ज्येष्ठ गायक अजित कडकडे यांना ‘संगीत रत्न जीवन गौरव पुरस्कार’.

‘मिमा 2026’ सोहळा. – ज्येष्ठ गायक अजित कडकडे यांना ‘संगीत रत्न जीवन गौरव पुरस्कार’

मराठी इंडी संगीत क्षेत्राला समर्पित ‘मराठी इंडी म्युझिक अवॉर्ड्स (मिमा) 2026’ हा भव्य सोहळा अलीकडेच उत्साहात आणि दिमाखात पार पडला. महाराष्ट्र आर्ट्स अँड कल्चर फाऊंडेशनतर्फे आयोजित या कार्यक्रमाला स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहाचे अध्यक्ष रणजीत सावरकर, मंजिरी मराठे, प्रियांका बर्वे, मंदार चोळकर, सावनी रविंद्र, कार्तिकी गायकवाड, अविनाश विश्वजीत यांसह संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.

गेल्या काही वर्षांत मराठी इंडी संगीताने स्वतःची वेगळी आणि ठळक ओळख निर्माण केली असून, चित्रपटसृष्टीच्या चौकटीबाहेर स्वतंत्रपणे संगीतनिर्मिती करणाऱ्या कलाकारांना ‘मिमा’सारख्या व्यासपीठामुळे योग्य संधी आणि प्रोत्साहन मिळत असल्याचे या सोहळ्यात स्पष्ट झाले. गायक, संगीतकार, वादक, गीतकार तसेच तांत्रिक क्षेत्रातील कलाकारांचा सन्मान करून इंडी संगीताच्या सर्वांगीण प्रवासाचा गौरव करण्यात आला.

या प्रसंगी ज्येष्ठ गायक अजित कडकडे यांना ‘संगीत रत्न जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. गीतकार गुरु ठाकूर आणि गायिका बेला शेंडे यांना ‘मराठी इंडी म्युझिक आयकॉन’ पुरस्काराने गौरविण्यात आले. बासरीवादनातील उत्कृष्टतेसाठी अमर ओक यांना ‘एक्सलेन्स इन म्युझिक अवॉर्ड’, तर तांत्रिक योगदानासाठी प्रमोद चांदोरकर यांना ‘टेक्निकल एक्सलेन्स इन म्युझिक अवॉर्ड’ देण्यात आला.

‘सोबतीचा करार’ या कार्यक्रमाला ‘आयकॉनिक म्युझिक शो’चा मान मिळाला, तर अवधूत गुप्ते यांच्या ‘आई’ या अल्बमला ‘आयकॉनिक म्युझिक अल्बम’ म्हणून सन्मानित करण्यात आले. विशेष कामगिरीबद्दल आकाश देशमुख (टेंभुर्णी) यांना ‘विशेष दिव्यांग कलाकार पुरस्कार’ देण्यात आला, तसेच परदेशात मराठी संस्कृतीचा ठसा उमटवणाऱ्या व्ही. रमेश (सौदी अरब) यांना ‘प्रवासी मराठी कलाकार पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

या उपक्रमाबद्दल आयोजक अजय नाईक यांनी सांगितले की, “मिमा हा केवळ पुरस्कार सोहळा नसून मराठी इंडी संगीताच्या वाढत्या सामर्थ्याचा उत्सव आहे. स्वतःच्या बळावर उभं राहिलेलं हे संगीत आता मुख्य प्रवाहात स्थान निर्माण करत आहे. आमचा उद्देश कलाकारांना केवळ सन्मानित करणे नाही, तर त्यांना दीर्घकालीन व्यासपीठ, योग्य ओळख आणि उद्योगाशी जोडणे हा आहे.”

(सोर्स..)

 

परकीय निधीवर नियंत्रणाची नवी दिशा.

भारतामध्ये येणारा परकीय निधी नेमका कुठे जातो, कशासाठी वापरला जातो आणि त्याचे परिणाम काय होतात—या प्रश्नांकडे आतापर्यंत मर्यादित लक्ष दिलं जात होतं. १९ मार्च २०२६ रोजी केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर या संपूर्ण व्यवस्थेकडे नव्या दृष्टीने पाहण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या परकीय निधी नियमन दुरुस्ती विधेयक २०२६मुळे विदेशी निधीच्या प्रवाहावर अधिक काटेकोर आणि स्पष्ट नियंत्रण आणण्याचा प्रयत्न दिसून येतो. जागतिक पातळीवरील काही शक्ती देशांच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करतात, सामाजिक आणि धार्मिक स्तरावर प्रभाव टाकतात, हे वास्तव आता नवीन राहिलेलं नाही. अशा हालचालींमुळे समाजात तणाव निर्माण होतो, राजकीय घडामोडींवर परिणाम होतो आणि दीर्घकालीन प्रभाव निर्माण करण्याचे प्रयत्न होताना दिसतात. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षेचा विचार केंद्रस्थानी ठेवत सरकारने उचललेले हे पाऊल लक्षवेधी ठरते.

या विधेयकाकडे केवळ प्रशासकीय बदल म्हणून पाहता येत नाही. देशाच्या सार्वभौमत्वाला अधिक बळकटी देणारी एक ठोस यंत्रणा उभी करण्याचा हा प्रयत्न आहे. विदेशी निधीच्या माध्यमातून देशात अस्थिरता निर्माण करण्याच्या हालचालींवर मर्यादा आणण्याची क्षमता या कायद्यात दिसून येते. गेल्या काही दिवसांत याचे परिणाम जाणवू लागल्याने विविध स्तरांवर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. केरळ कॅथोलिक बिशप परिषदेचे अध्यक्ष कार्डिनल बॅसेलियोस क्लेमिस यांनी या दुरुस्तीमुळे ख्रिस्ती समुदायांमध्ये चिंता आणि दबाव निर्माण झाल्याचे मत व्यक्त केले आहे.

त्याचवेळी विरोधी पक्षांकडून हा कायदा मागे घेण्याची मागणीही पुढे येऊ लागली आहे. या सर्व प्रतिक्रिया लक्षात घेतल्या तर या कायद्याचा प्रभाव व्यापक स्वरूपात जाणवू लागल्याचे स्पष्ट होते.

या आधी २०२० साली या कायद्यात काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले होते. त्या बदलांना पुढे नेत नव्या दुरुस्तीमुळे अधिक स्पष्टता, अंमलबजावणीतील सुसूत्रता आणि काटेकोरपणा आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. विदेशी निधीचा वापर, त्यामागील उद्दिष्टे आणि त्यावरील नियंत्रण अधिक पारदर्शक करण्यावर भर देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर हे विधेयक नेमके कोणते बदल घडवते, आधीच्या तरतुदींशी त्याचा संबंध कसा आहे, आणि सामाजिक, राजकीय, धार्मिक तसेच सांस्कृतिक स्तरावर त्याचे परिणाम कसे उमटू शकतात, हे समजून घेणे महत्त्वाचे ठरते.

परकीय अनुदान (नियमन) कायदा (फॉरेन कंट्रीब्यूशन (रेग्युलेशन) ॲक्ट – एफसीआरए) याची सुरुवात १९७६ साली इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात झाली. त्या काळात देशात आणीबाणी लागू होती आणि परकीय शक्तींच्या प्रभावाबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली जात होती. विशेषतः सीआयए, चर्च आणि कम्युनिस्ट विचारसरणीशी संबंधित गटांच्या हस्तक्षेपावर नियंत्रण ठेवण्याची गरज सरकारला जाणवत होती. या पार्श्वभूमीवर परकीय निधीच्या प्रवाहावर लक्ष ठेवण्यासाठी हा कायदा लागू करण्यात आला.

पुढे २०१० साली यूपीए सरकारने एफसीआरएमध्ये काही महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या. या अंतर्गत नोंदणी केलेल्या संस्थांची वैधता पाच वर्षांपर्यंत निश्चित करण्यात आली आणि परदेशातून मिळणाऱ्या निधीबाबत नियमित अहवाल सरकारकडे सादर करणे बंधनकारक करण्यात आले. कागदोपत्री या तरतुदी स्पष्ट वाटत असल्या तरी प्रत्यक्ष अंमलबजावणीत अनेक त्रुटी राहिल्याचे दिसून आले.

अंमलबजावणीतील शिथिलता आणि देखरेखीतील कमतरता यामुळे परकीय निधीचा प्रवाह अपेक्षित नियंत्रणाशिवाय सुरू राहिला. अनेक संस्थांकडे येणाऱ्या निधीच्या वापराबाबत पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाचा अभाव जाणवत होता. २०१४ पर्यंत परकीय देणग्यांच्या आधारावर कार्यरत असलेल्या हजारो स्वयंसेवी संस्थांची संख्या लक्षणीयरीत्या वाढलेली दिसत होती. या परिस्थितीमुळे एफसीआरएच्या उद्दिष्टांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आणि अधिक काटेकोर यंत्रणेची गरज अधोरेखित झाली.

या कायद्यात प्रमुख बदल २०२० मध्ये मोदी सरकारने क्रांतिकारी सुधारणा करून केला.

२०२० च्या एफसीआरए सुधारणांचे सोपे स्पष्टीकरण (५ वाक्यांत):

१. सब-ग्रांटिंग पूर्ण बंद: आता एक एफसीआरए नोंदणीकृत संस्था विदेशी फंड दुसऱ्या कोणत्याही संस्था किंवा व्यक्तीला ट्रान्सफर (सब-ग्रांट) करू शकत नाही. यामुळे गैरकृत्यांची आर्थिक साखळी तोडली गेली, आणि पैशाचा गैरवापर होणे, अप्रत्यक्ष मार्गाने पैसा चुकीच्या व्यक्तींच्या हातात जाण्याचा मार्ग बंद झाला.

२. प्रशासकीय खर्च ५०% वरून २०% पर्यंत कमी: पूर्वी विदेशी फंडातील ५०% पर्यंत प्रशासकीय खर्च (वेतन, भाडे, ऑफिस खर्च इ.) करता येत असे, आता ते फक्त २०% पर्यंत मर्यादित केले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त पैसा जे कारण सांगून विदेशातून देणग्या मिळवल्या आहेत, त्या सामाजिक-विकास कामावर खर्च व्हावा, हा यामागचा स्पष्ट हेतू आहे.

३. दिल्लीच्या एसबीआय एफसीआरए खात्यात फंड अनिवार्य: सर्व विदेशी फंड फक्त दिल्लीच्या स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) च्या मुख्य शाखेतील विशेष एफसीआरए खात्यातच येणे अनिवार्य आहे, ज्यामुळे केंद्र सरकारला फंड येण्यावर थेट आणि प्रत्यक्ष नजर ठेवता येते. ४. आधार अनिवार्य: संस्थेच्या सर्व (की फंक्शनरी) प्रमुख पदाधिकारी, विश्वस्त आणि संचालक मंडळ यांनी आपला आधार नंबर देणे अनिवार्य केले गेले आहे. यामुळे संस्थेच्या जबाबदार व्यक्तींची ओळख स्पष्ट होऊन देणगीचा गैरवापर रोखणे सोपे होते.

या चार प्रमुख बदलांमुळे विदेशातून येणारा पैसा अधिक पारदर्शक, नियंत्रित आणि सामाजिक हितासाठी वापरले जाण्याच्या शक्यता वाढल्या. पण या सुधारणेतही एक मोठी कमतरता होती. एखाद्या संस्थेची एफसीआरए नोंदणी रद्द झाल्यानंतर त्या सामाजिक संस्थेच्या मालमत्तेवर सामाजिक घटकांचे किंवा सरकारचे कोणतेच नियंत्रण नव्हते. विदेशी फंडातून बांधलेल्या इमारती, जमिनी, उपकरणे दुसऱ्या संस्थेच्या ताब्यात वैयक्तिक ताब्यात जाऊ शकत होते. या सर्व स्थावर जंगम मालमत्तेची सुयोग्य वापर आणि व्यवस्था लावण्याची वैयक्तिक जबाबदारी पदाधिकाऱ्यांवर नव्हती. गैरव्यवहारांची तक्रार झाल्यास तपास राज्य सरकार किंवा पोलिस स्वतंत्र सुरू करू शकत होते.

२०२६ चे विधेयक या कमतरता पूर्णपणे भरून काढते. आता या विषयात ‘डिझिग्नेटेड अथॉरिटी’ म्हणजे विशेष प्रायुक्त अधिकारी नेमले जातील. नोंदणी संपुष्टात आलेल्या संस्थेचे, किंवा निलंबित पदाधिकाऱ्यांचे, मालमत्तेचे समर्पण किंवा एफसीआरए नूतनीकरण होऊ न शकलेल्या ना नफा संस्थेच्या विदेशी फंडातून तयार झालेल्या मालमत्ता ताब्यात घेण्याचे काम हे अधिकारी करतील. या संपत्तीची कायद्यानुसार योग्य व्यवस्था लावण्याची जबाबदारी यांच्याकडे असेल.

नवीन कलम १४बी नुसार ‘डीम्ड सेसेशन’ – नोंदणी कालबाह्य झाली किंवा नूतनीकरण नाकारले गेले तर संस्थेची स्वयंचलितता रद्द केली जाईल. परदेशातून देणग्या मिळवण्याची आणि वापराची मुदत सरकारी नियमानुसार ठरेल. रक्कम कधी, किती येणार? ती कधीपर्यंत ठरवलेल्या उद्धेशासाठी वापरात आणली जावी याबाबत याआधी पूर्ण संदिग्धता आणि अनिश्चितता होती. संस्थेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची व्याख्यासुद्धा नव्या कायद्यात विस्तारित केली गेली आहे. ट्रस्टी, पार्टनर, डायरेक्टर, हिंदू अविभक्त कुटुंबाचा कर्ता यांच्यावर संस्थेची वैयक्तिक जबाबदारी असणार आहे. एफसीआरए अंतर्गत नोंदणी असणाऱ्या संस्थांविषयीच्या कोणत्याही तपासासाठी केंद्र सरकारची पूर्वपरवानगी अनिवार्य केली गेली आहे.

अनधिकृत फंडिंग साठी कमाल तुरुंगवास पाच वर्षांवरून एक वर्षापर्यंत कमी केला गेला आहे. परंतु व्यावहारिक पातळीवर प्रत्यक्ष नियंत्रण मात्र पूर्वीच्या अधिनियमांच्या मानाने अनेक पट कडक करण्यात आले आहे.

राष्ट्रवादी दृष्टिकोनातून हे विधेयक ‘गेम चेंजर’ का?

पूर्वीचे कायदे फक्त ‘इनफ्लो’ म्हणजे येणारी रक्कम नियंत्रित करत होते. आता ‘आऊटफ्लो’ म्हणजे आलेल्या निधीचे सुयोग्य वितरण/वापर आणि ‘पोस्ट-कॅन्सलेशन’ म्हणजे नोंदणी रद्द झाल्यावरही संस्थेच्या बँक खात्यात असणाऱ्या रकमेचे, इतर मालमत्तेचे नियोजन, व्यवस्थापन अथवा विल्हेवाट लावण्याचे अधिकार केंद्र सरकारकडे आले आहेत.

आता या विषयावर सरकार संस्थांना ताब्यात घेत आहे, मनमानी करत आहे अशी ओरड होऊच शकते. परंतु इथे एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे. कोणतीही संस्था, संघटना, कंपनी CSR सारख्या कार्यक्रमांनमध्ये पैसा ओतत असते त्यामागे बाकी काहीही नसले तरी गुडविल कमावण्याची इच्छा असतेच. विदेशातून येणाऱ्या पैशामागे तर अनंत प्रकारच्या अपेक्षा, कूटनीती दडलेल्या असतात. त्यामुळे जे सरकार लोकशाही पद्धतीने निवडून आले आहे, त्यांचे अश्या संपत्तीवर काही प्रमाणात नियंत्रण असणे लोकशाहीसाठी पोषकच ठरेल.

२०१०-२०२० पर्यंत विदेशी फंडिंग घेऊन शेकडो संस्थांनी विकास प्रकल्पांना विरोध करणे, धर्मांतरण, समाजात फूट पाडणे, राजकीय अस्थिरता निर्माण करणे असले चाळे चालवले होते हे विसरून चालणार नाही. आता एफसीआरए नोंदणी अथवा अधिक गंभीर प्रकरणांत संस्थेची सरकारी नोंदणीच रद्द झालेल्या एनजीओची मालमत्ता सरकारकडे जाईल.त्यामुळे त्यांनी अधिकृत केलेली संपत्ती/फंड दुसऱ्या विघातक संस्थेकडे वर्ग होणार नाही, जबाबदार व्यक्ती पैसा घेऊन पळून जाऊ शकणार नाहीत. हे खरे राष्ट्रहित आहे. विदेशी शक्ती आता भारतात ‘अराजकता’ निर्माण करण्यासाठी पैसा टाकू शकणार नाहीत, कारण त्यांचे ‘टूल्स’ – एनजीओ पूर्णपणे लोकशाही नियंत्रित होतील.

सध्या सुमारे १६,००० संस्थांकडे एफसीआरए नोंदणी आहे. त्यांना दरवर्षी सुमारे २२,००० कोटी रुपयांचा विदेशी फंड येतो. २०१९-२०२२ या तीन वर्षांत १३,५२० संस्थांनी ५५,७४१ कोटी रुपयांचा फंड घेतला. म्हणजे सरासरी वर्षाला १८,५८० कोटी रुपये होतात. २०१४ नंतर आजपर्यंत २०,००० हून अधिक एनजीओंच्या एफसीआरए लायसन्स रद्द झाल्या आहेत. २०१५ मध्येच ९,५००+ संस्था नोंदणी रद्द करण्यात आल्या. मुख्यतः देणग्यांचा गैरवापर, संस्थेच्या कामाचा अहवाल सादरीकरण न करणे किंवा राष्ट्रीय हिताविरुद्ध काम केल्याने या संस्थांची नोंदणी रद्द केली गेली. २०२० सुधारणांनंतर फंड येण्यात २०-३०% घट झाली. २०१०-२०२० मध्ये विदेशी फंड १.७३ लाख कोटी (२००६-१९) इतका आला, परंतु त्याचा प्रचंड गैरवापर झाला. आता येत असणारा २२,००० कोटींचा फंड ‘राष्ट्रीय हिता’ साठी वापरला जाईल.

सब-ग्रांट व्यवस्था बंद करून संस्थांचे अधिकृत खाते नियंत्रणात आणले गेल्यामुळेच इतका मोठा फरक पडला. यावरूनच विदेशी देणग्यांचा वापर करून किती प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार आणि अनागोंदी कारभार चालवला जात होता, हे सहज लक्षात येईल. कायद्यातील नव्या सुधारणेमुळे आता रद्द झालेल्या संस्थांच्या मालमत्ता चोरापोरांच्या हातात जाणार नाहीत. इतका सुस्पष्ट आणि ठोक बदल सामाजिक क्षेत्रात प्रथमच घडणार आहे.

सामाजिक प्रभाव – भारतात येणारा विदेशी फंड मुख्यतः ख्रिश्चन मिशनरी संस्थांकडे जात होता. कंपॅशन इंटरनॅशनल, वर्ल्ड विजन, ऑक्सफाम सारख्या संस्थांनी वर्षानुवर्षे लाखो आदिवासी आणि दलितांना ‘प्रलोभन’ देऊन त्यांचे धर्मांतरण केले. दरवर्षी हजारो धर्मांतरणे केली जात होती. आजही हे काम केले जातेच. परंतु अश्या धर्मांतरणाचा घाणेरडा व्यवसाय करणाऱ्या संस्थांचे एफसीआरए रद्द केल्याने अनेक संस्था आपोआप बंद पडल्या. सामाजिक एकतेचे आणि भारतीयांच्या मूळ संस्कृतीचे संरक्षण यातून साध्य होत आहे. ख्रिस्ती मिशनरींच्या गोडगोड, पॉश इंग्लिश बोलण्याला आणि राईस बॅग, शिक्षण आरोग्य सारख्या सामान्य प्रलोभनांना बळी न पडता त्यांनी स्वधर्म मुळातून समजून घ्यावा, आपली सामाजिक एकता मजबूत करावी यासाठी त्यांना यामुळे मोठे बाळ मिळणार आहे. आता चोर म्हणून सिद्ध झालेल्या संस्थांच्या मालमत्ता सरकारकडे गेल्याने नवीन संस्था निर्माण करून सामाजिक कल्याण, शिक्षण, आरोग्य इत्यादी क्षेत्रातील काम राष्ट्रीय धोरणानुसार होईल, विदेशी एजेंड्यानुसार नाही.

राजकीय प्रभाव: ग्रीनपीस, सेन्टर फॉर पॉलिसी रिसर्च (सीपीआर) सारख्या संस्थांनी विदेशी फंड घेऊन कोळसा, न्यूक्लियर, नर्मदा प्रकल्पांना विरोध केला. २०१४ च्या आयबी रिपोर्टनुसार विदेशी एनजीओ ‘विकासाला अडथळा’ आणत होते. कुडनकुलम आंदोलन, जेएनयू-शाहीनबाग सारख्या आंदोलनांना विदेशातून पैसे आले. हा पैसा इतका प्रचंड होता की या काळात आंदोलनजीवी हा एक नवीन व्यवसाय प्रकार लोकांना समजला. २०२६ कायदा सुधारणेमुळे आता रद्द झालेल्या संस्थेची स्थावर जंगम केंद्राकडे जमा होईल. राजकीय अराजकता निर्माण करणारे ‘फंडेड प्रोटेस्ट’ कमी होतील. केंद्राच्या पूर्वपरवानगीशिवाय तपास न होण्याने राज्य सरकारे या संस्था, कार्यकर्ते आणि संपत्तीचा ‘राजकीय’ गैरवापर करू शकणार नाहीत. भारतात राजकीय स्थिरता आणण्यासाठी हे उपाय अत्यंत आवश्यक आहेत.

धार्मिक प्रभाव: इस्लामिक आणि ख्रिश्चन संस्थांनी विदेशी पैशाने प्रचंड प्रमाणात ‘धर्मांतरण’ केले. २०२४ मध्ये सीएनआय, व्हीएचएआय, इव्हँजेलिकल फेलोशिप ऑफ इंडिया सारख्या संस्थांच्या लायसन्स रद्द केल्या गेल्या. लाखो धर्मांतरणे यामुळे रोखली गेली. भारत हिंदूबहुल, प्रामुख्याने हिंदुत्वाची चण असणारे राष्ट्र आहे, गेली हजारो वर्षे चालत आलेल्या बहुसंख्याक संस्कृतीचे रक्षण करणे, ही इथल्या सरकारचा प्रमुख जबाबदारी आहे. भारत सरकार त्यादृष्टीने अग्रेसर होत आहे, ही समाधानाचीच बाब आहे. विदेशी शक्ती सेक्युलॅरिझम ची ढाल करून जे ‘धार्मिक युद्ध’ लढतात, त्यांच्या शस्त्राची धार या कायद्यामुळे बोथट झाली आहे.

जागतिक शक्ती कशा नियंत्रित होतील?

अमेरिका, युरोप, चर्च, जॉर्ज सोरोस सारखे देणगीदार भारतात ‘कलर रिव्होल्यूशन’ आणण्यासाठी सामाजिक संस्थांचा वापर करतात. आता कडक निर्बंध घालून अनॆतिक कामे करणाऱ्या संस्थांच्या नोंदणी रद्द केल्या जातात. त्यांची मालमत्ता केंद्राने ताब्यात घेतल्याने त्यांची ‘गुंतवणूक’ वाया जाईल. वैयक्तिक जबाबदारीमुळे ट्रस्टी पैसे घेऊन पळणार नाहीत. केंद्र तपास नियंत्रित करेल, म्हणजे ‘राज्यस्तरावरचे’ राजकारण संपेल. अराजकता – म्हणजे शाहीनबाग, किसान आंदोलन, आदिवासी विद्रोह – यांना पैसा मिळणार नाही. भारत ‘फॉरेन एजंट्स’चे ‘सॉफ्ट टार्गेट’ राहणार नाही.

राष्ट्रवादी दृष्टिकोनातून विचार करता हे विधेयक म्हणजे ‘अमृतकाळा’कडे टाकले गेलेले मजबूत पाऊल आहे. पूर्वीचे कायदे अपुरे होते, कारण त्यात ‘लूपहोल्स’ होते. नव्या एफसीआरए कायद्यामुळे भारत खरोखर स्वावलंबी, सुरक्षित आणि एकात्म होईल. एनजीओ खरे सामाजिक काम करतील, विदेशी एजेंडा चालवायला जागा उरणार नाही. लाखो कोटींचा फंड राष्ट्रीय विकासात जाईल. त्यामुळे हा केवळ कायदा नाही, तर ‘राष्ट्र प्रथम’ ची घोषणा आहे.

युद्धाची गर्जना की सुप्त थाबंण्याची ? – ट्रम्प आपल्या भाषणाचा अर्थ काय ?

आज एखादी निर्णायक आणि ‘आर-पार’ची घोषणा होणार. मात्र, त्यांच्या सुमारे 18 मिनिटांच्या भाषणाने ठोस उत्तर देण्याऐवजी जगाला अधिक संभ्रमात टाकले.

या भाषणात अपेक्षित आक्रमकता किंवा ठाम लष्करी भूमिका दिसून आली नाही. उलट, त्यांच्या आवाजात एक प्रकारचा थकवा जाणवत होता. शब्दांमध्ये युद्धाची गर्जना नव्हती, तर देशांतर्गत राजकारणाचा प्रभाव अधिक स्पष्ट दिसत होता. त्यांच्या समर्थकांनी याला ‘विजयाची घोषणा’ म्हटले असले, तरी अनेक राजकीय आणि लष्करी तज्ज्ञांच्या मते हा विजय नसून, सुरू असलेल्या संघर्षातून सन्मानाने बाहेर पडण्याचा एक प्रयत्न होता.

ट्रम्प यांनी केलेले दावेही काही नवीन नव्हते. “इराणचे नेतृत्व कमकुवत झाले आहे” किंवा “परमाणु सुविधा उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत” अशा विधानांची पुनरावृत्ती त्यांनी यापूर्वीही अनेकदा केली आहे. त्यामुळे या दाव्यांचा प्रभाव कमी झालेला दिसतो. सततच्या पुनरुक्तीमुळे त्यांच्या वक्तव्यांची धार बोथट झाल्याचे स्पष्टपणे जाणवते.

भाषणातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांनी केलेला व्हिएतनाम आणि अफगाणिस्तान युद्धांचा उल्लेख. हा केवळ संदर्भ नसून एक सूचक संदेश होता. या उदाहरणांद्वारे ते अमेरिकन जनतेला अप्रत्यक्षपणे सांगण्याचा प्रयत्न करत होते की, आता या संघर्षातून बाहेर पडण्याची वेळ आली आहे. वाढते तेलाचे दर आणि घसरता शेअर बाजार यामुळे देशांतर्गत दबाव वाढत असल्याचेही या पार्श्वभूमीवर दिसून येते.

ट्रम्प यांनी 2 ते 3 आठवड्यांची मुदत मागितली आणि या कालावधीत मोठा हल्ला होईल असे संकेत दिले. मात्र, तज्ज्ञांच्या मते हा कोणताही ठोस लष्करी आराखडा नसून एक ‘एग्जिट स्ट्रॅटेजी’ असू शकते. म्हणजेच, मर्यादित लष्करी कारवाई करून ‘विजय’ घोषित करण्याचा आणि त्यानंतर या संघर्षातून बाहेर पडण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे.

याशिवाय, होर्मुझ सामुद्रधुनीच्या सुरक्षेबाबत इतर देशांनी जबाबदारी घ्यावी, असे सूचित करत त्यांनी मध्य-पूर्वेतील अमेरिकेची भूमिका कमी करण्याचे संकेत दिले. तसेच, इराणच्या नेतृत्वाला ‘तर्कसंगत’ म्हणत त्यांनी संवाद आणि तहासाठीही दरवाजे खुले ठेवले आहेत.

एकूणच पाहता, हे भाषण युद्धाची घोषणा नव्हती, तर सुरू असलेल्या संघर्षाच्या शेवटाची चाहूल होती. ट्रम्प यांचा उद्देश थेट विजय मिळवण्यापेक्षा, स्वतःची प्रतिमा टिकवत आणि राजकीय समीकरणे सांभाळत परिस्थितीतून बाहेर पडण्याचा अधिक असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. (सोर्स)

सांसद संपर्क अभियानात विहिपचा ३७५ हून अधिक खासदारांशी संपर्क.

सांसद संपर्क अभियानात विहिपचा ३७५ हून अधिक खासदारांशी संपर्क.

२८ मार्च २०२६ : विश्व हिंदू परिषदचा १९ दिवसीय सांसद संपर्क अभियान

विश्व हिंदू परिषद (विहिप) यांनी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान राबवलेल्या १९ दिवसीय विशेष सांसद संपर्क अभियान अंतर्गत देशभरातील सुमारे ३७५ हून अधिक खासदारांशी संपर्क साधून हिंदू समाजाशी संबंधित तीन महत्त्वाच्या ज्वलंत विषयांवर चर्चा केली.

विहिपचे केंद्रीय महामंत्री बजरंग लाल बागडा यांनी सांगितले की, देशातील विविध प्रांत, भाषा आणि मत-पंथांमधील सुमारे १७० कार्यकर्त्यांनी या अभियानात सहभाग घेतला. या दरम्यान प्रभावी लोकसंख्या धोरण, तीर्थाटनाचा विकास आणि संविधानाच्या कलम २९ व ३० अंतर्गत अल्पसंख्याकांना मिळणारे विशेष अधिकार हिंदू समाजालाही देण्याबाबत चर्चा करण्यात आली.

तसेच मंदिरांना सरकारी नियंत्रणातून मुक्त करणे, हिंदूंचा पैसा हिंदू हितासाठी वापरणे आणि तीर्थाटनाच्या विकासासाठी संस्कृती मंत्रालयात स्वतंत्र विभाग स्थापन करण्याबाबत सर्व खासदारांशी सविस्तर चर्चा झाली.

बागडा यांनी पुढे सांगितले की, विहिप दरवर्षी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सर्व पक्षांच्या खासदारांशी संपर्क साधते. मात्र यंदा हिवाळी अधिवेशनाची कालावधी कमी असल्याने हे अभियान अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान राबवावे लागले.

या अभियानाद्वारे विहिपचे विविध उपक्रम आणि हिंदू समाज तसेच देशाच्या एकता-अखंडतेशी संबंधित २-३ महत्त्वाच्या मुद्द्यांची माहिती खासदारांना देण्यात आली. या कार्यासाठी देशभरातील विविध प्रांतांतील कार्यकर्ते ३-४ टप्प्यांत दिल्ली येथे जाऊन आपल्या-आपल्या प्रांतातील खासदारांशी संपर्क साधतात.

या वर्षीचे अभियान ९ मार्च ते २७ मार्च दरम्यान पार पडले.

  • पहिला टप्पा (९ ते १३ मार्च): केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि महाराष्ट्र येथील कार्यकर्त्यांनी एकूण १३९ लोकसभा व राज्यसभा खासदारांशी संपर्क साधला.
  • दुसरा टप्पा (१४ ते १९ मार्च): बिहार, झारखंड, राजस्थान, गुजरात, ओडिशा, पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, मणिपूर आणि नागालँड येथील कार्यकर्त्यांनी १०३ खासदारांशी संपर्क केला.
  • तिसरा व अंतिम टप्पा (२० ते २७ मार्च): छत्तीसगड, मध्य प्रदेश, दिल्ली, हरियाणा, हिमाचल प्रदेश, पंजाब, जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड येथील कार्यकर्त्यांनी १३३ खासदारांशी संपर्क साधला.

अशा प्रकारे १९ दिवसांत एकूण ३७५ खासदारांशी थेट आणि वैयक्तिक संपर्क साधण्यात आला.

विहिप महामंत्र्यांनी सांगितले की, यंदा या अभियानासाठी खालील तीन प्रमुख विषय निश्चित करण्यात आले होते:

  1. लोकसंख्या असंतुलनावर व्यापक राष्ट्रीय विचार करून प्रभावी लोकसंख्या धोरण तयार करणे.
  2. भारताच्या आध्यात्मिक जीवनाचे केंद्र असलेल्या तीर्थक्षेत्रांचा विकास, मंदिरांना सरकारी नियंत्रणातून मुक्त करणे आणि संस्कृती मंत्रालयात स्वतंत्र विभाग स्थापन करणे.
  3. संविधानातील कलम २९ व ३० सर्व नागरिकांसाठी समानपणे लागू करणे, ज्यामुळे सर्व धर्मांना धार्मिक शिक्षणाचे समान संवैधानिक अधिकार मिळतील; तसेच ‘अल्पसंख्याक’ या संज्ञेची स्पष्ट व्याख्या करण्याची गरज अधोरेखित करणे.

तसेच त्यांनी सांगितले की, या कार्यक्रमासाठी सर्व पक्षांच्या खासदारांकडून भेटीची वेळ मागण्यात आली होती. बहुतेक खासदारांनी या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि त्यांच्यासोबत अत्यंत उपयुक्त व अर्थपूर्ण चर्चा झाली.

दिल्ली येथे झालेल्या या पत्रकार परिषदेत विहिपचे केंद्रीय मंत्री, विशेष संपर्क प्रमुख व राष्ट्रीय प्रवक्ते श्री. अंबरीष हेही उपस्थित होते.

— विनोद बंसल

पॅन कार्ड, बॅंकिंग अन् डिजिटल पेमेंट – आजपासून नियमांत मोठा बदल !

पॅन कार्ड, बॅंकिंग अन् डिजिटल पेमेंट – आजपासून नियमांत मोठा बदल !

देशात आज एक एप्रिलपासून अनेक कायदे आणि नियमांत बदल होणार आहेत. नवीन प्राप्तिकर कायदा, वेतन संहिता यांच्यासह डिजिटल पेमेंटसाठी कडक सुरक्षा यांचा यामध्ये समावेश असणार आहे. या महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच पॅन कार्ड, एटीएम आणि युपीआयच्या काही नियमांमध्ये बदल करण्यात आलायं. या बदलाचा थेट परिणाम सामान्य जनतेवर होणार आहे.

डिजीटल पेमेंटसाठी आजपासून कोणते नवीन सुरक्षा नियम लागू?
एप्रिल 2026 पासून आरबीआयने सर्व ऑनलाईन व्यवहारांसाठी टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA) आणि बायोमेट्रिक पडताळणी अनिवार्य केली आहे.
नवीन आर्थिक वर्षात बँकिंग आणि ATM शुल्कात काय बदल झाला आहे?
आजपासून मोफत मर्यादेपेक्षा जास्त एटीएम व्यवहारांवर 23 रुपये अधिक टॅक्स आकारला जाईल आणि काही बँकांनी रोख विड्रॉल मर्यादा बदलली आहे.

शेअर बाजार आणि गुंतवणूक
शेअर बाजारात फ्यूचर्स अँड ऑप्शन्सच्या उलाढालींवर ‘एसटीटी’ अनुक्रमे 0.05 आणि 0.15 टक्के होणार.
शेअर बाजारातून सार्वभौम सुवर्ण रोखे खरेदी करणाऱ्यांना तसेच शेअर बायबॅक करणाऱ्या कंपन्यांना भांडवली नफा कर द्यावा लागणार………….. सोर्स

इराण ने दिली १८ अमेरिकेतील टेक कंपन्यांना उडविण्याची धमकी.

इराणची अमेरिकन टेक कंपन्यांना धमकी.

आतापर्यंत केवळ लष्करी तळांना लक्ष्य करणारा इराण आता अमेरिकेच्या आर्थिक शक्तीवर प्रहार करण्याच्या तयारीत आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्प्स (IRGC) ने जगातील १८ मोठ्या कंपन्यांची यादी जाहीर केली असून, १ एप्रिल रोजी रात्री ८ वाजेपासून या कंपन्यांना उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली आहे.

इराणच्या ‘हिट लिस्ट’मधील १८ कंपन्या:

इराणने खालील कंपन्यांना ‘दहशतवादी’ घोषित केले आहे:

  • टेक दिग्गज: ॲपल, मेटा (फेसबुक), गुगल, मायक्रोसॉफ्ट.

  • हार्डवेअर आणि चिप्स: इंटेल, डेल, एचपी, एनवीडिया.

  • इतर: टेस्ला, बोइंग, आयबीएम, सिस्को, ओरेकल, प्लांटर, जेपी मॉर्गन, जीई, स्पायर सोल्यूशन्स आणि G42.

इराणचा इशारा: इराणने या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना तात्काळ कार्यालये सोडण्यास सांगितले असून, सर्वसामान्यांना या कंपन्यांच्या परिसरापासून १ किलोमीटर दूर राहण्याची चेतावणी दिली आहे.

हल्ल्यामागचे मुख्य कारण

इराणचा आरोप आहे की, या कंपन्यांनी त्यांच्या महत्त्वाच्या कमांडर्स आणि नेत्यांच्या ‘टार्गेटेड हत्या’ (Assassination) करण्यासाठी इस्रायल आणि अमेरिकेला तांत्रिक मदत आणि गुप्त माहिती पुरवली आहे. इराणच्या मते, या कंपन्यांच्या मदतीमुळेच त्यांच्या नेत्यांना शोधून मारणे सोपे झाले. यामुळे आता या कंपन्यांना ‘दगडयुगात’ पाठवण्यासाठी हल्ले केले जातील, असे IRGC ने म्हटले आहे.

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘एग्झिट प्लॅन’

दुसरीकडे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध संपवण्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी व्हाईट हाऊस मधून दोन महत्त्वाची विधाने केली आहेत:

  1. लष्करी कारवाईचा शेवट: ट्रम्प यांच्या मते, इराणमधील लष्करी ऑपरेशन पुढील २ ते ३ आठवड्यांत पूर्ण होऊ शकते.

  2. सैन्याची माघार: अमेरिका इराणला अणुशस्त्रे बनवण्यापासून रोखण्यासाठी त्याला कित्येक दशके मागे ढकलत आहे. हे उद्दिष्ट पूर्ण झाल्यावर अमेरिकन सैन्य मायदेशी परतेल. यासाठी कोणत्याही कराराची (Deal) गरज नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

ऊर्जा सुरक्षेवर ट्रम्प यांची परखड भूमिका

तेलाच्या वाढत्या किमती आणि ‘स्ट्रेट ऑफ होर्मूझ’ (Strait of Hormuz) मधील तणावावर ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांना कडक शब्दात सुनावले आहे:

  • स्वत:ची सुरक्षा स्वतः करा: ट्रम्प म्हणाले की, अमेरिका आता इतर देशांच्या ऊर्जा सुरक्षेची जबाबदारी घेणार नाही.

  • खडे बोल: “जर फ्रान्स किंवा इतर कोणत्याही देशाला तेल किंवा गॅस हवा असेल, तर त्यांनी स्वतः ‘स्ट्रेट ऑफ होर्मूझ’ मध्ये जाऊन आपला रस्ता मोकळा करावा. जेव्हा अमेरिकेला गरज होती, तेव्हा हे देश सोबत नव्हते, त्यामुळे आता अमेरिका त्यांच्या संरक्षणासाठी उभी राहणार नाही.” …………………………. सोर्स

मुलांची सुट्टी की पालकांची चिंता ?

0

मुलांची सुट्टी की पालकांची चिंता ?

 

उन्हाळा सुरू झाला की शाळांना सुट्टी लागते आणि घरात मुलांची लगबग वाढते. अनेक घरांमध्ये ही वेळ आनंदाची असली तरी काही पालकांसाठी ती चिंतेची ठरते. “मुलं दिवसभर घरी असतात”, “मोबाईलवर बसून राहतात”, “घरात गोंधळ घालतात” अशा तक्रारी या काळात वारंवार ऐकायला मिळतात. त्यामुळे अनेक पालकांचा पहिला आणि सोपा उपाय म्हणजे मुलांना विविध क्लासेसमध्ये पाठवणे. नृत्य, चित्रकला, अबॅकस, समर कॅम्प अशा उपक्रमांची यादी तयार होते आणि मुलांची सुट्टी पुन्हा एकदा वेळापत्रकांच्या चौकटीत अडकते.

निश्चितच, अशा क्लासेस आणि उपक्रमांचा मुलांच्या विकासासाठी उपयोग होतो. नवीन कौशल्ये शिकण्याची आणि आत्मविश्वास वाढवण्याची संधी त्यातून मिळते. परंतु मुलांचा सर्वांगीण विकास केवळ क्लासेसमधूनच होतो असे मानणे ही एक चुकीची समजूत आहे. खरं तर उन्हाळ्याची सुट्टी ही मुलांच्या आयुष्यातील अशी वेळ असते, जिथे त्यांना मोकळेपणाने शिकण्याची, अनुभव घेण्याची आणि स्वतःला शोधण्याची संधी मिळते.

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत पालक आणि मुलांना एकत्र बसून निवांत बोलण्यासाठीही वेळ मिळत नाही. शाळा, ऑफिस, गृहपाठ, क्लासेस आणि डिजिटल जग या सगळ्या गोष्टींमध्ये संवादाचा धागा अनेकदा सैल होतो. अशा परिस्थितीत उन्हाळ्याची सुट्टी ही पालक-मुलांमधील नातेसंबंध अधिक दृढ करण्यासाठी एक मौल्यवान संधी ठरू शकते. मुलांसोबत वेळ घालवणे ही त्यांच्यासाठी सर्वात मोठी भेट असते. ही भेट कोणत्याही महागड्या खेळण्यांपेक्षा किंवा क्लासेसपेक्षा अधिक मौल्यवान असते.

या काळात पालकांनी मुलांसोबत काही साध्या पण अर्थपूर्ण गोष्टी करण्याचा प्रयत्न करावा. उदाहरणार्थ, एकत्र स्वयंपाक करणे, घरातील छोट्या कामांमध्ये मुलांना सहभागी करून घेणे, एखादे पुस्तक वाचून त्यावर चर्चा करणे किंवा आपल्या लहानपणीच्या आठवणी मुलांना सांगणे. अशा छोट्या कृतींमधून मुलांना जीवनातील अनेक महत्त्वाच्या गोष्टी सहज शिकता येतात. जबाबदारीची जाणीव, सहकार्याची भावना आणि कुटुंबातील नात्यांचे महत्त्व यांची ओळख या अनुभवांमधूनच होते.

आज अनेक पालकांची एक मोठी तक्रार म्हणजे मुलं सतत मोबाईल किंवा स्क्रीनमध्ये गुंतलेली असतात. परंतु केवळ मोबाईल वापरावर बंदी घालून हा प्रश्न सुटत नाही. त्यासाठी मुलांना पर्यायी आणि आकर्षक उपक्रम उपलब्ध करून देणे अधिक महत्त्वाचे आहे. चित्रकला, हस्तकला, बागकाम, छोट्या प्रयोगांवर काम करणे, घरात छोटे प्रकल्प तयार करणे किंवा डायरी लिहिणे अशा अनेक गोष्टी मुलांच्या सर्जनशीलतेला वाव देऊ शकतात. या उपक्रमांमुळे मुलांची कल्पनाशक्ती वाढते आणि ते स्वतः काहीतरी निर्माण करण्याचा आनंद अनुभवतात.

उन्हाळ्याची सुट्टी ही मुलांना जीवनाचे प्रत्यक्ष अनुभव देण्याचीही योग्य वेळ आहे. मुलांना बाजारात घेऊन जाणे, एखाद्या सामाजिक उपक्रमात सहभागी करणे, गावाला भेट देणे किंवा निसर्गाच्या सान्निध्यात काही दिवस घालवणे या अनुभवांमधून मुलांना जीवनाचे वास्तव समजते. निसर्गाशी जवळीक निर्माण होते आणि समाजातील विविध घटकांविषयी संवेदनशीलता वाढते. अशा अनुभवांचे शिक्षण कोणत्याही पुस्तकातून किंवा वर्गातून मिळत नाही.

याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे  मुलांना कधी कधी कंटाळा येऊ देणेही गरजेचे असते. आज अनेक पालक मुलांना सतत काहीतरी कामात गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करतात. परंतु मोकळा वेळ आणि कंटाळा हेच अनेकदा सर्जनशीलतेचे मूळ असतात. जेव्हा मुलांना काहीच ठराविक काम नसते, तेव्हा ते स्वतः नवीन खेळ, नवीन कल्पना आणि नवीन उपक्रम शोधू लागतात. हीच प्रक्रिया त्यांच्या विचारक्षमतेला चालना देते.

उन्हाळ्याची सुट्टी ही केवळ वेळ घालवण्याची किंवा मुलांना व्यस्त ठेवण्याची गोष्ट नाही. ती मुलांमध्ये जीवनमूल्ये आणि जीवनकौशल्ये विकसित करण्याची एक महत्त्वाची संधी आहे. जबाबदारी, वेळेचे व्यवस्थापन, सहकार्य, संयम आणि कृतज्ञता यांसारखी मूल्ये या काळात सहज शिकवता येतात. अशा मूल्यांचा पाया बालपणीच मजबूत झाला तर पुढील आयुष्यात त्याचा मोठा फायदा होतो.

म्हणूनच पालकांनी उन्हाळ्याच्या सुट्टीकडे “समस्या” म्हणून पाहण्याऐवजी “संधी” म्हणून पाहणे गरजेचे आहे. मुलांना सतत क्लासेसमध्ये गुंतवून ठेवण्यापेक्षा त्यांच्या सोबत वेळ घालवणे, त्यांच्याशी संवाद साधणे आणि त्यांच्यासोबत अनुभव शेअर करणे अधिक महत्त्वाचे आहे.

म्हणूनच प्रत्येक पालकाने स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा  या उन्हाळ्यात आपल्या मुलांसाठी आपण किती आठवणी तयार करणार आहोत? कारण आयुष्य पुढे जात असताना मुलांच्या मनात कायम राहतात त्या कुटुंबासोबत घालवलेल्या आनंदी क्षणांच्या आठवणी. (फोटो AI Gemini)

पल्लवी चिकारे

युवा रुरल असोशिएशन, नागपूर
(स्किल इंडिया सर्टिफाइड पॅरेंटिंग कोच
‘सुजाण पालकत्व’ उपक्रम समन्वयक, युवा रुरल असोशिएशन, नागपूर
9890665676
pallavi.chikare@yraindia.org)

हवामान विभागाकडून अलर्ट..

0

राज्यात पुढील 3 दिवस पावसाचा धुमाकूळ.

हवामान विभागाकडून अलर्ट.

 

गेल्या काही दिवसांपासून राज्यात हवामानात बदल होत असल्याने काल अनेक ठिकाणी पावसासह गारपीटीची नोंद झालीयं. या पार्श्वभूमीवर राज्यात पुढील तीन ते चार दिवस काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलीयं.

सध्या उत्तर भारताच्या अनेक भागात पाऊस कोसळत असून या भागांना पावसाचा इशारा देण्यात आलायं. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरुन येणारे वारे तसेच पश्चिमी विक्षोभ या काही नैसर्गिक कारणांमुळे राज्यात मंगळवारपासून पुढील दोन ते तीन दिवस, विशेषत: राज्याच्या अंतर्गत भागात पावसाची शक्यता आहे, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आलंय.

हॉर्मुज तात्काळ खुली करा अन्यथा… ट्रम्प यांची इराणला धमकी.

0

हॉर्मुज तात्काळ खुली करा अन्यथा… ट्रम्प यांची इराणला धमकी.

इराण अमेरिका युद्धादरम्यान इराणसोबत चर्चा सुरू असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला होता. आता या दरम्यानच त्यांनी पुन्हा एकदा इराणला थेट त्यांचे तेल आणि पॉवर प्लांट उडवून देण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे आता हे युद्ध आणखी भडकणार असल्याचं दिसत आहे.

 

डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले ?

 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया साईट ट्रुथ सोशलवर लिहिले आहे की, अमेरिका आणि इराणमध्ये सैन्य ऑपरेशन संपवण्यासाठी एका योग्य शासनासोबत गंभीर चर्चा सुरू आहे. यामध्ये चांगली प्रगती झाली आहे. मात्र काही कारणांमुळे हा करार झाला नाही. तसेच इराणने हॉर्मुजची समुद्रधुनी ही व्यापारासाठी तात्काळ खुली केली नाही. तर आम्ही इराणमध्ये आमचा मुक्काम संपवताना त्यांचे पॉवर प्लांट, तेल साठे खर्ग द्विप हे उडवून इराण पूर्णतः नष्ट करून टाकू.

तसेच पुढे ट्रम्प म्हणाले की, हे आम्ही आमच्या त्या सैनिकांसाठी आणि इतर लोकांसाठी करत आहोत. ज्यांचा बदला घेणे गरजेचे आहे. ज्यांना इराणच्या 47 वर्षांच्या शासकांनी त्यांना निर्घृणपणे मारले आणि त्यांच्या हत्या केल्या. तसेच अमेरिका आणि इस्त्रायसच्या अधिकाऱ्यांच्या घरांना निशाणा करण्याची धमकी देण्यात आली. असं म्हणत ट्रम्प यांनी एकीकडे ते स्वत: च इराणसोबत चर्चा सुरू असल्याचा दावा करत असताना आता थेट इराणला धमकी दिली.

पर्यावरण रक्षण: प्लास्टिक मुक्तीसाठी देशव्यापी मोहीम

0

प्रदूषण रोखण्यासाठी सिंगल-युज प्लास्टिकवर बंदी आणि लोकसहभागातून स्वच्छ भारत अभियानाला गती.