मुकेश अंबंनींनी राखले पहिले स्थान

0

मुकेश अंबंनींनी राखले पहिले स्थान

आयआयएफएल वेल्थ हुरून इंडिया ने चालू वर्षातील भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. यादीसाठी ९५३ व्यक्तींनी कमीत कमी  १ हजार कोटी रुपये संपतीचा उंबरठा ओलांडला आहे. असे आयआयएफएल वेल्थ आणि हरून रिपोर्ट ने आपल्या ८ व्या प्रकाशित केलेल्या अहवालात म्हटले आहे.

या अहवालातील पहिले दहा व्यक्ति होण हे आपण पाहूया.

  1. मुकेश अंबानी, चेअरमन रिलायन्स इंडस्ट्रिज लि. यांनी या यादीत आज पर्यंतच्या आठ प्रकाशित झालेल्या अहवालात आपले प्रथम स्थान कायम ठेवले असून यांची संपत्ति ३,८०,७०० कोटी रुपये एवढी आहे. जिओ लोंचिंग मुळे रिलायन्स ही टेलिकॉम क्षेत्रातील एक अग्रगण्य कंपनी म्हणून ओळखली जाते.

 

  1. एस पी हिंदुजा आणि परिवार, चेअरमन हिंदुजा ग्रुप. यांनी सुद्धा या यादीत आपले दुसरे स्थान पटकावले असून  यांची संपत्ति तब्बल १,८६,५०० कोटी रुपये आहे. ही कंपनी इम्पोर्ट अक्स्पोर्त, ट्रेडिंग, मोटर वाहन, कॉल सेंटर, हेल्थ केअर आणि बँकिंग क्षेत्रातील अग्रणी कंपनी आहे.

 

  1. अजीम प्रेमजी, चेअरमन विप्रो लि. ने या यादीत तिसरे स्थान प्राप्त केले आहे. यांची संपत्ति १,१७,१०० कोटी रुपये आहे. विप्रो ही कंपनी सॉफ्टवेअर आणि टेक्नॉलॉजी मध्ये जगातविख्यात कंपनी आहे.

 

  1. लक्ष्मी मित्तल आणि परिवार, चेअरमन आरसेलर मित्तल. यांनी आपल्या १,०७,३०० कोटी रुपये संपत्ती सह आपले चौथे स्थान घेतले आहे. ही कंपनी जगातली एक नावाजलेली स्टील निर्माता कंपनी म्हणून ओळखली जाते.

 

  1. गौतम अडाणी आणि परिवार, अडाणी ग्रुप. यांची संपत्ती ९४,५०० कोटी रुपये असून हे या यादीत पाचव्या स्थानावर आहेत. अदाणी ग्रुप हा वीज निर्माता, रियल इस्टेट, कामोडेटीज, कोल आणि फोर्ट मध्ये काम करणारी अग्रणी कंपनी आहे.

 

  1. उदय कोटक, सिईओ आणि एमडी, कोटक महिंद्रा बँक. हे या यादीत सहाव्या स्थानावर असून यांची संपत्ती ९४,१०० कोटी रुपये आहे. कोटक महिंद्रा बँक ही एक अग्रणी खासगी बँक आहे.

 

  1. सायरस एस पूनावाला, चेअरमन पूनावाला ग्रुप. हे सातव्या स्थानावर असून संपत्ती ८८,८०० कोटी रुपये इतकी आहे. पूनावाला ग्रुप मधील सिराम इंस्टीट्यूट हे लहान मुलांचे लसीकरण निर्माण करणारी मोठी कंपनी आहे.

 

  1. सायरस पालोमजी मिस्त्री, शापुरजी पालोनजी ग्रुप. हे आणि शापुर पालोनजी मिस्त्री, शापुरजी पालोनजी ग्रुप. हे दोघेही एकाच स्थानावर आहेत. दोघांचीही संपत्ती ७६,८०० कोटी रुपये आहे.

 

  1. 8/9 शापुर पालोनजी मिस्त्री, शापुरजी पालोनजी ग्रुप. संपत्ती ७६,८०० कोटी रुपये. बांधकाम, टेक्स्टाइल, होम आपलायन्सेस,     शिपिंग, पब्लिकेशन, ऊर्जा आणि बायोटेक्नॉलॉजी अशा विविध क्षेत्रात कार्यरत शापुरजी पालोनजी हा ग्रुप कार्यरत आहे.

 

  1. दिलीप संघवी, सन फार्मा. हे दहाव्या स्थानावर असून यांची संपत्ती ७१,५०० कोटी रुपये आहे. सन फार्मा ही कंपनी  जागतिक चौथ्या स्तरावरील जनेरीक निर्माता कंपनी आहे.

 

टिम- लोकसंवाद.कॉम

 

आईचे दुध बाळासाठी अमृत

आईचे दुध बाळासाठी अमृत…!

आईचे दुध आपल्या बाळासाठी अमृत आहे. जन्मतःच बाळाला स्तनपान केले पाहिजे जामुळे बाळ निरोगी राहून त्याची रोगप्रतिकार शक्ती वाढते. अनेक माता गैरसमज बाळगून बाळाला स्तनपान करत नाहीत हि चुकीची बाब आहे. काही  सर्वेक्षणातून तर असे लक्षात आले आहे कि अनेक माता आपल्या फिगर च्या काळजी साठी सुद्धा आपल्या बाळाला स्तनपान करत नाहीत. असे केल्यानी त्या खरोखरच जन्मतः आपल्या  बाळावर अन्यायच करतात आणि आपल्अया बाळाला त्सेयाच्या हक्कापासून वंचित ठेवतात असे  म्हणावे लागेल.

पूर्वीपासून विज्ञानाने स्तनपानाचे महत्व मान्य केले आहे. स्तनपानाचे थोडक्यात महत्व पाहू – 

  • आईचं दूध हे बाळासाठी अमृत असतं.
  • बाळासाठी हे दूध पूर्णान्न आहे.
  • आईचं दूध र्निजंतुक असतं. त्यामुळेच बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
  • पहिल्या दोन-तीन दिवसात येणारे चीक दूध बाळासाठी पौष्टिक असतं.बाळाला 6 महीने पर्यन्त आवश्यक असणारे सर्व पोष्टिक घटक आईच्या दुधात असतात .
  • स्तनपान केल्याने स्तन आणि गर्भाशयाचा कॅन्सर होण्याचा धोका खूप प्रमाणात कमी होतो.
  • आई आणि बाळाचे नाते भावनिकरीत्या घट्ट होते. बाळ आपल्या आईला खूप लवकर ओळखायला लागते.
  • स्तनपान करताना अधिक कॅलरीज वापरल्या जातात. यामुळे नैसर्गिकरित्या वजन कमी होते आणि जाडेपणापासून सुटका होण्यास मदत होते.
  • त्याचबरोबर स्तनपान करणे हे नैसर्गिक गर्भनिरोधक आहे.
  • रक्तस्त्राव या समस्यांवर लवकर नियंत्रण मिळवता येते.
  • स्तनपान केल्याने प्रेग्नेंसीनंतर उद्भवणाऱ्या समस्यांपासून सुटका मिळते.
  • मातेच्या दुधामध्ये अनेक पोषक घटकदव्ये असतात , त्यामुळे बालकाचे शारीरिक ,बौद्धिक मेदू तल्लख बनतो , स्मरण शक्ति वाळते ,मानसिक विकास होण्यास स्तनपणमुळे मदत होते.

असे असंख्य फायदे हे स्तनपानाने आईला  व बाळाला होतात त्यामुळे सर्व मातांना माझा सल्ला राहील कि आपल्या बाळाला निरोगीठेवाण्यासाठी स्तनपान जरूर करा.

 

 

आहारतज्ञ

जया अहेरकर-गावंडे

काळे क्लिनिक आणि स्मिताज इन्फर्टीलीटी सेंटर,

औरंगाबाद

महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक जाहीर.

0

महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक जाहीर.

महाराष्ट्रात आणि हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीसाठी  निवडणूक आयोगाने आदर्श आचारसाहिता लागू करून  निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. दोन्हीही राज्यात २१ ओक्टोंबर ला मतदान होऊन २४ ओक्टोंबरला निकाल जाहीर होणार आहे. 

महाराष्ट्रात विधानसभेच्या  २८८  मतदार संघासाठी एकाच टप्यात निवडणूक होणार असून महाराष्ट्र  राज्यात ८ कोटी ९४ लाख ६२हजार ७०६ एकूण मतदार नोंदणी झाली आहे. या निवडणुकीसाठी ९५ हजार ४७३ मतदान केंद्र असून त्या ठिकाणी १.०८ लाख ई व्ही एम चा वापर होणार आहे. 

  • उमेदवारी अर्ज दाखल करणे – २७ सप्टेंबर ते ०४ ओक्टोंबर. 
  • अर्जाची छाननी   – ०५  ओक्टोंबर.
  • उमेदवारी अर्ज मागे घेणे  – ०७ ओक्टोंबर .
  • प्रचाराचा शेवटचा दिवस  – १९ ओक्टोंबर.  
  • मतदान (संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी ) – २१ ओक्टोंबर.
  • निवडणूक निकाल  – २४ ओक्टोंबर.

आचारसाहितेचे काटेकोर पालन करावे तसेच राजकीय पक्षांनी प्रचार मोहिमेत प्लॅस्टिकचा वापर टाळून पर्यावरण पूरक साहित्यांचा वापर करावा असे आवाहन मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्यात लोक शाहीचा महोत्सव जाहीर झाला असून प्रत्तेक नागरिकाने त्यात सहभागी व्हावे व आपला अधिकार व कर्तव्याचा वापर करावा अशी विनती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

  • टिम लोकसंवाद 

 

 

कोटीच्या कोटी उड्डाणे …..!

                 

                मोदी सरकारच्या पहिल्या आणि दुसऱ्या कारकिर्दीकडे पहिले तर असे लक्षात येईल कि, देशाची आहे त्यापेक्षा जास्त चांगली उन्नती साधण्यासाठी नेमके काय  प्रयत्न करावे लागेल, कोण्या दिशेला कार्य करावे  लागेल याची ब्लू- प्रिंट या मोदी सरकारकडे तयार आहे. असे म्हटले तरी हरकत नाही. मोदी सरकारच्या पहिल्या काळात आणि म्हटलेतर दुसऱ्या कारकिर्दीत सुद्धा जा प्रमाणात पंतप्रधान मोदींनी  विविध देशांचे विदेश दौरे केले, विदेश नितीवर भर दिला आणि आतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा जा प्रमाणे उंचावण्याचे काम केले ते खरोकारच वाखाण्याजोगे आहे. मोदींच्या विदेश दौर्याबद्दल उपहासात्मक अनेक वेळा टीका झाल्यात परतू जा प्रमाणे विदेशी भारतीय नागरिकांनी मोदींचे स्वागत त्यांच्या धरतीवर केले हे सुद्धा विसरून चालणार नाही. भारत देश हा जगाच्या शांतीसाठी बांधील आहे तसेच सर्व प्रकारच्या संकटाना तोंड देण्यासाठी आणि आपली प्रगती साधण्यासाठी सुद्धा सक्षम आहे हि प्रतिमा जगापुढे प्रस्थापित करण्यात या सरकारचा मोठा वाटा आहे असे समजले जाईल. जगातील अनेक देश भारतासोबत व्यावसायिक संबध प्रस्थापित करण्यास, मैत्री करण्यास इच्छुक आहेत आणि काही देश भारताच्या कणखर नेतृत्वा पासून सतर्क आहेत. भारतीय जनतेने निवडून दिलेले कणखर नेतृत्व आणि त्यामुळे संपूर्ण जगात निर्माण झालेली भारताची आश्वासक, विश्वासहार्य आणि सकारात्मक प्रतिमा यामुळे जनता निश्तितच समाधानी आहे. जगातील विविध देशाने घेतालेली भारताच्या नेतृर्वाची दखल हि वाखाण्याजोगी आहे. अनेक देशांनी मोदींना विविध पुरस्काराने सन्मानीत केले आहे. मोदींच्या रूपाने हा संपूर्ण भारतीयांचाच  सन्मान आहे असे म्हणावे लागेल.

    • आंतराष्ट्रीय स्थरावरील भारताचे प्रधानमंत्री  मोदींना मिळालेल्या काही पुरस्कार पाहूयात.

 

  • संयुक्त अरब अमीरात (यूएई) ने ०४ अप्रैल २०१९ ला प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांना आपल्या  सर्वोच्च नागरिक सम्मान ‘जायेद मेडल’ ने सन्मानीत केले आहे. हा पुरस्कार प्राप्त करणारे मोदी हे पहिले भारतीय आहेत.
  • प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना 14 जनवरी 2019 रोजी नवी दिल्ली येथे पहिल्यांदा फिलिप कोटलर प्रेसिडेंसियल सम्मान देऊन सम्मानित करण्यात आले. देशाला उत्कृष्ट नेतृत्व प्रदान केल्या बद्दल हा पुरस्कार देण्यात आला. प्रत्तेक वर्षी एका  राष्ट्रीय नेत्याला आपल्या कार्याबद्दल हा पुरस्कार दिल्या जातो.
  • सियोल शांति पुरस्कार-2018 चे चेयरमैन क्वॉन ई-हायोक  यांच्या अध्यक्षते मध्ये  सियोल चे जंग-यू मध्ये झालेल्या चयन समिति च्या बैठकी नंतर  24 ओक्टोंबर 2018 ला निर्णय झाला कि भारता मधील श्रीमंत आणि  गरीब यांच्या मध्ये  सामाजिक आणि  आर्थिक अंतर कमी करण्याच्या हेतूने  प्रधानमंत्री मोदी यांना सराहनीय कार्य केल्या बद्दल त्यांना  सियोल शांति पुरस्कार देण्यात आला.
  • प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना सप्टेंबर 2018 ला संयुक्त राष्ट्र चा सर्वात मोठा पर्यावरण सम्मान देण्यात आला . यूएन ने मोदी आणि  फ्रांसीसी राष्ट्रपति एमैनुएल मैक्रों यांना संयुक्त  ‘चैंपियंस ऑफ द अर्थ’ या अवॉर्ड से सम्मानित केले.
  • प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना 10 फेब्रुवारी  2018 रोजी फिलिस्तीन मध्ये ‘ग्रैंड कॉलर’ सम्मान फिलिस्तीन चे  राष्ट्रपति महमूद अब्बास यांनी देऊन  सम्मानित केले. हा  पुरस्कार फिलिस्तीन च्या वतीने  परदेशी पाहुण्यांना देण्यात येणारा फिलिस्तीन चा सर्वश्रेष्ठ सम्मान आहे.
  • प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांना 04 जून 2016 रोजी अफगानिस्तान चा  सर्वोच्च नागरिक सम्मान आमिर अमानुल्लाह खान पुरस्कार देऊन सम्मानित करण्यात आले. ऐतिहासिक अफगान-भारत मैत्री बांध च्या  उद्घाटना नंतर राष्ट्रपति अशरफ गनी द्वारा प्रधानमंत्री मोदी यांना हा सम्मान देण्यात आला.
  • प्रधानमंत्री मोदी यांना  03 एप्रिल  2016 रोजी सऊदी अरब चा सर्वोच्च नागरिक सम्मान किंग अब्दुलअजीज सैश ने सम्मानित करण्यात आले.

 

नितीन राजवैद्य,

मुख्य संपादक, लोकसंवाद.कॉम

अथर्वशीर्ष बाबत

गणपती उत्सवा निमित्त जाणून घेऊया अथर्वशीर्ष बाबत

मुळारंभ, विघ्नहर्ता, सुखकर्ता, बुध्दीची देवता श्रीगणपतीच्या उपासने साठी अथर्वशीर्ष चे पठण केले जाते. विशेष उपासनेसाठी ११, २१, १०८, १००० आवर्तने करण्याचा प्रघात आहे.
थर्व म्हणजे हलणारे आणि
अथर्व म्हणजे ‘ न हलणारे
शीर्षम् ‘ !!

सोप्या भाषेत सांगायचे झालेच तर अथर्वशीर्ष म्हणजे स्थिर बुद्धी असलेलं मस्तक…!
अथर्वशीर्षाचे स्तवन केले, की
बुद्धी आणि मन स्थिर होऊन वर्तमानातील शरीराशी एकरूप होऊन कार्य करते, त्यामुळे मोठ मोठे संकटांवर मात करण्याची शक्ती मिळते आणि मोठ मोठे कार्य सिद्धीस जातात अशी
श्रीगणेश भक्तांची श्रद्धा आहे.

स्थिर आणि निश्चयी बुद्धीने केलेलं
कार्य हे नेहमी यशस्वी होते.
आत्मविश्वास वाढू लागतो, माणूस नम्र होतो. सुविचारी होतो. निश्चयी होतो. असा अनुभव आहे.

अथर्वशीर्षाचा अर्थ –

मूळ श्रीगणपती अथर्वशीर्ष हे
संस्कृतमध्ये हजारो वर्षे पूर्वी रचलेले आहे. आपण आज
त्याचा मराठी अनुवाद पाहूया.

‘हे देवहो, आम्हांला कानांनी
शुभ ऐकायला मिळो. डोळ्यांनी
चांगलं पाहावयास मिळो.

सुदृढ अवयवांनी आणि शरीरांनी
देवानं (निसर्गानं) दिलेलं आयुष्य
देवाच्या (निसर्गाच्या) स्तवनांत
व्यतीत होवो.

सर्वश्रेष्ठ इंद्र आमचं रक्षण करतो.
ज्ञानवान सूर्य आमचं कल्याण
करतो. संकटांचा नाश करणारा
गरूड आमचं कल्याण करतो.
बृहस्पती आमचं कल्याण करतो.
सर्वत्र शांती नांदो…!!

ॐकाररूपी गणेशाला नमस्कार
असो. तूच ब्रह्मतत्त्व आहेस.
तूच सकलांचा कर्ता (निर्माता)
आहेस. तूच सृष्टीचे धारण
करणारा, पोषण करणारा आहेस.
तूच सृष्टीचा संहार करणाराही
आहेस. हे सर्व ब्रह्मस्वरूप
खरोखर तूच आहेस. तूच नित्य
प्रत्यक्ष आत्मस्वरूप आहेस.

मी योग्य तेच बोलतो, मी खरं
तेच बोलतो. तू माझे रक्षण कर.
तुझ्याबद्दल बोलणाऱ्या माझं,
तू रक्षण कर. तुझे नांव श्रवण
करणाऱ्या माझं तू रक्षण कर.
दान देणाऱ्या अशा माझं तू
रक्षण कर. उत्पादक अशा,
माझं तू रक्षण कर. तुझी
उपासना करणाऱ्या शिष्याचं
रक्षण कर.

माझं पश्चिमेकडून रक्षण कर.
माझं पूर्वेकडून रक्षण कर.
माझं उत्तरेकडून रक्षण कर.
माझं दक्षिणेकडून रक्षण कर.
माझं वरून रक्षण कर.
माझे खालून रक्षण कर.
सर्व बाजूनीं, सर्वप्रकारे तू
माझं रक्षण कर.

तू वेदादी वाड॒.मय आहेस.
तू चैतन्यस्वरूप आहेस.
तू ब्रह्ममय आहेस.
तू सत् , चित् , आनंदस्वरूप,
अद्वितीय आहेस.
तू साक्षात ब्रह्म आहेस.
तू ज्ञानविज्ञानमय आहेस.

हे सर्व जग तुझ्यापासूनच
निर्माण होतं. हे सर्व जग
तुझ्या आधारशक्तीनेच
स्थिर राहातं.
हे सर्व जग तुझ्यातच लय पावतं,
हे सर्व जग पुन्हा तुझ्यापासूनच
उत्पन्न होतं.

पृथ्वी, पाणी, अग्नी, वारा आणि
आकाश ही पंचतत्त्वे तूच आहेस.
तसेच परा, पश्यन्ती, मध्यमा
आणि वैखरी या चार वाणी तूच
आहेस.

तू सत्त्व, रज आणि तम या
तीन गुणांपलीकडचा आहेस.
तू स्थूल, सूक्ष्म आणि आनंद
या तीन देहांपलीकडचा आहेस.

तू भूत, वर्तमान आणि भविष्य
या तीनही काळांच्या पलीकडचा
आहेस. तू सृष्टीचा मूल आधार
म्हणून स्थिर आहेस.

तू उत्पत्ती, स्थिती आणि लय
या तीनही शक्तींच्या पलीकडचा
आहेस. योगी लोक नेहमी तुझं
ध्यान करतात.

तूच ब्रह्मा,तूच विष्णू, तूच रुद्र,
तूच इंद्र, तूच भूलोक, तूच
भुवर्लोक, तूच स्वर्लोक आणि
ॐ हे सर्व तूच आहेस.

गण शब्दातील आदि ‘ ग् ‘
प्रथम उच्चारून नंतर ‘अ ‘चा
उच्चार करावा. त्यानंतर
अनुस्वाराचा उच्चार करावा.
तो अर्ध चंद्राप्रमाणे असावा.
तो तारक मंत्रानं ॐ कारानं
युक्त असावा. हा संपूर्ण मंत्र
‘ॐगं ‘ असा होतो.

हे तुझ्या मंत्राचं स्वरूप आहे.
‘ग्’ हे मंत्राचे पूर्व रूप आहे.
‘ अ’ हा मंत्राचा मध्य आहे.
अनुस्वार हा मंत्राचा कळस आहे.
अर्धचंद्राकार बिंदू हे उत्तर रूप
आहे.

या गकारादी चारांपासून एक नाद
तयार होतो. हा नादही एकरूप
होतो. ती ही गणेशविद्या होय.

या मंत्राचे ऋषी ‘ गणक ‘ हे होत.
‘निचृद् गायत्री ‘ हा या मंत्राचा छंद
होय. गणपती ही देवता आहे.

‘ॐ गंं ‘ ह्या मंत्ररूपानं दर्शविल्या
जाणाऱ्या गणेशाला माझा
नमस्कार असो.

आम्ही त्या एकदंताला जाणतो.
त्या वक्रतुण्डाचं ध्यान करतो.
म्हणून तो गणेश आम्हाला
स्फूर्ती देवो.

ज्याला एक दात असून पाश,
अंकुश व दात धारण केलेले तीन
हात आणि वर देण्यासाठी चौथा
हात आहे. ज्याचे उंदीर हे वाहन
आहे. ज्याच्या शरीराचा रंग लाल
असून पोट मोठे आहे, कान
सुपासारखे आहेत, ज्याने लाल
रंगाची वस्त्रे परिधान केली आहेत,
अंगाला लाल चंदन लावले आहे,
ज्याची लाल रंगाच्या फुलांनी पूजा
केली आहे, भक्तांविषयी पूर्ण दया
असलेला, अविनाशी, सृष्टीच्या
आधी निर्माण झालेला,
प्रकृतिपुरुषाहून वेगळा असलेला,
अशा गणेशाचे जो ध्यान करतो,
तो सर्व योग्यांमध्ये श्रेष्ठ होय.

व्रतधारिणांच्या प्रमुखांना,
व्रातपतीस नमस्कार असो.

देवसमुदायांच्या अधिपतीला
नमस्कार असो,

शंकरगणसमुदायाच्या
अधिपतीला प्रमथपति
नमस्कार असो,

लंबोदर, एकदंत, विघ्ननाशी,
शिवपुत्र, वरदमूर्ती अशा
गणपतीला माझा नमस्कार
असो.

-नितीन राजवैद्य
-मुख्य संपादक – लोकसंवाद.कॉम

नांदा सौख्यभरे

?”नांदा सौंख्य भरे….!!”?

  • “तुझ्या कुंकूवाशी माझं नातं
    जन्मोजन्मी असावं,
    मंगळ सुत्र गळ्यात घालतांना
    तु डोळ्यात पाहून हसावं,
    कितीही संकटे आली तरी तुझा हात
    माझ्या हाती असावा,आणि
    मृत्यूलाही जवळ करताना देह
    तुझ्या मिठीत असावा…..!”
    अश्या भरभक्कम शब्द सुमनांच्या गजऱ्यासह सुरू झालेला संसार काही दिवसातच….त्या माळलेल्या गजऱ्यातील प्रेम,जिव्हाळा, आत्मीयता आणि ओढरूपी सुमने कधी गळून पडतात हे आजच्या नवदापत्यास कळतच नाही. आजकालच्या नवविवाहित्यांच्या आशेच्या नवकिरणांनी,स्वप्नांच्या झोपाळ्यावर, दोघांनी गिरक्या घेत सुरू केलेला संसाररूपी प्रवास एखाद्या चित्रपटाच्या सुंदर आणि देखण्या “ट्रेलर” सारखाच असतो.प्रथमदर्शनी तो फार हवाहवासा मनाला भुरळ घालणारा व अनामिक ओढ लावणारा असतो मात्र प्रत्यक्षात कदाचित तुमचा अपेक्षाभंगही होऊ शकतो.मग तुमचं आपलं नेहमीचं ठरलेलं उत्तर “अरे…,यार..थोडं थांबलो असतो तर..बरं झालं असतं..!!”
    माझ्या मते आजच्या शिक्षित नव जोडप्यांना सद्यस्थितीतील धकाधकीच्या व स्पर्धेच्या काळात एकमेकांना समजून घेणे आणि समजून सांगणे यातील योग्य सांगडच घालता येत नाही.व त्या मध्ये भर पडलेली असते ती घरामधील वरिष्ठांची. ही मंडळी जर जुन्या विचार सरणीची असेल तर मग विचारूच नका…!! तेव्हा या दोघामधील प्रेम-बीम राहतं बाजूला, अन नवरा ऑफिस मधून घरी आला की रोज नवा अध्याय सुरू झालाच म्हणून समजा..!
    काही जोडपी याला अपवाद असू शकतात. मात्र तरीही,
    “तू मला पूर्वी सारखा वेळच देत नाही..!”
    “तुझं माझ्यावर प्रेमचं राहिलेलं नाही..!”
    “किती दिवस झालेत आपण कुठे फिरायला पण गेलो नाहीत..!”
    “मला फक्त का घरी मोलकरीण म्हणून आनलस..!”
    “तुम्ही दिवसभर घरा बाहेर असता,आणि मला इथे काय-काय म्यानेज करावं लागतं..!!” वगैरे- वगैरे अश्या कितीतरी प्रश्नांची यादीचं बहुदा घरांमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरूपात तयार असते.
    “नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे,
    कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा
    शोध घेत बसलात,
    तर आयुष्यभर एकटे राहाल.”
    म्हणून एकमेकांना समजून घेणे फार महत्त्वाचे आहे,आणि समजून घेण्याची जवाबदारी ही केवळ एकाची नाही तर दोघांचीही आहे.
    पुरुषप्रधान संस्कृती असल्यामुळे लग्नानंतर भविष्यातील सुखी आयुष्याची तरतूद करत असताना कदाचित संसाराकडे दुर्लक्ष होतं आणि नको-नको त्या तक्रारी तोंड वर काढायला लागतात. म्हणूनच तर कामा व्यतीरिक्तही नातं जपणं आपण शिकलो पाहिजे. यामध्ये पुरुषाचा रोल हा फार महत्वाचा असतो,कारण आपल्या आई- बाबांना त्यांच्या इच्छा -आकांक्षाना सांभाळत तितक्याच अलगदपणे आपल्याला अर्धांगिनीचे हृदय सांभाळता आले पाहिजे. असंख्य स्वप्न उराशी बाळगून तीही आपलं घर सोडून तुमच्या आयुष्यात आलेली असते व वेळोवेळी अगदी ठामपणे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याची हिम्मत ती ठेवते.
    असं म्हणतात….
    “नातं कप-बशी सारखं असावं
    एकातून सांडलं तर
    दुसऱ्यानं सांभाळाव.”
    सरते शेवटी एवढंच सांगेल तुमच्या दोघातील गोडवा कमी होऊ देऊ नका.एकमेकांना सांभाळून घ्या, लहान-मोठ्या तक्रारीचे निरसन दोघांनी मिळून करा.
    कधी अचानकपणे घरी पोहचा ,दारावरची बेल वाजवा..!दार उघडताच क्षणीं आपल्या आयुष्यभऱ्याच्या प्रियसीच्या चेहऱ्यावरील आनंद बघा..!,कधी अचानक मन सुवासीत करणारा “गजरा” तिच्या जुळ्यात माळा. कधी चार चौघात तिच्या अंगावर स्तुती-सुमने स्वच्छदपणे उधळून टाका..!आणि बघा ती कशी लाजरी-बुजरी होऊन स्वतःला जगातील सुखी,आनंदी व समाधानी स्त्री समजेल. हेच महत्वाचं…!!आयुष्य तर सगळेच जगतात हो..!पण त्यामध्ये सुख,समाधान,आत्मीयता, जिव्हाळा, प्रेम,आर्तता नसेल तर काय.?
    सर्व निरर्थक.!!!
    आपल्या सुखी संसारात तक्रारींना थारा देऊ नका,सुख- दुःखाशी दोन हात करत पुढे चला.
    “झोपाळा जेवढा मागे जातो तेवढाच, तो पुढे देखील येतो,
    सुख आणि दुःख दोन्ही जीवनात बरोबर येतात.
    जीवनाचा झोपाळा मागे गेला म्हणून घाबरू नका,
    तो पुढेही तितकाच येईल.” आणि…

म्हणूनच तर….”नांदा सौंख्य भरे…!!!”??

  • श्री.मनोज वाडेकर(कलाशिक्षक)

श्रावण विशेष – कोण्डेश्वर महादेव.

प्रत्येक धर्म संस्कृती मध्ये विविध सण, वार,उत्सवाचे आपले एक वेगळेच महत्व असते. आपल्या धर्मा मध्ये सुद्धा श्रावण मास म्हणजेच श्रावण महिन्याला एक अनन्य साधारण असे महत्व आहे. यामहिन्यात विशेष करून देवाधी देव महादेवाची विशेष पुजा अर्चा केली जाते.
देशभरामध्ये मोठ्या उत्साहात महादेवची आराधना, उपासना या निमित्ताने केली जाते.
त्याअनुषंगाने आपण पाहणार आहोत विदर्भातील अमरावती येथील पाच हजार वर्षा पूर्वीच्या श्रीक्षेत्र कोण्डेश्वर महादेवाची महती.
अमरावती शहारच्या बाहेर पूर्व दिशेला थोड्या डोंगराळ भागात वसलेले हे महादेव मंदिर परिसरातील व देशभरातील हजारो भक्तांचे श्रद्धास्थान आहे. अतिशय देखणे काळ्या पाशाणातील हेमाडपंथी मंदिर मोठ्या दिमाखात उभे आहे. त्याचप्रमाणे मदिरातील अतिप्राचीन महादेवची पिंड पाहताक्षणी आपल्याला नतमस्तक व्हायला भाग पाडते. समोरच मोठा नक्षीदार नंदी आपले लक्ष वेधतो. परिसरातच सुंदर गणपतीची मूर्ति सुद्धा आहे. हजारो वर्षापासून इथे भगवान महादेवची पुजा अर्चा केली जाते. या ठिकाणच्या इतिहासाचा शिलालेख आपल्याला पाहाला मिळतो..

पौराणिक माहात्म्य –

प्राचीन काळातील भरत नावाच्या राजामुळे आपल्या देशाला भारत असे नाव मिळाले. भरताच्या भावाचे नाव विदर्भ, त्यांच्या वाट्याला आलेला प्रदेश म्हणजे विदर्भ प्रदेश. विदर्भ राजा हा काशी क्षेत्राजवळील ब्रम्हवर्त येथील मूळ निवासी होते. या शिवभक्त विदर्भ राजाने स्थापत्य विशारद कौडीण्य मुनीस काशिवरून बोलावून सुमारे ५००० वर्षापूर्वी आपल्या नव्या विदर्भ प्रदेशात भगवान शंकरच्या पिंडीची स्थापना केली. कौंडण्यमुनीच्या नावावर या महादेवाला कोण्डेश्वर असे नाव देण्यात आले.  ११ व्या शतकातील यादव घराण्यातील श्री रामदेवराय यादव व श्री कृष्णदेवराय यादव यांच्या राजसत्तेच्या काळातील त्यांचे पंतप्रधान हेमाद्रिपंत यांनी राजसत्तेच्या खर्चाने सुमारे 15 फुट उंचीचे हेमाडपंथी मंदिर बांधून दिले. भोसले घराण्याने व मध्यावरव पेशव्यांनी या मंदिराची जोपासणा केली.  बडनेरा येथील सत्पुरुष वं दादाशास्त्री भाडेकर यांच्या प्रेरणेने 1904 मध्ये मंदिराचे 71 फुट बांधकाम, सभामडप, चार मुख्य द्वार व इतर बांधकाम जिर्णोधार समितीच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आले.
दरम्यानच्या काळात भगवान कोण्डेश्वरच्या दर्शनासाठी या ठिकाणी देशभरातून अनेक साधुसंत, सत्पुरुष व भक्त येऊन गेलेत व आज सुद्धा येत राहतत आणि भगवान महादेवाच्या दर्शनाचा, पूजेचा लाभ घेतात.

  • नितिन राजवैद्य.
  • मुख्य संपादक, लोकसंवाद.कॉम

एक विलक्षण अनुभव पंढरीच्या वारीचा.

अगदी आजही वारीत असल्याचाच भास होतो. ‘माउली पुढे चला’ म्हणत वाट शोधणारे आम्ही. वारीत सहभागी होणारा प्रत्येकजण सकारात्मक आयुष्याची, समाधानाची वाट शोधत असतो. मिळेल ती वाट पकडायची आणि समोर चालत राहायचं. कारण ध्येय ठरलेलं असत. आत्मविश्वास असतो. त्यामुळे लहानग्यांपासून ते जेष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकजण वारीत स्वतःची ओळख पुसून टाकत फक्त वारकरी म्हणून सहभागी झालेला असतो. त्यामुळेच असेल कदाचित, पण वारीत प्रत्येकाचं वय समान वाटतं, अवघा भारत एकरूप वाटतो. एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी झालेले वारकरी मनात घर करतात. त्यामुळे आपसूकच त्यांच्याविषयी आदर वाढतो, प्रेम वाढतं. पण वारी संपली आणि मग मला पुन्हा अनुभवायला मिळाला तो जात, धर्म, पंथ अशा अनेक कारणांनी विभागलेला भारत.

दुनिया के अजिब ही मेले है, दिखती तो भीड है !
लेकीन चलते सब अकेले है..

यावर्षी डिजिटल प्रभात कडून आळंदी ते पंढरपूर वारी कव्हर करण्याची संधी मिळाली. दरवर्षी पुण्यात येणारी वारी पाहणाऱ्या मला, ही वारी नवी नसली तर तिचा अनुभव मात्र नवा आणि आयुष्य समृद्ध करणारा होता. डिजिटल प्रभातच्या माध्यमातून वारीचा प्रत्येक क्षण लोकांपर्यंत पोचवताना, ही वारी माझ्यासाठी खूपच आव्हानात्मक ठरली. आधुनिक मीडियामधील अपेक्षित बदल स्वीकारत इथे आम्हीच अँकर, आम्हीच रिपोर्टर, कॅमेरामॅन आणि आमचे मोबाईल म्हणजेच ओ.बी व्हॅन.

पुण्यातील वारीच्या मुक्कामापासून सुरु झालेला हा प्रवास, अनेक खेड्यापाड्यातून आलेल्या वारकाऱ्यांसोबत पहिल्यांदा संवाद साधण्याची वेळ, हे सगळंच नवीन होतं. वारकऱ्यांचे अफाट अनुभव ऐकून, त्याच्यामध्ये असणाऱ्या आत्मविश्वास आणि इच्छाशक्तीची जाणीव क्षणोक्षणी होतं होती. गाडगेबाबांच्या वेशात असणाऱ्या एका अवलीयाने दुष्काळ, स्वछता आणि युवकांचा वारीमधील सहभाग यावर ऐकवलेली सद्यपरिस्थिती ऐकून तर अंगावर काटा आला.

पुण्यातील पालखीच्या दोन दिवसांच्या मुक्कामानंतर आम्ही आमचा वारीचा प्रवास संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत सुरु केला, आणि वारकऱ्यांसाठी आवाहनात्मक असणाऱ्या टप्प्यात, म्हणजेच दिवेघाटात माऊलींच्या पालखीचे शूट केले. आम्ही दिवेघाटात सकाळी ११ वाजता पोहचलो आणि माऊलींची पालखी आली ४ वाजता. हा पहिलाच दिवस असल्याने दिवेघाटात वार्तांकन केल्यानंतर वारीत नको जायला असाही विचार मनात आला, कारण जोरदार पाऊस. सतत पडणाऱ्या या पावसामुळे आम्ही पूर्ण भिजलो होतो, त्यामुळे ‘हे जमणार नाही, परत जाऊयात’ असे विचार मनात यायला सुरवातही झाली होती. मात्र कोसळणाऱ्या पावसातही केवळ विठ्ठल भेटीच्या ओढीनं, जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कोणत्याही भौतिक गरजा नसताना वारीत चालणाऱ्या वारकऱ्यांना पाहून ‘जमेल आपल्यालाही’ हा प्रोत्साहनाचा डोस मिळल. त्यामुळे आता पंढरपूर गाठायचेचं हा निर्णय मनात पक्का झाला. दिवेघाटाच्या या कव्हरेजने वाटेत किती खडतर समस्या येऊ शकतात, याची झलक दाखवली होती. त्यामुळे आम्ही सासवडच्या दिशेने तयारीनिशी निघालो. आमचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला. आजवरचं आयुष्य विदर्भात घालवल्या माझ्यासाठी पश्चिम महाराष्ट्राचं हे रूप नवं होतं.

हलक्याश्या पावसाच्या सरी, गार हवा आणि पांढरेशुभ्र वस्त्र परिधान केलेल्या वारकऱ्यांसोबत ‘माउली माउली’च्या गजरात आमचा प्रवास सुरू होता. वारकऱ्यांच्या बरोबरीने गाडी चालवणे म्हणजे तारेवरची कसरत. पण या कसरतीमध्ये आम्ही यशस्वी झालो. सासवडला शिवाजी महाविद्यालयात आमचा मुक्काम होता. यापूर्वी फक्त शाळेत असताना स्काऊट गाईड व एनएनसीसी’च्या कॅम्प मध्ये बाहेर राहण्याचा अनुभव होता पण वारीचा अनुभव पहिल्यांदा घेत होतो.

रोज नवीन गाव, नवीन परिस्थिती, बदलते हवामान ही सर्व आव्हाने डोळ्यासमोर होती. सासवड मधील मुक्काम संपल्यानंतर हे सर्व वारकरी म्हणजे आपलं एक कुटुंबच आहे असं वाटायला लागलं. एकेमेकांची नावही न विचारता निर्माण होणारं, प्रेम, जिव्हाळा अतूट असणारे नाती यामुळे अनुभवायला मिळाली. आडनावरून जातीचा निष्कर्ष लावणाऱ्या लोकांसाठी वारी ही एक मोठी चपराक आहे. कारण इथं कोणी तुम्हाला तुमचा जात,धर्म विचारात नाही. माणसाने माणसांसोबत कसे जगायचं हे वारी उत्तम प्रकारे शिकवते.

सासवडमध्ये पालखीचा दोन दिवस मुक्काम होता. संध्याकाळी पालखी तळावर जाऊन काही वारकऱ्यांशी आम्ही संवाद साधला. यादरम्यान, वारीमध्ये भाषिक, धार्मिक असा कोणताही भेद नसतो हे जाणवलं. हल्ली भाषेच्या शुद्धतेमुळे एकमेकांना डिवचणाऱ्या लोकांनाच अनुभव पाहता, वारीतील हे भाषाच वैविध्य मोहात पाडणारं होतं. या मुक्कामात आम्ही काही बंजारा समाजातील महिला वारकऱ्यांशी सवांद साधला. त्यांनी त्यांचा भाषेत काही मधूर भजन ऐकवली. परतफेडीची कोणतीही अपेक्षा न ठेवता विठ्ठलाप्रती असणार वारकऱ्यांचं निस्वार्थ प्रेम मन जिंकून घेत.

‘खेळ मांडियेला वाळवंटी काठी…’ असे देवळातील कीर्तन पंढरीच्या वाळवंटात नेण्याचे काम संत नामदेव, संत ज्ञानेश्वर महाराजांनी केले. एकमेकांना माऊली म्हणत एकमेकांचे दर्शन घेणे, पाया पडणे यामध्ये वयाची सुद्धा मर्यादा नसते. खरा माणुसकीचा धर्म हे वारकरी जगत असतात आणि हाच वारीचा संस्कार आहे. हे तत्त्व अलौकिक आहे. त्यामुळे वारीही खऱ्या अर्थाने सामाजिक क्रांती आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

लाखो भाविकांना कोणी न बोलावता ते या सोहळ्यात सहभागी होतात. एका कुटुंबाप्रमाणे अनोळखी लोकांसोबत राहतात. हे सर्व विठ्ठलाच्या भेटीसाठी आतुरलेले असतात. त्यांच्या चेहऱ्यावरील भावमुद्रेतून हे उमजतं. परमात्म्यास बद्ध करण्याची ताकद वारीतील भक्तीत आहे. म्हणून जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकोबांच्या वचनाप्रमाणे

Wari anubhav

‘विठ्ठल टाळ। विठ्ठल दिंडी।।
विठ्ठल तोंडी उच्चारा। आणि शेवटी
विठ्ठल अवघा भांडवला।।

सासवडचा मुक्काम आटपून आम्ही निघालो जेजुरीच्या दिशेने, वारकऱ्यांच्या दिंडीसोबत आम्ही आमची वाट शोधात होतो. माउली माउली चा जयघोष, टाळ मृदूंगाच्या निनादात आमचा रस्ता कसा सर व्हायचा हे आम्हाला सुद्धा कळायचे नाही. वाटेत पालखी यमाई शिवर या ठिकाणी विसाव्यास थांबली. त्या ठिकाणी वारकऱ्यांचा नाष्टा, काही वेळ आराम होता. याठिकाणी काही महिला वारकऱ्यांची मुलाखत घेऊन आम्ही जेजुरीकडे प्रस्थान केले.

जेजुरीच्या भक्तीनिवास मध्ये आमचा मुक्काम होता. मी पहिल्यांदा हा सर्व परिसर पाहत होतो. त्यामुळे जेजुरीच्या गडावर पहिल्यांदा चढण्याची उत्सुकता मनामध्ये होती. निवासाच्या ठिकाणी आमच्या बॅग ठेवून आम्ही गडाच्या दिशने निघालो. आधीच भरपूर दमलेलो मात्र ऊत्सुकतेपुढे थकवा निघून गेला आणि आम्ही अखेर गड सर केला. त्यानंतर आम्ही गडावर भाविकांची गर्दी जमल्यामुळे काही स्टोरी करून गडावरून दिसत असलेले नैसर्गिक सौन्दर्य नजरेने टिपले. गडावर नेटवर्क असल्यामुळे काही व्हिजव्हल ऑफिसला पाठवले. कारण ज्या ठिकाणी पालखी थांबायची त्या ठिकाणी नेटवर्क जॅम व्हायचे त्यामुळे आमची मोठी दमछाक व्हायची.

जेजुरीचा मुक्काम संपवून आम्ही (१ जुलै) वाल्मिकी ऋषींचे वाल्हे गावाच्या दिशने निघालो. निसर्गाच्या सानिध्यात वसलेले गाव आजूबाजूने उसाची शेती. एकूण बारा वाड्या व पाच वस्ती असलेले हे गाव आहे. आमचे वार्ताहर समीर भुजबळ यांच्याकडे आमचा मुक्काम होता. अल्हाददाक वातावरण असलेले गाव, माझा पहिलाच भाग असल्याचे मी हे सर्व दृश्य नजरेनें टिपत होतो. वाल्हे चा मुक्काम संपल्यानंतर लोणंद, तरडगाव, फलटण, बरड, नातेपुते, माळशिरस, वेळापूर, भेंडीशेगाव अश्या गावांमध्ये माणूसपण असणाऱ्या माणसांसोबत वारी अभुभवता आली. भेंडीशेगाव पूर्वी, तोंडले-बोंडले या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज, सोपान महाराज, मुक्ताबाई यांच्या पालख्यांची भेट होती. सर्व वारकऱ्यांसाठी हा अभूतपूर्व क्षण असतो. अगदी अंगावर क्षहारे येतात. सलग वारीसोबत असल्यामुळे संतांच्या कथा ऐकण्यात आल्या. त्यामुळे त्याग काय असतो, याची प्रचिती आलेली. त्यामुळे हे सर्व मी मोट्या मोठ्या उत्साहाने अनुभवत होतो.

भेंडीशेगावचा मुक्काम संपल्यानंतर आम्ही थेट वाखरी गाठली. तोंडले-बोंडले पासून मला चांगलाच हिवताप आलेला. मात्र ध्येयापर्यंत पोहचलो या आनंदामुळे ताप जाणवला नाही. वाखरी म्हणजे आम्ही पंढरपूरच्या समीप आलेलो. वाखारीच रिंगण आटोपून आम्ही थेट पंढरपूर गाठले. भक्तांचा मेळा लागलेला. नजर जाईल तिथपर्यंत फक्त वारकरी. हल्ली दंगा, जाळपोळ, राजकीय सभेला जबरदस्ती माणसे जमतात. पण मी पहिल्यांदा ना कोणतं आमंत्रण, ना कोणत्या बोलावण्या शिवाय जमलेली माणसांची जत्रा पाहत होतो.

दुसऱ्या दिवशी एकादशी होती. त्या रात्री फक्त एक तास झोपून लगेच रात्री १ वाजता विठ्ठल मंदिरात गेलो. ज्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पायी येतात. त्या विठ्ठलाचे दर्शन घेतले. आणी परतीचा प्रवास सुरु केला. १५ दिवस केलेला प्रवास आम्ही ५ तासात केला. पूर्ण रस्ते ओसाड होते. जिकडे तिकडे शांतता. ज्या ठिकाणी पालखी विसावा घेत होती ते ठिकाण बघितले कि मन भरून येत होत. पण आजही जय हरी, माउली शब्द कानी पडले तर वारीत असल्याचा अनुभव होतो. पंढरपूर सोडताना एवढच सांगेन एकदा तरी वारी अनुभवावी…

-संदीप कापडे
उपसंपादक(ऑनलाईन विभाग), दैनिक प्रभात पुणे.

आश्वासक आणि भविष्याचा वेध घेणारे नेतृत्व – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री.

0

[youtube v=”https://youtu.be/Xyrfa7uK2Kc”]

१५ ऑगस्ट २०१९ रोजी ७३ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या या कारकिर्दीतील शेवटचे शासकीय ध्वजारोहण केले.
त्यावेळी त्यांनी आपल्या भाषणात भविष्याच्या समस्यांवर व विकासावर अनेक मुद्दे मांडले आणि नुकताच केंद्र सरकारने कलम ३७० व ३५ A संदर्भात घेतलेल्या भूमिकेचे कौतुक केले.
सततच्या दुष्काळावर मात करण्यासाठी नद्यांच्या मार्फत समुद्राला मिळणारे पाणी मराठवाड्यात व विदर्भाच्या दिशेने वळवण्याच्या महत्वाकांगशी योजनेचा पुन्हा त्यांनी उहापोह केला. येणाऱ्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही त्यांच्या या भूमिकेला धरून ही योजना असल्यामुळे एकूणच जनतेमध्ये समाधान व्यक्त केल्या जात आहे.
गेल्या पाच वर्षात महारष्ट्र सरकार ने विकासाच्या दृष्टीने कसे कार्य केले आणि भविष्यात काय अपेक्षित आहे या बद्दल सुद्धा त्यांनी भूमिका मांडली.

नितीन राजवैद्य
मुख्य संपादक – लोकसंवाद

कलम ३७० च्या निमित्ताने ……

0

राज्यसभा व लोकसभे मध्ये जम्मू कश्मीर ला विशेष दर्जा देणारे कलम ३७० व जम्मू कश्मीर नागरिकता कलम ३५ ए काढण्याच्या सदर्भात लोकशाही पद्धतीने चर्चा व मतदान घेऊन जो निर्णय घेण्यात आला त्यामुळे आता जम्मू कश्मीर भारताचा अविभाज्य भाग झाला. खरे म्हणजे यासाठी महामाहीम राष्ट्रपतीचे साधे आदेश जरी असते तरी देखील काम झाले असते. हा दिवस पहाण्यासाठी अनेक पिढ्यांच्या संघर्षाला विराम मिळाला. आणि जम्मू कशीर च्या विकासाचा मार्ग मोकळा झाला.
हे कार्य तडीस नेण्यासाठी सरकारने जी इच्छाशक्ति दाखवली, जी सकारात्मकता दाखवली जी गोपनीयता बाळगली व व्युव्हरचना तयार केली ते पाहून अक्खि दुनिया अवाक झाली. आणि भारताचे नेतृत्व आता कमकुवत नाही ते देश हितच्या दृष्टीने कुठल्याही संकटांना तोंड देऊ शकतात हे सार्‍या दुनियेनी पहिले. दुर्दैव मात्र असे की, या निर्णयाविरोधात काही सांसद होते आणि त्यांनी तसे मतदानही केले.
जम्मू कश्मीर ला विशेष राज्याचा दर्जा देणार्‍या कलम ३७० ची निर्मिती –
भारतातील अनेक संस्थाने विलीनीकरण होत असताना, जम्मू-काश्मीर संस्थान चे राजा हरिसिंग नी मात्र आपल्या जम्मू कश्मीर संस्थानला विलीन न करता स्वतंत्र ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी पाकिस्तानने स्थानिक टोळयांच्या मदतीने हरीसिंगांच्या संस्थानावर हल्ला केला. त्यानंतर हरीसिंगांनी भारताकडे मदत मागितली. तेव्हा हे संस्थान भारतात विलीन करा, तरच आम्ही मदत करू अशी अट भारताने घातली. हरीसिंगांनी याला सशर्त संमती दर्शवली. त्यांनी घातलेल्या अटींची पूर्तता करण्यासाठी अस्थायी कलम ३७० ची निर्मिती झाली. हे कलम अस्थायी स्वरूपाचे होते. भारतीय राज्यघटनेत ३७० वे कलम समाविष्ट करताना घटना समितीमध्ये मोठी चर्चा झाली होती. याविषयी अनेक तीव्र मतमतांतरे होती. घटना समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही काश्मीरला स्वतंत्र दर्जा देणारे कलम ३७० ला स्पष्ट विरोध केला होता. डॉ. आंबेडकरांनी हे कलम लिहिलेले नाही. पं. नेहरूंनी याचे ड्राफ्टिंग दुसऱ्याच व्यक्तीकडून करून घेतले होते. ह्या कलमासंदर्भात भारताच्या घटना समितीत चर्चा सुरू असताना त्या वेळी मद्रास प्रेसिडेन्सीचे प्रतिनिधित्व करणारे रामास्वामी अय्यंगार यांनी सुद्धा स्पष्ट केले होती की हे कलम पूर्णपणे अस्थायी स्वरूपाचे आहे. जम्मू-काश्मीरमध्ये स्वतंत्र घटना समिती तयार करण्यात आली होती आणि ती असेपर्यंत एक अंतरिम सरकार तिथे अस्तित्वात होते. शेख अब्दुल्ला हे त्या अंतरिम सरकारचे प्रमुख होते. हे अंतरिम सरकार अस्तित्वात असेल, जोपर्यंत तिथे घटना समिती अस्तित्वात असेल आणि तोपर्यंतच कलम ३७० अस्तित्वात राहील आणि त्यानंतर ते आपोआप विसर्जित होईल असे होते. याचे कारण भारतीय राज्यघटनेतील कलम १ मधील शेडयूल १ मध्ये १५ व्या क्रमांकानुसार असे म्हटले आहे की जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य घटक आहे. जम्मू-काश्मीरची स्वतःची घटना असून त्यातील कलम ३ मध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे. भारताची राज्यघटना अस्तित्वात आली, त्याच वेळी जम्मू-काश्मीरची घटना अस्तित्वात आली. जेव्हा विलीनीकरणाचा करार केला आणि जम्मू-काश्मीरच्या विधिमंडळाने त्याला मान्यता दिली, त्यानंतरच कलम ३७० चे महत्त्व संपले होते. पण जम्मू्-काश्मीरसाठी जी घटना समिती निर्माण करण्यात आली तिने हे कलम ठेवायचे किंवा नाही याविषयी कोणताही निर्णय घेतला नाही. ते काही बोलले नाही. त्यामुळे कलम 370 काढण्यासाठी या घटना समितीची परवानगी आवश्यक होती. पण घटना समिती आता अस्तित्वात नसल्यामुळे आणि विलींनीकरण अमलात आल्यामुळे हे कलम संपुष्टात आले होते. कलम ३७० हे राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेचा भाग नाही. १९७३ च्या केशवानंद भारती खटल्यामध्ये भारतीय राज्यघटनेची मूलभूत संरचना अधोरेखित करण्यात आली होती. त्यात कलम ३६८ म्हणजे अंतर्गत राज्यघटना दुरुस्ती करता येणार नाही. मूलभूत संरचनेतील घटकांमध्ये बदल करता येणार नाही, ते कायम ठेवावे. असे म्हटले होते. पण ३७० कलम हे मूलभूत संरचनेला छेद देणारेच होते. कारण काही मूलभूत अधिकारांची अमलबजावणी जम्मू-काश्मीरमध्ये करता येत नव्हती. त्यामुळे या कलमाबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार हा पूर्णपणे भारतीय संसदेचा होता आणि संसदेने याबाबत आता निर्णय घेतला आहे.

कलम ३७० आधीचे काश्मीर –
या कलमाने जम्मू-काश्मीरला स्वतंत्र दर्जा देण्यात आला होता. संसद ही भारतामध्ये सर्व निर्णय घेणारी यंत्रणा आहे. पण सुरक्षा, परराष्ट्र व्यवहार आणि कम्युनिकेशन या तीन गोष्टी सोडल्या, जोपर्यंत काश्मीरची विधानसभामान्यता देत नाही. तोपर्यंत भारतीय संसदेने बनवलेला अन्य कोणताही कायदा काश्मीरला लागू होत नव्हता. संपूर्ण भारतात विधानसभेचा कार्यकाळ ५ वर्षांचा आहे, तर जम्मू-काश्मीरमध्ये हा कार्यकाल आहे ६ वर्षांचा. जम्मू-काश्मीरच्या नागरिकांना दुहेरी नागरिकत्व आहे. या कलमामुळे काश्मीरमध्ये इतर कुणालाही जमीन अथवा संपत्ती खरेदी करता येत नाही. इतकेच नव्हे, तर तिथे व्यवसाय करता येत नाही. भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकारही तिथे लागू होत नाहीत. विधानसभा बरखास्तीचे नियम तिथे लागू होत नाहीत. इतर भारतात शिक्षणाच्या , आरोग्याच्या आणि भारतीय नागरिकाचे जीवनमान उंचवेल अशा जा अनेक योजना चालतता त्या योजना जम्मू काश्मीर मध्ये राबवल्या जात नव्हत्या. म्हणजे संपूर्ण भारत एकदिलाने आपली प्रगति करण्यासाठी झगडत होता प्रयत्नरत होता आणि तिकडे जम्मू काश्मीर ३७० च्या आडून तेथील तरुणांना बेरोजगार, अशिक्षित ठेऊन भारत विरोधी पाकिस्तानी दहशतवादाला पूरक काम करत होता. आणि यात काही घराण्याचे आर्थिक भले होत होते.
कलम ३७० नंतर उदयास येणारे जम्मू काश्मीर –
जम्मू-काश्मीरच्या आर्थिक विकासावर या निर्णयाचे अत्यंत दूरगामी परिणाम होणार आहेत. इन्स्ट्रुमेंट ऑफ ऍक्सेशन अस्तित्वात आल्यानंतर जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक बनला. पण विलींनीकरण मात्र झालेले नव्हते. आता खऱ्या अर्थाने काश्मीर आणि भारत यांच्या एकीकरणाची प्रक्रिया पार पडली आहे. जम्मू-काश्मीरला भारताच्या मुख्य प्रवाहात आणण्यामध्ये कलम ३७० आणि कलम ३५ अ हे दोन प्रमुख अडथळे होते ते आता दूर झाले. या दोन्ही कलमांमुळे काश्मिरी लोकांमध्ये एक परात्मभावाची भावना निर्माण झाली होती. इतकेच नव्हे, तर यामुळेच दहशतवादाची समस्या जटिल बनत चालली होती. त्यामुळे केंद्र सरकारने उचललेले हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे होते.
यामुळे शिक्षणाचे, विकासाचे अनेक मार्ग जम्मू काश्मीरच्या नागरिकांना मोकळे होतील. भारतात लागू असणार्‍या सर्व जन कल्याणकारी योजना तिकडेपण पोहोचतील आणि जम्मू काश्मीर नंदनवन म्हणून पुन्हा उदयास येईल असा विश्वास सर्व देशभक्त भारतीयांना आहे.

नितिन राजवैद्य
मुख्य संपादक – लोकसंवाद.