिळण्याची परवानगी देण्यात आली. 1952 च्या एका कायद्यानुसार 1917 चा कायदा निष्प्रभ करण्यात आला. मात्र दरवर्षी भारतीयांच्या प्रवेशाची मर्यादा 2000 ठरविनण्यात आली. 1910 मध्ये 95 टक्के अमेरिकन भारतीय पश्चिम किनाऱ्यावर राहत होते ही संख्या कमी होत 65% वर आली कारण भारतीय आता पूर्व किनाऱ्याकडे जाऊ लागले होते.  1940 मध्ये 43 राज्यात भारतीय राहत होते .पश्चिम किनाऱ्यावरील भारतीय प्रामुख्याने ग्रामीण भागात राहत होते तर पूर्व किनाऱ्यावरील भारतीय प्रामुख्याने नागरी वस्त्यांमध्ये शहरांमध्ये राहत होते. ब्रेक यारो कार्यक्रमामुळे मेक्सिकन लोकं शेती वर कामे करू लागले आणि भारतीय लोक छोटी दुकान चालवणे, टॅक्सी चालविणे, इंजिनिअर बनणे असे अशा कामांमध्ये प्रवेश करू लागले‌

गुजराती भारतीयांचे स्थलांतर:

त्यानंतरच्या काळात गुजराती भारतीयांचा नवीन स्थलांतराचा लोंढा सुरू झाला आणि त्यांनी हॉटेल उघडणे मोठ्या प्रमाणावर चालू केलं. 1955 मध्ये एकवीस हॉटेल उद्योगांपैकी चौदा-पंधरा गुजरातींचे होते आणि 1980 पर्यंत गुजराती समाजाने हॉटेल उद्योगावर आपला पगडा जमवला

1985 नंतर:

1985 च्या इम्मिग्रेशन कायद्यामुळे भारतीयांसाठी अमेरिकेची दारे मोठ्या प्रमाणावर उघडले गेले आणि यात  पारंपारिक उत्तर भारतीय पेक्षा वेगळे समुदाय येऊ लागले .अमेरिकेत येणारे सारेच भारतीय भारतातून येत होते असं नाही तर जगभर असलेल्या भारतीयांच्या वसाहतीतून पण ही मंडळी येत होती , येत राहिली .1965 ते 1995 यादरम्यान दरवर्षी सरासरी 40000 भारतीय अमेरिकेत स्थलांतरित होत गेले. त्यानंतर हा आकडा झपाट्याने वाढत गेला आणि इसवी सन 2000 मध्ये त्यांनी 90000 आकडा गाठला

2000 नंतर:

इसवी सन 2000 नंतर अनेक कारणाने भारताच्या स्थलांतर प्रवाहाला एक प्रचंड गती आणि वेगळेच स्वरूप प्राप्त झाले .प्रायव्हेटायजेशन, स्पर्धा ,भारतीय शिक्षण, दक्षिणेतल्या बंगलोर ,हैदराबाद सारख्या ठिकाणी इन्फॉर्मेशन इंडस्ट्रीज यामुळे या ठिकाणाहून येणारा एक मोठा वर्ग तयार झाला आणि जुन्या आंध्रप्रदेश मध्ये आंध्रप्रदेश, तेलंगणा या राज्यातून तेलगू भाषिक प्रवाशी भारतीय प्रचंड प्रमाणात अमेरिकेत घेऊ लागले आणि लवकर त्यांनी अन्य सर्व भाषिक भारतीयांना मागे टाकून एक नंबरचा भाषिक भारतीयांचे स्थान पटकावले.
याशिवाय केरळ ,तामिळनाडू ,कर्नाटक आणि गुजरात या राज्यातील भारतीय अमेरिकेच्या विविध भागात मोठ्या संख्येने वसले आहेत.
2006 मध्ये अमेरिकेत आलेल्या एक लाख 26 हजार स्थलांतरा पैकी 58 हजार भारतीय होते. 2000 ते 2006 यादरम्यान सव्वा चार लाख भारतीयांचा अमेरिकेत प्रवेश झाला 1990 ते 2000 यादरम्यान भारतीयांच्या वाढीचा वेग 106 टक्के होता तर अमेरिकेच्या सरासरी वाढी दर साडेसात टक्के होता.

भारतीयांची वैशिष्ट्ये:

एशियन अमेरिकन कम्युनिटीमध्ये भारतीयांचा वाटा सोळा टक्के आहे. या काळामध्ये भारतीयांची संख्या दहा लाखाच्या वर पोहोचली. 1995 -2005 भारतीयांनी स्थापन केलेल्या उद्योगांची संख्या इंग्लंड, चीन ,जपान आणि तैवान येथून  आलेल्यांनी स्थापन केलेल्या एकूण उद्योगांच्या संख्या पेक्षा जास्त होती. 1999 ते 2005 याकाळात सिलिकॉन व्हॅलीमध्ये भारतीय चे प्रमाण साडे सहा टक्के वरून साडे पंधरा टक्केपर्यंत पोहोचले. सर्व मोठ्या व महत्त्वाच्या अमेरिकन कंपन्यांमध्ये टॉपच्या जागांवर भारतीय-अमेरिकन पोचले. हे सर्व भारतीय अतिशय असामान्य आर्थिक स्थितीतून आले होते उदाहरणार्थ गुगलचे प्रमुख सुंदर पीचाई लहानपणी आपल्या घरी टीव्ही सुद्धा पाहू शकत नव्हते आणि आपल्या टू बेडरूम अपार्टमेंटमध्ये कुठल्याही टेक्नॉलॉजी शिवाय आपल्या भावासोबत राहत होते ताज्याआकडेवारीनुसार भारतीय बिझनेस स्कूलमधून पास होणारे 23 टक्के विद्यार्थी अमेरिकेमध्ये नोकरी धरतात.

उच्च शिक्षित भारतीय:

भारतीय अमेरिकन इतर कोणत्याही भाषिक गटा पेक्षा जास्त गतीने  व सातत्याने आर्थिक सामाजिक आघाडीवर प्रगती करीत आहे.2006 मध्ये डॉक्टरामध्ये त्यांचा वाटा सहा टक्के पेक्षा अधिक होता.
2015 मधील एका अभ्यासानुसार पंचवीस वर्षाच्या वरील अमेरिकन भारतीयांमध्ये पदवी शिक्षण घेतलेल्याचे प्रमाण 32 टक्के आहे 40% पोस्टग्रज्युएट आहेत .साधारण अमेरिकन नागरिकांसाठी हे प्रमाण अनुक्रमे 19 टक्के आणि 11 टक्के आहे.

सर्वाधिक उत्पन्न:

उत्पन्नाच्या बाबतीत भारतीय अमेरिकन गटाने नेटिव्ह अमेरिकन आणि अन्य स्थलांतरित गट या दोघांनाही मागे टाकले आहे भारतीय अमेरिकन गटाचं सरासरी वार्षिक उत्पन्न 100,000 डॉलर्स आहे तर अन्य स्थलांतरित गट आणि नेटिव्ह अमेरिकन यांच्यासाठी हे प्रमाण अनुक्रमे 51 हजार आणि 56 हजार डॉलर्स आहे.
शिक्षणावर भर आणि उत्तम कामाची क्षमता या व इतर काही गुणांमुळे  भारतीय अमेरिकन हे आर्थिक दृष्ट्या सर्वाधिक यशस्वी आणि सर्वाधिक श्रीमंत असा वांशिक/इथनिक समूह ठरला आहे.
फक्त सात टक्के भारतीय अमेरिकन दारिद्र्यरेषेखाली आहे अमेरिकन जन्मलेले आणि अन्य समूहासाठी हे प्रमाण अनुक्रमे सतरा व 14 टक्के आहे.

न्यूयॉर्क मध्ये सर्वाधिक भारतीय:

न्यूयार्क शहरात सर्वाधिक अमेरिकन भारतीय राहतात ही संख्या 3 लाखाहून जास्त आहे. त्यापाठोपाठ न्यूजर्सी दोन लाख 97 हजार, टेक्सास दोन लाख 45 हजारआणि इलिनोईस 180,000 ही शहरे येतात. विशेष म्हणजे हे आकडे 2010 च्या सेन्सस नुसार आहेत. आता 2019 मध्ये हे आकडे किती वाढले असतील याची कल्पना आपण करू शकतो. मिनी इंडिया किंवा लघु भारत म्हणता येईल अशी एकट्या न्यूयार्क शहरात 21 वस्त्या आहेत.
याशिवाय जिथे अमेरिकन भारतीयांची संख्या जाणवण्या सारखीच आहे अशी शहरे म्हणजे बाल्टिमोर, वॉशिंग्टन ,अटलांटा ,डेट्रॉईट, सॅन फ्रान्सिस्को, हुस्टन  ,फिलाडेल्फिया, शिकागो आहेत
अगदी 1910 च्या सर्वात आधीच्या  भारतीय अमेरिकन वसाहती म्हणजे स्टॉप टोन साक्रामेंटो युवा सिटी. पण या वसाहती शेती च्या भागात असल्यामुळे इथे लोकसंख्या आता कमी आहे

तेलुगू भाषिक सर्वाधिक:

भारताबाहेर भारतीयांची संख्या सर्वाधिक असण्यामध्ये अमेरिका हे प्रथम गंतव्य स्थान आहे हे विशेष.
हिंदी ,तेलगू, कन्नड ,बंगाली ,पंजाबी अशा विविध  भाषांमध्ये ते तिथे रेडिओ स्टेशन्स आहेत. महानगरांमध्ये फक्त बॉलीवुडचे किंवा तेलगू सिनेमा दाखवणारे मूवी थिएटर्स पण आहेत. 2012 मध्ये तेजू प्रसाद यांनी अमेरिकेतील भारतीयांचा प्रवास दाखविणारा एक सिनेमा पण काढला होता नाट ए फीदर बट डॉट, असे त्याचे नाव आहे.
नजीकच्या काळात पॉप्युलर मीडियामध्ये अनेक भारतीय अमेरिकन यांनी आपली छाप सोडली यात प्रमुख आहेत कोविद गुप्ता, काल पेन अजीज अन्सारी ,हसंन मिन्हाज आणि मीडी कॉलिंग.

50 ही राज्यात मंदिरे:

भारतीय समाजाच्या विविध आधारे भाषा पंथ धर्म व्यवसाय अशा अनेक संघटना इथे आहेत त्यांचे फेडरेशन पण आहेत आणि ते अमेरिकेत भारतीयाचा आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न करीत असतात .सर्व प्रकारचे मंदिर गुरुद्वारा येथे 50 ही राज्यांमध्ये आहेत.
2008 च्या ठिकाण अंदाजानुसार अमेरिकेत बावीस लाखावर हिंदू समाज आहे तर तीन ते पाच लाखाच्या दरम्यान शीख समाज आहे. भारतीयांचे स्वतंत्र चर्च पण वेगवेगळ्या ठिकाणी आहेत भारतीय ज्यु हा भारतीय-अमेरिकन मधील सर्वात लहान धार्मिक समूह आहे त्याची संख्या आहे 350 फक्त. (photo – financialexpress)

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन आज दिवे लावायचे का ?

मननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन आज दिवे लावायचे का ?

आजच्या दिवशी दिवे लावणे किती तार्कीक आहे ? त्यामागे काय लॉजिक आहे असा प्रश्न अनेक लोक विचार आहेत.
आज देशाचे प्रमुख म्हणून श्री नरेंद्र मोदी आपल्याला जे जे काही सामुहीक कृती करायला सांगत आहेत ते सर्व करणे आपल्या देशाच्या, समाजाच्या आणि स्वत:च्या फायद्याचेच आहे. हे लक्षात घेताना सोबतच आपल्या एवढ्यामोठ्या खंडप्राय देशाचा आवाका आणि विस्तार लक्षात घेतल्यावर आणि हा विस्तार व आवाका संदर्भ म्हणून मागे ठेवल्यावर आपल्याला त्यांचे शब्द व त्यांची हे किंवा असे काही करण्याची प्रेरणा लक्षात घेणे अवघड जाणार नाही.
एखाद्या मोठ्या कामात खुप मोठ्याप्रमाणात जनसमुदाय सहभागी करून घ्यायचा असल्यास त्या सर्व जनसमुदायाकडून एखादे ठराविक काम करून घेणे किंवा न करून घेणे यासाठी नेत्याला खुप मोठी कसरत करावी लागते. कारण जनसमुदाय जर मोठा असेल तर त्यांच्यात विविधता वाढते. वय, लिंग, भाषा, शैक्षणिक, सामाजिक समज, आर्थीक स्तर, समाजात मिसळून काम करण्याची क्षमता अश्या अनेक पातळीवर समाज भिन्न भिन्न प्रकारे व्यक्त होत असतो. अश्यावेळी उत्तम नेता तोच असतो जो या सर्व भिन्नतांनी भरपुर असलेल्या समाजातून एक लसावी (लघुत्तम सामाईक विभाजक) शोधून काढेल व एका साध्या मात्र समान कृतीने समाजातील सर्वच स्तर एकसंध बांधेल. यामुळे समाजातील सर्वांनाच व्यक्त होता येते व सहभागी होता येते. प्रत्यक्षात समाजातील सर्वच लोकांचा सहभाग खुप मोलाची भर टाकतो असे नसते मात्र ज्या कारणासाठी किंवा ज्या हेतूसाठी समाजाचा नेता एखादी चळवळ उभी करतो ती चळवळ किंवा ते धेय्यं या छोट्या कृतीमुळे सगळ्या समाजाला आपलेसे नव्हे आपले स्वत:चे वाटते. त्यात जनसहभाग वाढतो आणि शेवटी ती चळवळ सफ़ल होते. ती कृती किंवा ती चळवळ त्या क्षणी शुल्लक, हास्यास्पद किंवा अतार्कीक जरी वाटत असली तरी जरा न्याहाळून पाहिले असता त्या कृती मागे बहुतांश जनता काहीतरी कृती करून अपला सहभाग नोंदवू शकते अशी अपेक्षा असते. व असे केल्याने तो जनसमुदाय त्या चळवळीशी भावनिकदृष्ट्या जोडला जातो. ती चळवळ जनतेची चळवळ होते व धेय्य साध्य होते.
या विषयीचं एक खुपच प्रभावी व आपल्या सर्वांना माहिती असलेलं उदाहरण बघुया. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सर्वात मोठे नेते म्हणजे महात्मा गांधी. सुमारे 90 वर्षांपुर्वी म्हणजे 1930 साली त्यांनी ‘सविनय कायदेभंगा’ची चळवळ सुरू केली. आता त्याकाळी ही चळवळ लोकांपर्यंत पोहोचवणे आणि लोकांना या चळवळीत सहभागी होण्यासाठी प्रेरीत करणे यासाठी गांधीजींनी एक कार्यक्रम आखला. त्यांनी 12 मार्च 1930 रोजी आपल्या साबरमतीच्या आश्रमातून केवळ 80 लोक घेऊन सुमारे 390 किमी अंतरावर असलेल्या दांडी येथे समुद्रकिना-यावर जाऊन ब्रिटीश कायद्याला मोडून मुठभर मिठ उचलून कायदेभंग करण्याचे ठरवले. आता याकडे तार्कीक किंवा आजच्या भाषेत लॉजीकल दृष्टीने पाहिले तर यात काहीच अर्थ वाटत नाही. 390 किमी चालायचं आणि काय करायचं तर एक मुठ मिठ उचलायचं. ब्रिटीश सरकारनेसुध्दा सुरूवातीला या दांडी यात्रेकडे दुर्लक्ष केले. मात्र ही यात्रा जसजशी समोर जात गेली तस तसे लोक या यात्रेत सहभागी होत गेले. जगभरातून या यात्रेकडे लोक आकर्षीत झाले. अहिंसक आंदोलन, पदयात्रा आणि केवळ मुठभर मिठ उचलण्याचा कार्यक्रम. मात्र हजारो लोक या यात्रेत सहभागी झाले. तुम्ही कुठल्याही स्तरातील असा, उच्च शिक्षीत, शेतकरी, कामगार, सवर्ण , बहुजन अगदी कुणीही असाल तरी या साध्या कार्यक्रमात तुम्ही सहभागी होऊ शकता आणि देशासाठी आपलं बहुमोल असे योगदान देऊ शकता. आणि हो हे फार महत्वाचे योगदान आहे. हे सगळं त्या काळात गांधीजींनी देशातील जनतेला पटवू दिलं आणि त्याचे फलीत आपल्या समोर आले ते एका मोठ्या जनचळवळीच्या स्वरूपात. जेव्हा 24 दिवसांनंतर गांधीजी दांडी येथे पोहोचले तेव्हा पन्नास हजार पेक्षा जास्त लोक सहभागी झाले होते. जगातील सर्वच महत्वाच्या न्युजपेपरनी या दांडी यात्रेची दखल घेतली होती. जगभरात भारताच्या स्वातंत्र्यासाठी भारतीय लोकांचे अहिंसंक मार्गाने चाललेले आंदोलन अशी दखल घेतली. आणि भारताच्या दृष्टीने सर्वात महत्वाची गोष्ट अशी की भारतीय जनतेला या चळवळीच्या माध्यमातून गांधीजींनी एक छोटा मात्र प्रभावी कार्यक्रम दिला. ज्याने देशातील नागरीक प्रत्यक्ष या लढ्यात सहभागी होऊ शकतील. कार्यक्रम काय होता ? तर ठरवून ब्रिटीशांचा कायदा अहिंसक मार्गाने मोडायचा. हे सहज होते, प्रत्येक जण आपआपल्या गावी, खेड्यात , गावात हे करू शकत होता. या अश्या कार्यक्रमामुळे स्वातंत्र्यप्राप्तीची चळवळ जी आधी केवळ उच्चशिक्षीत लोकांची होती ती चळवळ गांधीजींनी भारतातील जनसामान्याची करून दाखवली.
वरील उदाहरणावरून असे सांगता येईल की दांडी यात्रेत एवढे किलोमीटर चालत जाऊन मुठभर नीट उचलून जे साधले गेलं ते ज्या दिवे लावण्याने साधले जाणार आहे. देश पातळीवरील नेते किंवा भारतासारख्या खंडप्राय देशातील नेते जेव्हा एखादा कार्यक्रम जनतेला देतात तेव्हा तो बहुतांश जनतेच्या सहभागाच्या कार्यक्रम असावा लागतो जेणेकरून समाजातील सर्व स्तरातील नागरिकांना त्यांचा सहभाग देता येईल व प्रत्येकाला आपल्या योगदानाचे समाधान मिळेल. असे कार्यक्रम किंवा अशी सामूहिक कृती जेव्हा एखाद्या नेत्याकडून समाजाला दिल्या जाते तेव्हा त्यातील कृती किंवा त्यातील करावयाची गोष्ट महत्त्वाची नसून त्यामागे एक समान विचार घेऊन एक समान कृती करण्याचा प्रयत्न असतो.

यामुळे एवढ्या मोठ्या देशातील एवढी मोठी लोकसंख्या आपल्यातील सगळे भेद विसरून, आपल्यातील सगळे वेगळेपण बाजूला ठेवून एका विचाराने, एका भावनेने, एकत्र येऊन एक छोटीशी कृती करतात. त्या छोट्या कृतीचे प्रत्यक्ष व्यवहारात उपयोजन काही नसेलही, मात्र देशातील जनतेला भावनेच्या आणि विचाराच्या एका समान पातळीवर आणणे व एखाद्या संकटाशी मुकाबला करण्यासाठी एक समान विचार पेरणे, ही महत्वाची कृती, ही महत्त्वाची जबाबदारी, ही महत्त्वाची घटना याद्वारे साधल्या जाते. त्यामुळे इंग्रजांच्या विरोधात इंग्रजी कायदा हा जाणीवपूर्वक तोडणे आणि त्याला सविनय कायदेभंग म्हणेने असा जो कार्यक्रम गांधीजींनी दिला होता त्यात करावयाची कृती फार छोटी होती मूठभर मीठ उचलले किंवा जंगलात प्रवेश करणे किंवा एखादा कायदा जाणीवपुर्वक सविनय तोडणे असा तो प्रकार होता मात्र त्यातून तयार झालेली जनजागृती, आपण स्वतंत्र व्हावे अशी उर्मी आणि आपण या मोठ्या कामात सहभाग घेऊ शकतो ही जाणीव व त्यामुळे मिळालेले समाधान हे फार मोलाचं होतं.
अश्याच मोठ्या संकटाला जेव्हा देश म्हणून आपण सामोरे जातोय, त्यावेळेस देशातील सर्वच नागरिक जे कुठल्याही पातळीवर असोत, आर्थिक, सामाजिक, राजकीय, भौतिक, भौगोलिक वेगळेपण असलेल्या सर्वांनी एकत्र येऊन एका विशिष्ट वेळी एक विशिष्ट कृती करणे, यातून जो एकसंधतेचा भाव निर्माण होईल व एक वाक्यता समाजात तयार होईल, त्या एक वाक्यतेची, एका विचाराची आज भारताला खूप जास्त गरज आहे. त्यामुळे दिवे लावून कोरोना नष्ट होईल का ? नाही असा प्रश्न विचारणेच चुकीचे आहे. हा उपक्रम कोरोणासाठी नसून जनतेसाठी आहे. जनतेने दिलेल्या कार्यक्रम आपला म्हणून राबवावा व कितीही कंटाळा आला घरात बसण्याचा तरी आपण घरात बसून देशासाठी एक मोठे योगदान देतोय याची त्यांना खात्री व्हावी यासाठी हा उपक्रम आहे. एका वेळेस भारतभर दिवे लावण्याचा हा जो प्रकार आहे तो भारतातील बहुतांश जनतेला करणे सहज शक्य आहे आणि तसं करून सगळा भारतीय समाज जाणिवेच्या आणि विचारांच्या एका समान पातळीवर येतो. आपल्याला या कोरोनाच्या संकटाशी मुकाबला करायचा आहे. आपण एकटे नसून कोट्यावधी भारतीय आपल्या सोबत आहेत. ही भावना लोकांच्या मनात तयार झाली तर लोकांची वागणूक जास्त जबाबदारीची व जाणीवपूर्वक होईल अशी त्यामागची अपेक्षा आहे.

नुसते हर हर महादेव ची गगनभेदी घोषणा देऊन स्वराज्य निर्माण झालं असत का ? तर नाही पण मनमानत स्फुल्लिंग पेटले.

मूठ भर मीठ हातात घेऊन स्वातंत्र्य मिळणार होत का ? तर नाही पण या छोट्याश्या कृतीने  मनमानत देश स्वातंत्र्याची धग निर्माण झाली.

स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे असे म्हणून कोणी स्वराज्य झोळीत टाकणार नव्हते, पण या घोषणेने  मना मनात हा भाव निर्माण झाला. 

युद्धामध्ये आपल्या सैनिकांच्या व साथीदारांच्या  मनमानत  असा स्फुल्लिंग, धग निर्माण करण्याची कृती सुद्धा सेनापतीला करणे गरजेचे असते.  

जगातील सगळे मोठे नेते आपल्या अनुयायांना जेव्हा जेव्हा आपल्या जनतेला अशाच प्रकारे छोटा मात्र सामूहिक कार्यक्रम  देताना दिसून येतात तेव्हा त्यामुळे साधला जाणारा परिणाम हा फार मोठा व महत्त्वाचा असतो हे वारंवार दिसून आले आहे. त्यामुळे केवळ विरोधासाठी विरोध करणारे विरोधक आणि बुद्धिवादी यांना बाजूला सारून आज संध्याकाळी आपण सर्वांनी आपल्या घरी रात्री नऊ वाजता दिवे लावून देशाच्या कोट्यावधी नागरिकांसोबत भावनेच्या एका समान पातळीवर येऊन माननीय पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांच्यासोबत कोरोनाच्या विरुद्ध लढायला सज्ज होऊया.
भारतावरच नव्हे तर समस्त जगातील मानवजातीवर आलेल्या कोरोना नावाच्या संकटाशी लढण्यात आपणा सर्वांना यश येवो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना. 

  • नितिन राजवैद्य. 

मंद प्रकाशातला निधड्या छातीचा वीर

मंद प्रकाशातला निधड्या छातीचा वीर

आज संपूर्ण विश्व कोरोना विषाणूच्या संसर्गाने ग्रासले आहे. अमेरिका चीन सारखे बलाढ्य प्रगत देश परिस्थितीपुढे हतबल झाले आहेत. लाखोंची जनता कोरोना विषाणूच्या विळख्यात सापडली आहे. हजारो लोकांनी प्राण गमावले आहेत. अमेरिकेत आजपर्यत सुमारे ६० लाख लोकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. त्यांनी तशी अमेरिकी सरकारकडे नोंदणी केली आहे. अनेक परिवार घरातील प्रमुख व्यक्ती गमावल्यामुळे अक्षरशः रस्त्यावर आले आहेत.

युरोपात तर अवस्था भयावह आहे. रोज हजारो लोक करोनामुळे बळी पडत आहेत. लाखो लोक कोरोनाच्या विळख्यात येत आहेत. तिथली वैद्यकीय व्यवस्था तर पार कोलमडली आहे. इटलीचे पंतप्रधान तर त्यांचा देश ज्या परिस्थितीमधून जात आहे ते पाहून अक्षरशः रडले. व्हटिकनचे धर्मगुरू पोप यांनी जगातील सर्व ख्रिश्त बांधवाना एकाच वेळी एका विशिष्ठ दिवशी देवाची प्रार्थना करायचे आवाहन केले आणि जगभर लोकांनी त्यांच्या आवाहनास प्रतिसाद देऊन देवाची प्रार्थना केली.

हि सर्व परिस्थिती हा निधड्या छातीचा वीर समजून घेऊन माझ्या १३० कोटी जनतेला या सगळ्यातून कसे वाचवता येईल याचा विचार करत होता. आपल्या देशातील एकंदर लोकांची मानसिकता, उपलब्ध असलेल्या वैद्यकीय सोयीसुविधा, भविष्यात अर्थव्यवस्थेवर होणारे दूरगामी परिणाम पाहून निर्णय कसा घ्यायचा हे ठरवत होता. यातून श्रींमत गरीब कोणीही सुटणार नव्हते याची खात्री त्याला पटली होती. सारासार विचार करून कमीत कमी झळ माझ्या देशबांधवांना कशी बसेल याचा विचार करत होता.

मग निर्णय व त्याची अंमलबजावणी सुरु झाली. सर्वप्रथम सर्व परदेशी नागरिकांचे हिंदुस्थानांत येण्यासाठी दिलेले परवाने रद्द करण्यात आले. हिंदुस्थानांत परदेशांतून येणारी सर्व विमाने येण्यावर बंदी घालण्यात आली. परदेशात अडकलेल्या हिंदुस्थानी नागरिकांना मायदेशी परत सुखरूप आणण्यात आले. त्यांची वैद्यकीय तपासणी विमानतळावरच करून गरजेप्रमाणे करोनाबाधित रूग्णांना विलगीकरण करून मोफत उपचार सुरु करण्यात आले. सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विश्वासात घेऊन तसे निर्देश देण्यात आले. तोपर्यत करोनाचा प्रसार रोखण्यात जगाच्या तुलनेत हिंदुस्थान बऱ्याचअंशी यशस्वी झाला होता.

आता करोना पुढे वाढू नये यासाठी पुढची रणनीती आखायची होती. देशातील लोकांची मानसिकता या निधड्या विराला तळागाळात काम केल्यामुळे चांगलीच माहिती होती. सगळी निर्णय क्षमता असताना सुद्धा आणीबाणी सारखा काळा निर्णय घ्यायचा नव्हता. प्रसार माध्यमांची गळचेपी करायची नव्हती. या सगळ्या बाबींचा विचार करून करोनाचा प्रसार जर रोखायचा असेल तर यावर औषध एकच आहे ते म्हणजे सामाजिक अंतर(Social Distance) हे आता सिद्ध झाले होते.

चीनसारखा हुकुमशाही देशाने यासाठी बळाचा वापर केला लोकांना घरात कोंडले दारावर खिळे/फळ्या ठोकण्यात आल्या. इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. आपल्या जवळच्या प्रियजनांना करोनामुळे मृत झालेल्यांचे शेवटचे दर्शनसुध्दा घेऊ दिले नाही. धर्माच्या विरोधात जाऊन प्रेताचे दफन करण्याऐवजी दहन करण्यात आले. इतके कडक निर्णय चीनने घेतले.

हिंदुस्थानात बळाचा वापर न करता भावनिक आवाहन करायचे होते. तो दिवस उजाडला आज हा निधड्या छातीचा वीर हिंदुस्थानांतील जनतेला काय आवाहन करणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. या वीराने तमाम हिंदुस्थानी जनतेला जनता कर्फ्यूचे आवाहन केले आणि या संकटकाळी फक्त एक दिवस घरी राहायचे आवाहन केले. या कठीण काळात आपले डॉक्टर पोलीस व सर्व अत्यावश्यक सेवा देणारे सहायक यांचे संध्याकाळी ५ वाजता टाळ्या/थाळ्या वाजवून आभार मानावे अशी भावनिक साद घातली.

आणि काय आश्चर्य त्यादिवशी तमाम हिंदुस्थानी जनतेने जनता कर्फ्यूला प्रचंड प्रतिसाद दिला. सगळा हिंदुस्थात या दिवशी थांबला. या निधड्या छातीच्या विराच्या आवाहनला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. तमाम हिंदुस्थानी जनतेने डॉक्टर पोलीस व सर्व अत्यावश्यक सेवा देणारे सहायक यांचे आपल्या घरातूनच मोठ्या जल्लोषात आभार मानले, हिंदुस्थानाच्या इतिहासात या आवाहनास हिंदुस्थानी जनतेने इतका प्रचंड प्रतिसाद दिला याचे हे कदाचित पहिलेच उदाहरण असावे. त्याचे मुख्य कारण एकच या निधड्या छातीच्या वीरावर असलेला जनतेचा प्रचंड विश्वास. आता पर्यत केलेल्या कामाची जणू ती पावतीच होती कि तमाम जनता या कठीण प्रसंगी या वीराच्या पाठीशी खंभीरपणे उभी राहिली.

देशातील परिस्थिती जास्त चिघळू नये करोनाचा प्रसार जास्त होऊ नये म्हणून या निधड्या वीराने अजून कडक निर्बंध व खबरदारी/ काळजी घ्यायचे ठरवले. परत या वीराने जनतेला फक्त तीन आठवडे घरी राहण्यासाठी पुन्हा एकदा भावनिक आवाहन केले. जनतेने ते स्वीकारले आणि त्याचे पालन करू लागले. सर्व अत्यावशक सेवा नीट चालू ठेवल्या. ज्या ठिकाणी काही कमतरता होत्या त्या त्या राज्य सरकारला सांगून त्या नीट कश्या होतील याचा पाठपुरावा केला. राज्यांना व देशातील नागरिकांना त्रास होणार नाही याची पुरेपूर दक्षता घेतली.

या काळात या निर्णयाविरोधात लोक रस्त्यावर येतील देशात गदारोळ कसा माजेल असे समाजातील काही देशविरोधी घटक व समाजकंटक शक्ती याची वाट पहात होते. करोनाचे रुग्ण देशात वाढल्यावर या निधड्या वीरावर सपासप वार करून याला धारातीर्थी कसे पाडू याचे अगोदरच प्रयत्न चालू होते. परंतु तसे काही घडत नव्हते देशातील नागरिक एका वीराच्या आवाहनावर हे सगळे सहन करत होते त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे रहात होते.

इथेच ठिणगी पडली आजपर्यंत हिंदुस्थानवर राज्य केलेल्या लोकांच्या राजकीय आणि पुरोगामी विचारधारेला हा मोठा धक्का होता. यांना हे सगळे पचनी पडत नव्हते. आपण अनुभवले आहे की या विचारसरणीच्या लोकांच्या आवाहनाला साद देऊन कोणीही फिरकत नाही. उठल्यासुठल्या प्रकरणात मेणबत्ती मोर्चा काढायला लोक पैसे देऊन सुद्धा येत नाहीत. या प्रकरणी कायम चर्चेत व प्रसिद्धीत राहण्यासाठी काही निवडक पत्रकार व प्रसारमाध्यमे यांना पैसे देऊन प्रसिद्धी करावी लागते. या निधड्या विराला इथेच जर थांबवले नाही तर आपली कारकीर्द लवकरच धोक्यात येईल आता याला कसे थांबवावे याच्यासाठी स्वार्थी लोक सक्रीय झाले. यांचा हेतू फक्त नि फक्त या निधड्या वीरावर कसा वार करता येईल त्याने घेतलेल्या निर्णयावर टीका कशी करता येईल एवढाच झाला होता.

याचा प्रत्यय यायला सुरुवात झाली आहे. हळूहळू देशातील वैद्यकीय सेवा कश्या तुटपुंज्या आहेत याचे प्रसार माध्यमे व समाज माध्यमे यांच्या मार्फत प्रचार सुरु करण्यात आला. ९५ टक्के जनता सामाजिक अंतर(Social Distance) पाळत असतांना फक्त ५ टक्के जनता कसे नियमाचे उल्लंघन करत आहे याचेच जास्त चित्रण दाखवण्यात येत आहे. *एक विशिष्ठ समाज रोज प्रार्थना करत असताना करोना पसरवत असल्याचे चित्र समोर दिसत असतांना सुद्धा एकही पुरोगामी या समाजाला काही काळ प्रार्थना करू नका, करोना संसर्ग रोखण्यासाठी सहकार्य करा असे सांगायचे धाडस दाखवू शकला नाही.* या अगोदर या देशात बऱ्याच लोकांना हा देश असुरक्षित वाटत होता असहिष्णु वाटत होता त्यातला एकही जण या एकजुटीच्या वेळी पुढे आला नाही. अश्या मानवताविरोधी घटनेचा निषेध केला नाही. इतर वेळी हे सगळे लोक एकत्र येऊन या निधड्या वीरावर सतत वार करत असतात.

दिल्लीमधील करोनामुळे स्थलांतर करणारे कामगार यांचे अतिरंजित चित्रण केले गेले. गरीब लोक व त्यांचे परिवार शेकडो किलोमीटर चालत कसे गेले याच्या कहाण्या बनवण्यात आल्या. छोटी मुले स्त्रिया चालतांना कश्या उपाशी राहिल्या, चालत असताना काही लोक मृत्यमुखी पडले, त्यांच्यावर करोनाचा प्रसार रोखण्यासाठी त्यांच्यावर घातक ओषधी फवारे मारण्यात याचे परदेशात अनेक वृत्तपत्रात लिखाण केले गेले. हे सगळे चित्रण समाज माध्यामातून सगळीकडे पसरवून हा वीर कसा दोषी आहे हे बिंबवले गेले. खरेतर या गरीब लोकामध्ये अगोदरच अफवा पसरवण्यात आल्या होत्या. या नागरिकाचे वीज पाणी बंद करण्यात येणार आहे अशी माहिती पसरवण्यात आली होती. या लोकांसाठी सोई करणे हि जबाबदारी राज्य सरकारची असते पण यात दोषी मात्र हा निधडा वीरच होता असे पढवले गेले.

या सगळ्यांचा उद्देश एकच होता या गरीब लोकांची सोय केली नाही म्हणून डोकी भडकवून सगळे केलेले प्रयंत्न हाणून पाडायचे आणि संपर्ण देशात यादवी माजवायची. परंतु यावेळीही या पुरोगामी लोकांचा हा प्रयत्न फसला. या गर्दीतील एकही हिदुस्तानी नागरिकाने हातात दगड घेतला नाही. एकाही सरकारी गोष्टीचे नुकसान केले नाही कोणतीही जीवितहानी व वित्तहानी केली नाही. सगळे सहन केले स्वतःच्या परिवारासाठी आणि या निधड्या वीराच्या केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देण्यासाठी.

सगळा देश गेली काही दिवस या वीराच्या आवाहनाचे पालन करत आहे. सामाजिक अंतर(Social Distance) पाळत आहे. या काळात देशाला एकसंध ठेवायची गरज असते या कठीण काळात मनोधैर्य वाढवायचे असते. त्यासाठी हा निधडा वीर सतत जनतेशी वेगवेगळ्या माध्यमातून संवाद साधत आहे. त्याच्या एका आवाहनावर अनेक उद्योगपतींनी करोडो रुपये करोनाविरोधात लढवण्यासाठी दिले. अनेक सामान्य नागरिक शेतकरी आपल्यापरीने मदत करत आहेत. जातीच्या पलीकडे जाऊन हिंदुस्थान एकत्र आला आहे हि बाब काही समाजकंटकांना खटकत आहे.

या निधड्या छातीच्या वीराने जी काही करोनाविरोधात पावले उचलली आहेत त्यामुळे आपल्या देशात याचा संसर्ग अजूनही देशाच्या लोकसंखेच्या मानाने कमी आहे . याची दखल जागतिक आरोग्य संघटनेने घेतली आहे त्याच्या कामाचे कौतुक केले आहे. अनेक देश हिंदुस्थानकडून मदत घेऊन करोनाविरोधात लढत आहेत. या निधड्या छातीला विराला आज गरज आहे करोनाविरोधातील लढाईतील आपल्या सहभागाची.

मला विश्वास आहे हा निधड्या छातीचा वीर हिदुस्तानी जनतेला मंद प्रकाशातून पुन्हा एकदा तेजस्वी हिंदुस्थानाकडे घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही.
चला तर मग एकतेचा दीप लाऊया आणि हिंदुस्थानला तेजस्वी करुया.

  • नंदकुमार शरद घोडके, पुणे. 

( फोटो आंतरजालावरून साभार)

गौरवशाली भारतीय कालगणना

गौरवशाली भारतीय कालगणना भाग १

सांप्रदायिक व वांशिक अभिनिवेश बाजूला ठेवून विचार केला तर हिंदू कालगणनाच वैज्ञानिक सत्याच्या कसोटीला उतरू शकते. या कालगणनेचा प्रारंभ 197 कोटी वर्षांपूर्वी सध्याच्या ब्रह्मांडसृष्टीच्या 51 व्या कल्पाच्या सुरुवातीस केला गेला. कल्पाची विभागणी मन्वंतर व महायुगात केली आहे.
सध्या सातवे म्हणजे वैवस्वत मन्वंतर सुरू आहे. त्यातील 28 वे महायुगातील कलियुग चालू आहे. या कलियुगाच्या 52 व्या शतकाकडे जग वाटचाल करीत आहे. महाभारतीय युद्ध सुरू असतांना व्दापर युग संपून कलियुग सुरू झाले व त्या युद्धात युधिष्ठिरास जय मिळाला. म्हणून या कालगणनेस भारतयुद्ध-संवत, युधिष्ठिर शक, किंवा युगाब्द अशी नावे मिळाली आहेत. या युगाब्दाचा आरंभ इसवीपूर्व 3102 फेब्रुवारी 18 या दिवशी रात्री 12 किंवा प्रात:काली झाला, असे सध्या समजतात.
कालगणना ही खगोलीय गणना आहे. ब्रह्मांडाची उत्पत्ती आणि गतीशी संबंधित म्हणजेच विश्वातील पृथ्वी, ग्रहगोल, सूर्य यांच्या गतींवरून मनुष्याने केलेली क्रमबद्ध कल्पना म्हणजे काल होय.
भारतीय कालगणनेचा सर्वात लहान (सूक्ष्मातिसूक्ष्म) घटक म्हणजे त्रुटि. त्रुटि म्हणजे एका सेकंदाचा 33,750 या भाग. सर्वात मोठा भाग महाकल्प. महाकल्प म्हणजेच सध्याच्या ब्रह्मांडाचे आयुष्य. या महानतम घटकाची व्याप्ती -31,104 शतकोटी वर्षे इतकी आहे. सूर्यासमोर असलेल्या भागास अह = (दिवस) तर मागील भागास रात्री म्हणतात. पृथ्वीच्या गतिमुळे मअहोरात्रिफ होतात. अहोरात्रिलाच सावनदिन किंवा भूदिन म्हणतात. कालांतराने अ-होरा-त्र या शब्दातून होरा शब्द आला.
आंग्ल भाषेतील ऑवर (र्हेीी) हा शब्द होरा या शब्दाचेच भ्रष्ट रूप होय.

चतुर्युगमान
प्रदीर्घ कालावधीच्या गणनेसाठी अत्याधिक दीर्घ कालदर्शक युगांची निर्मिती झाली. 1200 दिव्य वर्षाचे कलियुग म्हणजे मानवी वर्षे 1200 ह्न 360 – 4 लाख 32 हजार वर्षे होतात. कलिचा अर्थ एक. त्यानंतर द्वापरयुग. ते कलीच्या दुप्पट. 2400 दिव्य वर्षे किंवा 8 लाख 64 हजार मानवी वर्षे. त्रेतायुग कलियुगाच्या तिप्पट कालावधीचे. 3600 दिव्य वर्षे = 12 लाख 96 हजार मानवी वर्षाचे. सत्ययुग कलियुगाच्या चौपट 4800 दिव्य वर्षे = 17 लाख 28 हजार मानवी वर्षांचे. ही चार युगे मिळून एक महायुग.
भारतीय विद्वानांच्या मते कल्पारंभात सातही ग्रह एकत्र आले होते. ब्रह्मगुप्त आणि द्वितीय आर्यभट्टांच्या मते 4 लाख 32 हजार वर्षांनी त्याची पुन्हा युती होते. वर्तमान कलियुगाचा आरंभ ख्रिस्ताब्द पूर्व 3102 मध्ये 20 फेब्रुवारीला 2 वाजून 27 मि. 30 सेकंदांनी झाला. त्यावेळी सर्व ग्रह एका राशीत होते.

मन्वन्तर गणना
भारतीय मनीषींनी खगोलशास्त्रीय दृष्टिकोनातून घेतलेला काळाचा वेध आश्चर्यजनक आहे. चतुर्युग आणि महायुग ही परिमाणे सुद्धा सृष्टीचा कालक्रम मोजायला अपुरी आहेत हे लक्षात घेऊन त्यांनी जगत्क्रम आणि पृथ्वीच्या ध्रुवतेमधील परिवर्तन यांचा आधार कालगणनेसाठी घेतला. सृष्टिक्रमातील परिवर्तन 32 कोटी 25लाख 80 हजार वर्षांत होते. योगवसिष्ठात या संबंधी म्हटले आहे. – प्रत्येक मन्वंतरात जगत्क्रम बदलतो. जगाच्या उत्पत्ति, स्थिती व प्रलयानंतर मन्वंतर आरंभ होते. नव्या उत्पत्तीबरोबर दिशाही बदलतात. हे जग खरे की खोटे समजत नाही. बुद्धी भ्रमित होते. 32 कोटी 25 लाख 80 हजार वर्षाचा कालखंड म्हणजे मनु. वैदिक ऋषींनी सृष्टीचा पंचमंडल क्रम शोधून काढला. चंद्रमंडळ, पृथ्वीमंडल, सूर्यमंडल, परमेष्ठीमंडल आणि स्वायंभूव मंडळ. चंद्रमंडल पृथ्वीमंडलाभोवती, पृथ्वीमंडल सूर्यमंडलाभोवती, सूर्यमंडल परमेष्ठी मंडलाभोवती (आकाशगंगेचे केंद्र) केंद्र तर परमेष्ठीमंडल स्वायंभूव मंडलाभोवती मंडलाकार वृत्तात परिभ्रमण करतात. हा परिभ्रमण क्रम कालखंडाच्या जन्माचे कारण आहे.
सूर्यमंडलाच्या परिभ्रमणामुळे पृथ्वीच्या ध्रुवता आणि दिशाक्रमात तसेच जगत्क्रमात परिवर्तन होत राहते.
आधुनिक गणिती अनुमानानुसार सूर्याचा परमेष्ठी मंडलाच्या परिभ्रमणाचा मार्ग 2,00,00,000 खर्व कि.मी. इतका दीर्घ आहे. एका सेकंदाला 250 कि.मी. वेगाने सूर्य हे परिभ्रमण 25 ते 27 कोटी वर्षात पूर्ण करतो. प्राचीन भारतीय गणनेनुसार सूर्याला या परिभ्रमणास 32 कोटी वर्षे लागतात. या परिभ्रमणाच्या कालखंडास मनु किंवा मन्वंतर म्हणतात. एका मन्वंतरात 71 महायुग काल + एक सत्ययुग काल इतका कालखंड येतो. यातील एका सत्ययुगाच्या अधिक कालखंडाला संधिकाल म्हणतात. सूर्यसिद्धांतानुसार (1,18) हाच मन्वंतराचा जलप्लावनाचा काल आहे. कल्पमान परमेष्ठी मंडलाचा स्वायंभूव मंडळाभोवतीचा परिभ्रमण काल म्हणजे कल्प. 14 मन्वंतरे, 15 सत्ययुगे = 1000 महायुगे = 432 कोटी वर्षे हा कालखंड एका कल्पाचा होतो. अथर्ववेदात ही गणना दिली आहे. शत तेज्युतं हायनान् द्वे युगे त्रीणि चत्वारि कृण्म:। इंद्राग्री विश्वे देवास्ते नकुमन्यनतामह्णीयमाना:॥
अयुत म्हणजे 10 हजार, शत अयुत – 10 लाख, अयुताच्या पुढे 2,3,4 या संख्या सांगितल्या आहेत. अंकानाम् वामनो गति: या सिद्धांतानुसार 432 या संख्येवर 7 शून्ये म्हणजे 432 कोटी वर्षे. हाच विश्वदेवाच्या (ॠरश्ररुळशी) परिभ्रमणाचा काल होय.
ब्रह्माचा 1 दिवस म्हणजे 1 कल्प, एक रात्र म्हणजे एक कल्प, अहोरात्र म्हणजे दोन कल्प. म्हणजे 864 कोटी वर्षे होतात.
ब्रह्माचे एक वर्ष = 864 कोटी ह्न 360 = 31,10,40,00,00,000 इतकी वर्षे.
ब्रह्माचे आयुष्य 100 वर्षाचे ही संख्या येते – 31,10,40,00,00,000,00 संपूर्ण ब्रह्मांडाचा (आकाशगंगेचाही) काल हाच होय.
ब्रह्माच्या जीवनाची पहिली 50 ब्राम्हा वर्षे प्रथम मपरार्धफ व नंतरची 50 ब्राम्हा वर्षे द्वितीय परार्ध म्हणून ओळखली जातात.
जलप्रलय आणि नवीन सृष्टीचा प्रारंभ भारतीय मनीषींनी खगोलीय ज्ञानाच्या आधारावर काळाचा वेध घेऊन भविष्यातील संकेतही सूचित केले. विष्णुपुराणात म्हटले आहे. 432 कोटी वर्षात नियमित जलप्रलय होतो. तेव्हा पृथ्वी वसुंधरा राहात नाही. 12 आदित्य म्हणजेच 12 राशीतील सूर्याची किरणे पृथ्वी तप्त करतील. पृथ्वीवरील समस्त जल नष्ट होईल. चंद्र, बुध, शुक्र या ग्रहांप्रमाणेच हा ग्रहही निर्जन, शुष्क होईल. बृहस्पतीवर तोपर्यंत वसूंना धारण करण्याची क्षमता आली असेल. भारतीय ऋषींनी मांडलेला सिद्धांत, त्यांची वैज्ञानिक झेप व त्यातील अचूक संकेत स्पष्ट करतात.

युगांचें वर्षमान
432000 या संख्येला 4, 3, 2 व 1 यांनीं अनुक्रमें गुणिलें असतां ज्या संख्या येतील, तितक्या सौरवर्षांचीं कृत, त्रेता, द्वापर व कलि अशीं अनुक्रमें चार युगें होतात. यावरून 1728000 सौरवर्षांएवढें कृतयुग, 1296000 सौरवर्षांएवढें त्रेतायुग, 864000 सौरवर्षांएवढें द्वापरयुग व 432000 सौरवर्षांएवढें कलियुग अशीं माने आहेत. या प्रत्येक युगाच्या कालामध्यें प्रारंभीं त्याचा द्वादशांश भाग आरंभसंधि व तेवढाच युगाच्या शेवटीं विरामसंधि म्हणून समजला जातो. उदाहरणार्थ, कलियुगवर्षें 432000 याचा बारावा भाग 36000 इतक्या वर्षांचा होतो. म्हणून कलियुगाचीं जीं एकंदर वर्षें वर सांगितलीं, त्यांतीलच पहिलीं 36000 वर्षें त्या युगाचा आरंभसंधि म्हणून समजावीं, व शेवटचीं 36000 वर्षें विरामसंधि म्हणून समजावीं. अर्थातच मध्यें राहिलेलीं 360000 वर्षें हें खरें कलियुग होय. असाच प्रकार प्रत्येक युगाचा समजावा. या चारही युगांचीं एकंदर वर्षें 4320000 होतात, याला ममहायुगफ असें म्हणतात. ज्योतिषशास्त्रांत तर कृत, त्रेता, द्वापर व कलि हे चार मयुगांघ्रिफ (युगचरण) म्हणून मानिले आहेत, व त्यासर्वांच्या मिळून एकंदर समुदायाला (महायुगाला) मयुगफ असें म्हटलें आहे.

मन्वंतरगणना
71 युगें (महायुगें) झालीं म्हणजे एक मन्वन्तर (मनु) होतें. आणि एक मन्वंतर संपून दुसरें सुरू होण्यापूर्वी मध्यंतरीं कृतयुगाएवढा संधिकाल
असतो. त्या संधिकालांत जलप्रलय होतो. यावरून 71 महायुगें म्हणजे 306720000 सौरवर्षें झालीं कीं एक मन्वंतर होतें. आणि इतक्या वर्षांचें एक मन्वंतर झाल्यानंतर कृतयुगाइतकीं 1728000 वर्षें संधिकाल होतो व मग दुसरें मन्वंतर सुरू होतें.

कल्पगणना
एका कल्पामध्यें 14 मन्वंतरें व 14 संधिकाल इतकीं वर्षे होतात, व कल्पाच्या प्रारंभीं कृतयुगाएवढाच आणखी एक पंधरावा संधिकाल
कल्पारंभसंधि म्हणून असतो. याप्रमाणें पाहिलें असतां 14 मन्वंतरांचीं वर्षे 4294080000 इतकीं होतात. आणि पंधरा संधिकालांची वर्षे 25920000 इतकीं होतात. या सर्वांची बेरीज 4320000000 वर्षें हीं एका कल्पाचीं सौरवर्षें झालीं. एवढ्याच कालांत 1000 महायुगें होतात. याप्रमाणें एक हजार महायुगांइतक्या (4320000000) वर्षांनीं भूतसंहारकारी कल्प पूर्ण होतो. यालाच ब्रह्मदेवाचा दिवस म्हणतात, व हा दिवस संपल्यावर एवढीच मोठी त्याची रात्र असते. याप्रमाणें ब्रह्मदेवाच्या एका अहोरात्रामध्यें 8640000000 इतकीं सौरवर्षें होतात.
ब्रह्मदेवाची आयुष्यगणना ब्रह्मदेवाचें एकंदर आयुष्य शंभर वर्षें आहे. एवढ्या कालाला महाकल्प असें नांव पूर्वाचार्यांनीं दिलेलें आहे. काल हा अनादि आहे. तेव्हां आजपर्यंत किती ब्रह्मदेव होऊन गेले असतील, हें मला जाणता येत नाहीं, असें भास्कराचार्य म्हणतात.
ब्रह्मदेवाच्या एका अहोरात्राचा जितका काल वर सांगितला. तशा 360 अहोरात्रांचे त्याचें एक वर्ष होतें व तशी शंभर वर्षे ब्रह्मदेवाचें एकंदर
आयुष्य आहे. म्हणजे ब्रह्मदेवाचें एकंदर आयुष्य 311040000000000 इतकी सौरवर्षे एवढें आहे.
सध्यां ज्या ब्रह्मदेवाचा अधिकार कालावर चालू आहे. त्याचे अर्धे आयुष्य गेले असें कोणी म्हणतात, केवळ चालू असलेल्या कल्पाच्या प्रारंभापासून सिद्धान्तग्रंथांत ग्रहसाधन सांगितलेलें असतें.सध्यांच्या पंचागांत ब्रह्मदेवाचीं 50 वर्षें होऊन गेली व एकावन्नाच्या वर्षाचा पहिला दिवस चालू आहे असें मानिलेलें असतें. (photo – google)

क्रमश:

अनिल सांबरे, नागपूर.
मा. 9225210130

तणावाचे व्यवस्थापन

जगणं सुंदर करणाऱ्या टीप्स – 2

तणावाचे व्यवस्थापन

या लेखमालेतला आजचा हा लेख माझ्या फ़ोर्टी प्लस मित्र आणि मैत्रिणींकरता आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर वयाची चाळीशी ओलांडलेल्या साऱ्यांसाठी आहे. चाळीस… पन्नास… साठ या वयोगटातल्या बहुतांश लोकांनी या वयात ब्लड प्रेशर आणि हायपर टेन्शन यांच्याशी दोस्ती केलेली असते. काहींनी तर डायबेटीस नावाच्या पाहुण्याला आपला देह आंदण दिलेला असतो. छातीत धडधडणं, जीव घाबराघुबरा होणं हे आता परवलीचे शब्द झालेयत. तुम्ही अनावश्यक स्ट्रेस घेताय त्याचं हे दुश्चिन्ह आहे.

आधी मला वाटायचं की ब्लड्प्रेशर, डायबेटिस, हायपर्टेन्शन हे शहरी माणसांचे रोग आहेत. महानगरांत स्ट्रेस हा आपसूक येतच असतो. परवा आमचे कणकवलीतले रिक्षावाले मित्र डगरे म्हणाले, “मागच्या महिन्यात बीपी आणि डायबेटिस एकाच वेळी झाल्याचं समजलं आणि निराश झालोय साहेब! सगळ्याच गोष्टींतून मन उडालय.” तेव्हा मला धक्काच बसला. कठोर मेहनत करणाऱ्या रिक्षावाले, शेतकरी , कामगार बंधू यांनाही आता हे ताण आणि तणाव विळखा घालू लागलेयत.

मुळात ताण आणि तणाव या गोष्टीच न टाळता येण्याजोग्या आहेत. ताण हा आवश्यक आहे आणि तो येणारच याची पक्की खूणगाठ मनाशी बांधून ठेवा. ताण टाळणे ही भ्रामक समजूत आहे. महत्वाचं आहे तुम्ही त्याचं व्यवस्थापन कसं करता ते. म्हणजे बघा, तुम्हाला परीक्षा द्यायची आहे. तुम्ही ताण न घेता आराम करत राहीलात तर पास कसं होणार? तुम्ही ताण घेता तेव्हाच झपाटल्यासारखं काम करता ना! महत्वाचं असतं तो किती मर्यादेपर्यंत घ्यायचा आणि तो किती वेळ घ्यायचा. तुम्ही हातात पाच किलोची वजनदार पिशवी घेऊन घरी चाललायत. घर आलं. आता पिशवी ठेवा खाली. मुक्कामावर पोहोचल्यावर देखील जर तुम्ही हातात पिशवी घेऊन उभे राहीलात तर हात दुखायला लागेल. ताणतणावाचं अगदी असंच असतं. आपलं काम झालं की तो झटकून टाकायचा.

ताणताणावाचं आणखी एक कारण आहे विनाकारण चिंता. मुलाच्या नोकरीची चिंता, मुलीच्या लग्नाची चिंता, म्हातारपणी कसं होणार याची चिंता.. अशा एक ना अनेक चिंता आपलं मन पोखरत असतात आणि देहामध्ये अनावश्यक ताण निर्माण करत असतात. तुमची एनर्जी चिंता करण्यात वाया घालवण्यापेक्षा त्या समस्येवर उपाय शोधण्यात खर्च केलीत तर चिंता करावी लागणार नाही.

काही माणसांना त्यांच्या अतिसंवेदनशील स्वभावामुळे स्ट्रेस येतो. आता यात पुन्हा प्रकार बघा कसे आहेत. माझ्याकडे एक तरुण मुलगा काऊन्सिलिंगसाठी यायचा. त्याची आई त्याला अभ्यासावरुन सारखी बोलायची. तिच्या सततच्या बोलण्यामुळे त्याची मनस्थिती बिघडली होती. आता याच्या अगदी उलट; एक भगिनी फोनवर सांगत होत्या, आमचे हे घरात अजिबात बोलतच नाहीत. मला तर बाई वेड लागायची पाळी आलीय. ऑफीसमध्ये काम करणारे एक ग्रुहस्थ आपल्या बॉसबद्दल सांगत होते, अगदी जेवढ्यास तेवढं बोलतात. अगदी कामापुरतं. आम्हाला तर फार टेन्शन येतं बुवा. आता ही तीनही उदाहरणं बघा, कुणाला जास्त बोलल्यामुळे ताण, कुणाला बोलतच नाही म्हणून स्ट्रेस, तर कुणाला जेवढ्यास तेवढं बोललयाने टेन्शन. थोडक्यात काय तर कोणत्या गोष्टीचा ताण घ्यायचा आणि तो किती प्रमाणात घ्यायचा हे तुमचं तुम्ही ठरवायचंय. स्ट्रेस उर्फ ताण उर्फ़ टेन्शन या गोष्टीचं एक वैशिष्ट्य आहे. या गोष्टी रोजच्याच होऊ लागल्या की शरीरात त्या साचत जातात. ह्रुदयाची किंवा शरीरातल्या इंद्रियांची किंबहुना कोणत्याही गोष्टीची ताण सहन करण्याची एक क्षमता असते. ही क्षमता संपली की तिथे विविध विकारांचा जन्म होतो. आणि त्यातनं मग ब्लडप्रेशर, हायपरटेन्शन, मधुमेह अशा तत्सम व्याधी प्रगट होतात.

आणि या व्याधीमित्रांची एक गंमत आहे बरं का, मघापासून तुम्हाला सांगेन, सांगेन म्हणता सांगायचीच राहिली, हे पाहुणे एकदा आपल्या घरात वस्तीला आले की कोणत्याही उपायांनी बाहेर पडत नाहीत. पूर्ण घर काबीज करतात. अगदी स्मशानवाटेपर्यंत.

तेव्हा आता, झटका तुमचे सारे ताण तणाव आणि मनमोकळं हसा पाहू एकदा! पुन्हा भेटू या लेखमालेतल्या पुढल्या लेखात. तोवर तुमच्या प्रतिक्रियांचा इंतजार करतो. 

(photo – google)

 

  • प्रसाद कुलकर्णी
    Motivational Speaker