समाजविघातक लोकांनी समर्थ रामदास हे आदिलशहाचे हेर होते, असा शोध लावला आहे. ?

समाजविघातक लोकांनी समर्थ रामदास हे आदिलशहाचे हेर होते, असा शोध लावला आहे….  हा शोध लावला मा.म.देशमुखने!

मा.म.देशमुख कोण होता?

छत्रपती शंभूराजांची हत्या करणाऱ्या औरंगजेबला सदाचारी म्हणणाऱ्या पिवळ्या पुस्तकाचा लेखक होता.

समर्थ रामदास रायगडाजवळ शिवथरघळ आणि सज्जनगड परिसरात राहत होते, पण ते आदिलशाहचे हेर होते, याचा पत्ता छत्रपती शिवरायांच्या गुप्तहेर खात्याला का लागला नसेल? म्हणजे शिवरायांचे हेर खाते कूचकामी होते असे  म्हणायचे आहे का?

स्वराज्याच्या आसपास राहणारे रामदास हे शत्रूचे हेर होते, हे स्वराज्याच्या चोख गुप्तहेरखात्याला माहिती होत नाही, पण 300 वर्षानंतर ही गोष्ट मा.म.देशमुख याना कळते ? तुम्ही कोणाची मापे काढत आहात? शिवरायांच्या गुप्तहेर खात्याची?

सुरतपासून आग्र्यापर्यंत उत्तम कामगिरी करणाऱ्या शिवरायांच्या हेर खात्याच्या कीर्तीला कलंक लावण्याचा हा डाव आहे .

मागील विधानसभा अधिवेशनात आमदार आव्हाड यांनी “गागाभट्टाने महाराजांना पायाच्या अंगठ्याने तिलक लावला” असे विधान केले….तुम्ही कोणाला कमीपणा आणताय ? ज्यांनी चार-चार बलाढ्य जुलमी सत्ता उलथवून टाकल्या त्यांना ? जगात शक्तीशाली असणाऱ्या औरंग्यासमोर त्याच्याच दरबारात सिंहगर्जना करणारे शिवराय असा पायाने टिळा लावून घेतील ?

भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्यासाठी व्यापक षडयंत्र सुरु आहे. नाशिक येथील आयटी कपंनीतील लव्ह जिहाद, अमरावतीत एका मुस्लिम मुलाने 180 मुलींना जाळ्यात अडकवणे, मागे अनेक सुशिक्षित आणि डॉक्टर असणारे आतंकवादी सापडले. हिंदू मुलींना कन्वर्ट करुन मुसलमान बनवण्यासाठी मोठे नेटवर्क उभे करणारे पकडले .

भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्याच्या मार्गात सर्वात मोठा अडथळा कोणता आहे ? माहिती आहे ? तो म्हणजे- शिवचरित्र !

जो शिवचरित्र अभ्यासेल, समजून घेईल तो कधीच देशाविरुद्धचे षडयंत्र यशस्वी होऊ देणार नाही.

शिवचरित्र बदनाम करता येत नाही म्हणून त्यात खोट्या कहाण्या घुसवण्यासाठी गोंडस नाव असलेल्या संघटना स्थापन झाल्या,म्हणजे लोकांना शंका येऊ नये.

“शिवाजी कोण होता? ” सारखी पुस्तके लिहून शिवरायांचा लढा धार्मिक नव्हता तर राजकीय होता, अशी खोटी माहिती प्रसूत करण्यात आली.पानसरे यांनी तर “औरंगजेबाने मंदिराला देणग्या दिल्या” असे लिहून त्याला सेक्युलर आणि सॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला.याला कसलाही पुरावा नाही.

गुढीपाडवा, होळी, दसरा वगैरे सण बंद पाडण्यासाठी खोट्या कहाण्या रचून सांगण्यात आल्या.त्यासाठी वारकरी संप्रदायात अनेक कम्युनिस्ट घुसखोर धोतरे नेसून कीर्तन करत आहेत…..हिंदू समाजात फूट पाडत आहेत.यातील अनेकजण राहुल गांधींच्या भारत जोडो (की तोडो) यात्रेत सहभागी होते.

पुतनामावशीची कथा आपल्याला माहिती आहे.बाळकृष्णाला आपल्या दुधातून विष पाजण्यासाठी पुतना सुंदर रुप घेऊन आली होती…. त्याचप्रमाणे हिंदू समाजाला विष पाजण्यासाठी रुपे बदलून अनेक व्यक्ती -संघटनना कार्यरत झाल्या आहेत. जातीजातीत फूट पाडण्यासाठी सामाजिक प्रश्नाचे भांडवल करायचे…. नवनवीन प्यादे उभे करुन समाजात फूट पाडायचा डाव खेळायचा हे उद्योग सुरु आहेत. या नव्या पुतनामावशीचे रुप आम्ही ओळखणार आहोत की नाही ?

छत्रपती संभाजीनगरला विरोध करण्यासाठी 2,73,000 लोकांनी अर्ज केले तरी आम्हाला भाईचारा निभवायचा असतो. कोणी कुठे चहा-पोहे वाटले म्हणून लाखो पूर्वजांचे बलिदान आम्ही कसे विसरुन जातो?

बाजी पासलकर,तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, सूर्याजी काकडे, हंबीरराव मोहिते, हे लोक ज्या इस्लामी शक्तीशी लढले तो फक्त राजकीय लढा होता का? पानसरे कशाच्या आधारावर हे लिहू शकले?

कॉम्रेड गोविंद पानसरे हे कम्युनिस्ट होते…. त्यांच्या इतिहासकारांनी शिवाजी महाराजांना लुटारु आणि चोर संबोधले आहे.त्याविरुद्ध पानसरे कधी बोलले का?

कम्युनिस्ट इतिहासकार इरफान हबीबने लिहिलेल्या The Agrarian system of Mughal India या पुस्तकात मुघलांनी केलेले अत्याचार झाकण्यासाठी असे लिहिले आहे की  “शिवाजीच्या किंवा मराठ्यांच्या राज्यातही प्रजा अन्यायमुक्त होती, असं समजण्याचं काही कारण नाही… शिवाजीचं सैन्य कसं होतं, तर Naked starved rascals अर्थात ‘नागडे उपाशी चोरटे’ !”पुढे लिहिलेय “‘लूट नाही, तर वेतन नाही’ , अशी शिवाजीची निती होती. शिवाजीने दख्खनच्या दरिद्री रयतेचा जो काही प्रतिपाळ केला तो असा होता !”

म्हणजे थोडक्यात त्याला असे म्हणायचे आहे की मुघल जसे अत्याचारी होते तसे हिंदू मराठा राज्यकर्ते पण अत्याचारी होते.हीच गोष्ट पानसरेनी वेगळ्या भाषेत लिहिली की जशी मुघलांनी मंदिराची लूट केली तशी हिंदू राजांनीही केली.

मुघल- मराठे सारखेच होते असे शिकवले तर आमच्या भावी पिढीत कसला स्वाभिमान निर्माण होणार आहे? हा स्वाभिमान निर्माण होऊ नये म्हणून औरंगजेबाला सदाचारी ठरवणारी पुस्तके लिहिली जातात, मराठ्यांचा तेजस्वी लढा बोथट करण्यासाठी “शिवाजी कोण होता?” अशी पुस्तके लिहिली जातात.ही पुस्तके वाचून निर्माण होते कणा नसलेली “घर की ना घाट की” निस्तेज तरुणाई!

आम्हाला हिंदुत्वाचा जाज्वल्य अभिमान असणारी, तेजस्वी वारशाची आणि स्वतःचा आणि देशाचा उद्धार करणारी पिढी घडवायची आहे…… त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, गुरु गोविंदसिंह, छत्रपती शंभूराजे, बंदासिंह बैरागी यांचे उदात्त जीवन आमच्यासमोर आहे.

विचार नक्की करा….!!

– रवींद्र सासमकर

फसलेला डाव, मोडलेली समीकरणं.

फसलेला डाव, मोडलेली समीकरणं.

 

यूएस-इस्त्रायल वि इराण युद्धाचा आज २५ वा दिवस! गेले २५ दिवस ह्या युद्धाच्या भौगोलिक केंद्रबिंदूत असुनही मी ह्या विषयावर अवाक्षरही लिहिलं नाही! बऱ्याच गोष्टी आजुबाजुला घडतांना, ड्रोन, फायटर जेट्स, मिसाईल्स, इंटरसेप्टर, वॉर्निंग सायरन्स ह्या सगळ्यांचे आवाज रोज ऐकतांना ही ह्या युद्धाबद्दल अवाक्षरही लिहिलं नाही, कटाक्षाने लिहिलं नाही. ज्यांना मी कुठे राहतो हे माहिती आहे, आणि ज्यांना माझ्याबद्दल काळजी, आपुलकी आहे त्यांनी फोन किंवा मेसेजेस वर चौकशी केली, त्यात देखील मी फारसे इनपुट्स शेयर केले नाही, करणारही नाही. ज्यांना मध्यपूर्व, इथली धार्मिक-राजकीय समीकरणं ह्याची प्रत्यक्ष माहिती नाही, भौगोलिक परिस्थितीची कुठलीही आकलन स्पष्टता नाही त्या लोकांना युद्ध आणि त्याच्या परिणामांबाबत चर्चा करतांना बघुन हसु यायचं. गेले २५ दिवस माझ्यासाठी आणि विशेषतः भारतात राहणाऱ्या माझ्या कुटुंबियांसाठी फार तणावपूर्ण होते, आहेत! भल्याभल्या स्ट्रॉंग पर्सनॅलिटीज ना ह्या तणावादरम्यान तुटतांना मी बघितलं, तणावादरम्यान हॉस्पिटलाईज होतांना बघितलं. हॉस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये ऑपरेशन टेबलवर ऑपरेट होत असणाऱ्या मित्राला बघायला जातांना येणारे मिसाईल हल्ल्याचे अलर्टस फॉलो करायचे की मित्राचं आयुष्य बघायचं असा बाका प्रसंगही बघुन झाला. फेसबुकवर पेट्रोल, गॅस आणि ड्युटी फ्री मधील सोनं किंवा दारू ह्या खेरीज मध्यपूर्वेशी कुठलाच संबंध न येणाऱ्या फेसबुकीय मित्रयादीतील काही मित्रांच्या “कशाला लोकं मरायला गेलीत तिकडे आपला देश सोडून, आता मारे माझा माझा देश करत वापस येतायत” हे असले टोमणे देखील वाचून झाले. थोडक्यात जवळपास सगळं होतं नव्हतं ते बघुन झालं. पण कधी ह्या विषयावर व्यक्त व्हावं असं वाटलं नाही. आजचा दिवस मात्र ह्याला अपवाद ठरलाय, थँक्स टु नन अदर दॅन तात्या आणि बिबी!

आज तात्यांनी अचानक ५ दिवसांची सशर्त युद्धबंदी एकतर्फीच जाहीर केली. उशिरा रात्री बिबींनी त्याला दुजोरा दिला. तात्यांचं सोडा पण बिबी ह्या व्यक्तीचा गेली १० वर्ष अभ्यास करतांना जाणवलेली एक ठळक गोष्ट, बिबी जेंव्हा जेंव्हा प्रेडिक्टेबल वाटतात तेंव्हा तेंव्हा ते अधिक धोकादायक भासतात! ह्याउलट तात्या आपल्या पवार साहेबांप्रमाणे जे बोलतात त्याच्या अगदी विरुद्ध वागतात! दुर्दैवाने २४ तारखेला म्हणजे काल ह्या दोन्ही गोष्टी एकत्र आल्या आहेत. त्यात दुष्काळात तेरावा महिना म्हणजे मोदींनी लोकसभेत व्यक्त होतांना हे युद्ध कदाचित अधिक लांबु शकेल ह्याची वर्तवलेली शक्यता ह्या चांगल्या गोष्टी नक्कीच नाहीत. तात्यांना त्यांनी मांडलेला डाव फसलाय हे पुरतं कळुन चुकलंय, पण एकूणच त्यांच्या गोट्या (सोंगट्या) ह्या खेळात अशा काही अडकल्यात की त्यांना सोडवताही येत नाहीय आणि विव्हळता ही येत नाहीय! फक्त दुःख कमी होऊन सापळ्याची मिठी कधी सैल होतेय आणि आपल्या गोट्या (सोंगट्या) बाहेर काढतोय अशी ‘नॅरो बट सेफ एस्केप विंडो’ तात्या शोधतायत! आता तात्यांच्या गोट्यां (सोंगट्या) वरील पकड इराण कितपत ढिली करतोय, आणि बिबी ती किती ढिली करू देतोय ह्यावर पुढचा खेळ अवलंबून असेल. इराणच्या दृष्टिकोनातून बघितलं तर “मेलेलं कोंबडं आगीला भीत नाही” हे त्यांच्यासाठी तंतोतंत लागु ठरतं.

येणारे पुढील पाच दिवस अत्यंत महत्वपूर्ण आणि मध्यपुर्वेतील अरब राष्ट्रांच्या राजकारणात आमूलाग्र बदल घडवणारे ठरतील! इथून पुढे दोनच पर्याय आहेत.

१ः बिनशर्त संपूर्ण शांती
२ः क्लाइम्बिंग एन एस्कलेशन लॅडर! (स्लाईट पॉसिबिलीटी ऑफ ‘एन’ ऑप्शन)

तात्यांचा टिपिकल बिझनेस माईंडेड ट्रान्ससॅक्शनल स्वभाव बघता ते ‘हनी अँड स्टिक’ फार्म्युल्यानेच जातील. बिबींच्या स्वभावानुरूप त्यांच्यासाठी दुसरा पर्याय अधिक जवळचा असु शकतो अर्थात वर कंसात दिलेला ऑप्शन वगळुन! पण इराण आणि इस्त्रायल व्यतिरिक्त मध्यपूर्वेतील जे इतर स्टेकहोल्डर्स आहेत त्यांच्यासाठी पर्याय ‘एक’ हाच एकमेव ‘अस्तित्वाचा’ पर्याय आहे. १९७३ साली अमेरिकेवर ‘ऑइल एम्बारगो’ लादणारे सौदीचे तत्कालीन राजे फैजल निर्बंध आणतांना म्हणाले होते “मध्यपूर्वेत तेलसाठे मिळण्यापूर्वी आम्ही अरब लोक उंटांवरून प्रवास करायचो, कबिल्यांमध्ये वाळवंटात कठीण परिस्थितीत राहायचो. हे काही आम्हाला नवीन नाहीय, आमच्या बापजाद्यांपासुन ते आमच्या रक्तात आहे. आमच्या तेल साठ्यांवर युरोप आणि पाश्चिमात्य देशांमधील औद्योगिक क्रांती चालते त्यामुळे आमचे तेलसाठे आणि त्यांचा पुरवठा अबाधित राहणं त्यांच्यासाठी गरजेचं आहे, आम्ही काय हे संपलं तर परत आमचा गाशा गुंडाळु आणि परत उंटावरून फिरू”! अरबांना तेलाच्या श्रीमंतीच्या झगमगाटाची ‘सवय’ लागली नव्हती. त्यामुळे राजे फैजल ह्यांची भुमिका अगदी चपखल होती, आणि ह्याच भुमिकेने बलाढ्य अमेरिकेलाही झुकवलं होतं!

आज गंमत अशी आहे की नियतीचे फासे उलटे पडलेत! पाश्चिमात्य जगासोबतच मध्यपूर्व अरबांची सुद्धा तेल गरज झालीय, कारण तेलाच्या श्रीमंतीच्या झगमगाटाची त्यांना लागलेली ‘सवय’! आज अमेरिका तेलाच्या बाबतीत जवळपास स्वयंपूर्ण आहे. त्यामुळे युद्ध कितीही लांबलं तरीही त्यांना तसा फारसा फरक पडणार नाहीय. युद्ध आटोपशीर घेणं हे अमेरिकेपेक्षाही ‘मध्यपुर्वेतील अरब स्टेकहोल्डर्सना’ अधिक गरजेचं आहे, आणि त्यासाठीच त्यांचा अट्टाहास आहे. माझं लॉजिकल माईंड कितीही विरोध करत असलं तरीही माझं गट फिलिंग वेगळंच सांगतंय. सो माय गट फिलिंग, इट वोन्ट इंटेंसिफाय फर्दर! ही फेज मार्च एन्ड पर्यंत संपेल, दुसरी फेज कदाचित लवकर येईल पण सध्याची फेज मात्र थांबेल. ह्यात अडथळा एकच आहे, बिबी! जर दुर्दैवाने हे एस्कलेट झालं तर मात्र जगासाठी फार कठीण दिवस आहेत ह्याची झलक साऊथ पार्स, खर्ग आयलंड आणि नॉर्थ डोम मध्ये दिसली आहे, पुढची वाट रास-अल खैर किंवा इंजर्लीक नसावा हीच प्रार्थना! 🙏🏻

ह्या सगळ्यामध्ये घटनांमधून एक गोष्ट वारंवार अधोरेखित होते, की पाकिस्तान हा इराणपेक्षा हायपरसॉनिक बॅलिस्टिक किंवा क्रूज मिसाईल टेक्नॉलॉजीमध्ये सरस आहे, वरून पाकड्यांना चीन जबरदस्त टेक्निकल आणि वॉरफेअर बॅकअप जसे स्टेलाईट ट्रेसेस, लोकेशन मॅपिंग्स देत होता तरीही ‘ऑपरेशन सिंदुर’ दरम्यान भारताच्या इंटिग्रेटेड डिफेन्स सिस्टमने पाकड्यांनी डागलेले हजारावर ड्रोन/मिसाईल इंटरसेप्ट केले, एकही जमिनीवर पडून जीवितहानी झाली नाही ह्यावरून कल्पना करा आपली सिस्टम काय तोडीची होती! सॅल्युट टू अवर डिफेन्स फोर्सेस ऍन्ड ऑफकोर्स टू द गव्हर्मेंट लेड बाय पीएम नरेंद्र मोदी ज्यांनी डिफेन्स क्षेत्रातही ‘आत्मनिर्भर भारत’ ची संकल्पना राबवली. आपल्याकडे काही लोकांना संपणाऱ्या गॅस ची, सध्या न वाढलेल्या पण युद्ध लांबलं तर भविष्यात वाढु शकणाऱ्या पेट्रोल/डिझेल च्या किमतींची आणि त्यामुळे पर्यायाने येणाऱ्या महागाईची चिंता लागलीय, पण किमान एलिव्हेटेड सिक्युरिटी सायरन वाजल्यावर बंकर्स किंवा सेफ कॅंटोन्मेंट्समध्ये जाणं, तो थांबल्यावर, थ्रेट एलिमिनेट झाल्यावर परत आपलं रुटीन आयुष्य जगणं हे ‘न्यू नॉर्मल’ आयुष्य तुमच्या नशिबी आलं नाहीय ह्यासाठी मोदींचे नाही मानलेत तरी चालेल पण आपल्या संरक्षण दलाचे आणि जमल्यास देवाचे मात्र नक्की आभार माना !

✍🏻 प्रसाद देशपांडे.

‘आपल्या परंपरांचा मुख्य उद्देश वैज्ञानिक प्रणाली आणि नवोन्मेष यांच्यात संतुलन राखणे हा आहे’ – दत्तात्रेय होसबाले.

0

‘आपल्या परंपरांचा मुख्य उद्देश वैज्ञानिक प्रणाली आणि नवोन्मेष यांच्यात संतुलन राखणे हा आहे’ – दत्तात्रेय होसबाले.

गत १७ एप्रिल रोजी अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली येथे ‘ग्लोबल सायन्स इनोव्हेशन फोरम’च्या ‘थ्राईव्ह-२०२६ समिट’मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह श्री. दत्तात्रेय होसबाले यांनी वैज्ञानिक प्रगतीबाबत प्रभावी दृष्टिकोन मांडला. त्यांनी भारतीय ज्ञानपरंपरेवर भर दिला.

आपल्या परंपरेत वैज्ञानिक आणि तांत्रिक संशोधनाची मौलिकता कशी आहे? आपल्या परंपरेतील ज्ञानाची मौलिकता स्थूल आणि सूक्ष्म अशा दोन्ही स्तरांवर आढळते. ते बुद्धी आणि तर्कावर आधारित असून मानवी ज्ञानाच्या मर्यादांपलीकडे जाणारे आहे. आपल्या ज्ञानपरंपरेत ‘आध्यात्मिक’ आणि ‘लौकिक’ यामध्ये कधीही भेद केला गेला नाही. आपल्या येथे ज्याला ‘आध्यात्मिक’ ज्ञान म्हटले जाते, त्यामध्ये आज आपण ‘वैज्ञानिक ज्ञान’ म्हणतो तेही समाविष्ट आहे.

याची अनेक उदाहरणे आहेत. आपल्या अनेक ग्रंथांमध्ये मानव शरीरशास्त्र, मेंदूविज्ञान, मानवी शरीराची कार्यप्रणाली, त्याची क्रियाशीलता आणि निष्क्रियता, शरीर कसे आणि का कार्य करते याबाबत सविस्तर माहिती दिलेली आहे. तरीही त्यांना आध्यात्मिक ग्रंथ मानले गेले आहे. प्रत्यक्षात ते वैज्ञानिक स्वरूपाचे आहेत.

दीर्घ इतिहासात, विशेषतः सततच्या आक्रमणांमुळे आणि परकीय सत्तेमुळे, या परंपरांपैकी अनेक परंपरा विस्कळीत झाल्या किंवा नष्ट झाल्या. त्या संकटकाळात आपल्याला आपल्या वैज्ञानिक वारशातील मोठा भाग विसरण्यास भाग पाडले गेले. मात्र आता आपण अशा टप्प्यावर आहोत की त्या ज्ञानाला पुन्हा जागृत करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. नवीन सरकारने अशी शैक्षणिक धोरणे स्वीकारली आहेत ज्यामध्ये भारतीय ज्ञानपरंपरेला पुन्हा प्राधान्य दिले जात आहे.

सुमारे हजार वर्षांच्या संघर्षामुळे आणि परकीय प्रभावामुळे या ज्ञानाचा मोठा भाग दुर्लक्षित झाला. आज आपल्या समोर महत्त्वाचे उद्दिष्ट आहे की आपल्या सभ्यतागत इतिहासातील त्या वैज्ञानिक परंपरेचा पुनर्शोध घेऊन ती पुन्हा स्थापित करणे. आपल्या परंपरेत ब्रह्मांडीय संशोधनाला मोठे स्थान होते. ब्रह्मांड आणि अंतराळ हे नेहमीच आकर्षणाचे विषय राहिले आहेत. आपल्या सर्व ग्रंथांमध्ये संवाद आणि तर्कशक्ती दिसून येते. आपल्या प्राचीन वैज्ञानिक आणि तांत्रिक ग्रंथांमध्ये ‘सूक्ष्म जग’ (मायक्रोकॉस्म) आणि ‘संपूर्ण ब्रह्मांड’ (मॅक्रोकॉस्म) यांच्यातील संबंधांवर सतत चर्चा केली गेली आहे.

भारतामध्ये हजारो वर्षांपूर्वी शेतीची अत्यंत विकसित पद्धती अस्तित्वात होती. नगररचना उच्च दर्जाची होती. त्याअंतर्गत विद्यापीठांची निर्मिती करण्यात आली होती. सिव्हिल इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात भारत आघाडीवर होता. हे सर्व भौतिक विज्ञानाच्या सखोल आकलनाचे द्योतक आहे आणि ते कधीही शोषणवादी नव्हते.

भारतीय ज्ञानपरंपरेत निसर्ग समजून घेणे, त्याचे योग्य विश्लेषण करणे, त्याचा समतोल उपयोग करणे आणि त्याचे संवर्धन करणे यावर भर दिला गेला आहे. आपल्या परंपरांचा मुख्य उद्देश वैज्ञानिक प्रणाली आणि नवोन्मेष यांच्यात संतुलन राखणे हा आहे.

Read more at: https://panchjanya.com/2026/04/27/467527/interviews/the-core-aim-of-our-traditions-lies-in-balancing-scientific-systems-with-innovation-dattatreya-hosbale/

तज्ञांच्या मते महत्वाची झाडे.

पर्यावरणाच्या दृष्टीने झाडांचे महत्व अनन्यसाधारण  आहे. झाडे ही संपूर्ण जीव सृष्टिcha महत्वाचा भाग आहे. 

तज्ञांच्या मते त्या झाडापैकी विशेष महत्वाची असणारी झाडे पुढील प्रमाणे.  

कडुलिंब – कडुलिंबांचं झाडं अनेक औषधी गुणांनीयुक्त आहे. हे झाडं पर्यावरण स्वच्छ ठेवण्यास मदत करतं. हे एकप्रकारे नॅचरल प्यूरिफायरच आहे. वातावरणातील अशुद्धी साफ करुन हवेत ऑक्सिजनचं प्रमाण वाढवण्याचं काम हे झाड करतं. कडुलिंबांचं झाड लावल्याने आसपासच्या हवेतील बॅक्टेरिया नष्ट होतात, असं जाणकारांचं म्हणणं आहे.

जांभूळ – जांभळाचं झाड सल्फर आणि नायट्रोजनसारख्या गॅसेसला शुद्ध करतं. जांभळाच्या बियाही अतिशय फायदेशीर आहेत. हे झाडं मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनही रिलीज करतं.

वड – वडाच्या झाडाला नॅशनल ट्री म्हटलं जातं. वडाच्या झाडाची महत्त्वाची बाब म्हणजे, हे झाडं किती प्रमाणात ऑक्सिजन तयार करतं, हे त्याच्या सावलीवर अवलंबून असतं. म्हणजेच वडाचं झाडं जितकं मोठं असेल, तितका जास्त ऑक्सिजन मिळतो

अशोक – अशोकाचं झाडंही मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची निर्मिती करुन पर्यावरणात सोडतं. हे झाडं केवळ ऑक्सिजनचं प्रमाण वाढवत नाही, तर अशोकाचं झाड दुषित गॅसही शुद्ध करण्याचं काम करतं.

अर्जुन – अर्जुन वृक्षाचे अनेक आयुर्वेदिक फायदे आहेत. यामुळे ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात मिळतो, तसंच पर्यावरणातील अशुद्ध वायूही शुद्ध करण्याचं काम हे झाड करतं.

पिंपळ – जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळाचं झाड इतर कोणत्याही झाडाच्या तुलनेत अधिक ऑक्सिजन निर्माण करतं. हे झाड 60 ते 80 फुटांपर्यंत लांब असू शकतं. हे झाडं त्याच्या आयुष्यात इतका ऑक्सिजन तयार करतं, की एखादी फॅक्टरीही करू शकत नाही.

बागेश्वर बाबांचं वादग्रस्त विधान.

0

नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत येणारे बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी आता थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे विरोधकांसह राज्यभरातून प्रचंड टीकेची झोड उठली असून ते आता चांगलेच वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

नागपूरमधील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट परिसरामध्ये डॉक्टर आबाजी थत्ते सेवा आणि अनुसंधान संस्थेच्या वतीने भारत दुर्गा मंदिर उभारण्यात येणार आहे. या मंदिराचा शिलान्यास सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात आला. या सोहळ्यानंतर धर्मसभेचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी आयोजित कार्यक्रमामध्ये बागेश्वर बाबा बोलत असताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं.

ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा युद्ध करता-करता थकले तेव्हा ते समर्थ रामदास स्वामी यांच्याकडे गेले. त्यांनी आपला मुकुट काढला आणि म्हणाले की, मी लढाई करून-करून थकलो आहे. मला आता लढायचं नाही, त्यामुळे हे मुकुट आणि राज्य तुम्ही सांभाळा. आम्ही तुमच्या आदेशाने चालतो आम्हाला विश्राम हवा आहे.

यावर हसत रामदास स्वामी म्हणाले की, हे मी स्वीकारतो पण मला एक गोष्ट सांगा तुम्ही माझे कोण आहात? त्यावर महाराज म्हणाले मी तुमच्या शिष्य आहे. तर रामदास स्वामी म्हणाले मी कोण आहे? त्यावर महाराज म्हणाले तुम्ही आमचे गुरु आहात. मग रामदास स्वामींनी विचारलं शिष्याचे कर्तव्य काय? शिवराय म्हणाले जो गुरु आदेश देतील तो. त्यानंतर रामदास स्वामींनी मुकुट छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यावर घातला आणि म्हणाले आजपासून हे राज्य माझं आहे, पण आज्ञा तुम्हाला आहे की याचं संचलन तुम्ही करायचा आहे. असं म्हणत बागेश्वर भावाने हा वादग्रस्त किस्सा सांगितला.
मात्र यावरून आता विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. यामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, संघ भाजपने पोसलेले, गायपट्ट्यातून महाराष्ट्रात येत आपला महाराष्ट्र धर्म नासवणाऱ्या या धीरेंद्र शास्त्री सारख्या ढोंगी बाबांना महाराष्ट्रातील जनतेनेच आता चपलांचा मार देत हाकलून लावायला हवे. आज तर या भोंदूने विधान केलेय की, “छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करून थकले होते आणि थकलेल्या शिवाजी महाराजांनी आपल्या मस्तकावरचा मुकुट काढून रामदास स्वामींच्या चरणी ठेवला. आपला राज्यकारभार त्यांनी पाहावा अशी विनंती थकलेल्या महाराजांनी केली…” या वक्तव्याचा निषेध करावा तेवढा कमी आहे.

एक कोटी सह्यांद्वारे जनमत तयार करू.

0

महिला आरक्षण विधेयक संसदेत नामंजूर झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेत महिलांनाआणण्याची मोठी घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत स्पष्टपणे सांगितले की, महिला आरक्षण विधेयक हे शुद्ध भावनेतून आणि महिलांना संसदेत अधिक प्रतिनिधित्व मिळावे या उद्देशाने तयार करण्यात आले होते. मात्र, हे विधेयक मंजूर न झाल्याने लोकशाहीतील महिलांच्या सहभागावर मोठा आघात झाला आहे. त्यांनी विरोधकांवर थेट आरोप करत म्हटलं की, ही केवळ राजकीय भूमिका नसून महिलांच्या अधिकारांची भ्रूणहत्या आहे.

यावेळी बोलताना फडणवीस यांनी सांगितले की, या विधेयकाच्या अंमलबजावणीसाठी परिसीमन आणि जनगणना महत्वाची होती. 1976 आणि 2002 प्रमाणेच नव्या लोकसंख्येच्या आधारावर जागांचे पुनर्वाटप होणे गरजेचे होते. दक्षिणेकडील राज्यांच्या आक्षेपांचा विचार करून, कोणत्याही राज्यावर अन्याय होणार नाही अशा पद्धतीने जागा वाढवण्याचा संतुलित फॉर्म्युला तयार करण्यात आला होता. त्यामुळे उत्तर-दक्षिण वाद टाळत सर्वांना समान संधी देण्याचा प्रयत्न करण्यात आला, असे त्यांनी स्पष्ट केले.

 

तरी देखील, संसदेत या विधेयकाला आवशयक असलेली दोन-तृतीयांश बहुमत (352 मते) मिळू शकली नाहीत. विधेयकाच्या बाजूने 298 मते पडली, तर विरोधात 231 मते पडली आणि त्यामुळे हे ऐतिहासिक विधेयक नामंजूर झाले. यावर तीव्र प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले की, आज संसदेत 73 महिला आहेत, हे विधेयक मंजूर झाले असते तर तब्बल 273 महिला संसदेत दिसल्या असत्या. त्यांनी पुढे सांगितले की, या विधेयकामुळे केवळ महिलांनाच नव्हे तर अनुसूचित जाती आणि जमातींच्या महिलांना देखील मोठा फायदा झाला असता. मात्र विरोधकांनी त्याला देखील अडथळा आणला.

देशाचा राजा कायम पण तणावात ?

बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथे दरवर्षीप्रमाणे यंदा देखील पारंपरिक घटमांडणीचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. सुमारे ३७० वर्षांची परंपरा लाभलेल्या या  विशेष महत्व आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर काल सूर्यास्ताच्या वेळी घट मांडण्यात आला, तर आज पहाटे सूर्योदयावेळी सूक्ष्म निरीक्षण करून वर्षभरातील पाऊस, पीकस्थिती, अर्थकारण, राजकारण आणि देशाच्या सुरक्षेविषयी अंदाज जाहीर करण्यात आले.

म्हणजेच पंतप्रधान पदावर बदल होणार नसला तरी सत्ताधाऱ्यांवर तणाव वाढलेला राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला. देशाच्या संरक्षण व्यवस्थेवर ताण वाढेल आणि सुरक्षा परिस्थिती काहीशी कमकुवत राहू शकते, असे देखील संकेत या भाकितांतून देण्यात आले आहेत. आर्थिक आघाडीवर देशाला आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो, असे चित्र देखील समोर आले आहे. शेतीच्या दृष्टीने पाहता, यंदा शेतकऱ्यांसाठी वर्ष आव्हानात्मक ठरण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विविध पिकांवर रोगराईचे प्रमाण वाढेल, असा अंदाज आहे.

मात्र काही पिकांसाठी परिस्थिती अनुकूल राहण्याची शक्यता आहे. कापूस, तांदूळ, तीळ आणि बाजरी या पिकांचे उत्पादन चांगले होईल आणि त्यांना बाजारात योग्य भाव देखील मिळेल, असे भाकीत करण्यात आले आहे. ज्वारी, तूर, मूग, उडीद, मटकी, जवस आणि वाटाणा ही पिके सर्वसाधारण पातळीवर राहतील, असे देखील सांगण्यात आले. पावसाच्या दृष्टीने जून महिन्यात चांगला पाऊस पडेल, जुलै महिन्यात तो सर्वसाधारण राहील, तर ऑगस्ट आणि सप्टेम्बबारमध्ये पावसाचे प्रमाण घटण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही भागांमध्ये अतिवृष्टीमुळे महापुराचा धोका निर्माण होऊन नुकसान होण्याची देखील शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

यंदाच्या गट मांडणीतून निघालेले प्रमुख निष्कर्ष-

  • पिकांवर रोगराईचं प्रमाण जास्त असेल.
  • कापूस, तांदूळ पिकाचे उत्पन्न भरपूर.
  • ज्वारी , तूर, मुंग, उडीद, मटकी, जवस, वाटाणा ही पिके सर्वसाधारण असतील.
  • तीळ, बाजरी हे पीक भरपूर येईल.
  • देशाची संरक्षण स्थिती तणावात असेल 
  • राजा कायम असेल…
  • देशाची आर्थिक स्थिती मजबूत राहणार नाही.
  • पाऊस जूनमध्ये भरपूर, जुलै सर्वसाधारण, ऑगस्ट, सप्टेंबर कमी असेल…
  • अनेक भागात महापुरामुळे नुकसान होणार.

काय आहे भेंडवळ भविष्यवाणी ? 

पर्जन्यमान, पिकांची स्थिती, शेतीमालाचे दर, देशातील राजकीय आणि आर्थिक स्थितीबाबत भेंडवळमध्ये दरवर्षी भविष्यवाणी करण्याची परंपरा आहे. गेल्या 350 वर्षांपासून या घट मांडणीच्या आधारावर वर्षभराचं राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि हवामानाचं भविष्य वर्तवलं जात आहे. शेती आणि पावसाविषयक निसर्गाचा सूक्ष्म अभ्यास गुढीपाडवा ते अक्षय्य तृतीया या काळात करुन वर्षभराची भाकिते या घट मांडणीत करण्यात येते. 350 वर्षांपूर्वी महान तपस्वी चंद्रभान महाराज वाघ यांनी ही घट मांडणी सुरु केली होती, आणि आता त्यांचे वंशजही परंपरा कायम ठेवून आहेत. 

घटमांडणी नेमकी कशी करतात ? 

भेंडवळच्या घटमांडणीची परंपरेनुसार एक विशिष्ट पद्धत आहे. शेतात मध्यभागी खोल खड्डा करुन त्या खड्ड्यात मातीचा घट मांडण्यात येतो. घटात चार मातीची ढेकळे, त्यावर पाण्याने भरलेली घागर आणि घागरीवर पापड, भजा, वडा, सांडोई, कुरडई ठेऊन घटाच्या बाजूला पान सुपारीसह विविध 18 प्रकारची धान्ये मांडली जातात. घटाच्या वर्तुळाकार अठरा धान्ये गहू, ज्वारी, तूर, उडीद, मूग, हरभरा, जवस, तीळ, भादली, करडी मसूर, बाजरी, तांदूळ, अंबाडी, सरकी, वाटाणा ही धान्ये मांडली जातात.

अंदाज आणि भाकिते  कशावरून व्यक्त केली जातात ?  

घटामध्ये रात्रभर होणाऱ्या नैसर्गिक बदलाचे पहाटे सूक्ष्म निरीक्षण केले जाते. हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत पाऊस, हवामान, पीक, अर्थव्यवस्था तसेच देशाचे राजकीय तथा नैसर्गिक संकटाबाबत चाहूल देणारे भाकीत वर्तवण्यात येते. या भविष्यवाणीवर शेतकऱ्यांचा अतुट विश्वास आहे. या भाकिताचा आधार घेऊन ते आपल्या पिकपाण्याचे नियोजन करत असतात. मातीच्या ढेकळावरून चार महिन्यांच्या पावसाचा अंदाज व्यक्त केला जातो. विविध धान्यांवरून आगामी हंगामातील पिके कसे राहतील, हे सांगण्यात येते. चारा-पाणीसाठी सांडाई, कुरडई, तर पुरी निसर्गाशी संबंधित राहते. करंजीवरून देशाची आर्थिक परिस्थिती सांगण्यात येते. भादली हे रोगराईचे, तर पान-विडा राजाच्या गादीचे प्रतीक म्हणून पाहिले जाते. राजा म्हणजे पंतप्रधान. पान, विड्यात होणाऱ्या बदलावरून भविष्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले जाते. मसूर हे पीक परकीय घुसखोरीचे द्योतक आहे.

शेतकरी यावर विश्वास का ठेवतात आणि शेतकऱ्यांसाठी भाकीत महत्त्वाचे का ?  

घटमांडणीचे भाकीत ऐकण्यासाठी विदर्भ, खानदेश, मराठवाड्यासह अनेक भागातून शेतकरी भेंडवळमध्ये मुक्कामाला येतात, या परिसरात हजारोंच्या संख्येने शेतकरी एकत्रित जमतात. शेतकरीच नव्हे तर बी-बियाणे कंपन्यांचे प्रतिनिधीही शेतकऱ्यांचा आगामी काळातील कल लक्षात घेण्यासाठी येथे गर्दी करतात. शेतकरी वर्ग घटमांडणीचे भाकीत घेऊन पुढील हंगामाची पेरणी काय करायची, हे ठरवत असतात. पावसाची महिनावार माहिती आणि पीक परिस्थितीचा अंदाजही वर्तवण्यात येत असल्याने निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांसाठी ही घटमांडणी आशेचा किरण बनली आहे.

घटमांडणीला शास्त्रीय आधार आहे का ?  

घटमांडणीला कुठलाही शास्त्रीय आधार नसला तरी आजही परंपरेनं बळीराजाच्या मनातील महत्त्व कमी झालेलं नाही. भेंडवळची प्राचीन घटमांडणी परंपरा विज्ञानाच्या आधुनिक युगातही जपली जात असून, याच भविष्यवाणीविषयी शेतकऱ्यांमध्ये कमालीची उत्सकता पाहायला मिळते. घटमांडणीनंतर वर्तवलेली पाऊस, पीक-पाणी, राजकीय, आर्थिक भाकितं बऱ्याचदा खरी ठरली आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीला निव्वळ ठोकताळे म्हणत असले, तरी शेतकऱ्यांचा भेंडवळ घटमांडणीवर दृढ विश्वास कायम आहे.   Photo Google – Sorce..

 

‘लोकसंवाद डॉट कॉम’ ला सात वर्षे पूर्ण झालीत.

‘लोकसंवाद डॉट कॉम’ ला सात वर्षे पूर्ण झालीत.

 

आज ‘अक्षय तृतीया’ आज आपल्या ‘लोकसंवाद डॉट कॉम’ सात वर्षे पूर्ण झालीत.
हा प्रवास आपले लेखक, वाचक, हितचिंतक यांचे मुळे होत आहे.
या सगळ्यांमुळे ‘लोकसंवाद’ ला भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
आपले प्रेम, शुभेच्छा आणि सहकार्य असेच अक्षय राहो, हीच अक्षय तृतीये निमित्त शुभेच्छा ..!

 

टीम लोकसंवाद.

मुलींना ठरवून फसवता येते का ?

मुलींना ठरवून फसवता येते का ?

 

दुर्दैवाने याचं उत्तर ‘हो’ असंच आहे.

लव जिहाद कसा केला जातो, आजवर किती मुली बळी पडल्या वैगेरे माहितीत रोज भर पडतेच आहे. हा लेख फक्त vulnerable category मध्ये येणाऱ्या मुलींचे आजूबाजूला दिसणारे प्रकार, ती मुलगी अशी का वागते आणि ती तशी वागू नये म्हणून काय करता येईल याबाबत आहे.

बुद्धिजीवी स्त्रियांचे अपवाद सोडले तर बहुतांश स्त्रिया भावनांना प्राधान्य देऊन निर्णय घेत असतात. जेव्हा एखादी हिंदू मुलगी एखाद्या अब्दुल सोबत जाते तेव्हा तिला आईवडिलांबद्दल काहीच कसं वाटलं नाही याबाबत आश्चर्य व्यक्त केलं जातं. पण लवजिहादला बळी पडून घरवापसी केलेल्या एका मुलीने मुलाखतीत सांगितलं होतं की एक दिवस आईवडिलांना सोडून नवऱ्याकडे जायचंच आहे ही मानसिकता मुलींमध्ये वयात आल्यावर तयार झालेली असते. इथे प्रश्न फक्त त्यांनी अब्दुललाच का निवडलं हा असतो.

एका घरातील सर्व मुलांची जडणघडण आणि समान वातावरणाचा त्यांच्यावर होणारा परिणाम हा समान नसतो, वेगवेगळा असतो. मुलगी प्रॅक्टिकल विचार करणारी असेल किंवा पालक योग्य ते संस्कार देऊ शकत असतील तर काळजी करायची गरजच नसते. पण मुलगी अति स्वप्नाळू, over submissive, ‘self love ’ कोषात पूर्णतः अडकलेली, अति भावनाप्रधान किंवा over ambitious असेल किंवा पालक तिच्यासमोर चुकीच्या गोष्टी glorify करत असतील तर alarming situation लवकरच येऊ शकते.

स्वप्नाळू मुलगी प्रेमाच्या जाळ्यात सहज ओढली जाते कारण या मुलींना प्रेमाचं प्रचंड आकर्षण असतं. त्यांना जे आपण सिनेमात बघतोय किंवा पुस्तकांमध्ये वाचलंय ते सगळं थ्रील, सगळा romance अनुभवायचा असतो. या स्त्रियांना initiative घेणारा, तू हवी आहेस सांगणारा पुरुष खूप आवडतो. त्यांना लाजायचं असतं, मुरडायचं असतं, नको नको म्हणत एक एक पायरी पुढे जायचं असतं. यांच्या स्वप्नातील जगात Optimism bias मुळे ‘माझ्यासोबत काही वाईट होणार नाही’ हा विचार सातत्याने त्यांच्यासोबत असतो जो warning signs दुर्लक्ष करायला भाग पाडतो.

Over Submissive मुलींना बंधनात राहायला आवडतं. स्वतःचा ताबा घेणारा पुरुष त्यांना लगेच हवाहवासा वाटायला लागतो. ‘असे कपडे घाल. हे कर, ते करू नको ’ असं कोणीतरी सांगितलेलं त्यांना जाम आवडतं. Lead घेण्याच्या त्या पुरुषाच्या एका गुणावरून तो successful, attractive, trustworthy आहे असे यांना वाटू लागते. हा Halo effect चा cognitive bias आहे. यात मुली त्या पुरुषाची पहिली छाप कायम लक्षात ठेवतात आणि तीच खरी आहे असे धरून चालतात. या मुली त्या पुरुषाच्या सांगण्यावरून स्वतःचे अर्धनग्न फोटो, video पाठवायला सुद्धा सहज तयार होतात. याचा उपयोग पुढे त्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी होऊ शकतो हा स्वप्नातून जागे करणारा वास्तववादी विचारही त्यांना त्यावेळी नको असतो. त्यांच्या आईवडिलांनी जर त्यांना पूर्ण स्वातंत्र्य दिलं असेल तर त्या मुली आईवडिलांपासून, कुटुंबापासून आधीच दूर गेलेल्या असतात. त्यामुळे आपल्या मुलांना पूर्ण स्वातंत्र्य देण्याआधी त्यांना त्याची गरज आहे का हे आधी तपासा. बंधनाचा त्रास होत असेल तरच त्यांना गरजेपूरती conditional सूट द्या. मुलांमुलींवर योग्य ते निर्बंध पूर्वी असायचे. आता ‘my life my rules’, ‘मी माझ्या मुलांना हवं ते करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य देणार’ सारख्या घातक विचारांनी ही शिस्त लावण्याची पद्धत मोडीत काढलीय.

Self love नावाच्या कोषात अडकलेल्या मुली वेगळ्याच जगात असतात. यांना कानउघडणी करणारे, हीत अहित सांगणारे मित्र मैत्रिणी, नातेवाईक, आई वडील अजिबात नको असतात. त्यांना स्वतःच्या फोटोचं, व्यक्तिमत्वाचं तोंडभरून कौतुक करणारे आजूबाजूला हवे असतात. खोटी स्तुती करण्याची कला अवगत असणारे पुरुष love bombing technique ने यांना सहज पटवू शकतात. आपला धर्म, खानदान, इज्जत याचा विचार दुष्कर्म करताना त्यांच्या मनात फिरकत सुद्धा नाही. स्वतःचे कौतुक करणाऱ्याला या मोठमोठ्या रकमा सुपूर्द करू शकतात, ‘तुला हिजाब शोभून दिसेल’ असं म्हटल्यावर धर्म बदलू शकतात. दुर्दैवाने याप्रकरणातला honeymoon period संपल्यावर यांच्यावरचा कौतुकाचा वर्षाव थांबतो. ‘Gas lighting’ phase सुरू होते. शिव्या आणि लाथा सुरू झालेल्या असतात पण आता जवळची सगळी चांगली लोकं दुरावलेली असतात. यानंतर या मुली शांतपणे victim किंवा पीडिता या भूमिकेत जातात.

अतिभावना प्रधान मुली emotional fool असतात. त्यांना ‘तू कशी आहेस’ हा प्रश्न विचारला तर ‘असं मला कोणीच आजवर विचारलं नव्हतं’ म्हणून भरून येतं. या मुलींना घरी भावनिक आधार मिळाला नाही तर बाहेर त्या कोणाच्याही खांद्यावर डोकं ठेऊन रडू शकतात. या सतत nostalgic mode मध्ये असतात. यांना स्वतःचं दुःख कुरवाळत बसायला खूप आवडतं. त्यांचं रडगाणं ऐकून घेणाऱ्यावर त्या जीव ओवाळून टाकतात. ‘तू खूप सहन केलंय. यापुढे तू स्वतःसाठी जगायचं’ हा dialgoue यांच्या आयुष्याचा turning point ठरू शकतो. ‘तू माझ्यासाठी या जगात आली आहेस ’ अशा वाक्यातून त्या कधीच बाहेर पडू शकत नाहीत. पण या मुलींना घरातून कौतुक मिळालं, validation मिळालं आणि आत्मविश्वास वाढला तर मात्र या मुलींची सहज फसवणूक टाळता येऊ शकते. त्यामुळे मुलांच्या छोट्यात छोट्या achievement चं तोंडभरून कौतुक करा. Abraham Maslow यांच्या ‘hierarchy of needs — love & belongingness’ मध्ये कौतुक आणि validation ही मुलांची सर्वात मोठी मानसिक गरज मानली गेली आहे.

या पुढचा प्रकार अवास्तव वाटेल पण काही मुलींना स्त्री-पुरुष संबंधांचं सुप्त आकर्षण अगदी लहानपणापासून असतं. हे पूर्णतः नैसर्गिक आहे. अशा केस मध्ये आई वडिलांनी ‘आम्ही आमच्या मुलींना खूप शिकवणार, तिला लग्न वैगेरे या भानगडीत पडू देणार नाही’ असा पावित्रा घेतला आणि मुलीने कंटाळून आपली बाहेर सोय केली तर चूक कोणाची?

Over ambitious (अतिमहत्वाकांक्षी) मुलींवर चांगले संस्कार करणं, चांगलं वाईट समजावून सांगणं आणि एक ढोबळ roadmap तयार करून देणं खूप महत्वाचं आहे. तिच्यासमोर मैथिली ठाकूर, सुधा मूर्ती, चांद्रयान सोडणाऱ्या साधी राहणी असलेल्या ISRO मधील वैज्ञानिक, ज्यांनी आपापल्या आवडीच्या क्षेत्रात प्रगती केली त्यांना glorify करायला हवं. त्यांना केवळ पैसा, प्रसिद्धी आणि भौतिक सुख मोठं वाटू लागलं तर त्या वाममार्गाला लागायला फारसा वेळ लागणार नाही.

या सर्व मुलींना control, guilt, secrecy, खोटीस्तुती हे red flags ओळखायला आणि boundaries ठेवायला शिकवणं शक्य आहे. adolescence, Teenage पासून प्रत्येक मुलामुलीला जग स्वतः explore करायला आवडतं. इथून पुढे मुलांना आणि मुलींना घरात जास्तीत जास्त वेळ आणि प्रेम द्यायला हवा. त्यांना उपदेश आणि प्रवचन देऊ नका. काही गोष्टी पालकांच्या आचरणातून ते आपोआप शिकतील. इतर गोष्टींसाठी त्यांना योग्य त्या मूल्यशिक्षण देणाऱ्या संस्थेत/गुरुकुलात पाठवा. ते शक्य नसेल तर मुलांना संघाच्या शाखेत, मुलींना राष्ट्रसेविका समिती मध्ये पाठवा. मुलांना जेव्हा आपण स्वतः घराच्या बाहेरून ज्ञान अर्जित केलं अशी जाणीव होते तेव्हा ते त्याचं अनुसरणही करतात.

आपला धर्म सुंदर आहे, त्याची सौंदर्यस्थाने आपल्या मुलांना आवर्जून दाखवा. जर कार्ल मार्क्सने भारतीय तत्वज्ञानाचा अभ्यास केला असता तर ‘Religion is the opium of the people’ (धर्म ही अफूची गोळी आहे) हे विधान त्याने कधीच केलं नसतं. जेव्हा मुली एखादे धार्मिक कार्य करतील तेव्हा त्याचं कौतुक करा. Positive reinforcement चा वापर करा. उपवास, व्रत वैकल्य करत असतील तर त्यांना प्रोत्साहन द्या. ग्रंथ वाचत असतील तर काय वाचलं ते ऐकून त्यांचं कौतुक करा. ‘अध्यात्म, देवदेव या म्हातारपणी करायच्या गोष्टी आहेत, यात वेळ घालवू नको अभ्यास कर ‘असे निर्बुद्धपणाचे सल्ले देऊ नका.

अधर्माभिभवात्कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः।

अधर्माचे प्राबल्य वाढले तर कुलस्त्रिया भ्रष्ट होतात हे अर्जुनाचे शब्द आज रोज नव्याने जाणवत आहेत. या मुलींच्या आयुष्यात धर्माचे प्राबल्य वाढवणे हाच यावरचा एकमेव उपाय आहे. (Image – Shuttersstock.com)

– अश्विनी कुलकर्णी

अमित शहांनी गणितच मांडलं.

0

मतदारसंघ पुनर्रचनेबद्दल –महिला आरक्षण विरोधकांचा खोटा प्रचार

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी, loksabha  महिला आरक्षण विधेयक आणि मतदारसंघ पुनर्रचनेशी संबंधित तीन विधेयकांवरील लोकसभेतील चर्चेदरम्यान स्पष्ट केले की, या बदलांमुळे दक्षिण भारतीय राज्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही. विरोधकांकडून पसरवला जाणारा गैरसमज हा पूर्णपणे खोटा प्रचार असल्याचं सांगत त्यांनी तो फेटाळून लावला.

सभागृहाच संबोधित करताना शाह म्हणाले की, एक मोठा गैरसमज असा निर्माण केला जात आहे की, ही तीन विधेयके घटनादुरुस्ती विधेयक, मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आणि केंद्रशासित प्रदेश निवडणूक कायदा सुधारणा विधेयक लोकसभेतील दक्षिण भारतीय राज्यांचे प्रतिनिधित्व कमी करतील आणि त्यांना मोठे नुकसान पोहोचवतील. कर्नाटकचे उदाहरण देत गृहमंत्री म्हणाले की, राज्यात सध्या २८ जागा आहेत. या घटनादुरुस्तीनंतर कर्नाटकच्या जागांची संख्या २८ वरून ४२ होईल.

कर्नाटकला कोणतेही नुकसान होणार नाही. शाह यांनी हेही स्पष्ट केले की, मतदारसंघ पुनर्रचनेच्या प्रक्रियेनंतर लोकसभेतील सर्व राज्यांचे प्रतिनिधित्व वाढेल, तर दक्षिण भारतीय राज्यांचे प्रतिनिधित्व कायम राहील. सरकारचा दावा आहे की, या विधेयकांमुळे कोणत्याही राज्याची विद्यमान संख्याबळ कमी होणार नाही, उलट एकूण लोकसभा जागांमध्ये वाढ होऊन संतुलन राखले जाईल.

अमित शाह म्हणाले, एकंदरीत, संसदेतील एकूण ५४३ जागांपैकी १२९ खासदार दक्षिणेचे आहेत. ही संख्या वाढून १९५ जागा होईल. याचा अर्थ त्यांची शक्ती कमी होत नाहीये, उलट वाढत आहे. मी हे जबाबदारीने सांगत आहे. अमित शाह यांनी के. सी. वेणुगोपाल यांच्यावर निशाणा साधला. मी भारताचा गृहमंत्री आहे. मी त्यांना उद्या सविस्तर उत्तर देईन. उद्या फक्त बसून ऐका. मी इतक्या सोप्या भाषेत समजावून सांगेन की केजीच्या विद्यार्थ्यालाही ते समजेल असा टोलाही त्यांनी लगावला.

सरकारला जात जनगणना करायची नाही, हे म्हणणेही खोटे आहे. जनगणना दोन भागांत केली जाते. त्यामध्ये प्रथम घरे ओळखली जातात आणि नंतर रहिवाशांची चौकशी केली जाते. मी ८५० या आकड्याचा उगम स्पष्ट करेन. समजा, १०० जागा आहेत ज्यासाठी ३३% आरक्षण द्यायचे आहे आणि त्यात आपण ५० जागा जोडल्यास एकूण संख्या १५० होते. ८५० हा एक अंदाजे आकडा आहे, हे मी उद्या सविस्तरपणे स्पष्ट करेन असंही ते म्हणाले.