आढावा विधानसभेचा – पश्चिम महाराष्ट्र विभाग

  • पश्चिम महाराष्ट्र विभाग –

पश्चिम महाराष्ट्र विभागात एकूण ०५ जिल्ह्यातील ५८ मतदारसंघाचा समावेश येतो.

त्यामध्ये पुणे जिल्ह्यात २१, सांगली जिल्ह्यात ०८, सातारा जिल्हा ०८, कोल्हापूर जिल्हा १० आणि सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे.

पश्चिम महाराष्ट्र विभागात महायुतीने, आघाडीने, मनसे व इतर विविध राजकीय पक्षाने आपले उमेदवार निवडणुकीच्या लढाईत उतरवले आहेत.

  • पुणे जिल्ह्यातील कोथरूडच्या विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी चे तिकीट कापत भाजप ने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिली आहे. याठिकाणी मेधा कुलकर्णी चे तिकीट कापल्यामुळे स्थानिक कार्यकर्ते व मतदारांमध्ये मोठी नाराजी आहे. दादा पाटील यांचे विरोधात मनसे चे किशोर शिंदे हे उभे असून यांना आघाडीने पाठींबा जाहीर केला आहे. या लढतीत आघाडीने उमेदवार न देता स्थानिक मतदार व कार्यकर्त्यांना मनसे कडे वळवण्याचा डाव आखत महायुतीच्या पारंपारिक मतदारांना फोडण्याचा प्रयत्न आघाडीकडून होताना दिसेल. मतदार व स्थानिक कार्यकर्ते  नेमकी काय भूमिका घेतता यावर चंद्रकांत दादा पाटील यांचे भवितव्य अवलंबून आहे.
  • सोलापूर मध्ये कॉंग्रेसच्या प्रणिती शिंदे आणि महायुतीचे  शिवसेनेचे माने मैदानात आहेत., एमाएम, शिवसेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार सुद्धा मैदानात आहेत. त्यामुळे शिंदे घराण्याची प्रतिष्ठा पणाला लागणार की विजय मिळणे सोपे जाईल हे येणारा काळच ठरवेल.
  • बारामती मतदार संघात आघाडी चे नेते अजितदादा पवार विरुद्ध भाजपचे गोपीचंद पडळकर अशी रंगतदार लढत पाहाला मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांनी या नियवडणुकी करिता पडळकरांना भाजपत घेऊन तिकीट दिले त्यामुळे आपला पारंपरिक मतदार संघ राखण्यात अजितदादाना कसरत करावी लागणार असे दिसते.
  • कराड मध्ये कोंग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण रिंगणात असून त्यांचे विरिधात महायुतीचे अतुल भोसले मैदानात आहेत. पृथ्वीराज चव्हाण आपला गड राखतात की अतुल भोसलेंना जनता स्वीकारते हे लवकरच कळेल.
  • सातारा मतदार संघ हा राष्ट्रवादीचा गड मानल्या जातो. परंतु राष्ट्रवादीला मोठा धक्का  देत माजी खासदार उदयन राजे भोसले व माजी आमदार शिवेंद्रराजे भोसले हे दोघेही भाजपा वासी झाले आहेत. या मतदार संघात भाजपा कडून शिवेंद्रराजे भोसलेंना उमेदवारी देत विरोधी पक्षांना भाजपा ने चांगलेच अडचणीत पकडले आहे. भाजपाच्या विरोधात येथे रा.कोंग्रेस ने दीपक पवार यांना निवडणुकीत उतरवले आहे. शरद पवार स्वत: या मतदार संघात जातीने लक्षदेऊन असल्यामुळे या निवडणुकीत चांगलाच  रंग आलेला पाहायला मिळेल.
  • गुहाघर मतदार संघातून शिवसेनेचे भास्कर जाधव, आघाडीचे सहदेव भेटकर, वंचित चे विकास जाधव हे मैदानात असून या ठिकाणी तिरंगी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. 
  • कोल्हापूर उत्तर मतदार संघाचे आमदार शिवसेनेचे उमेदवार राजेश क्षीरसागर मैदानात असून आघाडीने मात्र चंद्रकांत जाधव यांना उमेदवारी देऊन चांगलेच आव्हान उभे लेके आहे. भाजपा चे कार्यकर्ते या मतदार संघावर दावा करत होते त्यामुळे ते आता सेनेचे किती काम करतील हा प्रश्नच आहे. शिवसेनेचे आमदार यावेळी हयट्रिक करतील का ? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
  • कोल्हापूर दक्षिण मध्ये वृतुराज पाटील यांना आघाडीने मैदानात उतरवले आहे. महायुतीने अमोल महाडीकांना मैदानात उतरवले आहे. त्याच सोबत वंचित बहुजन आघाडीचे बबनराव कवडे मैदानात आहेत त्यामुळे वंचितचा त्यामुळे मैदान कोण मारेल याची उत्सुकता शिगेला लागली आहे.

पुढील लेखात पाहूया खान्देश-उत्तर महाराष्ट्र विभागातील काही मतदार संघाचा आढावा. लोकसंवाद.कॉम सोबत कनेक्ट रहा. 

मुख्य संपादक- लोकसंवाद.कॉम

नितिन राजवैद्य.

आढावा विधानसभेचा – मराठवाडा विभाग

  • मराठवाडा विभाग-

मराठवाड विभागात एकूण ०८ जिल्हे तर एकूण मतदारसंघ ४६ आहेत.

त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात ०९, नांदेड जिल्हा ०९, हिंगोली जिल्हा ०९, परभणी जिल्हा ०४, जालना जिल्हा ०५, बीड जिल्हा ०६, लातूर जिल्हा ०६, उस्मानाबाद जील्यात्तील ०४ अशा एकूण ४६ मतदारसंघाचा  समावेश आहे.

मराठवाड्यात महायुती,आघाडी, मनसे, वंचित आघाडी अशा विविध राजकीय पक्षांनी आपले उमेदवार रणांगणात उतरवले आहेत.

  • बीड मतदार संघात  राष्ट्रवादी कोंग्रेस मधून शिवसेनत प्रवेश केलेले माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर रिंगणात आहेत. तर त्यांचेच पुतणे संदीप क्षीरसागर हे राष्ट्रवादी कोंग्रेस कडून विरोधात रणांगणात उभे ठाकले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीला ही लढत फारच चुरशीची ठरणार आहे. दोघांमध्ये  बाजी  मारणार तरी कोण अशी उत्सुकता लागली आहे.
  • निलंगा मतदार संघात महायुतीचे विद्यमान मंत्री संभाजी पाटील निलंगेकर मैदानात असून त्यांचे विरोधात कोंग्रेस चे अशोक शिवाजीराव पाटील निलंगेकर हे मैदानात आहेत. मतदार निलंगेकर घराण्यातील कोणाच्या बाजूने उभे राहतात  हे पाहणे उत्सुकतेचे राहील.
  • लातूरला कोंग्रेस चे अमित देशमुख रिंगणात असून त्यांचे विरोधात भाजपचे शैलेश लाहोटी हे  मैदानात आहेत. व माजी मंत्री अमित देशमुख  हे माजी मुख्यमंत्री कोंग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचे चिरंजीव आहेत. हा त्यांचा पारंपरिक मतदारसंघ असून अमित मतदारांना किती आपलस करतात व आपला पारंपरिक मतदार संघ राखण्यात कितपत यशस्वी होतता कि शैलेश लाहोटी विजय संपादन करतात हे लवकरच कळेल.
  • परळी विधानसभे मध्ये भाजपचे विद्यमान मंत्री पंकजा मुंडे विरुद्ध राष्ट्रवादी कोंग्रेस चे नेते विद्यमान विधान परिषद चे विरोधी पक्ष नेता धनंजय मुंडे अशी स्पष्ट लढत आहे. दोघेही मुंडे घराण्यातील पावरफुल व्यक्तिमत्व मैदानात असून ही लढत संपूर्ण महाराष्ट्रचे लक्ष वेधणारी राहील. वंचित बहुजन आघाडीचे धिरज सातपुते सुद्धा रिंगणात असून मतदार नेमके कोणाला कौल देतात हे येणारा काळच सांगेल.
  • भोकरदन मतदार संघातून केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचे चिरंजीव विद्यमान आमदार संतोष दानवे हे मैदानात असून त्यांचे विरोधात आघाडीने चंद्रकांत दानवे यांना मैदानात उतरवले आहे. दानवे कुटुंबाची ही लढत कोणासाठी विजयाची ठरेल हे पहिले जाईल.
  • केज मतदार संघातून भाजपाच्या विद्यमान आमदार संगीता ठोंबरे यांची उमेदवारी कापत राष्ट्रवादीच्या घोषित उमेदवार नमिता मुंदडा यांना वेळेवर भाजपात घेत भाजपाकडून उमेदवारी देऊन विरोधकांना चेकमेट केल्याचे पाहायला मिळाले. विरोधात आघाडी कडून पृथ्वीराज साठे हे रिंगणात आहेत.  राष्ट्रवादीला हि लढत प्रतीष्टेची झाली आहे. नेमकी बाजी कोण मारणार हे वेळच सांगेल.

पुढील लेखात पाहूया पश्चिम महाराष्ट्र विभागाचा आढावा. लोकसंवाद.कॉम सोबत कनेक्ट रहा. 

 

मुख्य संपादक- लोकसंवाद.कॉम

नितिन राजवैद्य.

गृह कर्ज

0

गृह कर्ज …!

आपले  एक सुंदर घर असावे असे सर्वांनाच वाटते. मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी तर आपले राहते घर होणे हि खूपच आनंदाची व स्वप्न साकार होणारी बाब आहे. मोठ्या मेहनतीने पै पै जमा करून, काटकसर करून घर होण्यासाठी अनेक कुटुंबे झटताना आपण पाहतो.

या करिता सहाय्य म्हणून शासनाच्या विविध योजना आहेत तर अनेक बँका आणि वित्तीय संस्था घर घेण्यासाठी किंवा घराचे बांधकाम  करण्यासाठी मर्यादित कालावधी करिता व्याज दर आकारून गृह कर्ज उपलब्द करून देतात.

चला तर मग पाहूया काही बँकांचे व वित्तीय संस्थांचे गृह कर्जाचे व्याजदर.

 

वाचकांना सहज माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने माहिती देत आहोत. बँकांच्या नियमानुसार थोडाफार फरक असू शकतो.

 

संपादक- लोकसंवाद.कॉम

प्रसाद गणोरकर

आढावा विधानसभेचा – विदर्भ विभाग

  • विदर्भ विभाग –

 विदर्भात एकूण ११ जिल्हे व ६२ विधानसभा मतदार संघ आहेत.

त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील ०७ विधानसभा मतदार संघ, अकोला जिल्हात ०५, वाशिम जिल्हात ०३, अमरावती जिल्हात ०८, वर्धा जिल्हात ०४, नागपूर जिल्हात १२, भंडारा जिल्हात ०३, गोंदिया जिल्हात ०४, गडचिरोली जिल्हात ०३, चंद्रपुर जिल्हात ०६ व  यवतमाळ जिल्ह्यातील ०७ विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे.

विदर्भात सर्वच प्रमुख पक्षांनी आपापसात अनेक मतदारसंघात बदल करत आपले उमेदवार रणांगणात उतरवले आहेत. यामध्ये महायुती, आघाडी, वंचित बहुजन आघाडी,  मनसे अशा विविध राजकीय पक्षांचा समावेश आहे.

  • महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या पारंपारिक दक्षिण – पश्चिम  मतदारसंघातून निवडणूक लढवणार असून त्यांचे विरोधात कॉंग्रेस चे आशिष देशमुख उभे आहेत. याआधी आशीष देशमुख काटोल मतदार संघातून भाजपा चे आमदार होते. परंतु यावेळी ते कोंग्रेस कडून थेट देवेन्द्र फडणवीस यांच्या विरोधात मैदानात उतरले आहे.
  • साकोली मतदारसंघातून महायुतीने परिणय फुके यांना रिंगणात उतरवले आहे. त्यांचे विरोधात भाजपातून कोंग्रेसवासी झालेले व मागच्या लोकसभेला नितिन गडकरींच्या विरोधात उभे असलेले नाना पटोले हे मैदानात आहेत. परिणय फुके विरोधात नाना पटोले अशी लढत पाहायला मिळेल.
  • अमरावती जिल्ह्यात भाजपा ने विद्यमान आमदार एकेकाळी कोंग्रेसचे मंत्री असणारे सुनील देशमुख यांना परत उमेदवारी दिली असून यांचे विरोधात कॉँग्रेसच्या सुलभा खोडके ह्या रिंगणात आहेत. ही लढत उत्सुकतेची राहील असे दिसते कारण दोघांनाही कोंग्रेस मतदार कोठे कसे फोडायचे हे माहीत असून दोघांनाही  मानणारा कार्यकर्ता व मतदार वर्ग या मतदार संघात आहे. त्यामुळे जनता नेमका कुणाला कौल देते हे पाहणे उत्सुकतेचे राहील.
  • धामणगांव मतदार संघात विद्यमान कोंग्रेस चे आमदार विरेन्द्र जगताप मैदानात असून यांचे विरोधात गेल्या विधानसभेला थोड्या  मतांनी विजयी न झालेले  अरुण अडसड यांचे चिरंजीव प्रताप अडसड हे भाजपा चे उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. प्रताप अडसड हे न.प. अध्यक्ष असून स्थानिक तरुणांशी  जुळलेले आहेत. यावेळी वीरेंद्र जगताप आपला विजय राखतात कि प्रताप अडसड बाजी मारतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
  • अकोला जिल्ह्यात आकोट मतदार संघातून जनतेचा विरोध दिसताना सुद्धा  विद्यमान आमदार प्रकाश भारसाकळे यांना भाजपाने उमेदवारी दिली असून कोंग्रेस चे संजय बोडखे हे त्यांचे विरोधात मैदानात आहेत. वंचित आणि मनसे ने सुद्धा या ठिकाणी आपापले उमेदवार उभे केले असून वंचितला मानणारा मोठा मतदारवर्ग या मतदार संघात आहे. त्यामुळे  भाजपला आपला गड राखण्यात चांगलीच कसरत करावी लागेल असे दिसते.
  • वाशिम जिल्ह्यातील रिसोड मतदार संघात कोंग्रेसचे विद्यमान आमदार अमित झनक हे मैदानात असून त्यांचे विरोधात शिवसेनेचे विश्वनाथ सानप हे आहेत. भाजपने आपला पारंपरिक मतदारसंघ सेनेला दिला असून या वेळी सेना येथे आपला झेंडा फडकवेल का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वंचितचे दिलीप जाधव यांनी सुद्धा मैदानात उडी घेतली असून वंचितला मानणारा मोठा मतदार याभागात आहे. त्यामुळे नेमके कोण विजयी होईल हे पाहणे उत्सुकतेचे राहील.
  • बुलढाणा जिल्ह्यातील चिखली मतदार संघात कोंग्रेस चे  विद्यमान आमदार राहुल बोंद्रे यांचे विरोधात महायुतीने श्वेता महल्ले  हा नवीन चेहरा दिला आहे. महल्ले ह्या जी.प. सभापती आहेत व त्यांनी दरम्यानच्या काळात बरीच तयारी केलेली दिसते. तसेच राहुल बोंद्रे सुद्धा दोन टर्म पासून या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करतात. त्यामुळे परत बोंद्रे कि महल्ले अशी लढत पाहायला मिळत आहे.

पुढील लेखात पाहूया मराठवाडा  विभागातील काही मतदार संघाच्या लढती. त्यासाठी लोकसंवाद.कॉम सोबत कनेक्ट रहा.

 

मुख्य संपादक- लोकसंवाद.कॉम

नितिन राजवैद्य.

आढावा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा

आढावा महाराष्ट्र विधानसभेचा

सध्या महाराष्ट्रात लोकशाहीचा महोत्सव  सुरू आहे. राज्यघटनेने  प्रत्तेक नागरिकाला दिलेल्या अधिकाराचा वापर करत आपले सरकार निवडून देण्याचा हा उत्सव आहे. महाराष्ट्रातील २८८ विधानसभा मतदार संघासाठी निवडणूक होत असून दरम्यान अनेक नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी पक्षांतर केले आहे तर अनेक ठिकाणी राजकीय पक्षांनी आपापल्या जागेची अदलाबदल केली आहे तर बऱ्याच ठिकाणी विद्यमान आमदारांचे, मंत्र्यांचे  तिकीट कापत राजकीय पक्षांनी भाकरी फिरविण्याचा प्रयत्न केला आहे. हा प्रयत्न कितपत यशस्वी होतो हे येणारा काळच सागेल. झालेल्या बदलांमुळे काही मतदार संघात चुरशीच्या लढत होतील अशी स्थिती आहे. अशा अनेक बाबींचा आढावा आपण  लोकसंवाद.कॉम च्या वाचकांसाठी घेणार आहोत.

विदर्भ विभाग, मराठवाडा विभाग, पश्चिम महाराष्ट्र विभाग, खांदेश–उत्तर महाराष्ट्र विभाग आणि कोकण विभाग अशा पाच विभागानुसार आढावा आपण पाहणार आहोत.

विभागानुसार आढावा क्रमाक्रमाने पुढील लेखात बघूया. लोकसंवाद.कॉम सोबत कनेक्ट रहा.

 

मुख्य संपादक – लोकसंवाद.कॉम 

नितिन राजवैद्य 

विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा..!

विजयादशमीच्या पावन पर्वावर आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.!

आई भवानी आणि प्रभू श्री राम चंद्राने धर्मासाठी केलेला संघर्ष आपल्या सर्वांना सतत प्रेरणा देत राहो ही प्रार्थना.

दु:ख ..

“दुःख”

आपल्या आयुष्यात कधीतरी सुख येईल या आशेवरच मनुष्य जगत असतो. रात्रीच्या काळ्याकुट्ट,गडद अंधारानंतर आशावादी सकाळ येते म्हणून ती मनाला आल्हाददायक वाटते. माणसाचा मृत्यू होतो त्याच्या असह्य वेदनेमुळेच की काय, आपल्याला नव्या जन्माचा आनंद मिळतो तसेंच आयुष्यात “दुःख”आहे म्हणून सुखाची अवीट गोडी अनुभवायला मिळते.
स्वतःला असं भासवा की तुम्ही अथांग अश्या सागर किनारी बसलेले आहात. त्या निळ्या अफाट सागराकडे बघतांना, त्याच्या लाटा अनुभवतांना तुमच्या असं लक्षात येईल की,आपल्या इच्छा, अपेक्षा देखील या लाटेप्रमाणेच आहेत. जशी एक लाट किनाऱ्यावरील वाळूत मिसळली की लगेच दुसरी लाट येते. ती त्या किनाऱ्याशी असलेलं आपलं नातं कधीच तोडत नाही.दरवेळी जणू ती त्याला आलिंगणच देत असते.तसंच इच्छाही आपल्या मनाशी असलेलं नातं कधीच तोडत नाहीत. माणसाचं आयुष्य देखील हे सागरा प्रमाणे असतं. सागराला ज्याप्रमाणे भरती-ओहटी येते ना…तसेच माणसाच्या जीवनात सुख-दुःख येत असतात.
सुखाचा काळ अनुभवतांना तो अल्प तर दुःखाचा काळ डोंगराएवढा मोठा असह्य असा वाटतो,कदाचित या दुःखामुळेच आयुष्यातील गोडवा जाऊन आयुष्य खारट झालेलं असतं.
आपल्या सर्वांचे आयुष्य वरून शांत व मोहक दिसतं पण त्याच्या अंतरंगात अनेक उलथा-पालथ होत असतात, हे त्याचं त्यालाच कळतं पण जो इतरांचे दुःख जाणून घेऊ शकतो त्याच्या भावनांची कदर करतो, जो “सांत्वन” करू शकतो त्याला स्वतःच्या अंतरंगातील दुःख सहज दिसतं .जसं सूर्यप्रकाश तळ्यात पडला की तळ सहज दिसतं ना…तस्स..!!
व्यक्तीपरत्वे स्वभावगुणधर्म वेगळे असु शकतात,काहींना आपलं दुःख कुणाकडे बोलून बरं वाटतं तर काहींना त्या दुःखाचे पापुद्रे काढण्यात, तर काही सहानुभूती मिळविण्याच्या हव्यासापायी….
तर काहींना…,मनात साठवलेलं दुःख कुणाजवळ तरी बोलायचं ठरलेलं असतं पण शब्दच सापडत नाहीत,ते सापडतात एखादया झाडाखाली ,एखाद्या ढगावर, सांजवेळी एखाद्या तळ्यात, कोसळणाऱ्या पावसाच्या सरीत,त्या मंद वाऱ्यात, नयनातून ओघळणाऱ्या अश्रूत ते सतत घरंगळत असतं आणि मन अगदी स्तब्ध होऊन बसतं.
चोहीकडे स्तब्धता, शांतता हदयात मात्र विचारांच काहूर माजलेलं असतं. कारण या विचारांना हृदयाच्या बाहेर पडण्यास वाटच नसते. विजांचा कळकडात,ढगांचा गळगडाटांसह नभ दाटून यावे…धो-धो पाऊस बरसूनही नभांनी मात्र स्वच्छ, निरभ्र न व्हावं…! अशींच काहीशी स्थिती दुःख मनात कोंबून ठेवलेल्यांची असते.
मनातलं मनातच दाटलेलं राहतं आणि मग हे सर्व असह्य झालं की हृदयात कोंडलेल्या दुःखांना, भावनांना कागदावर वाट मोकळी करावी लागते.
आपल्यापैकी बरेच वाचक प्रसिद्ध होणाऱ्या अनेक लेखनांमधून समाधान शोधत असतात. स्व-आयुष्याशी मिळतं-जुळतं काही मिळतं का? “स्व” शोधतांना अनेक महानुभवांनी आपलं आयुष्य वेचलं मात्र “स्व”मिळवायचा असेल तर प्रत्येक गोष्टीत आनंद शोधा, आनंद वाटा…!!
दिलखुलास जगा…!!आयुष्याची सकारात्मकतेणे आनंद-उत्साहात लयलूट करा. मग बघा “दुःख”कसं… मुंगी सारखं अन “सुख” कसं डोंगराएव्हढं भासेल..!!
तेव्हा….
आपल्या हृदयावर हात ठेवून….
हे म्हणायला विसरू नका……
“All is well…!!!”
“दुःखाची दौलत आहे,
हुंदक्याच पीक आहे..,
अश्रू मात्र संपले…,
बाकी सर्व ठीक आहे.”

 

श्री.मनोज वाडेकर (कलाशिक्षक)

उपवासाचे महत्व

आहार शास्त्रामध्ये उपवासाचे महत्व अनन्यसाधारण आहे. ऋतु मानांनुसार आपला आहार असावा असे आहारशास्त्र सांगते. मनुष्याने आपल्या दैनंदिन जीवनात उपवास करावा यासाठी वेगवेगळ्या रूढी- परंपरा च्या माध्यमातून आपल्याला त्याचे महत्व संगितले जाते. उपवासाने आपले शरीर, मन, बुद्धी, आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो.

नवरात्री उत्सवामध्ये अनेक लोक उपवास करतात. उपवास करतात म्हणजे काय करतता ? उपवास कशासाठी करतात ? उपवास कसा करतात ? याचा जर बारकाईने अभ्यास केला तर लक्षात येईल की अनेक लोक उपवास करून आपल्या शरीरावर, मनावर आणि आरोग्यावर अन्याय करतता. यापेक्षा उपास न केलेला बरा असे वाटू लागते.

आरोग्याच्या दृष्टीने उपवास करणे म्हणजे आपल्या दैनंदिन आहारात बदल करणे होय. जामुळे शरीराला आवश्यक तो बदल मिळेल आणि आवश्यक ती  जीवनसत्वे मिळतील. आपआपल्या आवशकते नुसार, क्षमते नुसार, आपण उपास करू शकतो. आठवड्यातला एक दिवस उपाशी राहून , असे शक्य नसेल तर फळ किवा फळाचा रस घ्या, हेही शक्य नसेल तर एक वेळ जेवण करा, कमी जेवा. परंतु उपवासाच्या नावावर नको नको ते खाणे आणि दिवसभर खाणे टाळा.

उपवासाच्या दिवसांमध्ये आपल्या आहारा मध्ये काय असावे हे आपण पाहू –

  • आपल्या आहारात भरपूर प्रमाणात फळांचा उपयोग करावा जेणेकरून आपल्याला आवश्यक असणारे विटामीन आणि खनिजे त्याद्वारे आपल्याला मिळतात.
  • दूध व दुधाचे पदार्थ (ताक,दही,पनीर)इत्यादि पदार्थाचा वापर आपल्या आहारात केल्यास प्रथिने व कॅल्शियम मुबलक प्रमाणात मिळून आपले स्ंनायु बळकट होतील.
  • निंबू पाणी,नारळ पाणी,फळांचा रस यांचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास आपल्या शरीरस आवश्यक असणारे एलेक्त्रोल्यतेस योग्य प्रमाणात मिळते.
  • नवरात्रमध्ये अनेक लोक उपवास करतात. या दिवसात योग्यप्रकारे उपवास केल्याने सकारात्मक परिणाम पाहाला मिळतात.
  • लठ्पणा कमी करण्यासाठी उपवास हा एक छगला पर्याय आहे. योग्य आहार घेऊन या नवू दिवसात वजन नियंत्रणात करू शकता.
  • या दिवसांमध्ये कमी क्यालरीज घेतल्या जातात. त्यामुळे अतिरिक्त क्यालरीज बर्न होण्यास मदत होते.
  • उपवासाच्या दिवसांमध्ये आपण आपल्या आहारात खजूर,अंजीर,मनुका,शेगदाणे, खोबर यासारख्या सुकामेवा व तेलबिया मध्ये असंनार्या पोष्टिक घटकांमुळे आपल्या त्वचेचे व केसांचे सुद्धा आरोग्य चांगले होते.
  • उपवास केल्यामुळे काही सकारात्मक परिणाम पाहावयास मिळतात त्यापाकीच एक म्हणजे आपले वाढलेले  वजन कमी करण्यास मदत होते मात्र त्यासाठी आपला आहार योग्य व योग्य त्या प्रमाणात असावयास हवा .
  • भगर शिंगाडा,उपवास भाजणी,रताळी,लालभोपळला, गूळ–शेंगदाणे,राजगीरा,फळे, सुकामेवा,दूध व दुधाचे पदार्थ इत्यादीचा आहारात समावेश करावा.
  • पण मात्र आपण उपवास करताना आपल्या आहारात तळलेले पदार्थ,चिप्स,साबुदाणा पापड, तळलेला चिवडा,साबूदाण्याची उसळ खूप गोड पदार्थ हे पदार्थ टाळावेत.
  • लहान मुलांनी,गरोदर माता,स्थनदा माता, वृद्ध व्यक्ति,आजारीव्यक्ति,मधुमेह असणारे, हृदयाशीसबधित आजार असणार्‍यांनी उपवास करू नये.

आहारतज्ञ

जया अहेरकर / गावंडे

काळे क्लिनिक आणि स्मितास इन्फेर्तिलीटी सेंटर,

औरंगाबाद

ध्येयनिश्चिती…!!

ध्येयनिश्चिती…!!

“काही माणसं स्वप्नात रमतात, काही वास्तवाशी सामना करतात, पण यशस्वी तेच ठरतात जे प्रयत्न आणि हिमतीने, स्वप्नांना सत्यात उतरवतात…!!”
सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन आयुष्यात कुठलीही गोष्ट मिळविण्यासाठी प्रतिकुल परिस्थितीतही केलेली धडपड तुम्हाला आपल्या निश्चित ध्येयापर्यंत पोहोचवू शकते. मात्र त्यासाठी गरज आहे ती म्हणजे,”ध्येयनिश्चितीची…!!” आज मला त्या विद्यार्थ्यांबद्दल बोलायचे आहे जी फक्त आणि फक्त आपली पुस्तकी शिक्षण घेत आहेत.
औपचारिक-अनौपचारिक शिक्षणातून तो पुढे आपले मार्गक्रमण तर करतो आहे पण आपल्या भविष्यासाठी कुठला मार्ग योग्य हे कदाचित त्याने ठरवलेलंच नसतं किंवा ठरवतांना तो कायम गोंधळातच असतो. खऱ्या अर्थाने ही बाब लागू पडते ती 10 वी ,12वी च्या विद्यार्थ्यांकरीता. या विद्यार्थ्यांसोबत जेव्हा-जेव्हा माझा संवाद झाला तेव्हा-तेव्हा एक बाब मला प्रखरर्षाने जाणवली ती म्हणजे…ध्येयच निश्चित नाही…!! आपल्याला पुढे काय करायचंय, कुठली क्षेत्र आपल्यासाठी योग्य राहील हेच माहीत नाही. क्षेत्र निवडतांना सतत गोंधळलेल्या विद्यार्थ्यांची स्थिती जणू, बस स्टँड, रेल्वे स्टेशन जावं अन कुठल्या गाडीत बसावं हेच माहीत नसावं अशीच असते.
हा काळ त्यांच्यासाठी फार महत्त्वाचा असतो,कारण याच काळात यांना खूप संकटांना सामोरे जावे लागते.

संकट…! हो संकटच…!! म्हणतात…”सोळावं वरीस धोक्याचं…!” ते काही चुकीचं नाही. मानसशास्त्र सांगतं की हा काळ म्हणजे…
“वादळी अशांततेचा काळ..!” या दरम्यान विद्यार्थ्यांमध्ये मानसिक, भावनिक व शारीरिक खूप मोठे बदल होतात, परिणाम स्वरूप भिन्नलिंगी आकर्षण, गटाने राहणे, सुंदर दिसावंस वाटणे, प्रेमात पडणे,नाजूक, हळवा पण तितकाच महत्वाचा काळ.
या काळात तो घडूही शकतो अन बिघडूही…!!
यामध्येच भर पडली आहे ती म्हणजे मोबाईल ची …! हे वेसनच मुलांना जडलंय,आणि त्या मुळेच सर्वकाही नडलंय. हे About Phone काय? ते आत्मविश्वासानं सांगू शकतील मात्र तितक्याच आत्मविश्वासानं…”भविष्यात पुढे काय..?”हे मात्र ते सांगू शकत नाहीत.
यांना 3G, 4G,व PUB G या बद्दल तर सखोल माहिती आहे,मात्र “गांधीजी” बद्दल यांना आठवण करुन द्यावी लागते. गेल्या शैक्षणिक सत्रात पर्यवेक्षक म्हणून 10 वी च्या परीक्षा केंद्रावर असतांना मला एका विद्यार्थ्यावर शंका आली म्हणून मी त्याला सहज उभा करून तपासले, मात्र आक्षेपार्ह असे त्याच्या कडे काहीही नव्हते. परंतु पेपर करीता तो अजिबात गंभीर नव्हता. सतत काहीतरी माकड चाळे करीत तो बसला होता.असे तो का करतोय? याचे उत्तर मला आजही मिळालेलं नाही. पेपर संपल्यावर कोऱ्या पानांवर रेषा ओढतांना मी आवर्जुन या महाशयांचा पेपर बघितला, तेव्हा लक्षात आले की सुरवातीचे काही प्रश्न…. हो…प्रश्नच त्याने लिहून ठेवले होते आणि संपूर्ण पेपर भर त्याने जय…PUB G असे लिहून ठेवले होते. हे सर्व बघितल्यावर मन सुन्नच झालं.
10 वी चं वर्ष आपण ज्याला “टर्निंग पॉईन्ट” म्हणतो…खरं तर यावेळी आपलं भविष्य निश्चित करायचं असतं अन अशावेळी एवढं जाणीवपूर्वक गाफिल आणि बेजवाबदारीने वागणं कितपत योग्य…! असं वागत असतांना त्याच्या चेहऱ्यावर मला एका क्षणालाही दुःख,किंवा अपराधी पणाची भावना दिसली नाही. अपराधी भावना हा शब्द मी आवर्जून इथे वापरला कारण, प्रत्येक मुलांना त्यांचे आई-वडील अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतात,त्यांचे लाड-हट्ट पुरवितात,अश्यावेळी जर त्यांनी मुलांना गृहीत धरून पुढील सुखी-समृद्ध भविष्याचे स्वप्न रंगवीले असतील तर यात वावगं असं काय?मुलांच्या शिक्षणाकरीता त्यांच्या भौतिक सुखाकरिता त्यांनी राब राब राबवं…आणि मुलांनी त्यांचा अपेक्षाभंग करावा,हा अपराधच आहे.
मुला-मुलींनी दिलखुलास जगावं,स्वच्छदपणे वागावं,निर्भीड राहावं आणि हिमतीने आपल्या निश्चित ध्येयाला गाठावं …!!आपले आई-वडील आणि गुरुजनांच्या विश्वासास पात्र ठरून आपले विद्यार्थीदशेतील कर्तेव्य मात्र निमूटपणे पार पाडावे.
विद्यार्थी दशेत आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहून आपल्या अभ्यासाशी प्रामाणिक राहावं आणि यादरम्यान कुठल्याही भावनिक गोष्टींच्या आहारी न जाता आपल्या कार्याला सकारात्मक कृतीची जोड देऊन अधिकाधीक टक्केवारी घेण्यासाठी प्रयत्न करावा.कारण सद्यस्थितीत शिक्षण प्रणालीत फार मोठे बदल झाले आहेत,तसेच विद्यार्थ्यातही…!स्पर्धा खूप वाढली आहे आणि या स्पर्धेत टिकायचे असेल तर तुम्हाला एक सर्वगुणसंपन्न विद्यार्थी बनुनच उभं रहावं लागेल.अन्यथा या स्पर्धेच्या प्रवाहातून तुम्ही बाहेर कधी फेकले जाल, हे कळणार देखील नाही.
म्हणून सर्वप्रथम तर आपलं ध्येयनिश्चित करा…! आणि ते मिळविण्यासाठी सतत प्रयत्नशिल राहा,अडचणींशी दोन हात करायलाही मागे हटू नका.
“भावनेवर आयुष्य निभत नाही,तत्कालीन वेळ निभते, पण आयुष्य काढायचं असेल तर व्यवहारीक दृष्टीनं विचार करा आणि कामाला लागा…!!”

श्री.मनोज वाडेकर
अकोला महाराष्ट्र @२६/०९/२०१९

नवरात्री उत्सवाच्या सर्व वाचकांना शुभेच्छा

या शरद नवरात्रात आई भवानी आपणा सर्वांना सुख समृध्दी, सुरक्षा व वैभव देवो. तसेच या काळात जे साधक साधना करीत असतील त्यांचेवर आई भवानी प्रसन्ना होवो ही आईच्या चरणी प्रार्थना.

नवरात्र हा साधनेचा काळ आहे.

नवरात्र हा आराधनेचा काळ आहे.

नवरात्र हा आपल्यासाठी दुर्गामातेने केलेल्या अहोरात्र युध्दाच्या स्मृती कायम ठेवण्याचा काळ आहे. आजही आपल्या आतील महिषासुराच्या मर्दनासाठी आणि जगत्जननी तीची कृपा अहोरात्र आपल्यावर कायम ठेवो ही लोकसंवाद.कॉम तर्फ़े शुभकामना.