तरुण तेरे तेज का आवाहन है!

‘ आदमीने मरने के बादही एक चौकट मे रहना चाहिए’
असा जिंदगी ना मिलेगी दोबारा मधील संवाद आठवितो का?

एकदा हे वाक्य स्वतःला विचारून पहा की ते आपल्याला लागू पडत का?

आणि लक्षात येईल की आपण स्वत: भोवती विचारांचे एक जाळे गुंतवुन घेतो आणि त्यातच समाधान मानुन आपले तेवढेच विश्व मानुन त्यात जगत असतो; त्यातुन बाहेर पडायचा साधा विचार सुध्दा आपल्या मनाला शिवत नाही.

या चौकटीचा एवढा पगडा असतो की चौकटीची मर्यादा माहीत असूनही आपण ती भेदुन जाण्याकरिता किंवा वाढविण्याकरिता आपण साधा प्रयत्नसुध्दा करीत नाही आणि मग परिस्थिती वा नशीबावर खापर फोडुन मोकळे होतो.

वास्तविकत: केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहीजे
अशी प्रयत्नवादाची भूमिका आपण कधी स्विकारतच नाही.

बरे या चौकटीचे आणखी एक वैशिष्ट्य ते म्हणजे ही जी चौकट असते ना ती आपल्या क्षमतेवर न बनविता आपण आपल्या आजुबाजुला
असणा-यांनुसार ती बनवितो.
सुख दुख यश अपयश सुध्दा मग आपण आपल्या
सभोवताली असलेल्या बोन्साय मनोवृत्ती वर आकलन करत असतो वा मनवित असतो.

आणि या सगळ्या जग रहाटीत ख-या जगण्याच्या आनंदापासुन आपण अलिप्त राहतो.
आणि सुप्त मनात जे जगायचं असत ते राहुन गेलं असत.

मग हेच जिवन आहे का?

नाही, कुठे तरी अंतरमनात ङोकावुन पहावे लागेल,
आपल्या जगण्याचे उद्दीष्ट शोधावे लागेल,
आणि मग निश्चितपणे चाकोरीबध्द जिवनाच्या बाहेर पडून यशोमार्गावर क्रमण करता येईल.

तोडुनी देवु ही परवशतेची शृखंला।
उद्युक्त होवुया निश्चित ध्येय गाठाया।।

अभिजित कोठीवान

चला तुळशीला पाणी घालूया..

आपल्या पूर्वजांनी मानवी जीवनाच्या कल्याणासाठी अभ्यासपूर्ण अनेक छोटे मोठे नियम आपल्या दैनंदिन जीवनात घालून दिले आहेत.

त्यापैकी एक म्हणजे रोज सकाळी तुळशीला पाणी घालणे.
चला मग या छोट्याश्या नियमांचे मोठे महत्व पाहू..

*१) अध्यात्मिक महत्व*

याबाबत पुराणामध्ये एक रंजक कथा सांगितली जाते. जालिंदर नावाचा एक पराक्रमी राक्षस असतो. आपल्या पराक्रमाच्या बळावर त्याने देवांना आणि साधू-संतांना त्राहीत्राही केले होते. त्याला कसे रोखायचे आणि सर्वत्र शांती कशी प्रस्थापित करायची असा प्रश्न सर्व देवांना पडतो. मग देव भगवान विष्णू कडे जाऊन जालिंदरापासून आपले रक्षण करण्याची विनंती करतात.
विष्णूनी जालिंदराबाबत माहिती काढतात तेव्हा त्यांना असेकळते की, त्याची पत्नी वृंदा ही सतीपतीव्रता आहे आणि तिच्या पातिव्रत्याच्या सामर्थ्यांने जालिंदर विजयी होत असतो. त्याला पराजित करायचे असेल, तर वृंदाच्या पतिव्रत्याचा भंग केला पाहिजे असे लक्षात येते.
परंतु असे करण्यास कुणीही धजावत नाही. अखेर ती जबाबदारी विष्णू स्वतः स्वीकारतात.जालिंदराचे रूपधारण करून विष्णू वृंदेच्या महालात जातात तेव्हा आपले पती आले असे समजून वृंदा त्यांना अलिंगन देते.तिच्या पतिव्रत्याचा भंग होताच, देवांनी मारलेल्या बाणाने जालिंदराचे शीर तुटून ते वृंदेच्या दारात पडते आणि जालिंदराचा मृत्यू होतो.
नवऱ्याचे शीर पाहताच वृंदा चकीत होते आणि विष्णूला विचारते, तू कोण आहेस? त्यावरविष्णू आपले ख-या रूपात प्रकटतात. संतप्त झालेली वृंदा विष्णूला तू दगड होऊन पडशील आणि मला माझ्या पतीचा विरह तुझ्यामुळे घडला, तसाच तुलाही तुझ्या पत्नीचा विरह सहन करावा लागेल, असा शाप देते.

भगवान विष्णू तिची क्षमा मागतात. तेव्हा वृंदा म्हणते, तू मला भ्रष्ट केलेस, आता मला कोण स्विकारील? तेव्हा भगवंत म्हणतात, ‘मी तुझा स्वीकार करतो. इतकेच नव्हे तर जे तुझी पूजा करतील त्यांच्यावर माझी कृपा असेल.’ त्यानंतर वृंदा सती जाते.
पुढे तिच्या शापामुळेच राम अवतारा मध्ये भगवंताला सीतेचा विरह सहन करावा लागला. देव दगड होऊन पडले. त्यालाच ‘शालिग्राम’ म्हणतात. ज्या ठिकाणी तिच्यावर अंत्यसंस्कार झाले, तिथे एक रोप उगवले. तीच ही तुळस. वृंदेच्या नावावरूनच ज्या ठिकाणी तुळस लावली जाते, त्याला ‘वृंदावन’ म्हणतात.

तीच तुळस भगवान कृष्णाने, पांडुरंगानेही धारण केली. तीच परंपरा पुढे तुळशीची माळ करून लाखो वारकरी धारण करतात म्हणून भगवंत त्यांचेवर प्रेम करतो. तिला भगवंताने स्वीकारले याचे प्रतीक म्हणून ‘शालिग्राम’ हा जो दगड आहे, त्याला देव मानून त्याचा विवाह तुळशीसोबत लावला जातो. अशी श्रद्धा आहे. याच विचाराने वारक-यांनीही तुळशीला आजतागायत पूजनीय मानले आहे.

*२) वैज्ञानीक महत्व*

निसर्गातील प्रत्येक वनस्पती दिवसा ऑक्सिजन- O2 व रात्री कार्बन डाय ऑक्साईड-CO2 सोडते. अपवाद फक्त पिंपळ, कारण पिंपळवृक्ष रात्रीही ऑक्सिजन सोडतो. म्हणुनच भगवान श्रीकृष्णाने पिंपळाचे महत्व सांगताना म्हटले आहे की, सर्व वृक्षात मी अश्वथ-पिंपळ आहे.
मात्र तुळस ही निसर्गातील एकमेव अशी वनस्पती आहे की जी दिवसा ऑक्सिजन, रात्री कार्बन डाय ऑक्साईड व फक्त पहाटेच्या वेळी 0.03% इतका ओझोन-O3वा़यु सोडते. जो की सर्व ब्रह्मांडासाठी महत्वाचा आहे. या वायुच्या संपर्कात मनुष्य आल्यास त्याच्या मेंदुत 5HTPn- सेरॉटोनीन नावाचे संप्रेरक (Neurotransmiter) स्त्रवते. ज्यामुळे मनुष्य दिवसभर प्रसन्न,आनंदी,उत्साही व मानसिक शांत राहतो.

तसेच त्याची रोग प्रतिकारक शक्ती बळकट होते. आयुर्वेदानुसार तुळशी पानाच्या सेवनाने सर्दी, खोकला, ताप, मधुमेह, रक्तदाब ,त्वचारोग, पोटाचे व किडनीचे विकार, कँन्सर, होत नाहीत व मेंदूला उपयोगी जीवनसत्वे मिळतात.
तुळशीच्या बिया, पाने, फांद्या, खोड,फुले (मंजिरी) हे सर्वच औषधी आहेत. तसेच तुळशीतुन निघणाऱ्या शुभ स्पंदनांमुळे वातावरण शुद्धी होते. या सर्व बाबींचा गहन विचार करुनच आपल्या पूर्वजांनी पहाटे तुळशीला पाणी घालने आणि सायंकाळी तुळशिजवळ दिवा लावणे असे सांगीतले आहे. जेणेकरून आपण रोज सकाळी तुळशीच्या समपर्कात येऊन तुळशीतून मिळणारी आध्यत्मिक व वैज्ञानिक सर्व शक्ती धारण करू.

राष्ट्रहितासाठी १०० टक्के मतदान …..!

भारत निवडणूक आयोगाने 2019 चा सतराव्या लोकसभेच्या निवडणुका संपूर्ण भारतामध्ये 11 एप्रिल ते 19 मे या दरम्यान विविध टप्प्यामध्ये होत आहे. या निवडणूकणाचा 23 मे रोजी निकाल जाहीर होऊन या प्रक्रियेतून या देशाचा राजा निवडला जातो. या निवडणूक प्रक्रिये मध्ये 90 करोड मतदाता सहभागी होणार आहेत. मतदारांनी लोकशाही बळकट करण्यासाठी जास्तीत जास्त संखेने सहभागी व्हावे या करिता आवाहन केले असून दरम्यान सुटयांचाची योग साधला आहे. परंतु मतदारांनी सुट्ट्याचा मोह बाजूला करून लोकशाहीच्या सवर्धंनासाठी मतदान हक्क बजावण्यासाठी, मतदाना पासून कोणी वंचित राहणार नाही आणि नोटा प्रयोग होणार नाही याची खबरदारी घेण्याची अवशकता आहे.

*नोटा म्हणजे काय ?*
Non for above अर्थात निवडणूक रिंगणात उभे असलेल्या उमेदवारा पैकी कोणीच नाही किवा नकारात्मक मतदानाचा अधिकार. नोटासंबंधी पीपल्स युंनियन फॉर सिविल लिबर्टीज संस्थेने सर्वोच्च न्यायालय मध्ये कंडक्ट ऑफ इलेक्शन रूल्स १९६१ मधील नियम ४१ (२) आणि (३) अंतर्गत जनहित याचिका सादर केली होती. २७ सप्टे २०१३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने नोटा अधिकार मान्य करण्याचा निर्णय भारत निवडणूक आयोगाला आदेश दिला. आणि २०१५ पासून निवडणुकी मध्ये ईविएमच्या पॅडवर सर्वात खाली नोटा चिन्ह नमूद केले आहे.
मा.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मतदारला नोटाचा अधिकार मिळाला असलातरी या अधिकाराचा मतदारांनी किती वापर करावा हे ठरवले पाहिजे . नोटा पेक्षा available best निवडणे केव्हाही चांगले आहे. गेल्या २०१७ च्या गुजराथ, हरियाणा, हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीमध्ये नोटाचा प्रयोग होऊन एकट्या गुजरातमध्ये ५.५ लाख मतदारांनी नोटा वापरला. २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत मध्यप्रदेश ४.१५ लाख, तेलंगणा २.३ लाख राजस्थान ४.३८ लाख, छत्तीसगड १.७८ लाख, मिजोराम ३ हजार मतदारनी नोटा चा प्रयोग करून जवळपास १२.५० लाख मतदारांनी नोटा वापरला आहे. त्यामुळे चांगले उमेदवार फार कमी मठाच्या फरकाने पराभूत झालेत. त्यामुळे नोटा करणे म्हणजे धृतराष्ट्र होण्यासारखे आहे.

*Analable Best निवडणे योग्य*
आजकाल सर्व समाजाची परिस्थिति आणि वातावरण पाहता सर्व क्षेत्रामध्ये चांगल्या आणि प्रामाणिक व्यक्तींचे प्रमाण कमी झाले आहे. आणि राजकरणात तर हे प्रमाण फारच कमी जाणवते. त्यामुळे उभ्या असणार्‍या उमेदवारांपैकी जो उमेदवार योग्य वाटतो त्यांना मतदान करणे आणि त्यांना निवडून आणणे हे योग्य ठरते. कारण नोटाचा वापर केला तर उभ्या असणार्‍या उमेदवारा पैकी चांगल्या उमेदवारा चे विरोधात मतदान जाऊन शेवटी याचा फायदा जोचांगला नाही त्यांनाच होतो त्यामुळे आपले, आपल्या पुढील पिढीचे आणि देशाचे भविष्य बिघडण्याची शक्यता वाढते.
त्यामुळे उज्वल भविष्यासाठी आणि कणखर देशासाठी सर्वांनी मतदान करणे आणि नोटा न करणे योग्य..

वसंतपंचमी

बासर येथील सरस्वती

वसंत पंचमी माघ शुध्द पंचमीला असते. वसंत ऋतूची चाहूल लागलेली आहे तर त्या पर्वावर हा सण साजरा करतात. वसंत पंचमीला विद्येची देवता सरस्वतीचे पूजन करून विद्यार्थ्यांनी वरदहस्त मिळवायचा असतो. या सृष्टीची निर्मिती श्री ब्रम्हदेवांनी श्री विष्णुंच्या सहमताने केली पण सृष्टीत चैतन्य नव्हते, वेग नव्हता मग ब्रम्हदेवांनी कमंडलूतून पाणी शिंपडलं आणि वृक्षांच्या तिथे एक सुंदर चतुर्भूज देवी प्रकटली,एका हातात वीणा तर दुस-या हाताची मुद्रा आणि पुस्तक अशा या देवीला ब्रम्हदेवांना वीणा वाजवायला सांगितली आणि काय चमत्कार सृष्टीला संगीत मिळाले, झरे,धबधबे ,हवा सर्वांनी आपापल्या आवाजाच्या किमयेने सृष्टीला भारावून सोडले. बागेश्वरी म्हणजेच सरस्वती. “प्रणोदेवी सरस्वती वाजेभिर्वजिनीवती धीनमणित्रयुक्त” म्हणजेच ही चैतन्य आहे,सरस्वती च्या रूपात आपली बुध्दी, प्रज्ञा आणि मनोवृत्ती सुरक्षित आहे. आपण जे आचार विचार करतो याला आधार भगवती सरस्वतीच आहे.सरस्वतीचे स्वरूप चमत्कारिक आहे. पुराणात श्रीकृष्णाने सरस्वतीला वरदान दिले आणि वसंत पंचमीला तुझी पूजा केली जाईल हे सांगितले. सरस्वती काय शारदा काय एकच असे बरीच नावं आहेत. प्रथमं भारती नाम द्वितियं च सरस्वती तृतीयं शारदादेवी चतुर्थं हंसवाहिनी पंचमं जगती ख्याता षष्ठं वागीश्वरी तथा सप्तमं कुमूदी प्रोक्ता अष्टमं ब्रम्हचारिणी नवं बुध्दीदात्री च दशं वरदायिनी एकादशं चंद्रकान्ति द्वादशं भुवनेश्वरी यः पठेन्नरः जिव्हाग्रे वसते नित्यं ब्रम्हरूपा सरस्वती! किती सुंदर नावं आहेत आणि त्
आपल्या जिभेवर सरस्वती असते बरं म्हणूनच तोंडातून शब्द बाहेर पडताना तोलून मोलून बोलावं असं म्हणतात कारण शब्द परत घेता येत नाहीत म्हणून वाणी नेहमी शुद्ध हवी. महाभारतात ,रामायणात पण उल्लेख आहेच. अहंकारी रावणाचे मर्दन करण्यासाठी रामावतार झालाआणि राज्याभिषेक होणार तितक्यात मंथरेच्या जिभेवर सरस्वती बसते आणि वाईट अपशब्द निघतात असं म्हणतात, अर्थात हे सर्व आधीच ठरलेलं होतं देवांचं आणि मग वनवास चौदा वर्षांचा पुढे सीतेचे अपहरण आणि नंतर युध्द रावणासोबत आणि मर्दन रावणाचे. माझ्या माहितीप्रमाणे श्री सरस्वतीचे मंदिर आंध्र प्रदेशात,बासर येते गोदेकाठी वसलेले आहे आणि मंदिर खूपच सुंदर आहे.काळ्या पाषाणातली सरस्वतीची रेखीव मूर्ती तेजःपुंज अशी आहे. लहान मुलं जेव्हा प्रथम शाळेत जायला लागतात त्यापूर्वी या मंदिरात त्यांच्या शिक्षणाचा पाटीवर श्रीगणेशा केला जातो. श्री गणेशाचे नाव लिहून मुलाच्या हाताने सरस्वती देवीची आराधना केली जाते. किती छान संकल्पना आहे नं ,ब-याच मुलांना आम्ही बघीतले होते हे पुजन करताना, असं केल्याने बुद्धी प्रगल्भ होते,मुलं हुशार होतात पण आजकालच्या मुलांना अडीच वर्षाचे होत नाही तर प्ले स्कूल ,नर्सरी,लोअर केजी,अप्पर केजी या चक्रात अडकवले जाते. मुलांच्या मानसिकतेचा विचार केला जात नाही ही खूपच खेदजनक बाब आहे. ठराविक वयात मुलांची ग्रहणशक्ती वाढते ,अभ्यास करण्यासाठी मन तयार होत असतं पण आजकालच्या स्पर्धेच्या युगात कोणाला सांगून उपयोग नाही तरी त्यांनी मुलांचा विचार करावा ,त्यांना बालपण मुक्त हसतखेळत जगण्याचा हक्क आहे, सर्वगुणसंपन्न च्या नादात त्यांना उन्हाळ्यातही विविध समर क्लासेस मध्ये अडकवून ठेवले जाते. मैदानी खेळ खेळण्याच्या वयात संगणक,भ्रमणध्वनी हातात दिल्याने डोळे कमजोर होत आहेत. तशीही आजची पिढी खूपच हुशार आहे पण म्हणून त्यांच्या वयाचा विचार करून असे जर सरस्वतीदेवीचे संस्कार करत श्रीगणेशा कराल शिक्षणाचा तर वय आणि मन दोन्ही तयार असेल त्यामुळे नवचैतन्याने झपाटतील मुलं हा विचार अवश्य करावा. सरस्वती संगीताचे आराध्य दैवत आहे. कोणाला गोड गळा लाभला असेल तर आपण म्हणतो नं सरस्वती विराजमान आहे ते अगदी खरंय. आजच्या वसंत पंचमीला याच सरस्वती देवीचे पूजन करून तिला सृष्टीचं हे मधुर संगीत सर्वत्र निनादू दे आणि सृष्टी अशीच बहरत राहू देत म्हणून आर्जव केली जाते. पाटीवर जेव्हा श्रीगणेशा होईल तेही सरस्वती देवीच्या साक्षीने तेव्हा सर्वच मुलांना शिक्षणाची गोडी लागेल अथवा लागावी हाच उद्देश जरी डोळ्यासमोर ठेवून तरी एकवेळ अवश्य जाऊन मुलांच्या प्रगतीचा विचार कराच असंच म्हणत हे स्तवन म्हणूया,”याकुन्देदूतुषारहार धवला या शुभ्रवस्त्रान्विता याब्रम्हाच्युत शंकर प्रभृतिभिःदैवे सदावन्दिता सामांपातुसरस्वती भगवति निःशेषजाढ्या पहा!!”. सौ.स्नेहा सुनिल लाडसावंगीकर नाशिक “प्रणोदेवी सरस्वती वाजेभिर्वजिनीवती
धीनमणित्रयुक्त” म्हणजेच ही चैतन्य आहे,सरस्वती च्या रूपात आपली बुध्दी, प्रज्ञा आणि मनोवृत्ती सुरक्षित आहे. आपण जे आचार विचार करतो याला आधार भगवती सरस्वतीच आहे.सरस्वतीचे स्वरूप चमत्कारिक आहे. पुराणात श्रीकृष्णाने सरस्वतीला वरदान दिले आणि वसंत पंचमीला तुझी पूजा केली जाईल हे सांगितले. सरस्वती काय शारदा काय एकच असे बरीच नावं आहेत. प्रथमं भारती नाम द्वितियं च सरस्वती तृतीयं शारदादेवी चतुर्थं हंसवाहिनी पंचमं जगती ख्याता षष्ठं वागीश्वरी तथा सप्तमं कुमूदी प्रोक्ता अष्टमं ब्रम्हचारिणी नवं बुध्दीदात्री च दशं वरदायिनी एकादशं चंद्रकान्ति द्वादशं भुवनेश्वरी यः पठेन्नरः जिव्हाग्रे वसते नित्यं ब्रम्हरूपा सरस्वती! किती सुंदर नावं आहेत आणि त्
आपल्या जिभेवर सरस्वती असते बरं म्हणूनच तोंडातून शब्द बाहेर पडताना तोलून मोलून बोलावं असं म्हणतात कारण शब्द परत घेता येत नाहीत म्हणून वाणी नेहमी शुद्ध हवी. महाभारतात ,रामायणात पण उल्लेख आहेच. अहंकारी रावणाचे मर्दन करण्यासाठी रामावतार झालाआणि राज्याभिषेक होणार तितक्यात मंथरेच्या जिभेवर सरस्वती बसते आणि वाईट अपशब्द निघतात असं म्हणतात, अर्थात हे सर्व आधीच ठरलेलं होतं देवांचं आणि मग वनवास चौदा वर्षांचा पुढे सीतेचे अपहरण आणि नंतर युध्द रावणासोबत आणि मर्दन रावणाचे. माझ्या माहितीप्रमाणे श्री सरस्वतीचे मंदिर आंध्र प्रदेशात,बासर येते गोदेकाठी वसलेले आहे आणि मंदिर खूपच सुंदर आहे.काळ्या पाषाणातली सरस्वतीची रेखीव मूर्ती तेजःपुंज अशी आहे. लहान मुलं जेव्हा प्रथम शाळेत जायला लागतात त्यापूर्वी या मंदिरात त्यांच्या शिक्षणाचा पाटीवर श्रीगणेशा केला जातो. श्री गणेशाचे नाव लिहून मुलाच्या हाताने सरस्वती देवीची आराधना केली जाते. किती छान संकल्पना आहे नं ,ब-याच मुलांना आम्ही बघीतले होते हे पुजन करताना, असं केल्याने बुद्धी प्रगल्भ होते,मुलं हुशार होतात पण आजकालच्या मुलांना अडीच वर्षाचे होत नाही तर प्ले स्कूल ,नर्सरी,लोअर केजी,अप्पर केजी या चक्रात अडकवले जाते. मुलांच्या मानसिकतेचा विचार केला जात नाही ही खूपच खेदजनक बाब आहे. ठराविक वयात मुलांची ग्रहणशक्ती वाढते ,अभ्यास करण्यासाठी मन तयार होत असतं पण आजकालच्या स्पर्धेच्या युगात कोणाला सांगून उपयोग नाही तरी त्यांनी मुलांचा विचार करावा ,त्यांना बालपण मुक्त हसतखेळत जगण्याचा हक्क आहे, सर्वगुणसंपन्न च्या नादात त्यांना उन्हाळ्यातही विविध समर क्लासेस मध्ये अडकवून ठेवले जाते. मैदानी खेळ खेळण्याच्या वयात संगणक,भ्रमणध्वनी हातात दिल्याने डोळे कमजोर होत आहेत. तशीही आजची पिढी खूपच हुशार आहे पण म्हणून त्यांच्या वयाचा विचार करून असे जर सरस्वतीदेवीचे संस्कार करत श्रीगणेशा कराल शिक्षणाचा तर वय आणि मन दोन्ही तयार असेल त्यामुळे नवचैतन्याने झपाटतील मुलं हा विचार अवश्य करावा. सरस्वती संगीताचे आराध्य दैवत आहे. कोणाला गोड गळा लाभला असेल तर आपण म्हणतो नं सरस्वती विराजमान आहे ते अगदी खरंय. आजच्या वसंत पंचमीला याच सरस्वती देवीचे पूजन करून तिला सृष्टीचं हे मधुर संगीत सर्वत्र निनादू दे आणि सृष्टी अशीच बहरत राहू देत म्हणून आर्जव केली जाते. पाटीवर जेव्हा श्रीगणेशा होईल तेही सरस्वती देवीच्या साक्षीने तेव्हा सर्वच मुलांना शिक्षणाची गोडी लागेल अथवा लागावी हाच उद्देश जरी डोळ्यासमोर ठेवून तरी एकवेळ अवश्य जाऊन मुलांच्या प्रगतीचा विचार कराच असंच म्हणत हे स्तवन म्हणूया,”याकुन्देदूतुषारहार धवला या शुभ्रवस्त्रान्विता याब्रम्हाच्युत शंकर प्रभृतिभिःदैवे सदावन्दिता सामांपातुसरस्वती भगवति निःशेषजाढ्या पहा!!”. सौ.स्नेहा सुनिल लाडसावंगीकर नाशिक

 

सूर्यनमस्कार..!

0

‌आपल्या प्राचीन ऋषी मुनींनी (शास्त्रज्ञांनी) आपल्याला दिलेली अमृततुल्य देणगी म्हणजे सूर्यनमस्कार.!
‌आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दृष्टीने सूर्य उपासनेचे महत्व आहे.
‌सूर्यनमस्कारच्या माध्यमाने सूर्योपासना आणि त्यामाध्यमाने जीवनाचे कल्याण साधण्याचा मार्ग म्हणजे सूर्यनमस्कार होय. स्वतःचे शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी तसेच भौतिक आणि आध्यात्मिक प्रगती साधण्यासाठी सुर्यनमस्काराचे अनन्य साधारण असे महत्व आहे. निसर्गातील सजीव सृष्टी मध्ये जे चैतन्य आहे त्याचा उगम सूर्या पासून आहे असे मानले जाते. त्यामुळे सुर्योपासनेला मानवी जीवनाच्या कल्याणासाठी जोडले पाहीजे या चिंतनातून सुर्यनामस्काराची निर्मिती आपल्या थोर ऋषी मुनींनी केली आणि त्या नंतर अनेक सत्पुरुषांनी सूर्यनमस्कार हा आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग व्हावा यासाठी अनेकानेक प्रयत्न केलेत. त्याचीच फलश्रुती म्हणून आणि सूर्यनमस्कार हे सकल मानवी जीवनाच्या कल्याणाचे साधन व्हावे असे मानून, त्याचा प्रचार प्रसार सम्पूर्ण विश्वातील अधिकाधिक लोकांपर्यंत व्हावा आणि प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या आयुष्यात या साधनेच्या माध्यमाने उन्नती साधावी या हेतूने 26 जानेवारी या तारखेला जागतिक सूर्यनमस्कार दिवस साजरा केला जातो.
‌हिंदू धर्मामध्ये सूर्याला देवता मानले आहे. सूर्य उपासना ही सूर्य स्तुती किंवा गायत्रीच्या स्वरूपात केली जाते. त्यामुळे
‌”आयुप्रज्ञाबलंविर्यमंतेजतेशाच्यजायते ” म्हणजेच
‌आयु,प्रज्ञा, बल, विरता, तेज अशा शक्तींचा विकास होतो ही सिद्धता आहे.
‌ भारतात अनेक ठिकाणी सुर्यमंदिरे आहेत. सौराष्ट्रातील वेरावळ, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, नेपाळ, कोणार्क इ. ठिकाणी सूर्यमंदिरे आहेत. तसेच महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर तालुक्यात कशेळी या गावी देखील शेकडो वर्षांपासून असलेले हे सूर्य मंदिर खूप सुंदर आहे.
‌तसेच रथसप्तमीला म्हणजेच माघ महिन्यातील सप्तमी ला घराघरात सूर्य पूजा केली जाते.
‌ सूर्यनमस्कार च्या सुरुवातीला मंत्र म्हटले जातात आणि सूर्यनमस्कार घालतांना जी आसने केली जातात त्यांचा आपल्या शरीरातील प्रत्येक चक्राशी संबंध येतो. तो पुढील प्रमाणे
‌
‌ क्र. मंत्र आसन
‌
‌१.मित्राय नमः अनाहत चक्र
‌
‌२.रवये नमः विशुद्ध चक्र
‌
‌३.सूर्याय नमः स्वाधिष्ठान चक्र
‌
‌४.भानवे नमः आज्ञा चक्र
‌
‌५.खगाय नमः विशुद्ध चक्र
‌
‌६.पुष्णे नमः मणिपूर चक्र
‌
‌७.हिरण्यगर्भाय नमः स्वाधिष्ठान चक्र
‌
‌८.मरीचये नमः विशुद्ध चक्र
‌
‌९.आदित्याय नमः आज्ञा चक्र
‌
‌१०.सवित्राय नमः स्वाधिष्ठान चक्र
‌
‌११.अर्काय नमः विशुद्ध चक्र
‌
‌१२.भास्कराय नमः अनाहत चक्र.

मंत्र आणि सूर्यनमस्कार सोबत घातल्यास आरोग्य लाभते दीर्घायुषी होते, कार्यक्षमतेचा विकास होतो. आजच्या धकाधकीच्या जीवनात आहारातील विसंगतता आणि येणारं नैराश्य या मुळे बिघडणारे आयुष्य या पासून सुरक्षितता मिळते. सुर्यनमस्कारा मुळे आयु-बल-बुद्धिचा विकास होतो. मस्तक, दोन डोळे, मान, दोन हात, छाती, पोट, कंबरेचे स्नायू, मेरूदंड, दोन पाय, गुढघे, पायाची बोटे, सांधे यांना व्यायाम घडतो. पोटाचे जडत्व, अनावश्यक वाढलेला मेद, ओटीपोटातील चरबी, थायरॉईडसारखे विकार, मुलांचे फिरलेले हातपाय व काही हाडांचे दोष, गंडमाळा, घशातील विकार नाहिेसे होतात. क्षय रोगा पासून संरक्षण मिळते, मनोबलामध्ये वाढ होते. शरीरात शुद्ध रक्ताचा सम प्रमाणात संचार होतो. म्हणजेच शरीराचा,मनाचा आणि बुद्धीचा विकास होतो.
हे फायदे फक्त हिंदूंनाच होतात असे नसून जो कोणी व्यक्ती सूर्यनमस्कार घालेल त्यांना असे असंख्य फायदे होतात.
जो आपला दाता आहे, जाच्यामुळे आपली उन्नती होते जीवन सुखकर होते त्या कुणालाही देवता त्याच्या प्रति आदरभाव, कृतज्ञता व्यक्त करणे हे गैर नाही.
मग ते सूर्य, वायू, जल, आकाश, माती, असो की गंगा किंवा गाय असो त्या सर्व बाबी वंदनीय असाव्यात.
श्री सूर्यनारायण भगवान आपल्याला सर्वांना ओज,तेज,बल प्रदान करो ही प्रार्थना।

।। ओम् श्रीसवीतृसूर्यनारायणायन म:हा ।।

प्रतापगड भवानी !

तुळजाभवानी ही भोसल्यांची कुलदेवता होती. तुळजापूर आदिलशाही प्रांतात असल्यामुळे तेथे जाण्यास शिवाजीमहाराजांना नेहमी अडचण येत असे. तुळजाभवानीचे ठाणे प्रतापगडावर असावे अशी छत्रपतींची इच्छा होती. त्यांनी विश्वासू सेवकांना तुळजापुरी पाठवून तुळजाभवानीची हुबेहूब लहान प्रतिमा घडवून आणली. ही मूर्ती अष्टभुजा महिषासुरमर्दिनीची आहे. श्रीछत्रपती शिवाजीमहाराजांनी १६५६ मध्ये कोकण व घाटमाथ्याच्या सीमेवर असलेला जावळी प्रांत काबीज केला. संरक्षणदृष्ट्या या प्रदेशाची उपयुक्तता लक्षात घेऊन, सह्याद्री पर्वताच्या रांगेतील भोरप्या डोंगरावर असलेल्या पुरातन गढीच्या ठिकाणी महाराजांनी प्रतापगड या किल्ल्याची स्थापना केली. प्रतापगडाची उंची समुद्रसपाटीपासून ३५४३ फूट आहे. महाबळेश्वरपासून हा किल्ला वीस किलोमीटर अंतरावर असून किल्ल्यापर्यंत वाहनांनी जाता येते. वाडा – कुंभरोशीपासून पायी किल्ल्यावर जाता येते. पूर्वी या किल्ल्यावर असलेल्या गढीस ढोपरा किंवा गुढ्यादुर्ग हे प्राचीन नाव होते. (शिवकालीन प. सा. सं. ३ नं. २६४०) १६५६ मध्ये या किल्ल्याच्या बांधकामास सुरुवात झाली. १६५७ मध्ये किल्ला पुर्ण झाला. शिवरायांनी महाराष्ट्रात बांधलेल्या अनेक किल्ल्यांमध्ये हा किल्ला अभेद्य व उत्तम दुर्गशैलीचा मानला जातो. या किल्ल्याचे बांधकाम हिरोजी इंदुलकर याने शिवरायांचे सेनापती मोरोपंत पिंगळे यांच्या देखरेखीखाली केले. मोरोपंतांनी या पूर्वी राजगड, रोहिडा व पुरंदर या किल्ल्यांचे बांधकाम केलेले होते. गडाच्या पायर्‍या चढून गेल्यावर प्रथम पश्चिमाभिमुखी मुख्य दुर्गद्वार लागते. या दुर्गद्वाराची बांधणी शिवकालीन मराठा शैलीतील असून, दरवाजाच्या दोन्ही बाजूस व्याघ्रमुखे कोरलेली आहेत. या दरवाजातून वर गेल्यावर पूर्वेकडे तोंड असलेला भग्न दरवाजा आढळतो. या दरवाजातून शिवाजीमहाराज अफझल खानाच्या भेटीस गेले होते. अफझल बुरुजाच्या बांधकामानंतर या दरवाजाचा वापर कमी होत गेला. प्रतापगड प्रामुख्याने दोन भागांत विभागलेला आहे. वरचा बालेकिल्ला व खालच्या भागास खालचा किल्ला म्हणतात. खालच्या किल्ल्याचे क्षेत्रफळ ३२० यार्ड लांब व १२० यार्ड रुंद आहे. ही लांबी दक्षिणोत्तर असून रुंदी पूर्वपश्चिम बालेकिल्ल्याच्या तटापर्यंत आहे. किल्ल्यावर एकूण चार तलाव व दोन विहिरी आहेत. या खोदलेल्या तलावातील कातळाचा वापर किल्ल्याच्या भिंती व बुरूज बांधण्याकरिता करण्यात आला. गडावरील पायर्‍यांचे नूतनीकरण, १९५७ मध्ये पंडित नेहरूंच्या प्रतापगड भेटीच्या वेळी करण्यात आले. काही ठिकाणी मूळ उंच पायर्‍यांचे दर्शन होते. मुख्य दरवाजा ओलांडून उजवीकडे असलेल्या तलावापासून पुढे गेल्यावर बालेकिल्ल्याकडे जाणार्‍या मार्गाच्या डावीकडे श्री भवानीमातेचे मंदिर आहे.

तुळजापूरची तुळजाभवानी ही भोसल्यांची कुलदेवता होती. तुळजापूर आदिलशाही प्रांतात असल्यामुळे तेथे जाण्यास शिवाजीमहाराजांना नेहमी अडचण येत असे. तुळजाभवानीचे ठाणे प्रतापगडावर असावे अशी छत्रपतींची इच्छा होती. त्यांनी विश्वासू सेवकांना तुळजापुरी पाठवून तुळजाभवानीची हुबेहूब लहान प्रतिमा घडवून आणली. मंबाजी पानसरे व इतर जाणकार व्यक्तींना बिहार – बंगाल प्रांताच्या सीमेवर असलेल्या श्वेतगंडकी व त्रिशुलगंडकी, नद्यांच्या संगमाच्या परिसरात पाठवले तेथून दिलेल्या मोजमापानुसार काळ्या एकसंध पाषाणाची शिळा आणवून, निष्णात नेपाळी कारागिरांकरवी तुळजाभवानीची सुंदर मूर्ती घडवली. ही मूर्ती अष्टभुजा

महिषासुरमर्दिनीची आहे. या मूर्तीकरिता वापरलेला पाषाण काळा कुळकुळीत असून त्यावर सुवर्णरेखा उमटलेल्या आहेत. महाराजांनी चिरेबंदी देवालय बांधून त्यात १६६१ मध्ये अत्यंत श्रद्धापूर्वक व विधिवत मोठ्या समारंभपूर्वक मोरोपंत पिंगळ्यांच्या हस्ते भवानीमातेची प्रतिष्ठापना केली. भोसल्यांच्या परंपरागत कुलदैवताची स्थापना करून शिवरायांनी प्रतापगडावर नवे अधिष्ठान व पुण्यक्षेत्र वसवले. देवीच्या पूजेअर्चेसाठी व मंदिराच्या कायम व्यवस्थेकरिता व्यवस्थापक, पुजारी, पुराणिक, गुरव, चौघडेवाले आदींच्या नेमणुका करून त्यांना गडावर निवासस्थाने बांधून दिली. महाराजांनी अष्टभुजा आदिशक्तीस सालंकृत करून, उंची रेशमी जरीची वस्त्रे, सोन्याचा मुगुट अनेकविध अलंकार व पूजेची उपकरणी, भवानीमातेस अर्पण केली. येथे देवळात पूजापाठ, नैवैद्य व उत्सवही सुरू झाला. याचे सुंदर वर्णन सभासद बखरीत करण्यात आलेले आहे.

देवीचे देवालय प्रशस्त असून गाभार्‍याचे व रंगमंडपाचे काम शिवकालीन आहे. गर्भगृहाच्या दरवाजावर गणेशमूर्ती आहे. चार ते साडेचार फूट उंचीच्या व तेवढ्याच रुंदीच्या सिंहासनावर तुळजाभवानी विराजमान आहे. ही रेखीव, तेजःपुंज, प्रसन्न मूर्ती दोन ते अडीच फुटांची असून या मूर्तीच्या उजव्या बाजूस कोनाड्यात, एक ते दीड फूट उंचीची महिषासुरमर्दिनीची सुंदर मूर्ती आहे. भवानीमातेच्या मूर्तीसमोर प्राचीन स्फटिकाचे शिवलिंग आहे. गडाचे बांधकाम करताना मोरोपंत पिंगळ्यांना हे शिवलिंग सापडले होते. गर्भगृहात छत्रपतींचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची तलवार ठेवलेली आहे. छत्रपती शिवाजीमहाराज युद्ध मोहिमेअगोदर देवीच्या दर्शनास येत व ध्यानधारणा करीत असत. शिवराज्याभिषेकाच्या वेळी (२० मे १६७४) महाराजांनी भवानीमातेस सोन्याचे छत्र अर्पण केल्याची नोंद ऐतिहासिक साधनांमध्ये आढळते. मंदिराच्या छतावर शिशाचे आच्छादन सातारचे छत्रपती प्रतापसिंह यांच्या कारकीर्दीत (१८१८-१८३९) करण्यात आले. मंदिराच्या आवारात दोन शिवकालीन दीपमाळा असून वीज पडून त्यांचे थोडे नुकसान झालेले आहे. १९२७ मध्ये लागलेल्या आगीत या मंदिरातील कीर्तनमंडप व पुराणमंडपाचे नुकसान झाले तेव्हा सातारच्या छत्रपतींनी व फलटणच्या निंबाळकरांनी याचा जीर्णेद्धार केला. नुकतेच सातारच्या श्रीमंत छत्रपतींकडून या मंडपांचे अत्यंत सुंदर व कलात्मक नूतनीकरण करण्यात आलेले आहे.

मंदिरासमोर नगारखाना असून मंदिराच्या आवारात डाव्या बाजूस अनेक प्रकारच्या शिवकालीन तोफा ठेवलेल्या आहेत. मंदिराच्या सभोवती तटबंदीसारखी भिंत असून येथून भवानी तलाव व दख्खन बुरुजाचे दर्शन होते. डिसेंबर १९२९ मध्ये या मंदिरात मोठी चोरी झाली. या देवीचे लाखो रुपयांचे दागिने व रत्ने चोरीस गेली. या संदर्भात मुंबईच्या पठाणांच्या टोळीला भोर संस्थानात अटक करून त्यांच्यावर खटले भरून, १९३१ मध्ये शिक्षा देण्यात आली. या घटनेची हकिकत तत्कालीन ‘ज्ञानप्रकाश‘मध्ये प्रसिद्ध झालेली आहे.
छत्रपती संभाजीराजे, शाहु छत्रपती, ताराबाई व अनेक मराठा सरदारांची भवानीमातेवर नितांत श्रद्धा होती. संकटात धावून येणार्‍या या देवीच्या दर्शनास महाराष्ट्रातून हजारो भक्त या गडावर येतात. सातारच्या श्रीमंत छत्रपतींचे हे खासगी देवस्थान असून येथील व्यवस्था उत्तम ठेवलेली आहे. नवरात्रात येथे घटस्थापना, सप्तशतीचे पाठ, गोंधळ, कीर्तन, होमहवन अशा अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. शिवकालापासून चालत आलेले पूर्वापार धर्मविधी सातारच्या छत्रपती घराण्याकडून अत्यंत धर्मबुद्धीने व भक्तिभावाने पार पाडले जातात. श्री भवानी मंदिरापासून बालेकिल्ल्याकडे जाणार्‍या रस्त्यावर अनेक प्रकारची दुकाने व रहिवाश्यांची घरे आहेत. प्रतापगडाचा इतिहास कथन करणारे संस्कृती दर्शन संग्रहालय व तेथील स्लाईड शो प्रेक्षणीय आहे. बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार पूर्वाभिमुख असून या दरवाजाव्यतिरिक्त बालेकिल्ल्यास आणखी तीन दरवाजे आहेत.

बालेकिल्ला ३० ते ४० मीटर उंचीच्या तटबंदीने वेढलेला असून आत महाराजांच्या सदरेचे व इतर वास्तूंचे अवशेष आहेत. आत केदारेश्वराचे मंदिर आहे. भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंच्या हस्ते अनावरण केलेल्या श्री छत्रपती शिवाजीमहाराजांचा अश्वारूढ पुतळा लक्ष वेधून घेतो. किल्ल्यावर अफझल बुरूज, केदार बुरूज, यशवंत बुरूज, रेडका बुरूज, असे गनिमी युगतंत्रास उपयुक्त असे बुरूज आहेत. तसेच येथे अफझलखानाचा दर्गा व मुख्य दरवाजाच्या पुढे अफझल खानाच्या भेटीची जागा असून अफझलखानाचा वध महाराजांनी येथेच केला व इतिहासप्रसिद्ध युद्ध येथेच झाले. दर्‍याखोर्‍यांनी भरलेल्या गर्द वृक्षराजीने वेढलेला, श्री शिवरायांच्या कुशल युद्धतंत्राची साक्ष देणारा व आदिमाया, आदिशक्ती श्री भवानीचे अधिष्ठान असलेला प्रतापगड महाराष्ट्रातील दुर्गांमध्ये दुर्गश्रेष्ठ आहे.

प्रविण देशपांडे, ” देशपांडे – वाडा ‘ तांदळी खुर्द ता.पातुर जि.अकोला. (विदर्भ प्रदेश)

Trouble-Free asian wife Programs – The Facts

As a matter of actuality, there is not any set like Asia. And there is absolutely no you akin to Asians re issues on the heart. Want to give the relationship some like power? Perhaps an important lovable Asian female will conquer your Westerner’s attention. Produce your couple lid the lift it can take – by using classics and undeniably Cookware traits a man or woman familiar with.

So why Marry a Filipina Girl?

Of the numerous beautiful traditions frequent here, some of the most prevalent some may be representing gifts mutually, specifically to guests right from abroad. Guests right from abroad are viewed with highest eagerness and true warmth and Pakistani people take great pride to make most of the guests feel at your home and are anxious to welcome these individuals with open up arms. There is a loaded tradition of creating message or calls in each and every others’ houses. If asked to your Pakistani’s home, it might be customary to have a little reward in your coordinate, like flowers, sweetmeats, or sweets. It is considered right etiquette not to ever offered the gifts when receiving them. Equally, the gift have to be provided while using the invitees with your hands.

3. Be is the past nonetheless not the least rule. Do not make somebody interested to suit your needs if you are not interested along with your ex. However, it’s actually a misuse of time. Uniformity with the hints above can be incredibly necessary. And this isn’t feasible in case you aren’t interested alongside her. But hey, there are tons from interesting things by means of every Filipina gals.

chinese women Therefore I would like anyone to enroll in your chosen, preferred dating community. The majority of the best sites get powerful people-finder serps like yahoo for your use. This really is perfect for our purposes here. What you can do is put in a try to get a lot of women decided by his or her’s ethnicity; which, in such cases, can be Asian. This means you will can easily choose Cookware ladies that have a home in your state, your metropolis, or maybe even short minutes away of your door in the world.

End #2 – Make an impression them by way of going to their property and taking time and exerting an endeavor in order to meet the woman’s family and small talk with these products. Going to a Filipina’s house doesn’t necessarily mean you are going to get married to her or you must be seriously committed coupled with her. It is just a question of displaying respect on her behalf father and mother. You can do this regardless if you’re solely for the getting-to-know-each-other stage. It is also a bonus phase acquired you been able to attract and build union by means of her family unit.

Dating an Asian Girl – A Westerner’s Guide

If you are looking at dating Wok cookware women, I obtain lucky and understand numerous, a number of which can be within my family unit, this individual is usually married on your really successful Japanese girl. Maybe you are imagining a great Asian gal, bowing by means of her nightie on as well as a platter of eggrolls to help you sample. Maybe you had an important failed marriage when the White woman you committed was too opinionated and wouldn’t respond. So you feel a submissive little Asian could possibly be the plane ticket. Maybe you daydream in evenings with her shiatsuing you ought to paradise.

If you want to attract Asian females you ought to get anything upright, they can be not planning on you ought to aquire them aggressively simillar to a North american girl might expect. They expect someone to grown to be their friend, the confidant, and unquestionably desire to consider all of them. Do not take this task carefully guys, they are not gonna end up being seduced by every one of the tricky pickup lines. They will beginning of see the real you.

The online online dating services produce the idea lot easier to the Cookware catalog shopping brides to be at the moment and marry American adult males. These females have grown to be polite inside their functions and behavior. The petite, slender and graceful figure and looks would be the many attractive points. These types of features are ample involve them as well-liked amongst Americans. They are really emotionally and in physical form strong. The defending and loving the outdoors of American his conversation towards his partner attracts the Asian females. For any relationship to visit good way, shared attraction and comprehension will be incredibly vital. Well, this really is present between both of which. A? Exploring Simple Solutions Of https://www.theguardian.com/lifeandstyle/shortcuts/2019/jul/03/if-your-boyfired-proposes-to-you-at-gunpoint-just-say-no

Freezing ought to help remind you again at this point that I’m certainly not making reference to ALL OF THE Asian females. Will be they are kind-hearted, caring angels that’ll uphold the person, through thick and tiny? No, not surprisingly this may not forever the situation. You should know preventing a nasty girls, therefore you just focus your time and effort about the correct solutions.

You happen to be laboring within the picture that whenever you are actually no petroleum painting, no popular and sexy Wok cookware women provides you with an additional start looking, however that’s seriously not the situation. Oriental women aren’t anything want western women. They do not consider looks necessary in terms of looking for a new bride. Asiatische women can be really home oriented and have confidence in your life much time union of love. Not only will a great Asian woman come to be home to suit your needs in public areas areas, she is going to additionally appeal to you will in your own home.

पु. ल. देशपांडे

आज आठ नोव्हे. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु ल देशपांडे यांची जयंती पु.लं. चा जन्म 8 नोव्हेंबर 1919 रोजी झाला महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युसन कॉलेज पुणे व सांगली येथील विलिंग्टन विलिंग्डन कॉलेज येथे झाले महाराष्ट्राच्या साहित्यिक जडणघडणीमध्ये पुलंचा सिंहाचा वाटा आहे,त्यांनी साहित्य, चित्रपट, नाटक क्षेत्रामध्ये अनमोल कार्य केलेत. त्यांनी शिल्पचित्र, संगीत, अभिजात साहित्य, तत्त्वज्ञान अशा विषयांशी निगडित चिंतन खेळकरपणे मांडले, त्यांनी गुळाचा गणपती या चित्रपटांमध्ये अभिनय दिग्दर्शन व पटकथा लेखन केले. दूध नवरा-बायको देवकाते चित्रपटांत अभिनय केले तसेच वाऱ्यावरची वरात, असा मी असामी, अशा कार्यक्रमांमध्ये अभिनय सादर केला त्यांनी व्यक्ती आणि वल्ली गणगोत असे व्यक्तिचित्रणात्मक लेखन केले. पु ल देशपांडे यांची जीवनसृष्टी यांना व्यक्त झाली आहे त्यांच्या साहित्यात महाराष्ट्रात झपाट्याने उदयास आलेल्या मध्यमवर्ग सारख्यांच्या संवेदना निर्दशनास येतात तसेच समाजाच्या तसेच समाजाचे जिवंत चित्रण आढळून येते जीवनाच्या सर्वच क्षेत्रांना स्पर्श करणारे साहित्य पुलंनी लिखित केलेले आहे. त्यांनी जवळपास चाळीस पुस्तके लिहिली बटाट्याची चाळ,असा मी असामी, व्यक्ती आणि वल्ली,नसती उठाठेव, गोळाबेरीज हसवणूक ही त्यांची गाजलेली पुस्तके. त्याच्या आवृत्त्या निघाल्या पूर्वरंग अपूर्वाईतून त्यांनी प्रवास वर्णने लिहिली आहेत तुझ आहे तुजपाशी, अंमलदार सुंदर मी होणार, तीन पैशाचा तमाशा, फुलराणी, इत्यादी नाटके लिहिली. गुण गाईन आवडी मैत्र आपुलकी इत्यादी, व्यक्ती आहेत तसेच काही पुस्तकांचे अनुवाद सुद्धा केले. तसेच त्यांनी लिहिलेली बटाट्याची चाळ असा मी असामी यांचे एकपात्री प्रयोग सुद्धा केलेत. कवितावाचनाचे कार्यक्रमातून तर त्यांनी धमाल केली. साहित्यासोबतच महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळींशी सुद्धा त्यांचा जवळचा संबंध आलेला आहे. रवींद्रनाथ टागोर यांच्या शांतिनिकेतन आणि बाबा आमटे यांचे आनंदवन सोबत त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. महाराष्ट्राच्या सार्वजनिक क्षेत्रांमध्ये काम करणारा एक प्रतिभावंत लेखक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते त्यांच्या साहित्यिक योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना पद्मश्री, पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. तसेच पोस्ट खात्याची तिकीट काढून त्यांचा सन्मान केला आहे. अशा या महाराष्ट्राच्या सर्वसमावेशक व्यक्तिमत्वाचा 12 जून 2002 रोजी निधन झाले.
त्यांना भावपूर्ण आदरांजली..

दुरितांचे तिमिर जावो

0

 

दिवाळी म्हटली की सर्विकडे लखलखाट आपल्याला पाहायला मिळतो.

समाजाच्या सर्व स्थरातील लोकांना दिवाळी हि प्रियच.! प्रत्येक परिवार आपापल्या शक्ती प्रमाणे हा दीपोत्सव साजरा करताना आपल्याला दिसतात.

सणांचा राजा दीपावली हा अश्विन वद्य एकादशी पासून सुरु होतो. एकादशी, वसुबारस, धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलीप्रतिपदा आणि भाऊबीज असा आठवडाभर मोठ्या आनंदात चालणारा हा उत्सव ,नंतर वर्षभर मनात रेंगाळत राहतो.
शेतकरी, कष्टकरी माणसांच पीक घरात आलेलं असतं या मूळे त्यांची आर्थिक गणितं जुळलेली असतात. सर्विकडे बाजारपेठे मध्ये नेहमीपेक्षा जास्तच लागबगाट असतो, नोकरदार वर्गांचाही दिवाळी बोनस च्या निमित्ताने किसा गरम झालेला असतो. अशा विविध कारणांमुळे सर्विकडे लक्ष्मी च आगमन होतांना दिसतं. घराघरात फराळाची तयारी, घराची साफसफाई, नवनवीन कपडे – वस्तूच्या खरेदीची घाई यामुळे सर्विकडे आनंदी आनंद जाणवतो.

कुणी अंगणात एका पणतीने तर कुणी अख्खेघर दिव्यांच्या झगमगाटात सजवून लक्ष्मी च्या आगमनाचे हर्षोल्लासात स्वागत करतात.

हे सगळ होत असताना मात्र गावाच्या कोण्या एका कोपर्यातील काही घरं मात्र भाजी-भाकरीच्या काळजीत आणि दुसऱ्यांची दिवाळी पाहण्यात व्यस्त असतात .

तेव्हा मनात सहजभाव येतो कि

कुठे फराळाचा सुवास तर  कुठे फटाक्यांची आतिषबाजी आहे…,

गरीबाच्या झोपडीत मात्र भाकरीसाठी टाहो आहे..!

 

परिस्तिथीला दोन हात करत जगणारे असंख्य कुटुंब आपल्या सभोवताली असतात. गावातील अशा एखाद्या कुटुंबा सोबत आपण दिवाळी साजरी करावी का ? त्यांच्या मुलां सोबत एक दिवस का असेना आपणही आनंद साजरा करावा का.?  याचा विचार गरजेचा आहे. विकासाच्या या दुनियेत कुठेतरी एखाद्याच्या मनातला अंधार आणि आनंद आपल्या  छोट्याश्या प्रयत्नाने प्रज्वलीत केल्यास काय हरकत आहे ! अंधारा कडून प्रकाशाकडे जाण्याचा संदेश देणारा हा उत्सव. आपल्या स्वतःच्या आयुष्यातील आणि समाजतली सर्व प्रकारचा अंधार दूर करण्याची इच्छा आणि सामर्थ्य परमेश्वर आपल्या सर्वांना देवो हीच प्रार्थना.! आणि दीपावली शुभचिंतन..!

नमन माझे गुरुराया…!

श्रीगुरु पौर्णिमा अर्थात आपल्या आयुष्यातील गुरुप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा विशेष दिवस, या गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा म्हणून सुद्धा ओळखले जाते. तसे पाहिले तर आपल्या परम वंदनीय गुरुंच्या प्रति आदरभाव हा नेहमीच आपल्या मनात असावा आणि तो आपल्या व्यावहारिक जीवनात आचरणात सुद्धा आणावा.
माणसाच्या कल्याणासाठी गुरुचे महत्व अनन्य साधारण आहे हे सर्वश्रुत आहे. आपल्या आयुष्याच्या विविध कार्यक्षेत्रातील गुरू हे वेगवेगळे असू शकतात. जसे की अभ्यासातील गुरू, नोकरी व्यवसायातील गुरू, विविध कला क्षेत्रातील गुरू, खेळातील गुरू,राजकीय गुरू, अध्यात्मिक गुरू…! आपल्या इच्छित ध्येया प्रति मार्गस्थ असणारे बरेचसे व्यक्ती आपल्या आयुष्यात विचारांना, ग्रंथांना, प्रतिकांना, अनुभवांना गुरू किंवा गुरुस्थानी मानतात आणि आयुष्यभर त्या विचारावर वाटचाल करतात. आजकाल समाजात मन दुःखी करणारा एक शब्द फार प्रचलित झालेला दिसतो तो म्हणजे कुणी कुणाचा गुरू नाही आणि कुणी कुणाचा चेला नाही. जा भारताला संपूर्ण जग गुरुस्थानी पाहायचे, जा भारतात अजूनही हजारो वर्षांची गुरू शिष्य परंपरा आहे त्याच परम पवित्र भारतात हा विचार रुजू होणे म्हणजे दुर्दैवच..!
राजकीय क्षेत्रात आपण राजकीय गुरू आणि त्यांचे शिष्य अशे अनेक उदाहरण पाहिले आणि आज तागायत अनुभवतो सुद्धा आहोत. त्या खेरीज आपल्या भारतात, आपल्या समाजात म्हणा वा आपल्या धर्मात म्हणा अध्यात्मिक क्षेत्रामधील गुरु शिष्य परंपरा तर अनादी अनंत काळा पासून चालत आलेली आपल्याला दिसते. अध्यात्मिक क्षेत्रात गुरू शिष्य परंपरेला तर अनन्य साधारण असे महत्व आहे. चरा चरात वास करणारे सद्गुरू भगवान श्री दत्तात्रय महाराज यांच्या प्रेरणेने आणि अनुग्रहाने आज सुद्धा अनेक गुरू शिष्य परंपरा भारतात अविरत सुरू आहेत.सर्वदूर पसरलेल्या ह्या परंपरा आप आपल्या कार्यक्षेत्रामध्ये संपूर्ण मानवजातीच्या कल्यांणा करिता अविरत कार्यमग्न असतात.
आपल्या आयुष्यातील सर्व प्रकारच्या उन्नती करीत गुरू शिवाय पर्याय नाही. म्हणूनच अभंग, दोहे, काव्य अशा विविध साहित्यां मार्फत अनेक थोर संत सत्पुरुषांनी गुरुची महानता व आवश्यकता विषद केली आहे. आपल्या आयुष्यात गुरुस्थानी कुणाला पाहावे ती शक्ती भेटायला, आपल्याला कळायला,ओळखायला आणि तिथे आपली निष्ठा बसायला जन्म जन्मांतरीचे पुण्य हवे असतात. एखाद्या पान टपरीवर घोळक्यात उभे राहून हे माझे गुरू आहेत आणि मी यांच्या मुळे घडलो आणि आज मी जे काही आहे ते यांच्या मुळे आहे असे म्हणणारे महाभाग व्यक्तिमत्व आपल्या आजूबाजूला आपल्याला दिसतात आणि काही कालावधी नंतर तेच आप आपसात भांडताना सुद्धा दिसतात. गुरू शिष्य संकल्पना ही एवढी तुच्छ असूच शकत नाही.
गुरूंच्या इच्छे साठी, त्यांच्या रक्षणासाठी जीवाची बाजी लावणारे अनेक शिष्य आपल्या पुण्यभूमी भारतात होऊन गेलेत. तसेच आपल्या शिष्याच्या सर्व प्रकारच्या उन्नतीसाठी सर्व प्रकारची शक्ती पणाला लावणारे गुरू तर महान आहेतच त्यांची सुद्धा परंपरा भारतात कमी नाही.
आपणा सारिखे करिती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी।।
माझा शिष्य माझ्या सिद्धतेचा माझ्या पेक्षाही श्रेष्ठ तयार व्हावा या भावनेतून त्याच्या आयुष्याच्या कल्याणासाठी अविश्रांत साधना करणाऱ्या, सगुण निर्गुण रूपात वास करणाऱ्या समर्थ सद्गुरुंच्या चरणी आपण सगळे नतमस्तक होऊ या..!

नितीन राजवैद्य
मुख्य संपादक विचारवेध.

 

(image credit www.chitrapurebooks.com)