अयोध्या प्रकरणाचा घटनाक्रम

कालच राम मंदिर आणि बाबरी मशीद वादावर देशाच्या सर्वोच्यन्यायालयाने दीर्घ सुनावणी नंतर आपला निकाल जाहीर करत  विवादीत ठिकाणी  विविध पुरवयाच्या आधारे राम मंदिर उभारण्याचे आदेश सरकारला दिले.

आपण पाहूया या प्रकरणाचा घटनाक्रम –

इसपूर्व ५७ मध्ये राजा विक्रमादित्य राजसिहासनावर बसल्यानंतर त्यांनी राम मंदिर बांधले असे मानले जाते.

१५२८  : मुघल बादशाह बाबरचा सेनापती मीर बांकी याने अयोध्येत बाबरी मशिदीची  उभारणी केली.

१८१३   : हिंदू संघटनांचा दावा – अयोध्येतील रामजन्मभूमीवर राम मंदिर होते आणि मंदिर पाडून बाबराच्या सेनापतीने त्याजागी मशीद उभारल्याचा दावा हिंदू संघटनांनी केला.

१८५३ : मंदिर-मशीद या वादातून अयोध्येत वादग्रस्त जागेच्या परिसरात पहिली जातीय दंगल उसळली.

१८५९ : ब्रिटिश शासकांनी वादग्रस्त जागेला कुंपण घालून मुस्लिमांना मशिदीच्या आतील तर हिंदूंना मशिदीच्या बाहेरची जागा देऊन तेथील चौथऱ्यावर पूजा  करण्याची परवानगी दिली.

१८८५ : फेब्रुवारी, मध्ये महंत रघुवर दास यांनी फैजाबाद उपजिल्हान्यायदंडाधिकाऱ्यांसमोर याचिका दाखल करून वादग्रस्त जागेवर मंदिर उभारण्याची परवानगी मागितली. मात्र, अशी अनुमती कोर्टाने दिली नाही.

१९४९ : २३ डिसेंबर १९४९ रोजी वादग्रस्त जागेवर प्रभू श्रीराम आणि लक्ष्मणाच्या मूर्ती आढळून आल्याने या वादाने नवे वळण घेतले. अयोध्येत राम प्रकट झाले, असा दावा हिंदूंनी केला तर मुस्लिमांनी त्यास आक्षेप घेत रात्रीच्या अंधारात  कुणीतरी या मूर्ती आणून तिथे ठेवल्याचा दावा केला. त्यामुळे वाद अधिक वाढू नये म्हणून तत्कालीन सरकारने ‘वादग्रस्त वास्तू’ घोषित करत मशिदीला टाळे लावले.

१९५०  : १६ जानेवारी १९५० रोजी गोपालसिंह विशारद यांनी फैजाबाद दिवाणी न्यायाधीशांच्या कोर्टात याचिका दाखल करून पूजेची परवानगी मागितली. त्यांना परवानगी देण्यात आली. मुस्लिम पक्षकारांनी या निर्णयाला आव्हान दिले.

१९८४ : अयोध्येत राम मंदिराच्या निर्माणासाठी विश्व हिंदू परिषदेने एक समिती स्थापन करून त्यामार्फत लढा उभारण्याचे ठरवले.

१९८६ : १ फेब्रुवारी १९८६ रोजी फैजाबाद न्यायालयाने वादग्रस्त ठिकाणी लावण्यात आलेले टाळे उघडून हिंदूंना पूजा करण्याचा अधिकार दिला. यानिर्णयाला विरोध करत बाबरी मशीद संघर्ष समिती स्थापन करण्यात आली.

१९८९ : राजीव गांधी सरकारच्या परवानगीनंतर विश्व हिंदू परिषदेने बाबरी मशिदीजवळच राम मंदिराचा शिलान्यास केला.

१९९०  : भव्य मंदिर उभारणी साठी भाजप नेते लालकृष्ण आडवाणी यांनी सोमनाथ ते अयोध्या रथयात्रा सुरू केली. या यात्रेने देशातील वातावरण ढवळून निघाले. आडवाणीची ही यात्रा बिहारमध्येच रोखून आडवाणी यांना अटक करण्यात आली.

१९९१ : रथयात्रेचा भाजपला मोठा फायदा झाला. उत्तर प्रदेशात भाजपचं सरकार आलं. याचवर्षी भव्य राम मंदिर निर्माणसाठी देशभरातून अयोध्येत विटा पाठवण्याची मोहीम सुरू झाली.

१९९२ : उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री कल्याण सिंह यांनी वादग्रस्त जागेच्या संरक्षणाबाबत प्रतिज्ञापत्र दिलं असताना ६ डिसेंबर रोजी देशभरातून अयोध्येत दाखल झालेल्या हजारो कारसेवकांनी बाबरी मशीद पाडली. तिथे घाईघाईत छोटंसं मंदिरही उभारण्यात आलं. या घटनेने मुंबईसह देशाच्या विविध भागांत जातीय दंगलींचा वणवा भडकला. एका आकडेवारीनुसार किमान २००० लोकांचा या दंगलीत बळी गेला. दरम्यान, तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनी मशिदीचे पुननिर्माण करण्याचे आश्वासन देत मुस्लिमांना शांतता        राखण्याचे आवाहन केले. १६ डिसेंबर रोजी बाबरी पतनाची चौकशी करण्यासाठी एम.एस.लिब्रहान आयोग नेमण्यात आला.

१९९४  : बाबरी मशीद पतनाबाबतच्या खटल्याची सुनावणी अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनऊ पीठापुढे सुरू झाली.

२००१  : ४ मे २००१ रोजी विशेष सीबीआय न्यायालयाने भाजप नेते लालकृष्ण आडवाणी, शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्यासह १३ जणांवरील कट रचल्याचा आरोप हटवला.

२००२  : १ जानेवारी २००२ रोजी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी अयोध्या विभाग स्थापन करून हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही पक्षकारांशी संवाद साधण्याची व वाद मिटवण्याचा प्रयत्न करण्याची जबाबदारी या विभागावर सोपवण्यात आली. १ एप्रिल २००२ रोजी अयोध्येतील वादग्रस्त जागेच्या मालकीसाठी दाखल दाव्यांवर अलाहाबाद हायकोर्टाच्या तीन सदस्यीय पीठाने सुनावणी सुरू केली.

२००२  : अयोध्येतून परतत असताना हिंदू कार्यकर्त्यांना घेऊन येणाऱ्या साबरमती एक्स्प्रेसला २७ फेब्रुवारी रोजी गुजरातमधील गोध्रा येथे आग लावण्यात आली.  त्यात ५८ जण मारले गेले. याघटनेनंतर उसळलेल्या गुजरात दंगलीत २००० हून अधिक लोकांचा बळी             गेला. तेव्हा गुजरात चे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे होते. तेव्हा मोदींवर खूप आरोप झालेत आणि आपण राजधर्माचे पालन करावे असे तत्कालीन प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांनी मोदींना सुनावले.

२००३  : २२ ऑगस्ट ला भारतीय पुरातत्व विभागाने अयोध्येतील उत्खनानाबाबतचा आपला अहवाल अलाहाबाद हायकोर्टात सादर केला. मशिदीच्या बांधकामाखाली दहाव्या शतकातील मंदिराचे अवशेष आढळले, असे  या अहवालात नमूद करण्यात आले होते. मुस्लिम पक्षकांरांकडून यावर  वेगवेगळी मते नोंदवण्यात आली. या अहवालाला ऑल इंडिया मुस्लिम पर्सन लॉ बोर्डाने आव्हान दिले.

२००३  : सप्टेंबरमध्ये झालेल्या एका सुनावणीत मशिदीच्या पतनास जबाबदार असलेल्य सात हिंदू नेत्यांना सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश कोर्टाने दिले.

२००९  : लिब्रहान आयोगाने तब्बल १७ वर्षांनंतर तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याकडे आपला अहवाल सादर केला.

२०१०  : २६ जुलै रोजी अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनऊ पीठाने निकाल राखून ठेवला. सर्व पक्षकारांना आपसात चर्चा करून तोडगा काढण्याचा सल्ला दिला. मात्र, त्यास कुणीच प्रतिसाद दिला नाही. अलाहाबाद हायकोर्टाला निकाल देण्यापासून रोखावे, अशी विनंती करणारी  याचिका सुप्रीम कोर्टाने २८ सप्टेंबर रोजी फेटाळली.

२०१०  : ३० सप्टेंबर रोजी अलाहाबाद हायकोर्टाने अयोध्या वादावर निकाल देत वादग्रस जमिनीचे तीन हिस्से करून यातील एक हिस्सा राम मंदिराला, दुसरा  हिस्सा सुन्नी वक्फ बोर्डाला आणि तिसरा हिस्सा निर्मोही आखाड्याला देण्याचे आदेश दिले.

२०११   : ९ मे रोजी सुप्रीम कोर्टाने अलाहाबद हायकोर्टाच्या आदेशाला स्थगिती दिली.

२०१७  : २१ मार्च रोजी झालेल्या सुनावणीत आपसात चर्चा करून हा वाद मिटवण्यात यावा, असे मत सुप्रीम कोर्टाने दिले.

२०१७  : १९ एप्रिल रोजी सुप्रीम कोर्टाने लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्यासह भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक नेत्यांवर  फौजदारी खटला चालवण्याचे आदेश दिले.

२०१७  :  ९ नोव्हेंबर रोजी शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी उत्तर प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिर व्हावं व तिथून दूर अन्य ठिकाणी मशीद उभारली  जावी असे विधान केले.

२०१७  : १६ नोव्हेंबर रोजी ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे श्री श्री रविशंकर यांनी वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी केली. विविध पक्षकारांची भेट घेऊन त्यांनी संवाद साधला.

२०१७  : ५ डिसेंबर रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी. कोर्टाने ८ फेब्रुवारीपर्यंत सर्व दस्तावेजांची पूर्तता करण्याचे निर्देश दिले.

२०१८  : ८ फेब्रुवारी रोजी सुन्नी वक्फ बोर्डाच्यावतीने ज्येष्ठ वकील राजीव धवन यांची सुप्रीम कोर्टात या प्रकरणी नियमित सुनावणी व्हावी अशी विनंती. विनंती कोर्टाने फेटाळली. १९९४ मध्ये इस्माइल फारूखी विरुद्ध  भारतीय संघ यांच्यातील खटल्यात दिलेल्या निकालाचा फेरविचार व्हावा. हे  प्रकरण घटनापीठाकडे पाठवण्यात यावे, अशी मागणी १४ मार्च रोजी धवन  यांनी केली. २० जुलै रोजी धवन यांच्या अपीलावरील निर्णय सुप्रीम कोर्टाने राखून ठेवला. २७ सप्टेंबर रोजी यावर निर्णय देत सुन्नी बोर्डाची विनंती सुप्रीम कोर्टाने अमान्य केली. ‘मशीद इस्लामचे अविभाज्य अंग नाही’ असे मत इस्माइल फारूखी विरुद्ध भारतीय संघ यांच्यातील खटल्याच्या निकालात                कोर्टाने नोंदवले होते. राम जन्मभूमी-बाबरी मशीद या दिवाणी वादावर उपलब्ध  साक्षीपुराव्यांच्या आधारेच निर्णय होईल, असेही कोर्टाने स्पष्ट केले होते. नंतर  याप्रकरणी लवकरात लवकर सुनावणी पूर्ण करण्याबाबत अखिल भारतीय हिंदू महासभेने दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टाने १२ नोव्हेंबर रोजी फेटाळली.

२०१९  : ८ जानेवारी रोजी सुप्रीम कोर्टाने अयोध्या प्रकरणी सुनावणीसाठी पाच सदस्यीय  घटनापीठ गठित केले. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील  घटनापीठात न्या. एस. ए. बोबडे, न्या. एन. व्ही. रमण्णा, न्या. यू. यू. ललित, न्या. डी. वाय. चंद्रचूड यांचा. दोनच दिवसांनी १० जानेवारी रोजी न्या. ललित यांनी या पीठातून अंग काढून घेतले. त्याचवेळी अयोध्या प्रकरणी सुनावणीसाठी             २९ जानेवारी ही तारीख निश्चित करण्यात आली.

२०१९  : २५ जानेवारी रोजी घटनापीठाचे पुनर्गठन करण्यात आले. सरन्यायाधीश गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील न्या. बोबडे, न्या. चंद्रचूड यांच्यासह अशोक भूषण व  एस. ए. जमीर या न्यायाधीशांचा समावेश करण्यात आला.

२०१९ : ८ मार्च रोजी सुप्रीम कोर्टाने मध्यस्थतेसाठी हा वाद समितीकडे पाठवला. हायकोर्टाचे माजी न्यायाधीश एफ. एम. आय. कलीफुल्ला यांना या समितीचे अध्यक्ष म्हणून नेमण्यात आले. या समितीने सीलबंद लिफाफ्यात १ ऑगस्ट  रोजी आपला अहवाल कोर्टात सादर केला. मात्र या समितीला मध्यस्थी करण्यात अपयश आले. ६ ऑगस्टपासून सुप्रीम कोर्टाने याप्रकरणी दररोज  सुनावणी घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर ४ ऑक्टोबर रोजी महत्त्वाची बाब सुप्रीम कोर्टाने अधोरेखित केली. अयोध्या प्रकरणी १७ ऑक्टोबरपर्यंत सुनावणी  पूर्ण होईल व १७ नोव्हेंबरपर्यंत निकाल दिला जाईल, असे कोर्टाने स्पष्ट केले.  उत्तर प्रदेश वक्फ बोर्डाच्या अध्यक्षांना राज्य सरकारने संरक्षण द्यावे, असे स्पष्ट निर्देशही कोर्टाने दिले. दरम्यान, १६ ऑक्टोबर रोजी अयोध्या वादावर  सुनावणी पूर्ण करत सुप्रीम कोर्टाने याप्रकरणी निर्णय राखून ठेवला.

२०१९  : ०९ नोव्हेंबर ला सर्वोच्या न्यायालयाने  या प्रकरणाचा निकाल जाहीर केला.

  • संकलित.

राम मंदिर अयोध्येतील नियोजित ठिकाणीच

गेल्या अनेक दशकांपासून सुरू असलेला रामजन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणाचा वाद आता संपुष्टात आला असून वादग्रस्त जागी राम मंदिर निर्माण करण्याचा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टा ने दिला आहे. या निकालामुळे आता वादग्रस्त जमिनीवर राम मंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे समजले जात आहे. दरम्यान, मु्स्लिमांना मशिदी साठी  अयोध्येत ५ एकर पर्यायी जागा देण्याचे आदेशही सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. याकार्यासाठी अनेक दशकांपासून जांनी लढा उभारला आणि लावून धरला त्या  सर्वांना आज समाधान वाटत असेल.

लोकसंवाद.कॉम च्या वतीने सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा सर्वांनी आदर ठेवण्याचे आणि शांतता राखून सौहार्द्य राखण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सर्वांच्या भावना सांभाळणारा आणि इतिहास आणि पुराव्याला धरून दिलेला हा निर्णय आहे. 

ट्रस्ट स्थापन करून मंदिर उभारणीची योजना आखा- सुप्रीम कोर्ट

सुप्रीम कोर्टाने वादग्रस्त जागी राम मंदिर उभारणीसाठी एका ट्रस्टची स्थापना करण्यात यावी असे आदेश निकाल वाचनादरम्यान दिली. या जागेत येत्या तीन महिन्यात मंदिर उभारण्याचे काम सुरू करावे असे निर्देशही सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.

सुन्नी वक्फ बोर्डाकडून निर्णयाचे स्वागत

सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचा सुन्नी वक्फ बोर्डाने स्वागत केले आहे.

सर्वोच्य न्यायालयाच्या पाच सदस्यीय न्यायमूरतींच्या खंडपीठात सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्यायमूर्ती शरद बोबडे, न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती अशोक भूषण, न्यायमूर्ती अब्दुल नजिर या सन्माननीय न्यायाधीशांचा समावेश आहे. हा निकाल ५ – 0 असा सर्व समतीने देण्यात आला. 

निकालातील ठळक मुद्दे – 

  • अयोध्येतील वादग्रस्त जागा हिंदूंची; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल
  • १८५६ पूर्वी वादग्रस्त जागेवर हिंदूंकडून चौथऱ्यावर पुजा – सर्वोच्च न्यायालय 
  • १८५६-५७ पूर्वी नमाजपठणाचे पुरावे नाहीत – न्यायालयाचं निरीक्षण
  • मशिदीचं निर्माण मंदिर उद्धवस्त करून करण्यात आलं हे पुरातत्व विभागाला स्थापित करता आलं नाही – सर्वोच्च न्यायालय
  • हिंदुंची श्रद्धा आणि विश्वास की भगवान रामाचा जन्म अयोध्येत झाला, हे निर्विवाद आहे: सर्वोच्च न्यायालय
  • मशीद रिकाम्या जागी बांधली होती. पण मशिदीखालचा संरचना इस्लामिक नव्हती: कोर्ट
  • रामलल्लाला कोर्टानं पक्षकार मानलं
  • पुरातत्व विभागाचे दावे कोर्टाने धरले ग्राह्य 
  • निर्मोही आखाड्याचा दावा कोर्टाने फेटाळला
  • एकाची श्रद्धा दुसऱ्याचा हक्क हिरावू शकत नाही : कोर्ट 
  • शिया वक्फ बोर्डाचा दावा एकमताने फेटाळला. गोगोई म्हणाले, ‘आम्ही १९४६ च्या फैजाबाद कोर्टाच्या निकालाला आव्हान देणारी शिया वक्फ बोर्डाची सिंगल लीव पिटीशन फेटाळत आहोत’

 

  • नितिन राजवैद्य, मुख्य संपादक

मुख्यमंत्री कुणाचा ?

हे स्पष्ट आहे की शिवसेना “मुख्यमंत्री आमचाच” या भूमिकेवरून हलायला अजिबात तयार दिसत नाही. भाजपाही फडणवीस यांच्याच नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्याबाबत ठाम दिसते आहे. या परिस्थितीत युतीचे सरकार स्थापन होण्याची शक्यता मावळत चालली आहे. ९ नोव्हेंबरपर्यंत नवी विधानसभा अस्तित्वात न आल्यास राष्ट्रपती राजवट हा एकच घटनात्मक पर्याय उरतो.

जर राज्यपालांनी ‘सर्वात मोठा पक्ष’ म्हणून भाजपाला निमंत्रण दिले तर शिवसेना साथ नसेल तर भाजपाने या परिस्थितीत “आम्ही स्थिर सरकार देऊ शकत नाही” हे राज्यपालांना कळवून टाकावं असंच बहुतेक भाजपा समर्थकांचं मत असू शकतं. निमंत्रण दिलं म्हणून स्वीकारलं आणि दिलेल्या मुदतीत बहुमत सिध्द न करता आल्यामुळे राजीनामा द्यावा लागणं ही नामुष्की भाजपाने विनाकारण ओढवून घेऊ नये. राष्ट्रपती राजवटीपासून राज्य वाचविण्याची जबाबदारी एकट्या भाजपाची नाही. निवडणूकपूर्व युती/आघाडी करणाऱ्या इतर पक्षांची सुध्दा आहे.

राज्यात भाजपाला १०५ व आघाडीला (५४+४४) ९८ अशी पक्षीय स्थिती असल्यामुळे फरक केवळ ७ चाच आहे. यात अपक्ष व इतर छोटे पक्ष धरलेले नाहीत. आता चेंडू पूर्णपणे शिवसेनेच्या कोर्टात आहे. त्यांनी खुशाल या आघाडीचे समर्थन त्यांना मान्य असलेल्या फाॅर्म्युलावर करून सत्ता स्थापन करावी आणि भाजपाने विरोधी पक्षाची जबाबदारी समर्थपणे पार पाडावी.

या परिस्थितीत काॅंग्रेसप्रणित आघाडीने शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देऊ केलं तर उध्दव ठाकरेच ते पद स्वीकारतील हे उघड आहे. हा काटेरी मुकुट त्यांनाच लखलाभ असो. ओला दुष्काळ, सरसकट शेतकरी कर्जमाफी याबाबत शिवसेनेनेच केलेल्या अवास्तव मागण्या, उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली भ्रष्टाचाराच्या सुरू असलेल्या विविध चौकशा इत्यादी प्रश्न सांभाळत व आघाडीच्या संभावित मागण्या व दबाव कसा असेल याचा विचार त्यांना करावाच लागेल. हेही लक्षात ठेवावं लागेल की ही उफराटी तडजोड जास्त काळ चालवू न शकल्यास येणाऱ्या मुदतपूर्व निवडणुकीत ज्यांच्या पाठींब्यावर मुख्यमंत्रीपद मिळवलं त्यांच्याच विरुध्द प्रचार करावा लागेल. या सगळ्या प्रयोगामधे भाजपाला दोष देणं त्यांना शक्य होणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे केंद्र सरकार व मुंबई महानगरपालिकेतील भागिदारीही सोडावी लागेल व राज्याचा कारभार चालविण्यासाठी केंद्र शासनाशी समन्वयही साधावा लागेल.

अर्थात शिवसेनेचे “चाणक्य” संजय राऊत यांनी या सर्व परिस्थितीचा विचार केला असेलच. निदान उध्दव ठाकरे यांचा त्या शक्यतेवर ठाम विश्वास असेलच. फक्त कर्नाटकातील कुमारस्वामींप्रमाणे मधूनमधून जनतेसमोर रडू नये म्हणजे झालं. त्यांना एकट्या काॅंग्रेसशी जुळवून घेता आलं नव्हतं. इथे तर काॅंग्रेसबरोबर साक्षात ‘जाणते राजे”ही आहेत.

या सर्व प्रयत्नांना भाजपाने शुभेच्छा देत शिवसेनेला काॅंग्रेस-राष्ट्रवादीच्या हातात विनाअडथळा सुपूर्द करावं!

 

  • मयूर मुकुंद आसरकार,

         (लेखक हे सामाजिक कार्यकर्ते व राजकीय अभ्यासक आहेत.)

बगदादी जीवंत गाडला,आपण काही शिकणार का ?

बगदादी जीवंत गाडला,आपण काही शिकणार का ?

आंतरराष्ट्रीय स्तरावरील ईसीस दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आणि मानवतेचा शत्रू तथा कट्टर दहशतवादी अबू बकर अल बगदादी दि.२७ ओक्टो रोजी अमेरिकन स्पेशल फोर्सच्या हल्ल्यात सिरिया मधील वायव्य प्रांतातील इदबील प्रांतात मारला गेल्याची वार्ता प्रसिद्ध झाली असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुद्धा व्हाईटहाऊस मध्ये पत्रकार परिषद घेऊन बगदादी कुत्र्या सारखा मारल्याची अधिकृत घोषणा केली आहे दहशतवादी बगदादी जगातील सर्वात क्रूर आणि हिंसक संघटना ईस्लामिक स्टेटचा प्रमुख असून बगदादीने इराक आणि सिरियाच्या भूप्रदेशावर आपले वर्चस्व स्थापन केले होते मानवतेचा शत्रू असलेला बागददी जीवंत गाडल्या गेल्यामुळे तसेच बगदादी सोबत असंख्य कुख्यात दहशतवादी मारल्या गेल्यामुळे भारतासह अनेक राष्ट्रांनी अमेरिका तथा अमेरिकन जवानांचे स्वागत केले आहे बगदादी यांच्या खातम्या नंतर बगदादीची जागा घेणारा दुसरऱ्या क्रमांकाचा किंवा उत्तराधिकारी कुख्यात दहशतवादी इस्लामिकस्टेटचा म्होरक्या अब्दुल्ला कर्दाशचा सुद्धा अमेरिकन सैन्यांनी खातमा केलेला आहे या पूर्वी सुद्धा अमेरिकेने कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्तरावरील इस्लामी राष्ट्राचे दडपन व मानवअधिकारला न जुमानता कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेन पाकिस्तानच्या ओबेटाबाद मध्ये असाच ठेचून ठार केला होता अमेरिके ने बगदादी आणि नंतर अब्दुल्ला कर्दाशचा केलेल्या खातम्याच्या घटनेचा सूक्ष्म विचार केल्यास ही कारवाई दहशतवादाचा बिमोड करण्याच्या चळवळी मधील महत्वाची घटना असून संपूर्ण अमेरिका राष्ट्राध्याक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पाठीशी मजबूत पणे उभे असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे अमेरिकेतील वर्तमानपत्रांनी सुद्धा सदर घटनेचे तोंड भरून कौतुक केले आहे कोणत्याही अमेरिकन माणसाने किवा विरोधी पक्षातील नेत्याने “ कितने बगदादी मारोंगे घर घर से बगदादी निकलेंगा “ अशा प्रकारच्या घोषणा न देता त्यांनी सैन्याच्या कारवाईचा गौरव करून दहशतवादाच्या मुद्द्यावर आम्ही सर्व एक आहोत असे आंतरराष्ट्रीय पातळीवर एक्याचे प्रदर्शन घडविले आहे त्यामुळे त्यांचे जागतिक पातळीवर वर्चस्व निर्माण होऊन त्यांचेकडे वाकड्या नजरेने पाहावयास कोणी धजावत नाही किवा भविष्यात कोणी धजावणार नाही अमेरिकेने खातमा केलेल्या क्रूर दहशतवादयाच्या पार्श्वभूमीवर आपण जर आपल्या देशातील सरकार विरोधी लोकांच्या कार्यपध्दतीचा विचार केल्यास अशी घटना आपल्या लोकशाही देशात घडली असती तर तुकडे गॅंग कडून “कितने अफझल मारोंगे,घरघरमे अफझल निकलेंगा” अशा आशयाच्या घोषणा देशाच्या गल्लीबोळात निघाल्या असत्या तथाकथित सेक्युलरमंडळी,मानवअधिकार कंपनी व राजकीय नेत्यांनी पुरावे मागून किती मोठा थयथयाट केला असता याचा विचार न करणे बरे राहील मागील वर्षी श्रीलंकेच्या कोलंबो शहरात दहशतवाद्यांनी साखळी बॉम्बस्फोट घडवून शेकडो निपराध माणसांचे प्राण घेतले होते शेकडो माणस जख्मी केले श्रीलंकेच्या सरकारने तत्काळ बॉम्बस्फोटातील दहशतवाद्यची पालेमुळे खोदून काढली त्यांना सहकार्य करणार्‍या विरुध्द कडक कारवाई करण्याची मोहीम उघडली होती तेथिल जनता सुद्धा श्रीलंका सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली विरोधी पक्ष सरकार सोबत होता दहशतवाद्यची न्यायलयीन केस लढण्यास एक वकील सुद्धा पुढे आला नाही पण दुदैवाने आपल्या संसदे वरील दहशतवादी हल्लाचा मास्टर माइंड असलेल्या अफजलच्या समर्थनार्थ मोर्चे निघतात घोषणाबाजी केली उदात्तीकरण केले जाते तसेच मुंबई बॉम्बस्फोटमध्ये फासीची शिक्षा झालेल्या याकुब मेमन या आरोपीची शिक्षा रद्द करण्यासाठी रात्रीला न्यायालय उघडले जाते राजकीय नेते अशा निषेधाच्या घटनाचे समर्थन करतात चित्रपट कलावंत सुद्धा फाशी रद्द करण्यासाठी मोर्चे बांधणी करतात आणि नंतर हेच लोक असहिष्णुतेचा कांगावा करतात त्यामुळे आपला देश कोठे चालला आहे मताच्या राजकीय फायद्यासाठी देशद्रोह्यांचे उदात्तीकरण आपण का करीत आहोत ? याचा निरपेक्षपणे विचार करण्याची आवश्यकता आहे अमेरिकेने बगदादी,अब्दुल्ला कर्दाश खातमा केलेल्या घटनेचा आणि अमेरिकन जनतेने,विरोधीपक्ष सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याच्या विचार केल्यास आपल्या देशातील मीडिया ,विरोधीपक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते केव्हा बोध घेतील किवा अमेरिकन जनतेकडून आपण आता तरी काही शिकणार का ? इतर वेळा आपण अमेरिकन तथा पश्चिम संस्कृतीच अंधाधुंद अनुकरण करतो पण देश हिताच्या घटनाचे अनुकरण का करीत नाही  याचा देशहितासाठी विचार करणे आवश्यक आहे.      (फोटो गुगल वरून साभार)

  • अशोक राणे ,अकोला. 
  • मो.9423658385

दीपावली शुभेच्छा.

0

लोक संवाद चे सर्व वाचकांना दिवाळी शुभकामना..!

नवनिर्वाचित उमेदवारांची यादी

0

महाराष्ट्र विधानसभा २०१९ चे २८८ मतदार संघासाठी मतदान दि. २१ ला पूर्ण  झाले. मतमोजणी प्रक्रिया काल पूर्ण होऊन सर्व मतदार संघाचे निकाल जाहीर झालेत. आपल्या सर्वांच्या महिती करिता कोण्या मतदार संघात कोण उमेदवार  निवडून आलेत याची यादी  विभाग व जिल्ह्या नुसार देत आहोत.

मुंबई

कुलाबा                         –          राहुल नार्वेकर, भाजप
धारावी                          –          वर्षा गायकवाड काँग्रेस
भायखळा                      –          यामिनी जाधव, शिवसेना
मलबार हिल                  –          मंगलप्रभात लोढा, भाजप
माहिम                          –          सदा सरवणकर, शिवसेना,
मुंबादेवी                        –         अमिन पटेल, काँग्रेस
वडाळा                         –          कालिदास कोळंबकर, काँग्रेस
वरळी                           –          आदित्य ठाकरे, शिवसेना
शिवडी                          –         अजय चौधरी, शिवसेना
सायन कोळीवाडा          –          कॅ. आर. तमिल सेल्वन, भाजप
अंधेरी पश्चिम                 –          अमित साटम, भाजप
अंधेरी पूर्व                     –          रमेश लटके, शिवसेना
अणुशक्ती नगर             –          नवाब मलिक, राष्ट्रवादी
कलिना                         –          संजय पोतनीस, शिवसेना
कांदिवली पूर्व                –          अतुल भातखळकर, भाजप
कुर्ला                             –         मंगेश कुडाळकर, शिवसेना
गोरेगाव                         –         विद्या ठाकूर, भाजप
घाटकोपर पश्चिम           –          राम कदम, भाजप
घाटकोपर पूर्व               –          पराग शाह, भाजप
चांदिवली                       –         दिलीप लांडे, शिवसेना
चारकोप                       –          योगेश सागर, भाजप
चेंबूर                             –         प्रकाश फातर्पेकर, शिवसेना
जोगेश्वरी पूर्व                  –          रवींद्र वायकर
दहिसर                         –          मनिषा चौधरी, भाजप
दिंडोशी                        –          सुनील प्रभू, शिवसेना
बोरीवली                       –          सुनील राणे, भाजप
भांडुप पश्चिम                 –          रमेश कोरगावकर, शिवसेना
मागाठणे                       –         प्रकाश सुर्वे, शिवसेना
मानखुर्द शिवाजीनगर    –          अबू आझमी, सपा
मालाड पश्चिम                –         अस्लम शेख, काँग्रेस
मुलुंड                            –        मिहीर कोटेचा, भाजप
वर्सोवा                          –         डॉ. भारती लव्हेकर, भाजप
वांद्रे पश्चिम                    –         आशिष शेलार, भाजप
वांद्रे पूर्व                        –         झिशान सिद्दीकी, काँग्रेस
विक्रोळी                        –        सुनील राऊत, शिवसेना
विले पार्ले                      –         पराग अळवणी, भाजप

ठाणे आणि कोकण

पालघर
डहाणू                           –        विनोद निकोले, सीपीआय
विक्रमगड                     –         सुनील भुसारा, काँग्रेस
पालघर                         –         श्रीनिवास वनगा, शिवसेना
बोईसर                         –         राजेश पाटील, बविआ
नालासोपारा                  –         क्षितीज ठाकूर, बविआ
वसई                             –        हितेंद्र ठाकूर, बविआ

भिवंडी ग्रामीण               –         शांताराम मोरे, शिवसेना
भिवंडी पश्चिम                –         महेश चौघुले, भाजप
भिवंडी पूर्व                    –         रईस शेख, सपा
शहापूर                         –         दौलत दरोडा, राष्ट्रवादी
मुरबाड                         –         किसन कथोरे, भाजप
अंबरनाथ                      –         डॉ. बालाजी किणीकर, शिवसेना
उल्हासनगर                  –         कुमार आयलानी, भाजप
कल्याण पूर्व                  –         गणपत गायकवाड, भाजप
कल्याण पश्चिम              –         विश्वनाथ भोईर, शिवसेना
कल्याण ग्रामीण             –         प्रमोद पाटील, मनसे
डोंबिवली                      –         रवींद्र चव्हाण, भाजप
मुंब्रा-कळवा                  –         जितेंद्र आव्हाड
मीरा-भाईंदर                 –         गीता जैन, अपक्ष
ओवळा-माजिवडा         –         प्रताप सरनाईक, शिवसेना
कोपरी पाचपाखाडी       –         एकनाथ शिंदे, शिवसेना
ठाणे                             –        संजय केळकर, भाजप
ऐरोली                           –        गणेश नाईक, भाजप
बेलापूर                         –         मंदा म्हात्रे, भाजप

सिंधुदुर्ग
सावंतवाडी                    –         दीपक केसरकर, शिवसेना
कुडाळ-मालवण            –         वैभव नाईक, शिवसेना
कणकवली-देवगड        –          नितेश राणे, भाजप

रत्नागिरी
राजापूर                         –        राजन साळवी, शिवसेना
रत्नागिरी                        –         उदय सामंत, शिवसेना
चिपळूण                       –          शेखर निकम, राष्ट्रवादी
गुहागर                          –        भास्कर जाधव
दापोली                         –         योगेश कदम, शिवसेना

रायगड
महाड                           –         भरत गोगावले, शिवसेना
श्रीवर्धन                         –         अदिती तटकरे, राष्ट्रवादी
अलिबाग                       –         महेंद्र दळवी, शिवसेना
पेण                               –         रवीशेठ पाटील, भाजप
उरण                            –          महेश बाल्दी, अपक्ष
कर्जत                           –          महेंद्र थोरवे, शिवसेना
पनवेल                          –          प्रशांत ठाकूर

पश्चिम महाराष्ट्र

पुणे
आंबेगाव                       –          दिलीप वळसे पाटील, राष्
इंदापूर                          –         दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी
कसबा                          –         मुक्ता टिळक, भाजप
कोथरुड                       –         चंद्रकांत पाटील, भाजप
खडकवासला                –         भिमराव तापकीर, भाजप
खेड-आळंदी                 –         दिलीप मोहिते, राष्ट्रवादी
चिंचवड                        –         लक्ष्मण जगताप, भाजप
जुन्नर                             –        अतुल बेनके, राष्ट्रवादी
दौंड                              –        राहुल कुल, भाजप
पर्वती                            –        माधुरी मिसाळ, भाजप
पिंपरी                           –        अण्णा बनसोडे, राष्ट्रवादी
पुणे छावणी                   –        सुनील कांबळे, भाजप
पुरंदर                           –        संजय जगताप, काँग्रेस
बारामती                       –        अजित पवार, राष्ट्रवादी
भोर                              –        संग्राम थोपटे, काँग्रेस
भोसरी                          –        महेश लांडगे, भाजप
मावळ                          –        सुनील शेळके, राष्ट्रवादी
वडगाव शेरी                  –        सुनील टिंगरे, राष्ट्रवादी
शिरुर                           –        अशोक पवार, राष्ट्रवादी
शिवाजीनगर                  –        अनिल शिरोळे, भाजप
हडपसर                        –        चेतन तुपे, राष्ट्रवादी

कोल्हापूर
इचलकरंजी                   –        प्रकाश आवडे, अपक्ष
करवीर                         –        पी एन पाटील, काँग्रेस
कागल                          –        हसन मुश्रीफ, राष्ट्रवादी
कोल्हापूर उत्तर             –         चंद्रकांत जाधव, काँग्रेस
कोल्हापूर दक्षिण            –        ऋतुराज पाटील, काँग्रेस
चंदगड                         –        राजेश नरसिंहराव पाटील, राष्ट्रवादी
राधानगरी                     –        प्रकाश आबिटकर, शिवसेना
शिरोळ                         –        राजेंद्र पाटील, अपक्ष
हातकणंगले                  –        राजू आवळे, काँग्रेस
शाहूवाडी                      –        विनय कोरे, जनसुराज्य पक्ष

सांगली
इस्लामपूर                     –        जयंत पाटील, राष्ट्रवादी
खानापूर                        –        अनिलभाऊ बाबर, शिवसेना

तासगांव कवठे महांकाळ –       सुमन पाटील, राष्ट्रवादी
पलुस-कडेगाव             –          विश्वजीत कदम, काँग्रेस
मिरज                           –        डॉ.सुरेश खाडे, भाजप
शिराळा                        –        मानसिंग नाईक, राष्ट्रवादी
सांगली                          –       धनंजय गाडगीळ, भाजप
जत                               –       विक्रमसिंह सावंत, काँग्रेस

सातारा
कराड उत्तर                  –        बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी
कराड दक्षिण                –        पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस
कोरेगाव                        –       महेश शिंदे, शिवसेना
पाटण                           –       शंभूराजे देसाई, शिवसेना
फलटण                        –       दीपक चव्हाण, राष्ट्रवादी
माण                             –       जयकुमार गोरे, भाजप
वाई                              –       मकरंद जाधव, राष्ट्रवादी
सातारा                          –      शिवेंद्रराजे भोसले, भाजप

सोलापूर
अक्कलकोट                 –       सचिन शेट्टी
करमाळा                      –       संजय शिंदे अपक्ष
पंढरपूर                         –      भारत भालके, राष्ट्रवादी
बार्शी                            –      राजेंद्र राऊत, अपक्ष
माढा                             –     बबन शिंदे, राष्ट्रवादी
माळशिरस                    –      राम सातपुते, भाजप-रिपाइं
मोहोळ                         –       यशवंत माने, राष्ट्रवादी
सांगोला                         –      शाहजी बापू पाटील, शिवसेना
सोलापूर दक्षिण             –       सुभाष देशमुख, भाजप
सोलापूर शहर उत्तर       –      विजयकुमार देशमुख, भाजप
सोलापूर शहर मध्य        –       प्रणिती शिंदे

अहमदनगर
अकोले                         –          डॉ. किरण लहामटे, राष्ट्रवादी
अहमदनगर शहर          –          संग्राम जगताप, राष्ट्रवादी
कर्जत-जामखेड             –          रोहित पवार, राष्ट्रवादी
कोपरगाव                     –          आशुतोष काळे, राष्ट्रवादी
नेवासा                          –          शंकरराव गडाख, क्रांतीकारी शेतकरी पक्ष
राहुरी विधानसभा          –          प्राजक्त तानपुरे, राष्ट्रवादी
शिर्डी                            –          राधाकृष्ण विखे पाटील, भाजप
शेवगाव                         –          मोनिका राजाळे, भाजप
श्रीगोंदा                         –          बबनराव पाचपुते, भाजप
श्रीरामपूर                      –          लहू कानडे, काँग्रेस
संगमनेर                        –          बाळासाहेब थोरात, काँग्रेस
पारनेर                          –          निलेश लंके, राष्ट्रवादी

विदर्भ

बुलडाणा
खामगाव                       –          आकाश फुंडकर, भाजप
चिखली                         –          श्वेता महाले, भाजप
जळगाव जामोद            –          संजय कुटे, भाजप
बुलडाणा                       –          संजय गायकवाड, शिवसेना
मलकापूर                      –          राजेश एकाडे, काँग्रेस
मेहकर                          –          संजय रायमुलकर, शिवसेना
सिंदखेडराजा                –          राजेंद्र शिंगणे, राष्ट्रवादी

अकोला
अकोट                          –          प्रकाश भारसाकळे, भाजप
अकोला पश्चिम               –          गोवर्धन शर्मा, भाजप
अकोला पूर्व                   –          रणधीर सावरकर, भाजप
बाळापूर                        –          नितिन देशमुख, शिवसेना
मूर्तिजापूर                     –          हरीश पिंपळे, भाजप

वाशिम
कारंजा                          –          राजेंद्र पाटनी, भाजप
रिसोड                          –          अमित झनक, काँग्रेस
वाशिम                          –          लखन मलिक, भाजप

अमरावती
अचलपूर                       –          बच्चू कडू, प्रहार
अमरावती                     –          सुलभा खोडके, काँग्रेस
तिवसा                          –          यशोमती ठाकूर, काँग्रेस
दर्यापूर                          –          बळवंत वानखडे, काँग्रेस
धामणगाव रेल्वे              –          प्रताप अडसड, भाजप
बडनेरा                         –          रवी राणा, अपक्ष
मेळघाट                        –          राजकुमार पटेल, प्रहार
मोर्शी                            –          देवेंद्र भुयार स्वाभिमानी पक्ष

वर्धा
आर्वी                            –          दादाराव केचे, भाजप
देवळी                           –          रणजीत कांबळे, काँग्रेस
हिंगणघाट                     –           समीर कुनावार, भाजप
वर्धा                              –          डॉ. पंकज भोयर, भाजप

नागपूर
काटोल                         –          अनिल देशमुख, राष्ट्रवादी
सावनेर                         –          केदार छत्रपाल, काँग्रेस
हिंगणा                          –          समीर मेघे, भाजप
उमरेड                          –          राजू पारवे, काँग्रेस
नागपूर दक्षिण-पश्चिम     –          देवेंद्र फडणवीस
नागपूर दक्षिण               –          मोहन मते, भाजप
नागपूर पूर्व                   –          कृष्ण खोपडे, भाजप
नागपूर मध्य                  –          विकास कुंभारे, भाजप
नागपूर पश्चिम                –          विकास ठाकरे, काँग्रेस
नागपूर उत्तर                 –          नितीन राऊत, काँग्रेस
कामठी                         –          सुरेश भोयर, काँग्रेस
रामटेक                        –           आशिष पेंडम, अपक्ष

भंडारा
तुमसर                          –          राजू कारेमोरे, राष्ट्रवादी
भंडारा                          –          अरविंद भलाधरे, भाजप
साकोली                        –          नाना पटोले, काँग्रेस

गोंदिया
अर्जुनी-मोरगाव             –          मनोहर चंद्रिकापुरे, राष्ट्रवादी
तिरोरा                          –          विजय रहांगडले, भाजप
गोंदिया                         –          गोपालदार अग्रवाल, भाजप
आमगाव                      –          सहसराम कोरोटे, काँग्रेस

गडचिरोली
आरमोरी                      –          कृष्ण गजबे, भाजप
गडचिरोली                   –          देवराव होली, भाजप
अहेरी                          –          धरमरावबाबा अत्राम, राष्ट्रवादी

चंद्रपूर
चंद्रपूर                         –          किशोर जोर्गेवार, अपक्ष
चिमूर                          –          बंटी भांदडिया, भाजप
बल्लारपूर                    –          सुधीर मुनगंटीवार, भाजप
ब्रह्मपुरी                       –          विजय वडेट्टीवार, काँग्रेस
राजुरा                         –          सुभाष धोटे, काँग्रेस
वरोरा                          –          सुरेश धानोरकर, काँग्रेस

यवतमाळ
वणी                            –          संजीवरेड्डी बोडकुरवार, भाजप
राळेगाव                      –          अशोक वोईके, भाजप
यवतमाळ                    –          मदन येरावार, भाजप
दिग्रस                         –          संजय राठोड, शिवसेना
आर्णी                          –          संदीप धुर्वे, भाजप
पुसद                           –          इंद्रनील नाईक, राष्ट्रवादी
उमरखेड                     –           नामदेव सासणे, भाजप

मराठवाडा

औरंगाबाद
औरंगाबाद पश्चिम          –          संजय शिरसाट, शिवसेना
औरंगाबाद पूर्व              –          अतुल सावे, भाजप
औरंगाबाद मध्य            –          प्रदीप जयस्वाल, शिवसेना
कन्नड                          –          उदयसिंह राजपूत, शिवसेना
गंगापूर                         –          प्रशांत बंब, भाजप
पैठण                            –          संदीपान भुमरे, शिवसेना
फुलंब्री                          –          हरीभाऊ बागडे, भाजप
वैजापूर                         –          रमेश बोरनारे, शिवसेना
सिल्लोड                       –          अब्दुल सत्तार, शिवसेना

हिंगोली
वसमत                         –          चंद्रकांत नवघरे, राष्ट्रवादी
कळमनुरी                    –          संतोष बांगर, शिवसेना
हिंगोली                        –          नाजी मुटकुळे, भाजप

परभणी
जिंतूर                           –          मेघना बोर्डिकर, भाजप
परभणी                         –          डॉ. राहुल पाटील, शिवसेना
गंगाखेड                        –          रत्नाकर गुट्टे, रासप
पाथरी                           –          सुरेश वरपुडकर, काँग्रेस

जालना
परतूर                           –          बबनराव लोणीकर, भाजप
घनसावंगी                     –          राजेश टोपे, राष्ट्रवादी
जालना                          –          कैलास गोरंट्याल, काँग्रेस
बदनापूर                       –          नारायण कुचे, भाजप
भोकरदन                      –          संतोष दानवे, भाजप

उस्मानाबाद
उमरगा                         –          ज्ञानराज चौगुले, शिवसेना
तुळजापूर                      –          राणाजगजीतसिंह पाटील, भाजप
उस्मानाबाद                  –          कैलास पाटील, शिवसेना
परांडा                           –          तानाजी सावंत, शिवसेना

नांदेड
किनवट                        –          भिमराव केराम, भाजप
देगलूर                          –          रावसाहेब अंतापूरकर, काँग्रेस
नांदेड उत्तर                   –          बालाजी कल्याणकर, शिवसेना
नांदेड दक्षिण                 –          मोहनराव हंबर्डे, काँग्रेस
नायगाव                        –          राजेश पवार, भाजप
भोकर                           –          अशोक चव्हाण, काँग्रेस
मुखेड                           –          डॉ. तुषार राठोड, भाजप
लोहा                             –          शामसुंदर शिंदे, शेकाप
हदगाव                         –          माधवराव पवार, काँग्रेस

लातूर
अहमदपूर                     –          बाबासाहेब पाटील, राष्ट्रवादी
उदगीर                         –          संजय बनसोडे, राष्ट्रवादी
औसा                            –          अभिमन्यू पवार, भाजप
निलंगा                          –          संभाजी पाटील निलंगेकर, भाजप
लातूर ग्रामीण                –          धीरज देशमुख, काँग्रेस
लातूर शहर                   –          अमित देशमुख, काँग्रेस

बीड
गेवराई                          –           लक्ष्मण पवार, भाजप
परळी                           –          धनंजय मुंडे, राष्ट्रवादी
माजलगाव                     –          प्रकाश सोळंके, राष्ट्रवादी
केज                              –          नमिता मुंदडा, भाजप
बीड                              –          संदीप क्षीरसागर, राष्ट्रवादी
आष्टी                            –          बाळासाहेब आजबे, राष्ट्रवादी

उत्तर महाराष्ट्र

नाशिक
इगतपुरी                       –           हिरामन खोसकर, काँग्रेस
कळवण                        –          नितीन पवार, राष्ट्रवादी; कॉ. जिवा गावित, सीपीआय
चांदवड                         –           राहुल अहेर, भाजप
दिंडोरी                          –          नरहरी झिरवाल, राष्ट्रवादी
देवळाली                       –          सरोज अहिरे, राष्ट्रवादी
नांदगाव                        –          सुहास कांदे, शिवसेना
नाशिक पश्चिम               –          सीमा हिरे, भाजप
नाशिक पूर्व                   –          राहुल ढिकळे, भाजप
नाशिक मध्य                 –          देवयानी फरांदे, भाजप
निफाड                         –          दिलीपराव बनकर, राष्ट्रवादी
बागलाण                       –          दिलीप बोरसे, भाजप
मालेगाव बाह्य                –          दादा भुसे, शिवसेना
मालेगाव मध्य                –          मोहम्मद इस्माईल अब्दुल खालिक, एमआयएम
येवला                           –          छगन भुजबळ, राष्ट्रवादी
सिन्नर                            –          माणिकराव कोकाटे, राष्ट्रवादी

धुळे
साक्री                            –          मंजुळा गावित, अपक्ष
धुळे ग्रामीण                   –          कुणालबाबा पाटील, काँग्रेस
धुळे शहर                     –          शाह फारुक अन्वर, एमआयएम
शिंदखेडा                      –          जयकुमार रावल, भाजप
शिरपूर                          –          काशिराम पवार, भाजप

नंदुरबार
अक्कलकुवा                 –          केसी पाडवी, काँग्रेस; आमशा पाडवी, शिवसेना;
शहादा                          –          राजेश पाडवी, भाजप
नंदुरबार                        –          विजयकुमार गावित, भाजप
नवापूर                          –          शिरीषकुमार नाईक, काँग्रेस

जळगाव
अमळनेर                      –          अनिल पाटील, राष्ट्रवादी
एरंडोल                         –          चिमणराव पाटील, शिवसेना
चाळीसगाव                   –          मंगेश चव्हाण, भाजप
चोपडा                          –          लताबाई सोनावणे, शिवसेना
जळगाव ग्रामीण            –          गुलाबराव पाटील, शिवसेना
जळगाव शहर               –          सुरेश भोळे, भाजप
जामनेर                         –          गिरीश महाजन, भाजप
पाचोरा                          –          किशोर पाटील, शिवसेना
भुसावळ                       –          संजय सावकारे, भाजप
मुक्ताईनगर                   –          चंद्रकांत पाटील, अपक्ष
रावेर                             –          मधुकरराव चौधरी, काँग्रेस

 

(विधान भवन फोटो गुगल वरून साभार )

आशा..!

आशा ….

(photo google )

जगातील प्रत्येक मनुष्य वा स्त्री हे आज कोणत्यातरी आशेवर जीवंत आहे, प्रसंगी तत्वज्ञान हा त्याला अटक म्हणून स्वीकारावा लागणारा मार्ग आहे. आशा अमर आहे.आशा मधूर असते पण आशेशिवाय जीवन कंटाळवाणे बनते.बालक, तरुण, तरुणी, श्रेष्ठ, क्षुद्र, श्रीमंत, गरीब हे सर्व आशेवरच आवलंबून असतात पण कधी -कधी  त्याला कर्तव्यासाठी आशेला मागे ढकलावे लागते.सर्वच आशा सफल होतील वा नाही.आशा सफल झाल्या तर मनुष्याला समाधान वाटते , अपयश आले तर त्याला दुःख होते.
     ज्या मनुष्य किंवा स्त्री च्या मनात ज्या प्रमाणे आशा असतील त्याने त्या प्रमाणे कर्तव्य केले पाहिजे, आशा सफल करण्याचा हाच एकमेव मार्ग आहे.एखाद्या गोष्टीची आशा ठेवण्यापेक्षा, त्या गोष्टीची इच्छा ठेऊन, त्याचे स्वप्न बघून, स्वप्नाला साकार करण्याचे द्रुष्टीने मेहनत घेतली पाहिजे अन्यथा स्वप्न फक्त स्वप्नच राहिल ते कधीही अस्तित्वत येणार नाही. मला परीक्षेत 70% मार्कस मिळाले पाहिजेत असे म्हणण्यापेक्षा मला 70% मार्कस मिळतीलच असे म्हणणे योग्य ठरेल परंतु हेच ध्येय डोळ्यासमोर ठेऊन अभ्यास केला तर !  
   भविष्यात काही तरी गोंडस आहे या आशेच्या गुंगीवरच सर्व चराचर सृष्टीचा दैनंदिन कार्यक्रम अव्याहतपणं चालू आहे.वर्षाऋृतून पाऊस पडणार आहे. या आशेवरच पृथ्वीसुध्दा उन्हाळ्यात कडक उन्हात धीर धरून उभी आहे. आशा वेडी असते, ध्येय शहाणे असते; आशा हातातल्या रेषा बघत असते.तर ध्येय हातातील सामर्थ्य अजमावते ! 
  • प्रकाश चिकारे,नागपूर

चला करू मतदान.!

चला करू मतदान..!

महाराष्ट्रातील सर्व मतदारांना लोकसंवाद.कॉम टिम कडून आवाहन करण्यात येते की लोकशाही बळकट करण्यासाठी अवश्य मतदान करा आणि लोकशाही चा उत्सव साजरा करा.

मतदारांना काही समस्या असल्यास मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांचे कडून खालील लिंक आणि टोल फ्री नं देण्यात आले आहेत.

काही समस्या असल्यास आपण त्यावर संपर्क करू शकता.

https://ceo.maharashtra.gov.in                                                             call 1800-22-1950 (Toll Free)

आढावा विधानसभेचा – कोकण विभाग

  • कोकण विभाग-

कोकण विभागात एकूण जिल्हे ०७ जिल्ह्याचा समावेश असून एकूण विधासभा मतदारसंघ ७५ आहेत.

त्यामध्ये मुंबई शहर १०, मुंबई उपनगर २६, पालघर ०६, ठाणे जिल्हा १८, रायगड जिल्हा ०७, रत्नागिरी जिल्हा ०५ व सिंधूदुर्ग जिल्हा ०३ अशा मतदारसंघाचा समावेश आहे.

कोकण विभागात महायुती, आघाडी, मनसे व इतर पक्षांनी आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत.

  • वरळी मतदार संघातून शिवसेनेचे सर्वे सर्वा उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव युवसेना अध्यक्ष आदित्य ठाकरे मैदात उभे असून ठाकरे कुटुंबातील सदस्य पहिल्यांदाच या निमित्ताने निवडणूक रिंगणात आहे. आदित्य ठाकरे चे विरोधात मनसे ने उमेदवार दिला नसला तरीही आघाडी ने सुरेश माने यांना  मैदानात उतरवले आहे. आदित्य ठाकरे हे आपले नेतृत्व सिद्ध करतता का ?  हे पाहणे या निमित्ताने उत्सुकतेचे ठरणार आहे. महाराष्ट्रातील अनेक उत्सुक लढती पैकी हि पण एक लढत होईल असे मानले जाते.  जाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.
  • माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव नितेश राणे यांना कणकवली मतदार संघातून भाजपाने  मैदानात उतरवले आहे. परतू याठिकाणी युतीधर्म बाजूला ठेवत शिवसेनेने सतीष सावंत यांना उमेदवारी दिली. आणि आघाडीने सुशील अमृतराव राणे  यांना मैदानात उतरवले आहे. तसेच वंचित चे मनाली वंजारे सुद्धा रिंगणात असून परंपरागत गड जरी राणेंचा असला तरी राणेंना न मानणारे भाजपा कार्यकर्ते व शिवसेना हे नीतेश राणे साठी डोकेदुखू ठरणार असून त्यांना गड सहज राखणे कठीण जाईल अशी चर्चा आहे.
  • वांदरे मतदारसंघात महायुतीचे विद्यमान मंत्री मुंबईतील पावरफुल नेता आशीष शेलार हे रिंगणात असून त्यांचे विरोधात आघाडीचे दमदार उमेदवार आसिफ जकेरिय मैदानात आह्र्त. यावेळी शेलार परत बाजी मारणार का हे पाहणे औत्सुक्याचे राहील.
  • डोंबिवलीतून आपल्याला रविंद्र चव्हाण, भाजपा विरुद्ध राधिका गुप्ते कोंग्रेस असा सामना पहायला मिळणार आहे.      
  • मूंब्रा कळवा मतदार संघात आघाडीचे नेता जितेंद्र आव्हाड यांचे विरोधात शिवसेनेने सिने अभिनेत्री  दीपाली सय्यद ह्यांना उमेदवारी देत जितेंद्र आव्हाड यांना हरवण्यासाठी महायुतीने आव्हान उभे केले आहे. मतदार नेमके कुणाला पसंती देतता हे पाहणे उत्सुकतेचे राहील.
  • कर्जत मतदार संघात भाजपचे विद्यमान आमदार मंत्री प्रा. राम शिंदे हे रिंगणात असून त्यांचे विरोधात आघाडी तर्फे रोहित पवारांना उमेदवारी देण्यात आली आहे. रोहित पवार हे पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पवार कुटुंबाची नवीन पिढी या निमित्ताने राजकारणात सक्रीय होऊ पाहत आहे. रोहित आपले नेतृत्व सिद्ध करतात का या कडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.
  • ठाण्यात संजय केळकर भाजपा चे उमेदवार असून रा.कोंग्रेस ने मनसेला पाठिंबा दिला आहे . या ठिकाणी मनसेचे अविनाश जाधव हे रिंगणात असून भाजपा विरुद्ध मनसे अशी लढत पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने मनसे विधानसभेत आपले खाते उघडते का ? अशी चर्चा ऐकायला मिळत आहे.
  • जिल्हा रायगड श्रीवर्धन मधून राष्ट्रवादीचे माजी मंत्री सुनील तटकरे यांची कन्या जी.प. अध्यक्ष अदिती तटकरे यांना आघाडीने रिंगणात उतरवले आहे. विरोधात शिवसेनेने विनोद घोसाळकर यांना मैदानात उतरवले आहे. मध्यंतरी सुनील तटकरे यांचे नाव वारंवार सिंचन घोटाळ्या मध्ये चर्चेला आले होते. तटकरे व शिवसेनेला हि निवडणूक फारच प्रतीष्टेची झाली आहे. त्यामुळे जनता कुणाच्या बाजूनी उभी राहते यावर डोहजांचेही भवितव्य अवलंबून आहे.
  • कल्याण पश्चिम  मतदारसंघ महायुतीच्या वाटाघाटीत भाजपा कडून शिवसेनेच्या वाट्याला गेल्याने भाजप विद्यमान आमदार नरेंद्र पवार  यांनी अपक्ष म्हणून मैदानात उडी घेतली आहे. आघाडीने कांचन कुलकर्णी यांना मैदानात उतरवले आहे. तर महायुती कडून शिवसेनेने विश्वनाथ भोईर यांना मैदानात उतरवले आहे. त्यामुळे या मतदारसंघात आपल्याला तिहेरी लढत पाहायला मिळेल असे चित्र आहे.

 

मुख्य संपादक- लोकसंवाद.कॉम

नितिन राजवैद्य.

आढावा विधानसभेचा – खान्देश-उत्तर महाराष्ट्र विभाग

  • खान्देश व उत्तर महाराष्ट्र विभाग –

खान्देशात एकूण ०५ जिल्ह्यामधील ४७ विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे.

या मतदारसंघामध्ये जळगाव जिल्ह्यातील ११ , धुळे जिल्हा ०५, नंदुरबार जिल्ह्य ०४, नाशिक जिल्ह्या १५ व  अहमदनगर जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे.

खान्देश व उत्तर महाराष्ट्र विभागात महायुतीने, आघाडीने, वंचित बहुजन आघाडी, मनसे व इतर अपक्ष उमेदवार मैदानात आहेत.

  • शक्तिशाली नेता एकनाथ खडसे यांचे तिकीट कापत मुक्ताईनगर मधून त्यांची कन्या रोहिणी खडसे यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे. एकनाथ खडसेंचे तिकीट कापल्यामुळे स्थानिक मतदारांमध्ये प्रचंड नाराजी पाहायला मिळाली त्यामुळे कार्यकर्ते व मतदार रोहिणी खडसेंच्या सोबत किती प्रमाणात ऊभे राहतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. विरोधात शिवसेनेचेच चंद्रकांत पाटील हे युतीधर्म बाजूला ठेवत मैदानात उतरले आहेत. तसेच मनसे चे संदीप देशपांडे सुद्धा मैदानात असल्यामुळे येथे तिरंगी लढत पाहायला मिळेल.
  • जळगाव मतदारसंघात महायुतीचे गुलाबराव पाटील आणि आघाडीच्या पुष्पा महाजन व मनसेचे मुकुंद रोटे असा सामना पाहाला मिळणार आहे.
  • जामनेर मतदार संघात विद्यमान मंत्री गिरीश महाजन विरोधात रा. कोंग्रेस चे संजय गरुड ही लढत पहायला मिळणार. भाजपच्या संकट मोचन म्हणून समजल्या जाणाऱ्या महाजनांच्या विरोधात संजय गरुड किती टक्कर देतात हे पाहणे मजेदार आहे.
  • नांदगाव मतदार संघातून आघाडी तर्फे पंकज भुजबळ यांचे विरोधात महायुतीचे सुहास खांडे मैदानात आहेत. जनता कुणाला स्वीकारते आणि कुणाला नाकारते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
  • येवला मतदार संघातून रा.कोंग्रेसचे छगन भुजबळ उभे असून त्यांना आव्हान देण्यासाठी शिवसेनेचे संभाजी पवार मैदानात आहेत. छगन भुजबळ भ्रष्ट्राचाराच्या आरोपात जमानतीवर बाहेर आलेत हे सर्वश्रूत आहे. त्यामुळे मतदार नेमके कोणाला कौल देतता हे पाहणे महत्वाचे आहे.
  • संगमनेर मधून आघाडी तर्फे कोंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भाळासाहेब थोरात मैदानात असून महायुतीने साहेबराव नवाले पाटील हे रिंगणात आहेत.
  • शिर्डी मतदार संघात नुकतेच भाजपा वासी झालेले विद्यमान मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपा कडून मैदानात आहेत. त्यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील हे नुकतेच भाजपा कडून खासदार म्हणून निवडून आलेत. राधाकृष्ण विखेंच्या विरोधात राष्ट्रवादी कोंग्रेस चे सुरेश थोरात मैदानात आहेत. राधाकृष्ण विखे यांचा भाजपा प्रवेश हा शरद पवारांच्या चांगलाच जिव्हारी लागल्यामुळे शरद पवार या मतदार संघात जातीने लक्ष देतील असे मानले जाते. त्यामुळे विखे पाटलांच्या मार्गात अजूनही अडचणी आहतेच असे चित्र आहे.

पुढील लेखात पाहूया कोकण विभागातील काही मतदार संघाच्या लढती. लोकसंवाद.कॉम सोबत कनेक्ट रहा.

 

मुख्य संपादक- लोकसंवाद.कॉम

नितिन राजवैद्य.