समर्थ श्री रामदास स्वामी महाराज.

0

आज माघ वद्य नवमी म्हणजेच दासनवमी.

श्री समर्थ रामदास स्वामी महाराजांची पुण्यतिथी.

समर्थ रामदास स्वामि महाराजांनी आपल्या प्रचंड जीवन कार्यात, मरगळ अवस्तेत असणाऱ्या समाजाला जागे करत समाजाच्या विविध विषयावर आपले परखड मत मांडत महाराष्ट्राला दिशा देण्याचे मोठे कार्य केले. दासबोध या प्रसिद्ध मार्गदर्शक ग्रंथाची त्यांनी निर्मिती केली.

प्रपंच करत करत परमार्थ करावा. हे सांगत उच – नीचतेच्या जातीयवादी  संकल्पनेला त्यांनी कडाडून विरोध केला. 

उच नीच नाही परी,

राया रंक येकची सरी ||

झाला पुरुष अथवा नारी, 

येकची पद ||२४ ||

( श्रीदासबोध : ब्रम्ह निरुपण – 24 , पृ १७९-१८० )

शके १६०३ साली दुर्मुखनाम सवत्सरी माघ वद्य नवमीला त्यांनी आपल्या जीवन कार्यास पूर्ण विराम दिला.

रामदास स्वामींना व त्यांनी केलेल्या  अत्युच्य कार्याला प्रणाम…!  

 

योगेश सोमण यांची मुस्कटदाबी कितपत योग्य?

          स्वातंत्रवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याच्या चर्चेवरून देशात कांग्रेसकडून गदारोळ निर्माण करून गोंधळ घातला जात आहे. वीर सावरकरांच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत तसेच त्यांच्या राष्ट्रकार्यावर संशय घेण्याचा दुर्दैवी आणि शेण चिवडण्याचा प्रकार देशात अनेक वर्षा पासून सुरू असून आता तीव्र करण्यात आलेला आहे राहुल गांधी,मणिशंकर अय्यर काही स्वंयघोषित दुटप्पी पुरोगामी मंडळी अशा असंख्य काँग्रेसी मंडळी अनावश्यक टिपाटिप्पणी करून वीर सावरकरांच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे आणि अशा कृती मधून समाजात फुट निर्माण करण्याचा प्रयत्न चालविला आहे सावरकरां प्रति कृतज्ञता व्यक्त करण्या ऐवजी त्यांची घोर अवहेलना करण्याची खेळी खेळल्या जात आहे आणि ही खेळी कितपत योग्य आहे ? याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. वीरसावरकर उच्चकोटीचे देशभक्त होते आणि समाज सुधारक सुद्धा होतेपणराहुलगांधी यांचे कडून वीरसावरकरयांची सतत बदनामी होत असून अपमान करणारे बेताल वक्तव्य केली जात आहेत व केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर समाजाकडूनमाफी मागणीचा विषय आला तेव्हा “मै राहुल गांधी हू सावरकर नही” असे निर्लज्ज वक्तव्या करून वाद निर्माण केलाआहे. वीर सावरकरांच्या बदनामीच षढयंत्र सुरू ठेवले आहे.

            हे कारस्थान सुरू असतांना मुंबई विद्यापीठामध्ये थेटर आर्ट्स विभागाचे संचालक योगेश सोमण यांनी राहुल गांधी यांच्या प्रश्नाला इतिहासिक पुराव्याच्या आधारे सोशल मीडियावर उत्तर दिले आहे त्यांचे उत्तर सावरकर विरोधी मंडळीना इतके झोंबले की त्यांच्या बुडाला आग लागून योगेश सोमण यांना मुंबई विद्यापीठामधून सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. योगेश सोमण यांना सक्तीच्या रजेवर पाठविने म्हणजे सरळसरळ अभिव्यक्ती स्वतंत्रयाची मुस्कटदाबी किंवा गळचेपी होय तसेच योगेश सोमण यांच्यावरील अन्याया विरोधात विवेक विचार मंच कार्यक्रत्यांनी शिवाजी पार्क दादर येथे दि.22 जाने रोजी सभा घेण्याची पोलिसाकडे रीतसर परवानगी मागितली होती पण पोलिसांनी परवानगी नाकारून सभा घेतल्यास कडक कारवाईची भाषा केली आहे. वास्तवमध्ये विवेक विचार मंच राष्ट्राला समर्पित कार्यकर्त्याचा मंच असून पुण्याचे माजी खासदार प्रदीपदादा रावत यांच्या नेतृत्वात सामाजिक जाणिवेने कार्यरत आहे. विवेक विचार मंचला सभेची परवानगी नाकारणारी पोलिस यंत्रणा रजा अकादमी पासून संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर झालेल्या सी.ए.बी.च्या विरोधात मोर्चा काढण्यास “फ्री-कश्मीर”फलक झळकविणाऱ्या मोर्चाना परवानगी दिली जाते मग विवेक विचार मंच ला परवानगी का देण्यात आली नाही?  असा संतप्त प्रतिक्रिया सोशलमीडिया तथा सामाजिक कार्यक्रत्यामध्ये उमटली आहे.

            वीर सावरकर यांच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा, त्यांना भारतरत्न देऊ नयेअसा वाद सुरू असतांना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी धाडसी वक्तव्य केले आहे. सावरकर यांना विरोध करणाऱ्यांना अंदमानच्या तुरुंगामध्ये दोन दिवस ठेवा असे आव्हान करून कांग्रेसची गोची केलीआहे. संजय राऊत यांनी अनेक वेळा वीर सावरकर यांचा गौरवपूर्ण उल्लेख केलेला आहे पण आता राज्यात आघाडी सरकार असल्याने त्यांच्या वक्तव्याला फारशी किंमत देण्यातआली नाही. उलट कांग्रेस मध्ये त्यांच्या वक्तव्याची गरमागरम चर्चा सुरू झाली असून अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार यांनी आपली वीर सावरकर विरोधी भूमिका कायम ठेवून सावरकरांच्या देशभक्ती विषयी संशय उपस्थित केला आहे वीर सावरकर यांच्या भारतरत्न चर्चेच्या पार्श्वभूमीवर खा. संजय राऊत यांनी केलेलं वक्तव्य कांग्रेसकडून होत असलेला गदारोळ आणि योगेश सोमण यांची सोशल मीडियावरील प्रतिक्रिया तसेच मुंबई विद्यापीठाने त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविणे, विवेक विचार मंचच्या योगेश सोमण समर्थन सभेला पोलिसाकडून परवानगी नाकारणे हा सर्व घटनाक्रम समाजात गोंधळ निर्माण करणारा आहे. शेवटी योगेश सोमण यांना मुंबई विद्यापीठाकडून सक्तीच्या रजेवर पाठविणे आणि त्यांच्या समर्थन सभेला परवानगी नाकारणे मुस्कट दाबी आहे आणि पुरोगामी महाराष्ट्रमध्ये अशी मुस्कटदाबी कितपत योग्य आहे ? याचा विचार करणे अगत्याचे ठरेल.

अशोक राणे, अकोला

भ्र 9423658385

आता देशद्रोही मानसिकता तुडविण्याची वेळ

आता देशद्रोही मानसिकता तुडविण्याची वेळ ……!

दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जे.एन.यू.) मध्ये झालेल्या हल्ला-प्रति हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून त्याचे पडसाद देशात उमटत आहेत या पूर्वी सुद्धा जामिया मिलिया मुस्लिम विद्यापीठा मधील शांतिदूतांनी दिल्लीत घातलेल्या धुडगूस नंतर पोलिस कारवाई मुळे देशाचे वातावरण जाणीवपूर्वक बिघडविण्याचे कटकारस्थान रचले गेले होते जामिया मधील हिंसक कारवाईची देशातील तथाकथित सेक्युलर पोंगापंडितांनी पाठराखण केली होती देशाच्या मालमत्तेचे नुकसान करू नका ही समजदारीची,शांतीची  भूमिका घेतली नव्हती आता सुद्धा जे.एन.यू मधील हल्ला -प्रतिहल्ल्याच्या निमित्ताने देशात  गैरसमज निर्माण करून  सामान्य माणसाचा बुद्धिभ्रम केला जात आहे केंद्र सरकारला दोषी धरण्यात येत आहे  देशहिता साठी रात्रदिवस इमानदारीने झटणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शाह यांना लक्ष करून केंद्रातील सरकार सुडाच्या भावनेने वागत आहे ,विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्यात येत आहे विध्यार्थ्यावर अन्याय करीत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा दाबला जात असल्याचा कांगावा करून संभ्रम निर्माण केला जात आहे देशातील वामपंथी,कांग्रेस,सेक्युलर मंडळींनी तर नको त्या कारणाने केंद्र सरकारला बदनाम करण्याचा सपाटा लावला आहे याआणि अशा मुद्दावरून देशात अशांतता  अराजकता निर्माण करण्याचा कसोशीने प्रयत्न करीत आहे पण हीच  मंडळी जेव्हा जे. एन. यु मध्ये आझादीच्या  घोषणा देऊन तुकडे गँग  देशविरोधी घोषणाबाजी करतात,नक्षल हल्ल्यात जेव्हा जवान शहीद होतात तेव्हा आनंदउत्सव साजरा करून नक्षलींचे उदात्तीकरण केले जाते देश गद्दार अफजलगुरुच समर्थन करतात किवा फी वाढीच्या मुद्द्यावरून सरकारी मालमत्तेचे नुकसान केले जाते स्वामी विवेकानंद मूर्तीची विटंबना करून “भगवा जलकर रहेंगा”म्हटले जाते तेव्हा मात्र एकही राजकीय नेता त्यांची समज काढणारी वक्तव्य करीत नाहीत किवा बोलत सुद्धा नाहीत अनेक वर्षा पासून जम्मूकश्मीरची भूमी हिंदूच्या रक्ताने रक्तरंजित होऊन सतत घुमसत होती तेथील बलात्कारीत आणि अन्यायग्रस्त हिंदू माता भगिनींच्या किंकाळ्या अशा हरामखोरांना कधीच ऐकू आल्या नाहीत राजस्थानच्या कोटा शहरात १०७ बालकाचा मृत्यु झालेला आहे तेथील कोटा जे. के.लोन हॉस्पिटलमध्ये प्रियांका ,योगेंद्र यादव,पदुकोण किंवा एखाद्या पादु का ! यांना वेळ मिळाला नाही पण जे.एन.यू.मध्ये हल्ला-प्रतिहल्ला काय झाला सारी सेक्युलर जमात जागी झाली असून हिंडीस प्रदर्शन करीत आहे चित्रपट कलावंत प्रदर्शन करीत आहेत अभिनेत्री दीपिका पदुकोण आईशी घोष, तूकडे गँग प्रमुख कन्हैय्याला भेटते मुंबईच्या गेट ऑफ इंडिया प्रदर्शन करून  भारत मातेचा मुकुट असलेला काश्मिर “काश्मीर फ्री”चे  पोस्टर झळकतात, उत्तर प्रदेशाच्या शांतिनिकेतन ,पुण्याच्या फर्ग्युसन मध्ये निषेध केला जातो  दुर्दैवाने जे.एन.यू साठी गळे काढणारी मंडळी पाकिस्तानमधील ननकना साहब मध्ये झालेल्या अत्याचारी कृत्यावर मुंग गिळून बसले आहेत तेथील हिंदूमहिलाच्या किंकाळ्या का ऐकू येत नाहीत? याचा विचार करण्याची वेळ आली आहे आणि वामपंथी, सेक्युलर मंडळीची दुटप्पी भूमिका लक्षात घेण्याची गरज सुद्धा आहे.

                  दि 5 जाने.ला आठ हजार विद्यार्थी असलेल्या  दिल्लीच्या जे.एन.यू मध्ये झालेल्या हल्ल्या-प्रतिहल्ल्याची  मीमांसा केली असता पोलीस यंत्रणा सदर घटनेच  शोध कार्य करीत त्यासाठी सोशल मीडियाची मदत घेण्यात येत तसेच दिल्लीच्या वर्तमानपत्र मध्ये जाहिराती प्रसिद्ध करून तपासला सहकार्य करण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे त्यामुळे शासन जे. एन. यु.हल्ल्याचे खरे चेहरे शोधून काढतील खरे चेहरे आणि कारणे समोर येतील पण जे. एन. यू हॉल -प्रति हल्ल्याच्या निमित्ताने जो धुडगुस सुरू आहे थांबला पाहिजे  तसेच अनेक वर्षा पासून जे.एन.यू मध्ये तुकडे गॅंग कम्युनिस्ट,आणि तथाकथित सेक्युलर मंडळीचा ,नक्षल समर्थकांचा अड्डा बनलेला आहे या कडे लक्ष वेधण्याची आवश्यकता आहे.                                                                     देशात अनेक दिवसांपासून  तिहेरी  तलाक कलम ३७०, श्री रामजन्मभूमीचा निर्णय,एन.आर.सी,सी.ए.बी. मुद्दावरून विरोधी शक्तींच्या मनात देशात अराजकता निर्माण करण्याचा मनसुबा खदखदत होती आणि एन.आर. सी आणि सि. ए. बी ला विरोध करण्याच्या मुद्द्याने अशा मंडळींना देशात अराजकता निर्माण करण्याचा मुद्दा मिळाला आहे आता  जे. एन. यु. मधील हल्ला -प्रतिहल्ल्याच्या निमित्ताने कांग्रेस , वामपंथी तथाकथित सेक्युलर मंडळी ,पुन्हा देशात वणवा भडकवीत आहेत तसेच या निमित्ताने समाजात गैरसमज, बुद्धीभ्रम, निर्माण करून समाजात आग लावण्याचं काम सुरू आहे.  देशातील  मीडिया,चित्रपट कलावंत ,बुध्दीवंत, साहित्यकांमध्ये बुद्धिभ्रम निर्माण करून उभी फूट निर्माण करण्याच काम सुद्धा सुरू आहे त्यामुळे  आता आपल्याच देशातील पाकिस्तानी ,नक्षल स्लिपर सेल असलेली तथाकथित सेक्युलर मंडळी किवा सेक्युलर राजकीय मंडळींची कारवाईची दिशा पाहता देशात वाढत चाललेली देशद्रोही व देशगद्दारी मानसिकता तुडविण्याची वेळ आलेली आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.                                                                               

( photo – google )                                                          

  • अशोक राणे.

नागरिकता दुरुस्ती कायदा देशात लागू

भारतीय संसदेने मागील महिन्यात  नागरिकता दुरुस्ती विधेयक बहुमताने संमत केल्यानंतर राष्ट्रपतीने त्याला मंजुरी दिली होती.

काल भारत सरकारने या कायद्याची अधिसूचना काढली. म्हणजे कालपासून हा कायदा देशात लागू झाला. आता हा कायदा संपूर्ण राज्यांनी लागू करणे बंधनकारक आहे. विरोधकांनी या कायद्याला विरोध केला असला तरी देशहिताच्या निर्णयांवर मोदी सरकार मागे हटणार नाही हे सरकारने दाखवून दिलं.

मागील महिन्यात भारतीय संसदेने नागरिकता दुरुस्ती विधेयक बहुमताने संमत केल्यानंतर राष्ट्रपतीने त्याला मंजुरी दिली होती. काल भारत सरकारने या कायद्याची अधिसूचना काढली. म्हणजे कालपासून हा कायदा देशात लागू झाला. आता हा कायदा संपूर्ण राज्यांनी लागू करणे बंधनकारक आहे. विरोधकांनी या कायद्याला विरोध केला असला तरी देशहिताच्या निर्णयांवर मोदी सरकार मागे हटणार नाही हे सरकारने दाखवून दिलं.

सेक्युलर दहशतवाद

सेक्युलर दहशतवाद 

हे पुस्तक आपल्या  लोकसंवाद.कॉम  चे लेखक श्री अशोक राणे यांचे असून साप्ताहिक विवेक ( हिंदुस्थान प्रकाशन संस्था ) मुंबई यांनी हे नुकतेच प्रकाशित केले आहे.

सध्या समाजात सेक्युलर शब्दाचा वापर करून मूळविचारला तिलांजली देण्याचा आणि वैचारिक स्लो पोईझन देऊन समाजाला, युवा वर्गाला भरकटवण्याचे जे काम चालू आहे, त्या विषयी खरपूस समाचार घेणारे हे पुस्तक आहे.

अशोक राणे याचे आठ लेख या पुस्तिकेत आहेत. त्यामाध्यमातून तत्कालीन घटनांचा आढावा घेत वैचारिक संघर्षाला बळ देणारे हे लिखाण आहे. 

पुस्तकाचे लेखक – श्री अशोक राणे

लेखक हे स्तंभ लेखक असून महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळावर सदस्य आहेत.

 

विद्येची  देवता सरस्वतीच, सावित्रीबाई  प्रेरणास्थान

विद्येची  देवता सरस्वतीच, सावित्रीबाई  प्रेरणास्थान  

३ जाने सावित्रीबाई फुले यांची जयंती त्या दिवशी त्यांना स्मरण करून  कृतज्ञता, वंदना करण्याचा दिवस समाजाला एका सूत्रात बांधण्याचा तो दिवस पण दुर्दैवाने सावित्रीबाई फुले जयंती दिवसाचे औचित्य साधून काही ढोंगी पुरोगामी मंडळी विद्येची देवता सरस्वती की सावित्री असा विवादित  विषय प्रस्तृत  करून समाजात फुट पाडण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करीत असतात.          दि १ जाने १८४८ मध्ये फुले दांपत्यांनी भिडे वाड्यात मुलींची शाळा सुरू केली होती, नंतर च्या काळात ही शाळा चिपळूणकर यांच्या वाड्यात स्थलांतरीत झाली होती.  शाळेला ज्योतीबांचे सहकारी सखाराम परांजपे, सदाशिव हाटे, सदाशिवराव गोवंडे यांचे सहकार्य होते त्याच वेळेस मुंबई शहर,मुंबई विद्यापीठाचे  शिल्पकार असलेल्या नाना शंकर शेट यांनी गिरगावातील ठाकूरद्वारात मुलींची शाळा काढलेली आहे. फुले दाम्पत्या पासून प्रेरणा घेऊन महर्षी कर्वे, न्या. रानडे आणि कर्मवीर भाऊराव पाटील सारख्या अनेक समाज सुधाराकांनी शिक्षाण क्षेत्रात क्रांतिकारक बदल घडवून आणले आहेत.  दि १ जाने ते ३ जाने च्या काळात काही ढोंगी पुरोगामी मंडळी शाळा, कॉलेज, विद्यापीठे येथे विद्येची देवता सरस्वती कि सावित्री असे चर्चासत्र, व्याख्याने ,परिसंवाद आयोजीत करून  समाजात संभ्रम निर्माण करतात तसेच शाळा, कॉलेज मधील पारंपारीक  सरस्वती पूजन बंद करण्याची भूमिका मांडतात किंवा बंद करण्याचे आवाहन करण्यात येते. त्यामधून शाळा,कॉलेज मधील सरस्वती पूजन बंद करणयात येते आहे.  त्यामुळे शाळा, कॉलेजमध्ये ज्ञानाची देवता सरस्वतीची उपासना करण्या ऐवजी अवहेलना करण्याची खेळी खेळल्या जात असून ही खेळी कितपत योग्य आहे.?  याचा आजच्या दिवशी विचार करण्याची आवश्यकता आहे. सावित्रीबाई फुले उच्च कोटीच्या समाजसुधारक होत्या या आणि त्यांच्या बहुमूल्य कार्या विषयी संपूर्ण देशाला आदर आहेच तो नाकारण्याचा प्रश्नच नाही  पण त्यांच्या जयंती निमित्ताने जो  समाज विघटनाचा जो कांगावा केला जात आहे याचा विचार करण्याची आवश्यकता आहे 

भारतीय संस्कृती मध्ये  “या  कुंदेन्दूतुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता……….सा मां पातु सरस्वती भगवती नि:शेषजाड्या पहा”  ही सरस्वती वंदना करून ज्ञानाची उपासना करीत आलेला आहे आणि ही सरस्वती वंदना आजही  घराघरात केली जाते.  अनादि काळा पासून सरस्वती वंदना करतात  भारतीय संस्कृती महिलांना आदरच स्थान असून रामायण, महाभारत मध्ये उच्च स्थान होते जुन्या काळी गुजरात मध्ये महिला साठी गुणशिला स्वतंत्र  विद्यापीठ होते आक्रमणकारी मोघलांच्या काळात काही दोष निर्माण होऊन सशिक्षण केंद्रे काही प्रमाणात बंद पडली होती महिलांनी सुध्दा हा देश येथील संस्कृती ,परंपरा टिकविण्यासाठी संघर्ष केला आहे हिंदुस्थानच्या इतिहासात महिलांचे योगदान महत्वाचे रामायणातील युद्धभूमी वरील कैकयीचा इतिहास आहे.  तसेच गोंडवाना संस्थानच्या महाराणी दुर्गावती, दक्षिण भारतात देवी रुद्राम्मा ,महाराणी पद्मावती, बलाढ्य मोघली सत्तेला टक्कर देणाऱ्या  मराठा सत्तेतील महाराणी ताराबाई ,राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर यांचा संघर्ष  प्रचंड आहे “,दीनबंधू “च यशस्वी संपादन करणाऱ्या तानुबाई बिर्जे  पत्रकारिता महाराष्ट्राला सदैव प्रेरणा देणारी आहे.

आपल्या देशात  सतत जातीपातीच्या व धर्माच्या नावाने काही संघटना,कार्यकर्ते राजकारण,समाजकारण करून छुप्या पध्द्तीने हिंदू समाज फोडण्याचे कारस्थान करीत असतात त्यामधून समाज सुधारकांना जातीपाती मध्ये  कैद करण्याची मानसिकता वाढीस लागली आहे किंवा जाणीवपूर्वक वाढविण्यात येत आहे तसेच दुटप्पी पुरोगामी विचाराच्या सहाय्याने हिंदू समाजात फुट पाळण्याचा प्रयत्न सुद्धा सुरू आहे छ.शिवरायांच्या राज्याभिषेकला काही लोकांचा विरोध होता,शिवरायांना गागाभट्टानी पायच्या अंगठ्याने टिळा लावला, शिवरायांच्या सैन्यात ५७ टक्के मुस्लिम होते असे गैरसमज निर्माण करणे, विख्यात स्वामी बसवेश्वराची हत्या , संत तुकारामांचे वैकुंठ गमन की हत्या ? वीर सावरकर राणी लक्ष्मीबईच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे,श्री शनीशिंगणापूऱ,शबरीमाला मंदिर प्रवेशाचे सोंग घेऊन आंदोलन करणे , व्रतवैकल्या,पुजापाठ, धार्मिक कार्याची टिंगलटवाळी करून इतिहासाचे विकृतीकरण करण्याचे कटकारस्थान  समाजात मोठया प्रमाणात सुरू आहे   ” विद्येची देवता सरस्वती की सावित्रीबाई ” संभ्रम निर्माण  कृती उपरोक्त  कटाचा  भाग आहे अशा कटकारस्थान मधून हिंदू समाजात गैरसमज निर्माण करण्याचं षढयंत्र मोठया प्रमाणात सुरू आहे. विशेषता महिलांच्या प्रश्नावर उलटसुलट चर्चा घडवून हिंदू  समाजात महिलांना दुय्यम स्थान आहे, अन्याय करून शोषण केले जाते, स्वातंत्र नाही, असे गैरसमज पसरवून समाजात दूही निर्माण केली जाते. या षढयंत्रामागे हिंदुत्व विरोधी मेंदू कार्यरत असून दि.३.जाने सावित्रीबाईफुले जयंती सोहळा आला की विद्येची देवता सरस्वती की सावित्रीबाईफुले असा प्रश्न उपस्थित करून समाजात संभ्रम निर्माण केला जातो आपल्या देशातील महिलांचा गौरवशाली इतिहासाचे अवलोकन केल्यास लक्षात येते शेवटी  ज्ञानाची, विद्येची देवता सरस्वतीच असून सावित्रीबाई फुले प्रेरणास्थान  आहेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.                                                                           

अशोक राणे, अकोला.

मो. ९४२३६५८३८५                                                                    

तरुणाई चा संकल्प

तरूणाईचा संकल्प

फोटो गुगल

‘*छोडो कलकी बाते कल की बात पुरानी
नये साल में लिखेंगे हम मिलकर नई कहानी’*

नवीन वर्ष म्हणजे उत्साह, उत्सव, धमाल सगळीकडे अगदी आनंदी वातावरण व नवीन उत्कंठा असते की हे नवीन वर्ष कसं जाईल? आणि सोबतच असतो तरुणाईचा संकल्प. ज्याची आजच्या पीढीमध्ये भयंकर क्रेझ आहे. तरूणाई म्हणजे सळसळते रक्त. या जोशात संकल्प घेतला जातो. झिरो फिगर, सिक्स पॅकचा विचार करुन फिट राहण्याकरिता जिम,सूर्य नमस्कार करून फिट राहण्याचा संकल्प केला जातो. शिवाय माझी फॅशन कोणी का ठरवावी? माय कम्फर्ट इज माय फॅशन हा अॅटीट्युड घेवून तरुणाई आपला संकल्प घेताना दिसते. सोबतच
*मिले सूर मेरा तुम्हारा तो,  सूर बने हमारा’*
नुसार काही तरुण मंडळी नवीन वर्षाच्या संकल्पामध्ये सामाजिक कार्यामध्ये हातभार लावण्याचा संकल्प घेताना दिसून येते आहे.
*पापा कहते है बडा नाम करेगा,
बेटा हमारा ऐसा काम करेगा’ *
यंदा काहीतरी करूनच दाखवायचं म्हणून स्वत:मध्ये काही चांगले रिजोलेशन्स ठरविले जातात. आपले व्यक्तिमत्व उभारून येण्यासाठी काही संकल्प घेतले जातात. पण रूटीन लाइफमध्ये वर्षाच्या सुरूवातीला केलेला संकल्प वर्षाच्या शेवटपर्यंत टिकवून त्यातून काही साध्य झाले तर केलेला संकल्प फळास जाईल. फक्त चांगले संकल्प ठरवून होणार नाहीत, तर ते पूर्ण झाल्यास अर्थपूर्ण होतात.

पल्लवी प्रकाश

देश हाच देव आणि संविधान हाच धर्म

” देश हाच देव आणि संविधान हाच धर्म”

पण  बदनाम करण्याचे षढयंत्र कितपत योग्य ?

हिंदुस्थानच्या सर्वोच्च असलेल्या संसदेच्या दोन्ही सभागृहाने एन.आर.सी. (राष्ट्रीय नागरीक रजिस्टर)  आणि सी.ए.ए (नागरिकत्व संशोधन अधिनियम २०१९) कायदा बहुमताने पास केला आहे घटनेच्या तरदूती नुसार व चौकटमध्ये अधीन राहून सदर कायदा केंद्र सरकार देशात लागू करणार आहे हिंदुस्थानला धर्मशाळा होण्यापासून वचविणारा हा कायदा असून शक्ती सपन्न हिंदुस्थानसाठी देशाच्या उज्वल भविष्य आणि सुरक्षेसाठी कायद्याची कठोरपणे अंमलबाजवणी होणे आवश्यक आहे परंतु देशातील विरोधी पक्ष विशेषता कांग्रेस,डाव्या विचारसारणीच्या राजकीय पक्ष ,शहरी नक्षली,नक्षल समर्थक एन.आर.सी .आणि सी.ए.बी. कायदा मुस्लिम विरोधी असल्याची बतावणी करून मुस्लिम समाजात भीतीचे वातावरण निर्माण करीत असून  कायद्याला विरोध करण्यास सुरुवात केली आहे अशा विरोधातून देशात दंगल सदृश्य परिस्थीती निर्माण केली जात आहे  वास्तविक सदर कायद्याची  जन्मदाता कांग्रेसच आहे याचा सुद्धा विचार करावा लागणार आहे                    दोन  वर्षांपूर्वी दिल्लीच्या जे.एन. यु मधील नक्षल समर्थक तुकडे गँगने  “आझादी” च्या घोषणा देऊन देशविरोधी आणि देश गद्दाराच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली होती देश गद्दार,नक्षलीचे उघड समर्थन केले होते आता त्याच   ” आझादी” च्या घोषणा देत  शांतिदुतांनी दिल्लीच्या  जामिया मिलिया इस्लामीया  विद्यापीठा मधून सि. ए बी च्या विरोधात  हिंसक आंदोलना द्वारा हिंसेने सुरुवात केलेली आहे त्याची आग देशाच्या इतर भगत पोहचली आहे                                                                                            

           आपल्या देशात  आपणास  न पटणाऱ्या गोष्टी विरुध्द आंदोलन करणे देशातील प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे पण हिंसा करणे ,सरकारी मालमत्ता नुकसान करणे हा गुन्हा आहे तसेच देशातील कायदा आणि सुव्यवस्था राखणे सामाजिक एकता जपणे,सार्वजनिक मालमत्तेची सुरक्षा करणे प्रत्येकाचे कर्तव्ये आहेत  याचा विसर पडून दिल्लीच्या जामिया मधील शांतिदुतानी सुरू केलेली  हिंसेची आग आता  देशातील प.बंगाल,आसाम,महाराष्ट्र उत्तरप्रदेशच्या २५शहरात दंगली घडविण्यात आल्या आहेत ज्यामध्ये  लखौन, गोरखपुर ,बुलंदशहर, मेरठ दिल्ली येथे हिंसेचा अतिरेक झालेला आहे महाराष्ट्रातील बीड,परभणी, हिंगोली मध्ये सरकारी मालमत्तेचे जाळपोळ करण्यात आलं आहे तसेच या आंदोलना वेळी पोलिस सुरक्षा यंत्रणावर जीवघेणे  हल्ले मोठ्या प्रमाणात करण्यात आले  कर्नाटकात मंगलोर ,उत्तर प्रदेशातील लखनौ, दिल्ली  येथे शांतिदुत असलेल्या आंदोलका कडून सरळसरळ पोलीसावर समोरा समोर दगडफेक करण्यात आली  सार्वजनिक स्थानी दगडफेक, करून पोलिस स्टेशन जाळणे, मीडियाच्या मोबी व्हॅन जाळपोळ करण्यात आली  आहे देशात सुरू असलेल्या जाळपोळीचे प्रकार लक्षात घेतले तर आंदोलन स्थळी दगड,पेट्रोल,लोखंडी पाईप,पेट्रोल बॉम्ब कसे उपलब्द होते ? म्हणजे आंदोलनाच्या निमित्ताने  पोलीस यंत्रणा आणि मीडियाच्या व्हॅनवर हल्ले करणे दंगल घडविणे पूर्व नियोजीत असल्याचे निष्पन्न होते  त्यामुळे पोलीस आणि मीडिया वरील हल्ल्याचे मास्टर माईंड कोण आहेत याचा शोध घेणे व कोणतीही परवा न करता कडक कारवाई आवश्यक आहे  तसेच आंदोलनामध्ये देण्यात आलेल्या घोषणाबाजीचा ,हिंसेचा बारीक विचार केल्यास या हिंसे मागे रोहिंगे समर्थक ,देश विरोधी मानसिकता, समाजात भेद निर्माण करून अराजकता निर्माण करणारा मेंदू कार्यरत असल्याचे लक्षात येते त्यामुळे समाजाने हे सत्य ओळखून  विरोधाकांचा कांगावा लक्षात घेण्याची आवश्यकता आहे  सी.ए. बी. च्या समर्थनार्थ जागरूक नागरिकांनी सरकारच्या पाठीशी उभे राहण्याची सुद्धा  गरज आहे देशात कायद्याच्या विरोधात काही मूठभर लोक, काही सेलिब्रेटी, लेखक ,बुद्धिजीवी असतील पण कायद्याच्या समर्थनात देशभरात  देशभक्ताचा फार मोठा वर्ग असून त्याच प्रदर्शन सुद्धा झाले पाहिजे किंवा प्रदर्शन करण्याची आता वेळ आलेली आहे तसेच पोलीसा वरील हल्ले ,मीडियाच्या जाळलेल्या व्हॅन प्रकारावर बेगडी सेक्युलर जमात, मानवअधिकार कंपनी गप्प का आहे ? याचा विचार करण्याची गरज आहे                                                                                                                                                                    देशात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह “देश हाच देव आणि संविधान हाच धर्म” अशा शुद्ध विचाराने उत्तम कार्य करीत आहेत जनताजनार्दन सुद्धा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे पण बेदाग प्रतिमेचे धनी असलेल्या या जोडीला बदनाम करण्यासाठी विरोधीपक्षांनी एन.आर.सी ,सि. ए. बी ला विरोध करण्याच्या  आंदोलनाच  हत्यार हाती घेतलं आहे आणि त्यामधून  केवळ मोदी शाह यांचा विरोध  करण्यासाठी सर्व खटाटोप मांडला गेला आहे तसेच  विरोध करण्याचे एकमेव कारण म्हणजे नरेंद्र मोदी-अमित शहा यांना  वैचारिक किवा राजकीय टक्कर देण्याची क्षमता उरलेली नाही किवा त्यांचा सामना करणारा  राजकीय नेता देशात दिसत  नाही त्यामुळे देशहित बाजूला सारून केवळ रोहीग्या मुस्लिमाच्या हितासाठी आणि मोदी शाह यांना बदनाम केले जात आहे तसेच अशा विरोधा मधून देशविरोधी शक्ति देशात अराजकतेच वातावरण निर्माण  केले जात आहे सोबतच  कांग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि इतर राजकीय नेते हिंसेला थांबविण्याच आवाहन करण्या ऐवजी हिंसेला प्रोत्साहन देणाऱ्या मुलाखती मीडियाला देऊन वैचारिक गोंधळ निर्माण करीत आहेत राजघाट वरील सत्याग्रह आणि राहुल गांधी यांचं वक्तव्य तसेच ममता बॅनर्जी यांची घोषणाबाजी सामान्य लोकांची दिशाभूल करणार आहे या सर्व पार्श्वभूमीवर सी.ए. बी च्या विरोधा मधून जाणीवपूर्वक शांतिदुता कडून सुरक्षा यंत्रणा,   पोलिस मीडिया यांना लक्ष का करण्यात येत आहे ? हल्ले का केले जात आहेत, पोलीस,मीडियावर हल्ल्याच्या मागील षढयंत्र कोणाचे आणि सेक्युलर मीडिया ,मानवअधिकार कंपन्या का मुंग गिळून का गप्प बसले होते याचा विचार करण्याची आवश्यकता आहे शेवटी “देश हाच देव आणि संविधान हाच धर्म ” या तत्वाने काम करणाऱ्या सरकारला बदनाम करण्याच षढयंत्र सुरू आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही —–   

– अशोक राणे, अकोला, ९४२३६५८३८४

आज खंडग्रास सूर्य ग्रहण

लोकसंवाद. कॉम चे वाचकांसाठी आज झालेल्या सूर्य ग्रहणाचे फोटो.

अनेक भागात हे काकणाकृती तर महाराष्ट्रात खंडग्रास सूर्यग्रहण पाहायला मिळाले.

 

 

 

 

भारतरत्न माजी पंतप्रधान जेष्ठ पत्रकार अटलजी ना कोटी कोटी नमन !

0

स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्ता सुशासन दिवस म्हणून साजरा केला जातो.

भारतरत्न, भारतमातेचे थोर सुपूत, जन नायक, कवि, जेष्ठ पत्रकार, प्रगल्भ, विश्वासू आणि चारित्र्य समप्न्न राजकरणी. अटलजींचे राजकरणा बद्दलचे, धर्म बद्दलचे, देशाबद्दलचे  विचार आणि कृती अतिशय स्पष्ट होती.

त्यांच्या जयंती निमित्त लोकसंवाद कडून कोटी कोटी नमन.